वाळवी - या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 January, 2023 - 15:07

वाळवी - या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट

आताच बघून आलो! रात्रीचा शो! फुल्ल धमाल!! फुल्ल पैसा वसूल चित्रपट!!!!

पुर्वार्धात असे काही नाट्य की काही मिस होऊ नये म्हणून एक क्षण, अक्षरशा एक क्षण पडद्यावरून नजर हटू नये. आणि उत्तरार्धात ईतका ड्रामा की बरेच दिवसांनी दिवसांनी असे पुर्ण थिएटर नॉनस्टॉप खळखळून हसताना बघितले.

हो, रात्रीचा शो होता. चित्रपट मराठी होता. आणि तरीही थिएटर हाऊसफुल्ल होते. मी मात्र एकटाच गेलेलो. काहीतरी बायकोच्या मर्डरचा प्लान आहे हे ट्रेलर बघून समजलेले. त्यामुळे या इन्फॉर्मेशन शेअरींग सेशनला तिला सोबत नेले नव्हते. पण असे वाटलेच नाही की मी एकटा आहे.

मोजकी चार पाच कॅरेक्टर.. पण काय तो अभिनय, काय ते संवाद, काय तो एकेकाचा टायमिंग..
स्वप्निल जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे, अनिता दाते... सर्वच भारी!

मोजकीच चार पाच लोकेशन्स.. पण काय ते चित्रीकरण, काय तो साऊंड, काय ती बॅकग्राऊंड म्युजिक..
कमाल केलीत परेश मोकाशी..

आणि शेवट तर ईतका अनपेक्षितपणे आला की क्षणभर काळजाचा ठोकाच चुकला. छातीवर हात ठेऊन थोडावेळ खुर्चीतच बसून राहिलो.

पण मला आश्चर्य वाटते की मायबोलीवर अजून एकानेही कसे वाळवीबद्दल लिहिले नाही..
अजून कोणी पाहिला नाही का? ईथल्या लोकांपर्यंत अजून हा पोहोचला नाही का?

वाट कसली बघता आहात? आपलाच मराठी चित्रपट आहे. कोणी आमंत्रण देणार नाहीये. जा ऊठा, बूक माय शो करा, जवळचे चित्रपटगृह गाठा आणि पहिले बघून घ्या. लगेच या धाग्यावर लिहून मोकळे व्हा. तोपर्यंत मी रोज हा धागा हलता कसा राहील आणि हा चित्रपट एकूण एक मायबोलीकर कसा बघत नाही हेच बघतो.

आणि हो, चित्रपट मराठी आहे म्हणून नाही, तर ईतका उत्क्रुष्ट बनवलाय की थिएटरातच बघायचा आहे. त्यातच मजा आहे. ओटीटीच्या छोट्या स्क्रीनवर बघाल तर त्या नाट्यातली मजा घालवाल. केवळ मल्टीस्टार्रर, बिग बजेट, वीएफएक्स आणि स्पेशल ईफेक्टवाले चित्रपटच थिएटरमध्ये बघायचे असतात हा माझा भ्रम तोडला या चित्रपटाने. माझ्याकडून फुल्ल पाच स्टार !

धन्यवाद,

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परेश मोकाशी हा एक उत्तम दिग्दर्शक आहे
>>>
हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि एलिझाबेथ एकादशी असे नॅशनल ॲवार्ड विनिंग फिल्म आहेत. हा सुद्धा त्याच लेव्हलचा जमलाय.

हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि एलिझाबेथ एकादशी असे नॅशनल ॲवार्ड विनिंग फिल्म >> हो त्यामुळेच वाळवी पहायचा आहे.
आधीचे दोन्ही आवडलेले.
पण इथे वाचून ओटीटीवरच पहावा की काय असे वाटतेय आता.

पण इथे वाचून ओटीटीवरच पहावा की काय असे वाटतेय आता.
>>>>

का असे वाटले?

फेसबूकवर एक सिनेमागल्ली नावाचा ग्रूप आहे. मी तिथे रिव्यू वाचलेला याचा एक. त्यात कौतुक होते. मग हॅश टॅगवर क्लिक केले. तर या पिक्चरवर लिहिलेल्या रिव्यूचा खजिनाच सापडला. एकूण एक लोकं प्रभावित झाले होते. हा पिक्चर म्हणजे एक अनुभव आहे. थिएटरातच घ्या. आजवर आपण मराठीत असे कधी पाहिले नव्हते. अर्थात काही लोकं मर्डर मिस्टरीच्या ॲंगलने बघून लूपहोल्स काढायला बघत असतील तर त्याला काही अर्थ नाही. पिक्चर धमाल मनोरंजक आहे.

