वाळवी - या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 January, 2023 - 15:07

वाळवी - या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट

आताच बघून आलो! रात्रीचा शो! फुल्ल धमाल!! फुल्ल पैसा वसूल चित्रपट!!!!

पुर्वार्धात असे काही नाट्य की काही मिस होऊ नये म्हणून एक क्षण, अक्षरशा एक क्षण पडद्यावरून नजर हटू नये. आणि उत्तरार्धात ईतका ड्रामा की बरेच दिवसांनी दिवसांनी असे पुर्ण थिएटर नॉनस्टॉप खळखळून हसताना बघितले.

हो, रात्रीचा शो होता. चित्रपट मराठी होता. आणि तरीही थिएटर हाऊसफुल्ल होते. मी मात्र एकटाच गेलेलो. काहीतरी बायकोच्या मर्डरचा प्लान आहे हे ट्रेलर बघून समजलेले. त्यामुळे या इन्फॉर्मेशन शेअरींग सेशनला तिला सोबत नेले नव्हते. पण असे वाटलेच नाही की मी एकटा आहे.

मोजकी चार पाच कॅरेक्टर.. पण काय तो अभिनय, काय ते संवाद, काय तो एकेकाचा टायमिंग..
स्वप्निल जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे, अनिता दाते... सर्वच भारी!

मोजकीच चार पाच लोकेशन्स.. पण काय ते चित्रीकरण, काय तो साऊंड, काय ती बॅकग्राऊंड म्युजिक..
कमाल केलीत परेश मोकाशी..

आणि शेवट तर ईतका अनपेक्षितपणे आला की क्षणभर काळजाचा ठोकाच चुकला. छातीवर हात ठेऊन थोडावेळ खुर्चीतच बसून राहिलो.

पण मला आश्चर्य वाटते की मायबोलीवर अजून एकानेही कसे वाळवीबद्दल लिहिले नाही..
अजून कोणी पाहिला नाही का? ईथल्या लोकांपर्यंत अजून हा पोहोचला नाही का?

वाट कसली बघता आहात? आपलाच मराठी चित्रपट आहे. कोणी आमंत्रण देणार नाहीये. जा ऊठा, बूक माय शो करा, जवळचे चित्रपटगृह गाठा आणि पहिले बघून घ्या. लगेच या धाग्यावर लिहून मोकळे व्हा. तोपर्यंत मी रोज हा धागा हलता कसा राहील आणि हा चित्रपट एकूण एक मायबोलीकर कसा बघत नाही हेच बघतो.

आणि हो, चित्रपट मराठी आहे म्हणून नाही, तर ईतका उत्क्रुष्ट बनवलाय की थिएटरातच बघायचा आहे. त्यातच मजा आहे. ओटीटीच्या छोट्या स्क्रीनवर बघाल तर त्या नाट्यातली मजा घालवाल. केवळ मल्टीस्टार्रर, बिग बजेट, वीएफएक्स आणि स्पेशल ईफेक्टवाले चित्रपटच थिएटरमध्ये बघायचे असतात हा माझा भ्रम तोडला या चित्रपटाने. माझ्याकडून फुल्ल पाच स्टार !

धन्यवाद,

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेंबरशिप घेतलेल्यांना बघायला मिळेल ना, जाऊदे . किती नी काय घेत बसायचे>>> हो ना किती टीव्ही घ्यायचे नक्की? एकच कॉमन प्लॅट फॉर्म ठरवा आणि आम्हाला सोडवा किटकिटीतुन

बघितला
पण शेवट काही समजला नाही..
मला वाटले क्रमशः आहे काय.
Second part साठी

हेमंत - अनिता दातेच्या सुरूवातीच्या सीन्स मधे त्याचा संदर्भ आहे. ते सीन्स पुन्हा बघितलेत तर लक्षात येइल.

शेवटचा मोटारीतील प्रवासाचा भाग सोडला तर बाकी पटकथा व्यवस्थित रचलेली आहे. एखाद्या सीनचा उलगडा लगेच झाला नाही तर थोड्या पुढे होतोच (उदा: स्वप्नील जोशी टॉयलेटच्या बाजूला काहीतरी बघून चक्रावतो. तेथे शिवानी सुर्वे त्याला थोबाडीत मारते तो सीन). एकूण संवाद व अभिनय इतका मस्त आहे की अनेक ठिकाणी घेतलेली लिबर्टी खपून जाते.

