चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

फेफ Lol

' गुमराह ' - आदित्य रॉय कपूरचा डबल रोल असलेला पकाऊ चित्रपट पाहिला (Netflix)

काहीच पाहण्यासारख नाही.

संजय दत्त श्रीदेवीचा याच नावाचा होता ना एक सिनेमा ? त्यावरून एक थी हसीना आलेला उर्मिला मातोंडकरचा.

संजय दत्त श्रीदेवीचा याच नावाचा होता ना एक सिनेमा ? >>> हो. एक हसीना थी ची तशीच स्टोरी होती का? तो चांगला होता.

साडुक चा बादशा पण इंग्लिश पिक्चर वरून बनवला आहे.
शेवटी कळतं CM की PM, तिचा नवराच कट करत असतो ते

बादशाह धमाल होता. कुठूनही बघा. स्पेशली त्याचा भलामोठा क्लायमॅक्स पुन्हा पुन्हा बघायला मजा येते. शाहरुखने नजरेने फार मस्त अभिनय केलाय त्यात..

बादशाह महाटुकार सिनेमा होता, विनोद अतिशय सुमार दर्जाचे आणि बालिश
फोन वरून सीबीआय का कुणीतरी त्याच्याशी बोलतात तो सिन तर कल्पनादरिद्री पणाची कमाल आहे

पण त्यातली गाणी मस्त होती
अजूनही आवडतात ऐकायला

त्यातली आणि डुप्लिकेट या तितक्याच सुमार सिनेमातले एक शररात होने को है
जुही इतकी क्युट आणि मस्त दिसलीय ना त्यात
कितीही वेळा बघा

डोळ्यातून अभिनय हे ऐकलेले होते. पण नजरेने हे पहिल्यांदाच ऐकतोय.
डोळ्यातून लेजर रेज येत होते का त्यात ?

काल अंदाज अपना अपना बघायचा निकराचा प्रयत्न केला.
जसजसा पुढे जातो तसा एक्सपोनंशियली वाईट होत गेलाय.
एक तास चोविसव्या मिनिटाला पोचलोय (शक्ती कपूरच्या एन्ट्रीपर्यन्त)
अजून एक तास बाकी आहे Sad
अंगात थोडी शक्ती आली (आणि डॉक्टरांनी परवानगी दिली) तर उरलेला बघेन.

साडुक >>
Rofl

ज्या लोकांना शाहरूख बद्दल सहानुभूती वाटते , त्याच लोकांना त्याच्याबद्दल राग वाटू शकतो. कसे ?

- ज्या वेळी बॉयकॉट गँग शाहरूख खानच्या चित्रपटांवर बहीष्काराचे आवाहन करते, त्याला देश सोडून जा म्हणते. त्या वेळी आपल्या मनात आपोआप त्याच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होतो. मग आपण त्या Empathy मुळे त्याचा सिनेमा पाहून सुपरहिट करतो.

- पण ज्या वेळी त्याचं पातळी सोडून छळवादी कौतुक सुरू केलं जातं, मुद्दामून उकसवण्यासाठी तुम्हाला बसता उठता तुमच्या कानात त्याचं कीर्तन ऐकवलं जातं त्या वेळी ती बॉयकॉट गँग बरोबर होती असं वाटू लागतं.

काल अंदाज अपना अपना बघायचा निकराचा प्रयत्न केला.>>> बापरे.. आम्हा कॉलेज मुलींचा अगदी फेव्ह होता तो. त्यातले डायलॉग मारत मारतच मोठ्या झालो आम्ही. तर मग तुम्हाला जाने भी दो यारो ही बहुधा आवडणार नाही. तो पण अगदी कल्ट क्लासीक. शिवाय हेराफेरी, हंगामा, हलचल हे काही अमेझींग बनलेले चित्रपट.

