काळा घोडा फेस्टिव्हल २०२३ दरम्यान मायबोली गटग

Submitted by अश्विनीमामी on 4 January, 2023 - 04:19

तर मित्र मैत्रीणींनो ,

नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. मायबोलीकर टी आय ह्यांच्या मुंबई हेरिटेज वॉक धाग्यावर मुंबई प्रेमींची चर्चा झालेली आहे. त्या अनुसार
गटग चा धागा काढत आहे. या वर्शीचे काळा घोडा फेस्टिवल चार ते १२ फेब्रुवारी दरम्यान आहे. तर कोणा कोणाला यायला आव्डेल? लॉक डाउन नंतरचे पहिलेच मोठे गटग प्लॅन होते आहे. मला शनिवार रविवार चालेल. पण त्यादिवशी फार गर्दी असेल हे नक्की आहे. तारीख नक्की झाल्यावर मला एक दिवस काम सोडून येणे पण सहज शक्य आहे. ब बरोबर शॉपिन्ग साठी रिकाम्या पिशव्या व खाउ घरी नेण्यासाठी डबे पण घेउन या.

त्या दिवसात कोविड परिस्थिती कशी असेल त्या अनुसार मास्क व इतर घेउन येणे.

कोण कुठुन येणार कधी जमेल चर्चे साठी धागा. चला भेटु या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही documentary पाहिली. अप्रतिम अनुभव होता. पुन्हा स्क्रीनिंग झालं तर चुकवू नये.

"Kala Ghoda festval today ( Saturday) 12 noon to 2-15.
The Sound Man Mangesh Desai
By Subash Sahoo.
( English, Hindi documentary)
एका मराठी माणसाचे कर्तृत्व.
जमल्यास जरूर जाऊन पाहा.
गूगलवर यशवंतराव चव्हाण auditorium, Nariman point
असा पत्ता दिसतोय. हे ठिकाण चर्च गेट स्टेशन पासून पश्चिमेला एक किलो.मी. अंतरावर आहे. अगदी काळया घोड्याला असे नाही."

आज दुपारी पाहिली ही docu. खूप सुंदर .
पहिलंच स्क्रीनिंग होतं. सर्वांसाठी मोकळी नाही केलीय लिंक.
शिवकुमार शर्मा, हरि प्रसाद चौरसिया, अनेक नामवंत दिग्दर्शक, ( संदीप रॉय, विधु विनोद चोपड़ा, यश चोपड़ा, रणधीर कपूर )अनेक निर्माते ह्यांची संगीताची, बॅक ग्राउंड म्यूझिकची जाण आणि त्यांचे अनुभव.. फारच उच्च दर्जाची docu film आहे.

म्यूझिकची जाण नसल्याने डॉक्यू नाही पाहाणार.
------------
आज काला घोडा जत्रा/उत्सवला गेलो. (साडेबारा ते एक जहांगिर कलादालनाच्या पायऱ्यांवर शेजारी उभा राहिलो - तिथे कुणी बसू नये म्हणून सांगून कर्मचारी कंटाळले आणि त्यांनी पाणी ओतून ठेवले. )तोपर्यंत बायको आणि मुलगी कलादालन चित्रे पाहून आली. मोरारका दालनात आणि बाजूला बॉम्बे आर्ट सोसायटीच्या सभासदांची चित्रे,शिल्पे आणि फोटो होते. सुंदर. बाहेर फुटपाथवरच्या कॅम्लिन ओपन आर्ट गॅलरीतही खूप सुंदर चित्रे मांडली होती. मग काला घोडा चौक रस्त्यावर जाऊन कलाकृती पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. टीव्हीवर बातम्या पाहिल्याने प्रचंड गर्दी झाली होती. तरुणवर्गाचे गटागटाने घोळके येत होते. तिथून सीएसटीम समोरच्या फूड कट्ट्यावर जाऊन ('कॅनन' पावभाजी (११०/-)आणि साबूदाणा खिचडी (५०/-)घेतली. खिचडी अफलातून होती. पावभाजी पहिला कॅननचा सरदारजी मालक चांगली करत असे.
हल्ली स्ट्रीट फूड दाखवणे हेच पर्यटन यूट्यूबवर चानेलचा आधार आहे. सबस्क्राईबर वाढवण्याचा उपाय. असो.
मग दादरला रेल्वेने जाऊन रुपारेल कॉलेज गाठले. (दादर पश्चिम,माटुंगा रोड स्टेशनला अगदी जवळ). ११-१२ फेब्रुवारी दोन दिवस फुले भाजीपाला प्रदर्शन आहे, पाहिले. गेली दहा वर्षे जात आहे. एकूण आजचा दिवस मजेत गेला.

आज सकाळी चर्चगेट स्टेशन पश्चिमेलाही टॅक्सी मिळत नव्हती. टॅक्सीवाले आओ काला घोडा म्हणत होते खरे पण तरुणांचे घोळके जास्तच होते. आम्हांला पश्चिमेला जायला ओला उबर बुक करत बसावे लागले.

Pages