काळा घोडा फेस्टिव्हल २०२३ दरम्यान मायबोली गटग

Submitted by अश्विनीमामी on 4 January, 2023 - 04:19

तर मित्र मैत्रीणींनो ,

नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. मायबोलीकर टी आय ह्यांच्या मुंबई हेरिटेज वॉक धाग्यावर मुंबई प्रेमींची चर्चा झालेली आहे. त्या अनुसार
गटग चा धागा काढत आहे. या वर्शीचे काळा घोडा फेस्टिवल चार ते १२ फेब्रुवारी दरम्यान आहे. तर कोणा कोणाला यायला आव्डेल? लॉक डाउन नंतरचे पहिलेच मोठे गटग प्लॅन होते आहे. मला शनिवार रविवार चालेल. पण त्यादिवशी फार गर्दी असेल हे नक्की आहे. तारीख नक्की झाल्यावर मला एक दिवस काम सोडून येणे पण सहज शक्य आहे. ब बरोबर शॉपिन्ग साठी रिकाम्या पिशव्या व खाउ घरी नेण्यासाठी डबे पण घेउन या.

त्या दिवसात कोविड परिस्थिती कशी असेल त्या अनुसार मास्क व इतर घेउन येणे.

कोण कुठुन येणार कधी जमेल चर्चे साठी धागा. चला भेटु या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच दिवसांनी माबोवर जाहीर करून गटग होतंय ह्याचा आनंद आहे.
भेटा, मजा करा, वृत्तांत लिहा.

अध्यक्ष महोदय,
या गटग चे नाव 'अश्विनी भेट' मोहीम असे करावे असे सुचवतो.

मग तिकडे ह्या सगळ्याजणी स्वतःची ओळख त्या हास्यजत्रा मधल्या ' मी आवली लवली कोली' स्किट आहे ना त्या चालीवर अशी करून देतील

मी आहे मामी अश्विनी
मी आहे अकरा अश्विनी
मी आहे नौशेनव्याण्णव अश्विनी
मी आहे इंद्रा अश्विनी

अमाला नाही लागणार पण बाकीच्यांना लागणार असेल तर Light 1 घ्या.

हो एक रीळ बनवाच.

रीळ सुरुवात

११ - मी अश्विनी
९९९ - मी आहे अश्विनी
इंद्रा - मी पण अश्विनी
अमा - अश्विनी मी आहे

११- तसं नव्हे मी पुण्याची अश्विनी
९९९ - मी आहे पुण्याची अश्विनी
इंद्रा - मी पण पुण्याचीच अश्विनी
अमा - मीच आहे मुळी मुळची आणि मुळच्या पुण्याची अश्विनी

भरत - हो हो मुलींनो जरा थांबा. नीट ओळख करून द्या.

सगळ्या -बरंं बरं

११- मी आहे अकरा अश्विनी
९९९ - मी आहे नौशेनव्याण्णव अश्विनी
इंद्रा - मी आहे इंद्रा अश्विनी
अमा- मी आहे थोडी मावशी आणि जास्त मामी अश्विनी

भरत - हुश्श

आनंदी आनंद

रीळ समाप्त

हपा ,
अमा मुठेकाठची आहे.
पण स्किट करता बनवू आपण तिला मुळेकाठची

Happy
मला नाही जमणार पण सर्वांना gtg साठी शुभेच्छा.
पुण्या वरुन जाण्यार्या ना जाताना डेक्कन क्वीन (७.२५) की कल्याण मार्ग घेउन जाते आणि येताना प्रगती (४.३५ ला) जी पनवेल , चौक मार्ग घेउन जाते ह्या गाड्यानी जावे. पुण्यावरुन उशीरा निघायचे असल्यास प्रगती (७.४५) आणी मुम्बई वरुन उशीरा निघायचे असल्यास डेक्कन क्वीन (५.१०) ला आहे. ट्रेनचे रिझरवेशन करावे नाहीतर उभ्याने प्रवास करावा लागेल.

शिवनेरी/ शिवशाही पेक्षा ट्रेन स्वस्त, वेळ वाचवते आणि टॅक्सी पण नाही करावी लागते.

जाताना CST वरुन दादाभाई नवरोजी मार्गाने चालत तर येताना Old Custom Road, Reserve bank, Asiatic Library, GPO मार्गाने चालत गेल्यास जुन्या हॅरिटेज बिल्डिंगीस बघायला मिळातील.

सरळ एक सेवन सीटर इर्तिका सारखी बुक करा पुणे मुंबई पुणे म्हणजे एकत्र गप्पा मारत जाता येईल... मधेमधे ब्रेक घेता येतील...रोड ट्रिप सारखी मजा नाही....

अश्विनी गटग Proud
बरेच लोक्स जमले.. ते ही पुण्याहून येताहेत लोकं. काळाघोडा जोरात आहे यंदा.. फोटो चिक्कार काढा आणि शेअर करा

खूप दिवसांनी धागा काढून गटग! चर्चा वाचायला मजा येतेय. हर्पेन Lol रीळलेखक के हैसियत से तू धावत जा गटगला.
मजा करा, वृत्तांत लिहा. Happy

हर्पेन Lol

मजा करा सगळे.. वृत्तांत, फोटो टाकायला कंजुशी करू नका

हर्पेन Lol
अस्मिता Rofl

मलापण आवडलं असतं यायला...

गटगसाठी शुभेच्छा सगळ्यांना!

@ साहिल शाह...खूप छान आणि उपयोगाची माहिती...धन्यवाद...
माझी मुलगी पण येणार आहे बरोबर ..तिला काळा घोडा फेस्टिवल बघायचा आहे...सो जमेल का? गटग बरोबर?

काळा घोडा फेस्टिवल बघायचा आहे.जमेल का?
.
.
>>जहांगीर कला दालनापाशी असलेल्या आडव्या रस्त्यात कलाकृती मांडलेल्या असतात तिथे सेल्फी,ग्रुप फोटो काढले जातात त्यास एक तास खूप झाला. परंतू हे फेस्टीवलचा पाच टक्केच भाग झाला. आठ दिवस रोज आठ तास कार्यशाळा आजुबाजूच्या इमारतींत भरतात ते पाहणे/भाग घेणे असते. ती कार्यक्रमपत्रिका ओनलाइन सापडेल. तिथे याचे एक जाडजुड बुकलेटही मिळते.
१)चित्रकला
२)पॉटरी
३) फोटोग्राफी
४)डान्स
५) सिनेमा संबंधित स्क्रिप्ट राइटिंग, ॲक्टिंग, वगैरे
६)लेखन
असे अनेक भरगच्च कार्यक्रम असतात आणि या क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन असते.
पाच ते पंधरा वयातील मुलांसाठी खास जत्राच.
सुरुवातीचे मुख्य प्रायोजक टाईम्स ओफ इंडिया पेपर्स होते . सध्या हिंदुस्थान टाईम्स आहेत.

Pages