इडीयट कॉमेडी म्हणुन प्रकार असतो, आंगीक विनोद, प्रासंगीक विनोद, प्रादेशिक वगैरे. आता अशा थीम्स वर लोक स्टँड अप करतात. सगळे प्रकार सगळ्यांनाच नाही आवडत.

बादशाह टुकार च आहे पण हसू येतं नक्की. ट्विंकल मस्त दिसते, फक्त तो पोलिसीण बाई चा नाच बघवत नाही..घाण वाटतो.

फक्त तो पोलिसीण बाई चा नाच बघवत नाही..घाण वाटतो.>>> तो जिम कॅरी च्या मास्क मधल्या डान्स ची भ्रष्ट कॉपी आहे
अनेक असे भ्रष्ट ढापु सीन्स विखुरले आहेत यात
शेवटचा सिन रश अवर मधला आहे
ज्या क्लायमॅक्स चे वर कौतुक झाले तो जसाच्या तसा निक ऑफ टाईम मधून उचललाय
नाईस गाय जॅकी चॅन यातले सिन आणि स्टोरी ढापलीय

जे ओरिजिनल आहे ते सुमार दर्जाचे आहे Happy

आशु२९च, तुमच्या यादीत इश्क (अमीर खान अजय देवगण. नायिका आठवतच नाहीएत ) हा चित्रपट मी जोडेन. आणखी मागे गेलो तर बरेच निघतील.
अंदाज अपना अपना त्या यादीत मारून मुटकून बसवता येईल.

इश्क (जुही- काजोल या नायिका) पहिला अर्धा मस्त आहे. पुढचा अर्धा वाईट.
अजय देवगण पाईपवरून चालतो तो सीन भारी जमून आलेला आहे.

भरत हो इश्क पण हाफ मस्त. १ जुना रिशी कपूर आणि राकेश रोशन चा पण १ सिनेमा छान आहे..नाव आठवत नाही, नीतू सिंघ आहे.

खिलाडी, १०० डेज सारखे रहस्य वाले पण आमचा गिल्टी प्लेजर का काय होते. खूप इंटरेस्टींग.
शिवाय विराना वगैरे Wink

दिल से बघितला.
मत -
फस्ट हाफ -
शाहरुख खान त्याचे नेहमीचे रोमँटिक क्रीप हे पात्र वठवत आहे. ह्या अमरला प्रेम व्यक्त करणे आणि सेक्शुअल हरासमेंट ह्यामध्ये फरक समजत नाही. DDLJ सारखेच.

सेकंड हाफ मात्र चांगलाच थरारक वाटला. प्रीती झिंटा मस्तच.

एकूण मजेशीर अनुभव.

DDLJ सेक्शुअल हरासमेंट??
उलट शाहरुख यासाठी भावतो की त्याच्यातला लवरबॉय अस्सल वाटतो. उगाच आदर्शवादी होत नाही किंवा उगाच कसेही वागा आपण हिरो आहोत तर पोरगी आपल्यालाच पटणार असेही नसते. म्हणून त्याच्याशी स्वताला रीलेट करता येते..

बादशाहमध्ये बरेच सीन्स आहेत उचललेले..
पण त्याने मनोरंजनावर शून्य फरक पडतो. ते भरपूर व्हायचे ते होतेच.
हवे तर लेखक दिग्दर्शक यांचे श्रेय नाकारू शकतो.
शाहरुख मात्र तितकीच धमाल उडवतो. ते त्याचेच श्रेय आहे Happy

जसे बर्फी कितीही का चोरला असेना. रणबीर आणि प्रियांकाच्या अदाकारीला दाद द्यायलाच हवी.

घरचे सोनाली कुलकर्णी चा व्हिक्टोरिया बघत होते
मी अधून मधून बघत होतो, त्यात एकदा सोनाली अंधारात जाताना दिसली त्यामुळे मला वाटलं तीच भूत आहे Happy

हे बोलून दाखवल्यावर मला घालवण्यात आलं तिथून Happy

Pages