चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ना भूताचे पिक्चर बघून भीती वाटते, ना इमोशनल सीन्सला रडायला येतं,ना ध्क्केपटांनी धक्के बसतात, ना रहस्यपटातल्या रहस्याची उकल उत्तेजित करते.

>>>> आचार्य, मग चित्रपट पाहायचेच कशाला Wink

दिल से पाहिला नाहीये. पण दिल से गाणं खूप आवडते आहे.
बंधन है रिश्तों में
काटों की तारें हैं
पत्थर के दरवाज़े, दीवारें
बेलें फिर भी उगती हैं
और गुच्छे भी खिलते हैं
और चलते है अफ़साने
किरदार भी मिलतें हैं

आचार्य, मग चित्रपट पाहायचेच कशाला >>> Lol

काही लोक गोदोची वाट बघत असतात. काही लोक क्रांतीची वाट बघत आहेत.
तर काही लोक त्याची वाट बघत होते, जो दक्षिणेतून येईल, भारताचा सम्राट होईल आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारत जगज्जेता होईल.
प्रत्यक्षात तो आला पश्चिमेतून, आणि त्याचे नावही शायरन नव्हते, तो शायही नव्हता आणि पळून ही जात नव्हता.... पण आज भारत विश्वगुरू झाला.

अगदी तस्संच एखादा सिनेमा येईल ही वेडी आशा असते.

शायराना अंदाज असलेला तो शायरन असा काहीतरी अर्थ असेल त्याचा. नसेल तर आपण दडपून देऊ. अर्थही आणि अंदाजही. त्यात काय! Proud

धन्यवाद फुरोगामी आणि हसलेले माबोकर्स Happy
--------
दिल से गाणं खूप आवडते आहे. >>+1
'ऐ अजनबी तू भी कभी' हे पण . हृदयाचा ठाव घेणारी गाणी आहेत. सिनेमापेक्षा गाणी वेधक आहेत.

अंजली सिनेमा खूप लहानपणी बघितलेला. खूप तरल आहे.

---------

M3GAN बघितला Peacock वर. बरा आहे. हॉरर सायफाय आहे. शेवटी शेवटी झपाटलेलातल्या बाहुल्याची आठवण येते, फक्त ओम फट् स्वाहा ऐवजी self-evolving हाय एन्ड AI technology आहे.

यू tube वर १९९८ चा अंजली चित्रपट पाहिला. रेवती, रघुवरण आणि बच्चे कंपनीचा. डोळ्यातून इतके पाणी आले की सांगता येत नाही. अतिशय सुंदर सिनेमा.
>>>>

खूप लहानपणी पाहिलेला. छान सिनेमा आहे. खरेच पाणी काढतो डोळ्यातून

आमची अवस्था टणक, नीब्बर शेंगदाण्यासारखी झालेली आहे. ना भूताचे पिक्चर बघून भीती वाटते, ना इमोशनल सीन्सला रडायला येतं,ना ध्क्केपटांनी धक्के बसतात, ना रहस्यपटातल्या रहस्याची उकल उत्तेजित करते. ते इतके घाऊक पाहीलेत की आता रोबोट मधे रूपांतर झालंय. आता तर जय संतोषी मा, लिओनी, खलिफा पट एकसमान तटस्थतेने पाहता येतात. ईक्यू उणे १७३ च्या खाली जाऊन गोठला आहे कायमचा.

>>>> Lol मीही याच मार्गावर आहे.
तुका म्हणे आता
उरलो पिसं काढण्यापुरता

दिल से मला पण खूप आवडतो सामो.त्याला म्हणावं तितकं कौतुक मिळालं नाही.पण सुंदर पिक्चर आहे.
××××××××××

कारण तो पिक्चर फार उच्च दर्जाचा होता. सामान्य पब्लिकला थोडा अवघड होता.

दिल से - तेव्हा मलाही खूप आवडला होता.
आता परत बघायला हवा.

------------

'ज्युबिली' वेबसिरीज पाहिल्यानंतर त्या काळातले काही जुने सिनेमे पुन्हा लागोपाठ पाहिले. मधुमती, नौ दो ग्यारह, आरपार, कागज के फूल. आणखी काही क्यूमध्ये आहेत.
प्रत्येकातली काही ना काही एलिमेन्ट्स ज्युबिलीमध्ये अगदी नकळत आणि बारकाईने विचार करून वापरली आहेत. ती शोधायला /ओळखायला फार मजा आली.

