चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अदिति, असामी Happy मी मे मधे अर्धी बघितली होती फ्लाइट मधे. मग नंतर अनेक ठिकाणी शोधली पण सापडली नाही. डिस्ने प्लस मधे याच्या पुढचा भाग आहे असे वाचले. पण पहिलाच भाग पूर्ण बघितला नव्हता म्हणून ती चेक केली नाही. यावेळेस पुन्हा गेलो तेव्हा मग लगेच उरलेली पाहिली.

फ्लाइट्स मधे सहसा नवीन रिलीज आधी येतात स्ट्रीमिंग वर यायच्या आधी. त्यामुळे २-३ महिन्यांत आली पाहिजे नेफि, प्राइम किंवा डिस्नेवर.

प्राण अनेक वर्षांनी आपल्या जुन्या घरी येतो त्याच वेळेस विनोद खन्नाही अनेक वर्षांनी तेथे काहीतरी आठवण आल्यासारखा येतो >> ते पुढे उभे आहेत ते नेहरू. आमच्या जावयांचा फोटो काढला तेव्हा ते ही होते म्हणे तिथे!

आज चक्क आदिपुरूष बघितला. मैत्रीसाठी काही गोष्टी कराव्या लागतात.
हा रामायण नाही तर रामायणाचे fanfiction आहे.
तसेच बघताना "spot the movie' it's stolen from" हा खेळ खेळता येईल.
आम्ही Harry Potter, LOTR, GOT, Mission Impossible, Matrix, The Hobbit, Apes आणि बाहुबली हे ओळखले. तुम्ही कोणते ओळखले तेपण सांगा.

हे जरा "प्राण अनेक वर्षांनी आपल्या जुन्या घरी येतो त्याच वेळेस विनोद खन्नाही अनेक वर्षांनी तेथे काहीतरी आठवण आल्यासारखा येतो" च्या वळणावर आहे >>> Lol

वाळवीमधली विनोदनिर्मिती एंटरटेनिंग आहेच. योगायोगामुळे फार्सिकल कॉमेडी झालीय इतकेच. Happy

वाळवी चांगलाच आहे.
निष्पाप माणसे पटापटा मरताहेत आणि तरीही आपल्यासह अख्खे थिएटर नुसते खिदळतेय हा अनुभवच कमाल होता.
असे पिक्चर थिएटरलाच पब्लिक सोबत बघायला मजा येते..
ते लूपहोल वगैरे घरी आल्यावर सोशलमीडियावर पोस्ट टाकताना आठवायचे असतात. पिक्चर बघताना एन्जॉयच होतो.

जड़ चेतन गुन दोषमय बिस्व कीन्ह करतार ।
संत हंस गुन गहहिं पय परिहरि बारि बिकार॥
तुलसी देखि सुबेषु भूलहिं मूढ़ न चतुर नर ।
सुंदर केकिहि पेखु बचन सुधा सम असन अहि ।।

ते लूपहोल वगैरे घरी आल्यावर सोशलमीडियावर पोस्ट टाकताना आठवायचे असतात. पिक्चर बघताना एन्जॉयच होतो. >> +१

आज the flash चित्रपट पहिला. उत्तम चित्रीकरण , अँक्शन, सर्व जुने नवे चेहरे आणि flash ची गोष्ट सर्व जुळून आले आहे. लांबी थोडी जास्त वाटते कारण डायरेक्टर ला खुप काही सांगायचंय... कथेला एक भावनिक पदर ही आहे.. तो शेवटी डोळ्यात पाणी आणतो. ..सिनेमा आवडतो पैसे वसूल होतात...

