मायबोलीकरांच्या सहभागाने आणि प्रोत्साहनामुळे यंदाचा मराठी भाषा गौरव दिन सोहळा दणक्यात साजरा झाला. एकूण ४ उपक्रम, ५ खेळ आणि साहित्यिकांच्या स्मरणार्थ विशेष आमंत्रित लेख यांसह भरगच्च कार्यक्रम २५ जुलै ते १ मार्च ह्या दिवसांत घेतले गेले. मराठी भाषेच्या प्रेमाखातर अनेकांनी उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रमाला शोभा आणली.
यंदाच्या उपक्रमांपैकी स.न.वि.वि. हा उपक्रम सर्वात जास्त लोकप्रिय उपक्रम ठरला. मायबोलीची पत्रपेटी उघडताच मायबोलीकरांनी लिहिलेली काही गमतीशीर, काही हृद्य, काही कल्पक, काही वैचारिक आणि काही धमाल पत्रे वाचायला मिळाली. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या उपक्रमात लिहिल्या गेलेल्या रसग्रहणामुळे अनेक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची माहिती झाली. एका चित्रपटावर दोन वेगळ्या व्यक्तींनी लिहिलेल्या रसग्रहणांत त्या चित्रपटाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पडला, हे विशेष म्हणून नमूद करावेसे वाटते. पाउले चालती या उपक्रमाला कमी प्रतिसाद मिळाला असला तरी सुंदर सचित्र धागे वाचायला मिळाले. किलबिल किलबिल चित्रे डोलती या उपक्रमात आपल्या छोट्या दोस्तांची नावीन्यपूर्ण चित्रकला बघायला मिळाली. आपल्या कानावर पडणार्या गाण्यांची कल्पना ही बालमनावर कशी चितारली जाते ह्याचे प्रत्यंतर त्यांनी काढलेल्या चित्रांत आले.
म्हणींचा खेळ, शब्दखेळ, शब्दशोध, शीघ्रकविता आणि मुद्रितशोधन या बाबतीतल्या सगळ्या खेळांना उत्तम प्रतिसाद लाभला. या खेळांच्या निमित्ताने मायबोलीवर आता म्हणींचा आणि शब्दकोड्यांचा मोठा खजिना तयार झाला आहे असे म्हणावयास हरकत नाही. 'शब्दशोध' या खेळासाठीचे कूटप्रश्न कुमार१ आणि मानव पृथ्वीकर यांनी रचले होते. 'स्मरण साहित्यिकांचे' या उपक्रमासाठी स्वाती_आंबोळे व टवणे सर यांनी जी .ए. कुलकर्ण्यांच्या कथांचे अंतरंग उलगडवून दाखवले. साजिरा यांनी काफ्का या महत्त्वाच्या कथा-कादंबरीकाराची ओळख मायबोलीकरांना करून दिली. या सर्वांचे मनापासून आभार. वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल, तांत्रिक साहाय्याबद्दल आणि दिलेल्या प्रोत्साहनासाठी मायबोली प्रशासनाचे आभार.
ह्या संपूर्ण सोहळ्यात भाग घेणार्या, चर्चा करणार्या, वेळप्रसंगी योग्य त्या सूचना करणार्या, प्रोत्साहन देणार्या आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणार्या सर्वच मायबोलीकरांचे आम्ही ऋणी आहोत. आपल्या मायबोलीचा हा उत्सव दर वर्षी वृद्धिंगत होत राहो अशी इच्छा व्यक्त करून हे संयोजकांचे मनोगत संपवतो.
- अस्मिता., किल्ली, छन्दिफन्दि, तेजो, भरत., हरचंद पालव
ओके. हे पडद्यामागे लिहिलं
ह पा +१.
-----
ओके. हे पडद्यामागे लिहिलं होतंच. पुस्तकांची नावं शोधायची कोडी तेजो यांनी रचली होती. हे काम प्रचंड किचकट असणार.
छन्दिफन्दि यांनी मायबोलीवर येताच पहिल्याच वर्षात उपक्रमात संयोजक म्हणून भाग घेतला. मला त्यासाठी धीर गोळ करायला १३ वर्षे लागली.
किल्ली तर काय, उत्साहाचा कायम वाहता झरा! दोन लहान ले करांना सांभाळून त्या प्रत्येक वेळी हौशीने संयोजनांत सहभागी होतात , याचं प्रचंड कौतुक आहे.
अस्मितांशी संवाद अजूनही कायम आहे , वाढता आहे. मला वाटतं आम्हां दोघांनाही ऐकून घेणारे कान मिळाले आहेत. मला आणि ह पां ना अधूनमधून मायबोलीबाहेरही एकमेकांची आठवण येते.
संयोजनाचा अनुभव फारच छान होता. मला सहलींची / प्रवासाची फार आवड नाही. नोकरीत असताना आमच्या सेक्शनने एकदा माथेरानची सहल केली होती. आम्ही नेरळहून माथेरानला चालत जाऊन चालत परत आलो होतो. मध्येच आलेल्या पावसात भिजलो होतो. कपडे तसेच अंगावर वाळू दिले होते. शारीरिक दृष्ट्या प्रचंड दमायला झालं , एकीने चपला काढल्या, त्या परत घालता येईनात इतके पाय सुजले होते. पण ऑफिसच्या रूटिनचा सगळा शीण, कंटाळा पार पळून गेले होते. तसं काहीसं संयोजन करून झाल्यावर वाटलं. आणि मला त्या वेळी असं काही तरी करायची खूप गरज होती.
---
आमच्या प्रत्येक घोषणेत एक वाक्यांश आला आहे. हे सुरुवातीला आपसूक आणि मग लक्षात आल्यावर ठरवून झालं. तेव्हा खूप हसलो होतो. बघा कोणाला कळलंय का.
अॅडमिन / वेमा देवा आमच्या या प्रतिसादांना व्रताचं उद्यापन समजू नका. पुढच्या वर्षीही हा सोहळा ठेवा. _/\_
हृद्य मनोगत, हर्पा आणि भरत!
हृद्य मनोगत, हर्पा आणि भरत!
सगळ्या संयोजकांचं नव्याने कौतुक!
आमच्या प्रत्येक घोषणेत एक
आमच्या प्रत्येक घोषणेत एक वाक्यांश आला आहे.
>>>>>
आठवलं. दूरदर्शनवरील बातमीदारासारखं अतिशय कृत्रिम वाक्य होतं.
हर्पा, खरंच.
भरत, मनोगत आवडले. काही ठिकाणी अगदी अगदी झाले.
सहलीच्या भागा बद्द्ल -
व ते गोंडस बाळ वडिलांना सुरक्षित सुपूर्त केल्याचं समाधान आणि प्रवासातला आगळावेगळा 'क्रेझी' आनंद. एवढं सगळं मिळालं. 
मलाही आईस एज-१ मधे एक मॅमथ, एक स्लॉथ, एक सेबरटूथ वाघ, एक रॅन्डम खार, मधेच विश्वाच्या अंतापर्यंत खायला लागली तर पुरावीत म्हणून तीन कलिंगडं सांभाळणारे डोडोज्.... ही कळपाची अनुभूती
ही टीम मिळाली तर डोळे मिटून संयोजनात पुन्हा उडी मारेन.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी

