काळा घोडा फेस्टिव्हल २०२३ दरम्यान मायबोली गटग

Submitted by अश्विनीमामी on 4 January, 2023 - 04:19

तर मित्र मैत्रीणींनो ,

नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. मायबोलीकर टी आय ह्यांच्या मुंबई हेरिटेज वॉक धाग्यावर मुंबई प्रेमींची चर्चा झालेली आहे. त्या अनुसार
गटग चा धागा काढत आहे. या वर्शीचे काळा घोडा फेस्टिवल चार ते १२ फेब्रुवारी दरम्यान आहे. तर कोणा कोणाला यायला आव्डेल? लॉक डाउन नंतरचे पहिलेच मोठे गटग प्लॅन होते आहे. मला शनिवार रविवार चालेल. पण त्यादिवशी फार गर्दी असेल हे नक्की आहे. तारीख नक्की झाल्यावर मला एक दिवस काम सोडून येणे पण सहज शक्य आहे. ब बरोबर शॉपिन्ग साठी रिकाम्या पिशव्या व खाउ घरी नेण्यासाठी डबे पण घेउन या.

त्या दिवसात कोविड परिस्थिती कशी असेल त्या अनुसार मास्क व इतर घेउन येणे.

कोण कुठुन येणार कधी जमेल चर्चे साठी धागा. चला भेटु या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकु अमितव - नुकतीच मुंबई मॅरॅथॉन झाली. आता ह्या रनिंग सिझनचा कोटा संपला.
अस्मिता - मी वृत्तांत वाचणार फक्त. लिहिणार जाणारे लोक्स.

I am in

Hi thanks please update on the other thread.

I am currently down with severe back pain and sciatica.

गटग ला शुभेच्छा!!
हर्पेन, अवली लवली च्या चालीवरचं स्किट भारी जमलंय Happy

नमस्ते, सांगली मिरज कोल्हापूर मधून कुणी जात आहे का? एकत्रित नियोजन करू शकतो .
मला वाटते बोकलत अजून इथेच आहेत, वर्णिता ताई आहेत, कोल्हापुरात अशोक मामा व बरेच जण असतील.

अमा टेक केअर.

हरपेन भारीच लिहिलंय Lol

अस्मिता Lol

११ - मी अश्विनी
९९९ - मी आहे अश्विनी
इंद्रा - मी पण अश्विनी
अमा - अश्विनी मी आहे
>> पण खरी 'मी अश्विनी' तर मीच आहे ना Proud

सध्या भारतात नसल्याने जमणार नाही पण एरवी ठाण्यात असते.. तेव्हा नक्कीच जमवून सगळ्या अश्विनीजची 'हम पांच' रील केली असते. Happy

अश्विनी गटग आणि त्यावरील पोस्ट्स हर्पेन :).

च्रप्स, अमराठी स्त्रीयांचेच नव्हे तर चक्क पुरुषांचे सुद्धा असते. त्यात काहींचे अश्विनी कुमार तर काहींचे फक्त अश्विनी असते. अश्वनी पण असते ते वेगळे.

गटगचे ठिकाण काळा घोडा (अश्व), येणार्यांमधेही बहुतेकांचे नाव अश्व वरून सुरूवात. यामागे काही दैवी संकेत दिसतात.

बापरे किती आश्विनी बाहेर पडत आहेत.
जणू अश्विनी ये ना म्हणून कैक वर्षांपूर्वी साद घातलेली त्याला आता प्रतिसाद मिळत आहे.
गटगचेच नाही तर मायबोलीचे नावही अश्विनीबोली करायला हरकत नाही आता..

जी मायबोलीकर मंडळी कालाघोडा येथिल मायबोली गटगला नक्की येणार आहेत किंवा जी येण्यासाठी उत्सूक आहेत, त्यांनी खालील दुव्यावर टिचकी मारून वॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा ही विनंती. सदर ग्रुप अश्विनीमामीच्या पुढाकाराने उघडला असून जॉईन करतांना तुमचे अधिकृत नाव व मायबोलीवरील युझरनेम लिहावे. अन्यथा सार्वजनिक स्थळावर दुवा शेअर केल्याने, अनावश्यक घटक गैरफायदा घेऊन वॉट्सॲप ग्रुपमध्ये शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

https://chat.whatsapp.com/BCxz51hj2mRKeulcK707Bb

ह्या ग्रुपद्वारे एकामेकांशी संपर्कात राहणे अधिक सोपे होईल, कारण प्रत्येक वेळी गटगसंबंधीत इथले दोन्ही धागे बघणे शक्य नसते.

जी मंडळी कालाघोडा मायबोली गटगसाठी इच्छुक आहेत त्यांनी लगेचच खालील व्हाट्सऍप ग्रुप जॉईन करावा ही नम्र विनंती. ह्या किंवा दुसऱ्या धाग्यावर जरी अनेक मायबोलीकरांनी गटगसाठी उत्सुकता दाखवली असली तरी, सध्या व्हाट्सऍप ग्रुपवर ११ मंडळीच जॉईन झाली आहेत.

https://chat.whatsapp.com/BCxz51hj2mRKeulcK707Bb

व्हाट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून सगळी इच्छुक मंडळी एकमेकांच्या संपर्कात राहतील आणि गटगचे पुढील नियोजन करणे सोपे होईल. तथापि आम्ही ग्रुपवर अजून नियोजनास सुरुवात केलेली नाही कारण जशी जशी नवीन मंडळी जॉईन होतील त्यांची मते व सोईंकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे लौकरात लौकर ग्रुप जॉईन करावा ही पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

Pages