मी पण फ्लॅश बघणार होतो. पण मित्रांनी आदिपुरुष ठराव केल्याने तो बघितला. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा.
सिनेमा हिंदुत्ववाद्यांना गंडवून पैसे उकळायला काढला आहे, आणि तो प्लॅन यशस्वी दिसतो. एकदम ब्येक्कार सिनेमा. तो पण तीन तास !
एक लहान मुलगा सर्वांच्या मनातले बोलत होता. मध्यंतर झाल्यावर तो सतत "बाबा घरी चला" हट्ट करत होता. राम रावण युद्ध सुरू झाल्यावर रावण मेला असे वाटते आणि सगळी पात्रे हसत आहेत असा शॉट आहे. पण एकदम रावण राक्षसी हसू लागतो, तो मेला नाहीये. त्यावर मुलाने "अजून संपला नाही ?" अशी भयचकित प्रतिक्रिया दिली.

> सिनेमा हिंदुत्ववाद्यांना गंडवून पैसे उकळायला काढला आहे, आणि तो प्लॅन यशस्वी दिसतो.
हा एक फेल सेफ फॉर्म्युला आहे सध्या. सेक्स आणी व्हायोलंस तर ओ टी टी वर गेला. मग हेच राहिले.
'काश्मीर फाईल्स', केरला स्टोरी', आदिपुरुष', '७२ हूरेन' , 'अजमेर स्टोरी'

फ्लॅश बघून आलो काल.
ठीकच होता. २० २५ मिनिटं कमी चालला असता. डीसी मूव्ही सिरियस असतात म्हणून विनोदाची फोडणी टाका सांगितलं होतं बहुतेक. क्रिंज नाही जोक्स पण सुरवातीला जरा त्यात ढेपाळला मूव्ही. बेरी आईला वाचवायला मागे जाणार आणि काळ लिनियर नाही त्यामुळे काय तरी गफला होणार आणि... इ. जे थिएटर मध्ये जाण्याआधी मनात होतं तितकं आणि तितकंच होतं. त्यातही मला प्रश्न पडलेत. आत्ता नाही लिहीत मग स्पॉयलर सहीत बोलू तेव्हा विचारेन. बाकी स्पे. इ. असतात तितके चांगलेच असतात. ओव्हरोल dceu मध्ये काही फार घडलं नाही. बघा, नाही बघितलात तरी ठीकच.
बेरीच्या खोलीत हनुमानाचे चित्र एक दिसले. सुपरमॅन/ वूमन कडे हनुमान दिसला असता तर सूर्य कनेक्शन ने समजू शकलो असतो. बेरी आणि हनुमान काय सबंध लागेना मला. जाणकारांनी प्रकाश टाका.

>>तिला पाहुन मला पुलच्या बिगरि ते मॅट्रिक मधल्या गोदीचीच आठवण झाली.

साक्षात ढ असलेली गोदी गुळवणी चितळे मास्तरांच्या वर्गात होती, राम्या गोगटे च्या बॅच ला.

बेरी आणि हनुमान काय सबंध लागेना मला. जाणकारांनी प्रकाश टाका. >> चित्रपट अजाबात माहीत नाही, पण तरी अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरुः हा न्याय लावायचा झाला तर - हनुमान ज्याचा सेवक, तो राम, त्याचा पुढचा अवतार कृष्ण, तो गोकुळात वाढला, तिथे दूधदुभतं भरपूर, त्या दुधाच्या दह्याच्या ताकाच्या लोण्याचं तूप कढवल्यानंतर राहिलेली जी बेरी असते, तिचं नाव आपल्याला दिलं आहे ह्या जाणिवेनं बेरीच्या घरात कायम हनुमान स्मरले गेले असावेत.

ह.पा. Lol

धनवन्ती प्लस वन. किती छान संस्कृत वाक्य आहे. त्याचा पण अर्थ जरा सांगा. मला बदरी चक्र तुला बदरी वृक्ष असे आहे का? छानच प्रतिसाद.