छान लिहिलंय भरत आणि अस्मिता
संयोजनात मजा तर येतेच.
सगळ्यात जास्त brainstorming स्पर्धा आणि उपक्रम ठरवताना होतं. त्यात नावीन्य कसं आणता येईल ते पाहणे, रोचक आणि माबोकरांचे लक्ष वेधून कसे घेता येईल आणि मजा येईल हे सहसा मुख्य निकष असतात.
ह पा, भरत मस्त पोस्ट्स.
ह पा, भरत, अस्मिता, किल्ली मस्त पोस्ट्स.
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
अॅडमिन / वेमा देवा आमच्या या प्रतिसादांना व्रताचं उद्यापन समजू नका >>
चला तर मग, भरत यांनी सांगितलेला वाक्यांश शोधूयात
लिहा पडद्यामागच्या गोष्टी,
लिहा पडद्यामागच्या गोष्टी, आम्हाला वाचायला मजा येतेय. त्यानिमित्याने सुप्त गुणही समोर येतायेत, आदर वाटतो सर्वांचा.
>>>>> +१
यंदा कुठलीही अधिकृत घोषणा नसताना, कुणीही संयोजक नसताना काही माबोकरांनी उत्स्फूर्तपणे काही उपक्रम सुचवले आणि अन्य माबोकरांनी ते उचलून धरले. >>> +१११
छन्दिफन्दि यांनी मायबोलीवर
छन्दिफन्दि यांनी मायबोलीवर येताच पहिल्याच वर्षात उपक्रमात संयोजक म्हणून भाग घेतला. मला त्यासाठी धीर गोळ करायला १३ वर्षे लागली.>>>>
नवशिक्याला उडी मारण्यागोदर पाण्याचा अंदाज / खोली वगैरे चाचपणी करायची असते ही समज नसते... दिसलं पणी मार उडी असा काहीसा प्रकार झाला असावा..
---

आमच्या प्रत्येक घोषणेत एक वाक्यांश आला आहे. हे सुरुवातीला आपसूक आणि मग लक्षात आल्यावर ठरवून झालं. तेव्हा खूप हसलो होतो.>>>
मस्त मनोगतं आहेत सगळ्यांची!
मस्त मनोगतं आहेत सगळ्यांची!
अॅडमिन / वेमा देवा आमच्या या प्रतिसादांना व्रताचं उद्यापन समजू नका >>
या वर्षी मराठी दिन साजरा न
या वर्षी मराठी दिन साजरा न झाल्याने ज्या वर्षी लीप ईयरला लोकसभेच्या निवडणुका असतात त्या वर्षी मभागौदि साजरा केला जात नाही असे मायमाऊल्या आपल्या लेकरांना सांगतील.
पुढे ती प्रथा पडून जाईल.
या वर्षी लीप ईयरला लोकसभेच्या
ज्या वर्षी लीप ईयरला लोकसभेच्या निवडणुका असतात त्या वर्षी मभागौदि साजरा केला जात नाही
>>>
पूरनमासी के दिन व्हॅलेन्टाइन डे वगैरे चोप्रीय सण आठवले
लीप ईयरला लोकसभेच्या निवडणुका
लीप ईयरला लोकसभेच्या निवडणुका >>

पूरनमासी के दिन व्हॅलेन्टाइन डे वगैरे चोप्रीय सण आठवले >>
किंवा आपला आत्मपॅम्फेटच्या हिरोसारखं .... मभागौदी साजरा झाला नाही, लीप इयर आलं आणि आम्ही बारावीत गेलो.
हर्पा, भरत, अस्मिता, किल्ली
हर्पा, भरत, अस्मिता, किल्ली मस्त पोस्ट्स >> +१११११
Pages