आणि ह्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ??
>>>>>

आतापर्यंतचा >>> 13 तारखेला हा धरून 4 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या शुक्रवारी पाचवा. पाचमधे या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट हे नवीनच सुरू झाले आहे का? कि या वर्षी यानंतर मराठी चित्रपट येणार नाहीत?

का असे वाटले? >>> वाटलं असेल त्यांना. आता काय तडीपारीची शिक्षा सुनावताय का? घ्या सांभाळून.

कोणते अमराठी सिनेमे? पाहिलेले आहेत का?
>>>
हो. त्या सर्वात हा उजवा आहे.

तसेच गेल्या महिन्या दोन महिन्यात मी जे अमराठी चित्रपट थिएटरला पाहिले त्यात हा मराठीच पैसा बसूल निघाला..

कांतारा - साऊथचा
ब्रह्मास्त्र - हिंदी
अवतार २ - ईंग्लिश

वाळवी चित्रपट मला तरी खूप खास वाटला नाही. Fargo season 1
या सिरीज ची फार आठवण आली . Martin अन billy bob ला खूप मिस केले.
स्वप्निल जोशी काही विशेष करत असल्याचा आव करून एक्टिंग करत होता.

2023 हे वर्ष कांतारा, ब्रह्मास्त्र च्या रिलीजच्या वेळी चालू झाले का? आम्हाला कुणी कळवले नाही.

बघितला. ठीक आहे, पण इतका हायपरबोली काही वाटला नाही. पात्रांशी कनेक्टच होत न्हवतो फार.

या २६ जानेवारी + विकेंडला मिळून आमच्या ऑफिसला बरेच जण पठाणला जाणार होते.
मी त्यातला निम्मा क्राऊड वाळवीला वळवला Happy

मी त्यातला निम्मा क्राऊड वाळवीला वळवला >>> क्राऊडची डेफिनिशन काय आहे ओ तुमची ?
ऑफीसमधे काय हजारोंची सभा भरली होती का पठाणला जाणार्‍यांची ? थापा मारताना पकडलो जाऊ याची मुद्दाम व्यवस्था करता का ?
चार दोन लोक बोलतात. यापेक्षा जास्त फार तर पाच दहा. त्यातले निम्मे म्हणजे दोन चार, खरंतर एखादाच. त्याला क्राऊड म्हणायचं का ?
तुमची एकूणच आवड बघता तुमचं ऐकून जाणारे लोक थोरच असले पाहीजेत. भगवी कफनी घालून जाता कि काय ऑफीसला ?

मायबोलीला लागलेली वाळवी ऑफिसात पण लागली तर !

पठाण चा क्राऊड तिकडे वळवला, म्हणजे केहना क्या चाहते हो??? झपाटलेला बाहुला शाहरुख से बेहतर है??? ओ माय गॉड , यह मै क्या देख रही हु??????

झाला झाला ओव्हर acting मोड ऑफ......

रच्याकने मला ही वाळवी बघायचाय..... पाहू केव्हा योग येतोय....

हा वाळवी चित्रपट मलाही आवडला. पठाण की वाळवी असा चॉईस होता त्यामुळे वाळवी निवडला. पठाणच्या शा.खा. भक्तांनी चालवलेल्या अतिकौतूकामुळे तो न बघावा याच निर्णयाला आलो होतो.

आधीच मुंबई, त्यात विकांत, त्यात पश्चिमेकडचे मराठी कमी वस्ती असणारे उपनगर आणि तरीही पठाण पेक्षा वाळवीला जास्त गर्दी होती. दोन्हीचे शो एकाच वेळी होते. यामुळे माझी निवड योग्य ठरली असे वाटले. पठाण पेक्षा वाळवीला कमी स्क्रिन्स आहेत हे ही कारण असू शकेल पण शेवटी कॉलिटीही महत्वाची.

वाळवीविषयी जास्त लिहीत नाही. इतरांनी लिहीलेच आहे. स्वप्निल जोशी यावेळी चक्क आवडला. तसा तो कधीच नावडत नव्हता पण त्याची अ‍ॅक्टींग कधी कौतूकावी असे वाटले नाही. शिवानी सुर्वे विषयी बिग बॉसमधील तिच्या वागण्यामुळे वाईट मत होते पण तिचा अभिनय व स्क्रिन प्रेसेंन्स आवडला. सुबोध नेहमीसारखाच पण त्याचा कॉमेडी रोल पहिल्यांदाच पाहीला जो आवडला. त्याने आधी कधी कॉमेडी रोल केला असेल तर माहित नाही. अनिता दातेला बराच काळ प्रेतव्रत ठेऊन प्रेक्षकांवर उपकार केले आहेत असे ही वाटले. धाग्यात लिहील्याप्रमाणे अनपेक्षित शेवट व तो ही अनपेक्षित क्षणी येतो. याने मी पण काही सेकंद सुन्न झालो होतो.