तेव्हांपासून आजवर कधीही बीवी और मकान आणि बनवाबनवी इतके एकसारखे कसे याबद्दल त्यांनी अवाक्षरही काढलेले नाही
>>
कुठल्याशा मुलाखतीत आपण कसे लहानपणा पासून ऋषीदांना ओळखायचो, त्यांना असिस्ट करायचो, त्यांना आपण या सिनेमाचा रिमेक करायचा प्रस्ताव कसा दिला, त्यांनी कसं करू नको, माझ्यासारखे पैसे बुडतील, म्हणून विनवलं, पण आपल्याला कसा आपल्या मराठीकरणावर विश्वास होता, अन् तो कसा सार्थ ठरला वगैरे फुशारक्या मारल्या होत्या...

नशीब हेच की अशोक, लक्ष्या अन् वसंत सबनीस यांना फ्री हॅण्ड दिला होता अन् खूप सारे पंचेस हे त्यांच्या कोलॅबरेशन मधून आले हे कबूल केलं होतं...

त्यांना आपण या सिनेमाचा रिमेक करायचा प्रस्ताव कसा दिला >>> हे त्यांनी कधी सांगितले ? माझ्या पाहण्यात ही मुलाखत आली नाही. हे खरे असेल तर आजतागायत हा माझा शब्द चुकीचा आहे. त्याबद्दल माफी !

पण सिनेमा आला तेव्हां त्याच्याशी संबंधित एकूण एक मुलाखती वाचलेल्या होत्या. त्यात बालगंधर्व मधे फिरताना यावर सिनेमा बनू शकतो असेच सर्वांनी एका सुरात सांगितले होते.
https://www.loksatta.com/manoranjan/marathi-movie-ashi-hi-banwa-banwi-wi...

दिल से मधली गाणी च फक्त मस्त होती आणि आहेत

शेवटी रेहमान ची जादू Happy

बाकी बऱ्यापैकी गंडलेला सिनेमा होता

मनीषा पूर्ण सिनेमाभर अवघडून वावरली आहे
प्रीती झिंटा च थोडीफार तिच्या आवाक्यातील हिट रोल करते
अन्य कलाकारांबद्दल बोलायला नकोच
लगेच नैतर माझ्यामुळे हरबरा टरारून वर व्हायचं Happy

एन्ड तर अशक्य फिल्मी
चला सुटलो एकदाचे म्हणून सिनेमागृहाच्या बाहेर आलेले आठवतंय (लहानपणी Happy )

दिल से आला तेव्हां मी आठ महीन्यांचा होतो. शक्ती आला तेव्हां शाळेत होतो.
कुछ कुछ होता है च्या वेळी शाळेत नव्हतो. ऐश्वर्या माझी क्रश होती (सीक्रेट)
सोनालीवर पण मरायचो. सलमान माझ्या आजोबांचा मित्र.
ओळखा माझं वय.

आशुचँप+१
मलाही नव्हता आवडला दिल से. गाणी मात्र प्रचंड आवडतात.

मनीषा कोईरालावरून आठवलं. काही दिवसांपूर्वी अकेले हम अकेले तुम लागला होता तेव्हा मला साक्षात्कार झाला की हा क्रेमर व्ह. क्रेमरवरून घेतलाय. मी बऱ्याच वर्षांपूर्वी बघितला होता तेव्हा क्रे.व्ह.क्रे. नव्हता बघितलेला. मनीषा कोईरालाने मेरिल स्ट्रीपची सरळसरळ नक्कल केली आहे त्यात.

आशुचँप+१
मलाही नव्हता आवडला दिल से. >>>>> +१

मनीषा कोईरालाने मेरिल स्ट्रीपची सरळसरळ नक्कल केली आहे त्यात.>>> मनीषा ची कारकीर्द बॉम्बे, 1942 अ लव्ह स्टोरी आणि खमोशी इतक्यातच संपते
हेच सिनेमे वारंवार पहावेत, यातली मनीषा आणि बाकी सिनेमातली यात अफाट फरक आहे
गुप्त, अग्निसाक्षी आणि लज्जा हे होनरेबल मेंशन
मन, गुड्डू, महाराजा वगैरे तर अररारा

दिल से मधील गाणी नुसती गाणी नाही तर पिक्चरचा आत्मा त्यात सामावला आहे.
सतरंगी रे मध्ये प्रेमाच्या सात स्टेज दाखवल्या आहेत. त्यानुसार शब्द आहेत. त्यानुसार कोरिओग्राफी आहे. त्यानुसार कपडे आहेत. गुगल केले तर याबद्दल माहिती मिळेल. नंतर शोधतो. पण कमालीचे ब्रिलियंट वर्क आहे. गुलजार, रहमान आणि मनीरत्नम या त्रिकुटाबद्दल कमालीचा आदर वाटलेला ते बघून.

