वाळवी - या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट
आताच बघून आलो! रात्रीचा शो! फुल्ल धमाल!! फुल्ल पैसा वसूल चित्रपट!!!!
पुर्वार्धात असे काही नाट्य की काही मिस होऊ नये म्हणून एक क्षण, अक्षरशा एक क्षण पडद्यावरून नजर हटू नये. आणि उत्तरार्धात ईतका ड्रामा की बरेच दिवसांनी दिवसांनी असे पुर्ण थिएटर नॉनस्टॉप खळखळून हसताना बघितले.
हो, रात्रीचा शो होता. चित्रपट मराठी होता. आणि तरीही थिएटर हाऊसफुल्ल होते. मी मात्र एकटाच गेलेलो. काहीतरी बायकोच्या मर्डरचा प्लान आहे हे ट्रेलर बघून समजलेले. त्यामुळे या इन्फॉर्मेशन शेअरींग सेशनला तिला सोबत नेले नव्हते. पण असे वाटलेच नाही की मी एकटा आहे.
मोजकी चार पाच कॅरेक्टर.. पण काय तो अभिनय, काय ते संवाद, काय तो एकेकाचा टायमिंग..
स्वप्निल जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे, अनिता दाते... सर्वच भारी!
मोजकीच चार पाच लोकेशन्स.. पण काय ते चित्रीकरण, काय तो साऊंड, काय ती बॅकग्राऊंड म्युजिक..
कमाल केलीत परेश मोकाशी..
आणि शेवट तर ईतका अनपेक्षितपणे आला की क्षणभर काळजाचा ठोकाच चुकला. छातीवर हात ठेऊन थोडावेळ खुर्चीतच बसून राहिलो.
पण मला आश्चर्य वाटते की मायबोलीवर अजून एकानेही कसे वाळवीबद्दल लिहिले नाही..
अजून कोणी पाहिला नाही का? ईथल्या लोकांपर्यंत अजून हा पोहोचला नाही का?
वाट कसली बघता आहात? आपलाच मराठी चित्रपट आहे. कोणी आमंत्रण देणार नाहीये. जा ऊठा, बूक माय शो करा, जवळचे चित्रपटगृह गाठा आणि पहिले बघून घ्या. लगेच या धाग्यावर लिहून मोकळे व्हा. तोपर्यंत मी रोज हा धागा हलता कसा राहील आणि हा चित्रपट एकूण एक मायबोलीकर कसा बघत नाही हेच बघतो.
आणि हो, चित्रपट मराठी आहे म्हणून नाही, तर ईतका उत्क्रुष्ट बनवलाय की थिएटरातच बघायचा आहे. त्यातच मजा आहे. ओटीटीच्या छोट्या स्क्रीनवर बघाल तर त्या नाट्यातली मजा घालवाल. केवळ मल्टीस्टार्रर, बिग बजेट, वीएफएक्स आणि स्पेशल ईफेक्टवाले चित्रपटच थिएटरमध्ये बघायचे असतात हा माझा भ्रम तोडला या चित्रपटाने. माझ्याकडून फुल्ल पाच स्टार !
धन्यवाद,
आणि तो अंधाधून आहे ना? अंधा
आणि तो अंधाधून आहे ना? अंधा -धून>> हो
मागे चित्रपट आला तेव्हा पण हे तुम्ही की मैत्रेयींनी हे निदर्शनास आणुन दिले होते पण हम तो ठहरे ममव..
वावे, उत्तरार्धात ब्लॅक ह्युमर आहेना, किडनी रॅकेट, लगेच प्लॅन प्रमाणे तयार होणारे डॉक्टर्स व इतर, सगळे योगायोग वगैरे.
आधी तो इन्स्पेक्टर तिच्या घरात असरो आयुष्यामान जातो तेव्हा तो ही हाच प्रकार आहे. तीच मजाही आहे त्यात. उत्तरार्धात मात्र या ब्लॅक ह्युमर सस्पेन्सची भट्टी जमुन्नाली नाही असे मला वाटले.
वाळवी आणि anandhadhund मध्ये
वाळवी आणि anandhadhund मध्ये फरक आहे. वाळवी चा बाजच वेगळा आहे
हो.
<<वाळवी आणि anandhadhund मध्ये फरक आहे>>
हो.
इथे दोन्हींचे उल्लेख आले होते आधीच म्हणुन लिहिलं.
दोन्ही तुलनात्मक आहेत असे म्हणायचे नाहीय.
अंधाधून पिक्चर म्हणजे तोच ना
अंधाधून पिक्चर म्हणजे तोच ना ज्यात एक आंधळा मुलगा असतो त्याला एक धून वाजवायची असते. त्याला ती काय वाजवता येत नाही म्हणून घरचे त्याचं लग्न लावतात. नंतर बायको त्याला सपोर्ट करते. बायको पैंजण घालून इकडे तिकडे फिरते आणि तिच्या मूवमेंटवरून तो पोरगा ती धून वाजवायला लागतो. शेवटी स्टेजवर वाजवताना बायको नसते म्हणून त्याला ती धून वाजवता येत नाही. लोकं कुजबुज करायला लागतात इतक्यात बायको येते. स्टेजसमोर जाऊन ती पैंजण वाजते तशी याला ती धून वाजवता येते. सगळे लोकं इमोशनल होतात. मस्त पिक्चर आहे.
अहो सारंच वेगळं आहे की.
अहो सारंच वेगळं आहे की. ट्रीटमेंट, थीम, बाज, टोन, भाषा, विषय, स्टाईल..
मला अंधाधुन जितका आवडला, तितकाच वाळवीही. इन फॅक्ट वाळवीने आश्चर्याचा धक्का दिला. अंधाधुन इज ए बिग फिल्म. श्रीराम राघवनबद्दल वाचलं, बघितलं तर कळेल. राघवनकडून ती अपेक्षा असतेच. मराठीत क्लोन केलेला राघवन कुणी दिसतो का तुम्हाला? जास्तीत जास्त महेश मांजरेकर, आणि त्याबद्दलही छे छे छे..
वाळवी पहिला अर्धा पाऊण तास,
वाळवी पहिला अर्धा पाऊण तास, बायकोला कस मारायचे यावर घालवला, तिथेच बोअर झाला. वाळवी फक्त शेवटची पाच दहा मिनिटं आवडला. फार वेगच नाही.
अंधाधूनने पहिल्यापासून पकड घेतली.
साजिरा +786
साजिरा +786
) मला असे काही बघायला जात आहे याची बिलकुल कल्पना नव्हती. तसेच थिएटरमध्ये जी खिदळणारी लोकं होती त्यांचेही बहुधा असेच झाले असावे. या सरप्राईज एलिमेंटने जास्त मजा आणली 
मराठीत या प्रयोगाने आणि तो देखील जमल्याने खरेच आश्चर्याचा आणि सुखाचा धक्का दिला. त्यात मी सुरुवातीलाच गेल्याने (ओह माझाच तर धागा आहे
आणि त्यात तो शेवटचा पंच.. त्यामुळे एकूणातच चला आज काहीतरी वेगळे बघितले या समाधानात आपण थिएटरबाहेर पडतो तशी फिलिंग होती.
Pages