बघितला वाळवी...कन्सेप्ट नाही आवडली..
..............स्पॉईलर....................
मला पूर्ण सिनेमा भर वाटत होते कि अनिता दाते मेलीच नाहीये..मर्डर एक गंभीर बाब आहे पण आता असे दिवस आले इतक्या गंभीर विषयावर इतकं जास्त विनोदी केलंय..बैकग्राऊंड म्युझिक पण प्रेक्षकांना गंभीर होऊं देत नाही.. आणि जे चाललंय ते चुकीचे नाही असा संदेश पसरतोय..
बायकोला मारणे चूक..त्या बाईला मारणे चूक..पोलीसाला मारणं चूक..सगळ्यात भयानक अपघातात जीवंत असलेल्या माणसाला मारणं...
शेवटच्या दहा सेकंदात लोकांना मारून डायरेक्ट ने स्वतः ला वाचवलंय... पण प्रेक्षकांच्या लक्षात शेवट राहत नाही जितकं पूर्ण सिनेमात पाहिलेल राहितं....

#लहान मुलांसमोर अजिबात बघण्यासारखा नाहीये.#

मृणाली,
मर्डर करणे हे चूकच आहे. हे जसे तुम्हाला मला माहीत आहे तसेच ते थिएटरात हसणाऱ्या प्रत्येकाला माहीत होते. त्या गंभीर बाबीलाही जशी ट्रीटमेंट दिली होती त्याने खरे तर लोकांना आणखी हसायला येत होते.

एकदमच कल्ट क्लासिक आहे वाळवी ! खतरा ब्लॅक ह्यूमर ! शिवानी सुर्वे चे काम विशेष आवडले. ती ज्या सूरात 'पंगत आहे काय' , 'काय भयंकर बाई आहे हो' किंवा 'लाडाने रेश्मा म्हणतात मला' वगैरे म्हणते ते अशक्य आहे.

शिवानी सुर्वे चे काम विशेष आवडले. ती ज्या सूरात 'पंगत आहे काय' , 'काय भयंकर बाई आहे हो' किंवा 'लाडाने रेश्मा म्हणतात मला' वगैरे म्हणते ते अशक्य आहे. >>> Lol टोटली.

आणि त्या बॅकग्राउण्ड वर सुभा अगदी कॅज्युअली "हिच्याकरता बायकोला मारलं याने" असे सेमी-स्वगत वाक्य टाकतो तेव्हा मी टोटल फुटलो.

मी टोटल फुटलो. >> हो असे खूप मोमेंट्स आहेत जिथे एकदम अकस्मात फुटायला होते. मला ह्या सगळ्या प्रकारात कोणीही एकदम मर्डर मधे स्मार्ट नसून नॉर्मल लोक आहेत जे पुस्तके, सिनेमा वगैरे च्या जोरावर सगळॅ प्लॅन करताहेत हे इनडायरेक्टली दाखवणे आवडले.

झी ५ वर पाहिला वाळवी .. अनिता ला खूपच कमी रोल दिलाय. तिच्या जागी कुणी not so famous व्यक्ती घेतली असती तरी चालली असती. माझ्या मते तरी तिच्यावर अन्याय झालाय. शिवानी च काम खूप छान. तिला असे रोल सूट करतात . मला वाटल होत मर्डर मिस्टरी असेल. काही वेळा पर्यंत अनिता जिवंत आहे आणि मधूनच उठून बोलायला लागेल वाटत होत. ट्विस्ट म्हणून अनिता आणि सुबोध एक होऊन ह्या दोघांना काही तरी करतील असा वाटलं... शेवट एकदम अनपेक्षित. एवढा हाईप बघून तुंबाड सारखा असेल अशी अपेक्षा होती...पण.. ओव्हरऑल चांगलाआहे. कदाचित, चित्रपटगृहात बघितला असता तर वेगळा इफेक्ट जाणवला असता

"हिच्याकरता बायकोला मारलं याने" >> हा हा हा... अगदी अगदी...जबरी पंचेस आहेत अगदी.
शेवट बघुन एकदम हँग च झाले होते मी. खुर्चीवरुन उठायचं पण सुधरेना पटकन.
जबरदस्त आहे खरच चित्रपट.