हपा Proud

अमा, त्यामागे एक गोष्ट आहे, कदाचित माहीत असेल. एका घरी एक पाहुणा आणि त्याचं कुटुंब येऊन राहतं. यजमान नवर्‍याला वाटतं बायकोच्या माहेरचा कुणीतरी आहे. बायकोला वाटतं कुणीतरी सासरचं असावं. पण सुरुवातीला कुणीच नीट विचारत नाहीत. मग शेवटी ते घरून निघायच्या वेळी नवरा बायकोत चर्चा होते आणि लक्षात येतं की कुणालाच आठवत नाहीये की ह्यांना आपण कुठे बघितलं आहे. मग शेवटी ते त्याला विचारतात, की हूज हू / आपला नक्की संबंध काय? तेव्हा तो पाहुणा म्हणतो -

अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरु: |
बादरायण संबंधात् यूयम् यूयम् वयम् वयम् ||

'आमच्या बैलगाडीचं चाक बोरीच्या लाकडाचं (बदरी) आहे, तुमच्या घराच्या अंगणात बोरीचं झाड आहे (बदरीतरु:). अशा प्रकारे आपला बादरायण (= बदरी रिलेटेड, राम - रामायण, तसं बदरी - बादरायण) संबंध आहे. यावरून पुढे 'बादरायण संबंध' हा शब्दप्रयोग प्रचलित झाला.

ता. क> ओह! केकू, तुमचा प्रतिसाद आत्ता पाहिला.

धनवन्ती >> Lol

ह पा Lol

Lol

In the tall grass इंग्रजी, नेटफ्लिक्सवर.
एक प्रेग्नंट स्त्री आणि तीचा भाऊ हायवेवर कारमधे जात असताना बाजूच्या उंच गवतातून लहान मुलाचा मदतीसाठी आवाज येतो..दोघेही गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करून गवतात शिरतात आणि हरवतात..चकवा,भ्रम, चित्रविचित्र आवाज खसखस..किती दिवस किती रात्रं किती माणसं त्या गवतानं भरगच्च भरलेल्या जागेत असतात....
हॉरर,थ्रीलर, भीतीदायक सिनेमा.

True spirit .,इंग्रजी, नेटफ्लिक्सवर.
एका सोळा वर्षाच्या ऑस्ट्रेलियन मुलीला जगातील सर्वात लहान खलाशी व्हायचे असते, ती प्लान करून एकटी समुद्रसफरीला निघते..मोहिम पूर्ण करताना येणारी वादळं,पाऊस, वारं न वाहणं आणि अडचणी पार करून डेस्टिनेशन ला कशी पोचते पहा सिनेमात.

Skater girl, हिंदी. नेटफ्लिक्सवर.
राजस्थान च्या एका गावातील एक टिनेज मुलगी ,आपले स्केटबोर्डिंगचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी,कुठल्या अडचणीतून जावे लागते,त्यातून ती कशी मार्ग काढते..छान आहे सिनेमा.. फिल गुड, इन्सीपीरेशनल.

आदीपुरूष मधे संत ज्ञानेश्वरांचा कॅमिओ आहे ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. ते संत ज्ञानेश्वर नसून ती सीता झालेली क्रिती सेनॉन आहे हे पहिल्या खेळाला गेलेल्या काही चाणाक्ष प्रेक्षकांनी सांगितले.

मृणाली, तुझा एक(इथे लिहिणं चालू असूच दे, अजून एक) वेगळा धागाच काढायला हवा.छान पिक्चर बघतेस तू.

आदिपुरुष मधला 'भारत की बेटी' हा उल्लेख खटकला होता. This wont end well. अंदाजाप्रमाणेच नेपाळ ने आक्षेप घेतला आहे. त्यावर मनोज मुंतशीर यांनी आपले व्हॅट्सॅपीय भुगोलाचे ज्ञान पाजळून आणखी घोळ घातला ! धन्य ते मोदीभक्त !

ह पा, too good. खूप वर्षांनी वाचले सुभाषित! मला फार आवडतात तुमचे प्रतिसाद Happy

ह पा
दंडवत Lol

आप कूच व्हाट्सअप फॉरवर्ड क्यू नय लिकते जी.

Pages