शिवानी सुर्वे अभिनय चांगला करते, त्यामुळे ती आवडत होती अभिनेत्री म्हणून पण बिग बॉस मध्ये नव्हती आवडली तिच्या वागणूकीमुळे, अर्थात अभिनय आणि दिसणे दोन्ही छान असल्याने तिला उत्तम भूमिका मिळत राहतील.

बघायला हवा वाळवी.

पठाण की वाळवी असा चॉईस होता त्यामुळे वाळवी निवडला.
>>>

मी दोन्ही पाहिलेत.
मला जेव्हा कोणी हे कुठचा बघू रे म्हणून विचारते तेव्हा मी त्यांना वाळवीच सुचवतो Happy

वाळवी मस्त हलका फुलका वाटला. परत बघायला हरकत नाही.
मजा वाटली. बरेच आचरट प्रकार असले तरी सिनेमा लिबर्टी समजू शकतो. नैराश्यात गेलेली बाईचा रोल चांगला केलाय. शिवानी सुर्वे चांगला अभिनय करते, त्या वीण पेक्षा नक्कीच बरा.

अनिता दातेला बराच काळ प्रेतव्रत ठेऊन प्रेक्षकांवर उपकार केले आहेत. >> +१

चित्रपट एकदा बघायला ठीक.

आवडला. मधे मधे झाला थोडा बोर. तरीही आवडलाच.
ट्विस्टस, डार्क ह्युमर फार भारी जमलंय.
शिवानीचे आणी सुभाचे काही मस्त टायमिंगवाले पंचेस आहेत. परेश मोकाशी आणि मधुगंधा फारच ब्रिलियंट डायरेक्टर्/लेखिका आहेत.

आताच पाहीला. मजा आली.
ट्विस्टस, डार्क ह्युमर फार भारी जमलंय.
शिवानीचे आणी सुभाचे काही मस्त टायमिंगवाले पंचेस आहेत. + १

क्लायमॅक्सला जेव्हा तिघे (+ ३) घरी येतात तेव्हा पिक्चरची शेवटची ३ मिनिटे राहिली होती. मी विचार केला आता इथे काय शेवट करणार? कदाचित पुढल्या भागाची सोय करुन ठेवली असावी पण छान ट्विस्ट देऊन पिक्चर संपवला. एव्हढे मुडदे पडूनही चित्रपट बघताना मज्जा आली.

क्लायमॅक्सला जेव्हा तिघे (+ ३) घरी येतात तेव्हा पिक्चरची शेवटची ३ मिनिटे राहिली होती. मी विचार केला आता इथे काय शेवट करणार?
>>>>>>
तुम्ही तरी हा विचार केला. माझ्या तर डोक्यातही नव्हते. अचानक सुन्न झालो Proud

ओटिटिवर आला कि नाही अजून?
>>>>>>>
अरे वाह आज झाला... ZEE5 वर .. आताच गूगलून चेकले,
लोकहो मोठ्या संख्येने बघा..
मी सुद्धा सहपरीवार बघतो पुन्हा

कालच पाहिला झी-५ वर. मस्त पिक्चर आहे. एकदम जमला आहे. मुख्य चौघांचाही अभिनय मस्त. शिवानी सुर्वे सरप्राइज पॅकेज आहे एकदम. काही वर्षांपूर्वी कोणत्यातरी सिरीज मधे होती इतकेच लक्षात आहे. तिला इतके दिवस पिक्चर्स मधे कसे रोल मिळाले नाहीत आश्चर्य आहे.

स्वप्नील जोशी चांगले रोल्स करू शकतो हे त्या "चेकमेट" मधे पाहिले होते. इथेही त्याने मस्त काम केले आहे. सुबोध भावे मात्र धमाल. त्याचा जवळजवळ प्रत्येक संवाद जबरी जमला आहे. अनिता दाते ला त्या नवर्‍याची बायको मधेच जास्त पाहिले आहे. त्यामुळे इथला रोल वेगळा वाटला. पण सर्वात भारी काम शिवानी सुर्वेच!

शेवटचा सीन म्हणजे टोटल पंचलाइन आहे!

Pages