सिनेमा शेवट पर्यंत बोअर होवून देत नाही.
पुढे काय ह्याची उस्तुक्ता लागून राहते.
कथा योग्य दिशेने योग्य वेगात पुढे जात राहते.
एकंदरीत सिनेमा छान आहे.
नाही तर हल्ली सिनेमा ला काही च कथा नसते,मध्येच काही तरी कथेशी संबंधित नसलेले सीन असतात.

खूप कमी सिनेमे मला आवडले त्या मधील हा एक.
श्वास,हा मराठी सिनेमा.
अमिताभ च शराबी हा एकमेव सिनेमा.
चाची 420 हा कमल हसन च सिनेमा.
तब्बू चे सर्व च सिनेमे.
हेराफेरी,
असे मोजकेच सिनेमे मला आज पर्यंत आवडले आहेत

पाहिला काल वाळवी
दुसर्‍यांदा बघत असल्याने आणि पहिल्यांदा थेट्रात पाहिला असल्याने कदाचित पहिल्याईतकी मजा आली नाही.
पण आई आणि बायकोला आवडला. हसतही होते. मध्येच त्या मेलेल्या माणसांबद्दल हळहळ व्यक्त करायचे. पण हसायचा सीन आला की हसायचेच.
शेवटच्या सीनला त्यांचेही अई ग्ग झालेच. मागे ढकलून पुन्हा पाहिला तो सीन. थिएटरात ही फॅसिलीटी नसते. जे पाहिले ते पचवायचे आणि निघायचे. पोरगी मात्र झोपली असल्याने तिने बघण्या न बघण्याचा प्रश्नच आला नाही. पण कधीतरी आम्हा दोघांच्याच मूवी नाईटला तिला दाखवेन.

काल बघितला. मस्त आहे. आवडला! शेवटी चांगलंच दचकायला झालं!
मला सारखा संशय येत होता की डेंटिस्ट आणि सायकियाट्रिस्ट एकमेकांना सामील आहेत. ते दोघे जास्त हुशार आहेत. स्वप्नील जोशी त्या मानाने जरा मठ्ठ आहे. म्हणजे त्याचं पात्र.
सगळ्यांचीच कामं मस्त झाली आहेत. शिवानी सुर्वे आधी कशात होती? तिचा चेहरा ओळखीचा आहे पण आठवत नाही कशात बघितलंय ते.
काही काही वाक्यं फारच भारी आहेत. 'काय बाई आहे'!' यावर ती सासू 'भयंकर' म्हणते तिथे जाम हसले Lol

'काय बाई आहे'!' यावर ती सासू 'भयंकर' म्हणते >>> Lol हो, हे फार भारी होतं. तसंच ते 'काय? पंगत आहे का' हे पण. जाम हसू आलं या वाक्यांना.

मला आवडला पिक्चर. असामी म्हणाला तसं हे सगळे नॉर्मल लोक दाखवले आहेत आणि आपापल्या वाचनाच्या किंवा माहितीच्या आधारे प्लॅन करतायत. त्यामुळे अर्थातच त्यात काहीतरी गोंधळ होतायत, रिअ‍ॅक्शन्स गृहित न धरल्याने गडबड होते आहे हे अगदीच पटण्यासारखं आहे. शेवटचा ट्विस्ट पण खूप आवडला. जबरीच!

ठिक आहे मुव्ही. जितकं कौतुक चाललं होतं तितका भारी नाही वाटला. दोन चार फनी डायलॉग सोडले तर हसायलाही नव्हतं येत. कामं सगळ्यांची छान आहेत. एक बरं की दीड तासातच संपला. तीन तास बोअर झालं असतं. कोणत्या इंग्लिश मुव्हीवरून घेतला आहे का?