शाहरुख त्यात अस्सल शाहरुख आहे. त्याच्या आणि मनीषाच्या पहिल्या रेल्वेस्टेशन चायवाल्या सीनवर स्वतंत्र लेख होईल. कमालीचा रोमांटिक सीन Happy

भोआकफ

बाटलीतला जीन मोकळा केलात
आता शिसारी येईपर्यंत वाचत राहा यांचं दळण

आशूचॅम्प का उगाच वाकडी पोस्ट टाकून वेगळे वळणं द्यायचा प्रयत्न करता आहात. Runmesh पलीकडेही जग आहे.
असो, पुन्हा पुन्हा तेच सांगण्यात अर्थ नाही. एंजॉय !

दिल से साठी +1
जेव्हा आलेला चित्रपट तेव्हा प्रचंड आवडलेला. पण आता पाहिला तर वाटते काहीही काय चाललेलं. शाहरुख पत्रकार असतो तो मध्येच रेडियो वर जाऊन ए ajnabi काय गायला लागतो..पण गाणी बेस्ट आहेत.

असे बरेच चित्रपट आपल्या लहानपणी आवडलेले असतात आणि नंतर आपल्याला वाटते अरे कसा आपल्याला हा पिक्चर आवडला! दिल तो पागल है मला शाळेत असताना कितीतरी आवडलेला आता पाहिला तर cringe fest... Swades चांगला होता पण काही काही ठिकाणी गंडलेला वाटतो. गायत्री जोशी मला खूप आवडते पण She sticks out like a sore thumb. तिचे ते सरळ केस आणि परीट घडीची साडी गावाच्या शाळेत शिकवताना. ती शहरातून आलेली आहे हे मान्य करून ही हे जरा जास्तच वाटते. शाहरुख जेव्हा गायत्री la सांगतो की तो कावेरी अम्मा ला घेऊन जाणार आहे आणि कावेरी अम्मा मागे अंधारात उभी राहून हे ऐकते तेव्हा मागे ते ट्यूब लाईट फडफड करत लागतात ते कॉमेडी वाटलेले परत एकदा बघताना.. आता जरा हे चित्रपट बाळबोध वाटतात. तेव्हा मात्र भयंकर आवडलेले..

दिल से मणीरत्नमचा सिनेमा म्हणून गंडलेला होता. जनरली मनिरत्नमच्या सिनेमातले घटक - कथा, पटकथा, संवाद, गाणी, संगीत, छायाचित्रण, अ‍ॅक्टींग सगळेच वेगवेगळे बघितले तर उच्च असते पण हे सगळे घटक एकत्र येऊन बनलेले रसायन त्यापेक्षा बर्‍याच वरच्या पातळीवर असते. सिनेमा बघितला कि एकापेक्षा अधिक प्रकारे भारावून जायला होण्याचे कारण हे असते.
दिलसे मधे नेमका हा मुख्य भाग मिसिंग आहे. इंड्यीव्हिज्यूअली सगळेच ब्रिलियंट आहे पण तरीही एकूण भट्टी जमली नाहिये हे फिलिंङ घेऊन बाहेर येतो.

https://youtube.com/watch?v=R8DzvCQerMY&feature=share7

वरचा व्हिडिओ जरूर बघा Happy

The song is symbolic and it portrays the seven stages of love that have been put across in Arabic poetry. These stages are – dilkashi (attraction), uns (attachment), ishq (love), akidat (trust), ibadat (worship), junoon (madness), and finally maut (death) Happy

असामी, करेक्ट!
मनमोहन, गायत्री जोशीसाठी +१
सोनाली कुलकर्णी चालली असती तिथे. तिने चांगलं केलं असतं काम.

बालपणीचा काळ सुखाचा. त्या वेळी आवडलेले सिनेमे आत्ता पाहताना विचित्र वाटतं पण नॉस्टॅल्जिक व्हायला होतं म्हणून सगळे माफ करून आपण पाहतो.
या कारणासाठीच बजरंगी भाईजान ची पारायणं केली आहेत. Lol

एकूण भट्टी जमली नाहिये हे फिलिंङ घेऊन बाहेर येतो.>>>
अगदी अगदी
मला इतक्या परफेक्ट मांडणी करता आली नसती कधी
पण मला असंच काहीसं म्हणायचं होतं Happy

त्या वेळी आवडलेले सिनेमे आत्ता पाहताना विचित्र वाटतं पण नॉस्टॅल्जिक व्हायला होतं म्हणून सगळे माफ करून आपण पाहतो.>>> हो मी सलमान आणि काजोल अरबाज आणि धर्मेंद्र यांचया एक लांबलचक नाव असलेला सिनेमा खूप आवडीने बघायचो

आता वाटतं काय म्हणून इतका नॉनसेन्स सिनेमा आपण इतक्यादा बघितला असेल

त्यातली गाणी फार मस्त होती

Pages