आता स्पॉयलर-

मला एक कळलं नाही- सुभा म्हणतो की त्याची मेडिकल करियर वाचवायला त्याने तिचा खून केला. जर सुभाचा ओरिजिनल प्लॅन वर्क झाला असता तरी सगळ्यांना कळलंच असतं की त्याचे तिच्याशी संबंध होते, ती गरोदर होती. तो म्हणतो मी ते हँडल केलं असतं. पण मग खून कशाला करतो? केवळ ते मूल जन्माला येऊ नये म्हणून?त्यासाठी तो तिचा गर्भपात करू शकला असता काहीतरी गोळ्या देऊन.

त्यासाठी तो तिचा गर्भपात करू शकला असता काहीतरी गोळ्या देऊन.>>> तेव्हढा विचार करायला त्याला वेळ मिळाला नसेल किंवा ती जेव्हा बोलते कि मी तुझ्या घरी येऊन तमाशा करेन तेव्हा तिच्यापासून कायमची सूटका झालेलीच बरी असे वाटले असेल.

काल च पाहिला. इतका काही नाही आवडला.
विषय तर मुळीच नाही आवडला. खूना वर खून करत चालतात.. काहिही....
पण. सु. भा. आणि dentist ch काम माञ छानच झालंय.

जितकी अपेक्शा होती त्यापेक्शा थोडा कमीच आवडला .
आगदी आवडला असं ही नाही म्हणता येणार . मुळात चित्रपटाची जात्कुळी कळायला हवी . डार्क ह्युमर . पण सिनेमॅटीक लिबर्टी जरा जास्तच वाटली.
सुरवातीचा अर्धा तास जास्त रंजक वाटला . रिहर्सल करताना , झेरॉक्स वाल्याकडे पुस्तक विसरणं , आयत्या वेळी कोणीतरी येउन गोष्टी प्लॅनप्रमाणे न जाणं .
नंतर चा कार मधला प्रवास थोडा क्रिस्प हवा होता , मध्ये मध्ये कंटाळवाणा होतो .
बरेचसे संवाद चुरचुरीत आहेत .
देविकाचा एकंदर स्वभाव , वैतागवाणी परस्थिती बघून ती त्या ट्रक ड्रायवर ला नडली याच काहीच आश्चर्य नाही .
त्या छेड काढणार्या बाईकवाल्यांवर ती मोठा दगड फेकून मारते तेही मजेशीर वाटलं .
शेवट तुम्हाला एक्दम बेसावध गाठतो , ५ सेकंदात चर्र होतं . तिथे आणखी १०-१५ सेकंद जरी वाढली असती तरी तेवढा परिणामकारक झाला नसता.

मस्त जमला आहे सिनेमा ..शेवट तर जबरदस्त... मोटारीतील सीन्स जास्त खेचले आहेत हे मान्य.. पूर्वार्ध जास्त वेगवान वाटला.. पण कथा , पटकथा ,दिग्दर्शन कमाल ...ज्याला सुचली कल्पना त्याला तर मानलं

शिवानी सुर्वे चे काम विशेष आवडले. ती ज्या सूरात 'पंगत आहे काय' , 'काय भयंकर बाई आहे हो' किंवा 'लाडाने रेश्मा म्हणतात मला' वगैरे म्हणते ते अशक्य आहे. >>> +१११११

पाहिला सिनेमा. ओक्केच आहे. एका प्रेताची विल्हेवाट लावायला गेले अन तीन प्रेतं घेऊन आले हे चांगलं खुलवलंय. पण .... शेवट कैच्याकैच आहे. असं जड झुंबर नायलॉनच्या दोरीनं बांधतात? तेही अश्या अलिशान घरात? एका झुंबरात तीन पक्षी - पक्षी माणसं - कसे काय मरू शकतात हे ही काही कळलं नाही.

पण सगळ्यांची कामं मस्त. सर्वांत मस्त शिवानी सुर्वे आणि स्वप्नील जोशी.

मला वाटते मरू शकतात.

आमच्या घरचे झुंबर बघूनही मला नेहमी हेच टेंशन येते की कधी पडले तर खालचा मरून जाईल Sad

पण आता हे चेक तरी कसे करणार..
त्यासाठी तीन माणसे मरायला किंवा जखमी व्हायला तयार झाली पाहिजेत हे मोगॅंबो करत...

Pages