फुटबॉल विश्वचषक २०२२

Submitted by आशुचँप on 12 November, 2022 - 12:39

जगात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक २०२२ स्पर्धेला येत्या रविवार (२० नोव्हेंबर) पासून सुरुवात होत आहे. या महास्पर्धेच्या चर्चेसाठी हा धागा

स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यादाच कुठल्या अरब देशात ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे नोहेंबर डिसेंबर मध्ये ही स्पर्धा कारण तिथल्या उन्हाळ्यात खेळायची तर बातच नाही. आतासुद्धा कतारमध्ये एसी स्टेडीयम असतील असे जाहीर करण्यात आले आहे.

दरवेळी प्रमाणेच ८ ग्रुपमधून १६ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. असे म्हणले जात आहे की ३२ संघ असलेली ही कदाचित शेवटची स्पर्धा आहे. पुढील विश्वचषकाला संघांची संख्या वाढवली जाईल.

ग्रुप A : कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड
ग्रुप B : इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
ग्रुप C : अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
ग्रुप D : फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया
ग्रुप E: स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी, जपान
ग्रुप F: बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
ग्रुप G : ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
ग्रुप H: पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया प्रजासत्ताक

यावेळी चाहत्यांना धक्का म्हणजे माजी विजेता इटलीचा संघ मुख्य स्पर्धेतच नाही, ते क्वालिफायच झाले नाहीत. अजून दोन नसलेले संघ म्हणजे रशिया आणि युक्रेन. फिफाने रशिया क्वालिफाय झाला असतानाही त्यांच्या आक्रमक युद्धामुळे त्यांना बाद केले आहे तर युक्रेन प्रयत्न करूनही क्वालिफाय होऊ शकली नाही.
दर स्पर्धेत एक तरी ग्रुप ऑफ डेथ असतोच, तो परत एकदा जर्मनीच्या वाट्याला आलाय. ग्रुप E मध्ये स्पेन तर बलाढ्य संघ आहेच पण जपान आणि कोस्टा रिका हे धक्कादायक निकाल देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे फिंगर्स क्रॉस्ड.

ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. पहिल्या दिवशी एक आणि त्यानंतर दररोज दोन ते चार सामने होतील. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-16 चे सामने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम फेरी होईल.

फिफा वर्ल्ड कप २०२२ चे लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे बघू शकता?

Viacom-१८ कडे भारतातील FIFA विश्वचषक २०२२ चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-१८ आणि स्पोर्ट्स-१८ एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.30 आणि सायंकाळी 6.30 वाजता सुरू होतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रोएशिया जिंकले
गेल्या वेळी दुसरे आणि या वर्ल्ड कप ला तिसरे
लुका मोद्रीक चा शेवटचा वर्ल्ड कप
लिजंड् रिटायर होणार अजून एक

राज, १०० टक्के सहमत! गेम फॉर द एजेस! मेसी खरच मॅजीशिअन आहे!

आर्जेन्टिनाचा दुसरा गोल जेव्हा होत होता तेव्हा मी टीव्ही समोर उड्या मारत अक्षरशः वेडा होउन नाचत होतो. फक्त चार का पाच सिंगल पासेस मधे अख्खे फिल्ड क्रॉस करुन गोल झाला! काय नजाकत! काय अचुकता! काय जादु त्या ५ पासमधे! डोळ्याचे पारणे फिटणे की काय ते म्हणतात ना! त्याचा जिवंत अनुभव आला तो गोल बघताना. शेवटचा असिस्ट पास मेसीचा जरी नसला तरी त्या सिक्वेन्समधल्या त्याने केलेल्या पासला परत परत बघावेसे वाटते व ते बघीतल्यावर मेसीला मॅजीशिअन का म्हणतात ते कळते.

पण फ्रांस व एमबापे च्या नेव्हर से डाय अ‍ॅटिट्युडला दाद दिली पाहीजे. आजच्या फायनलमधे माझ्या मते अर्जेन्टिना ७५ टक्के वेळेत सरस खेळले तर फ्रान्स २५ टक्के. तरीही सामना ओव्हरटाइमच नाही तर पेनल्टी शुट आउट पर्यंत त्यांनी खेचला. बिचार्‍या एमबापेची हॅटट्रिक फुकट गेली.

पण मेसी व अर्जेन्टिना या विश्वचषकाचे नक्कीच वेल डिझर्व्ह्ड विजेते होते यात वाद नसावा! व्हॉट अ वर्ल्ड कप फायनल! टेक अ बाव बोथ टिम्स!

* नजाकत! काय अचुकता! काय जादु त्या ५ पासमधे! डोळ्याचे पारणे फिटणे की काय ते म्हणतात ना! त्याचा जिवंत अनुभव आला तो गोल बघताना..*. अगदीं अचूकi वर्णन !!! अप्रतिम गोल होता तो अर्जेंटिनाचा !!!
एकंदरीतच अर्जेंटिना सरस खेळ खेळले. फायनल असावी तशी करण्यात फ्रान्सच्या खेळाला श्रेय जातंच जातं.
दोन्ही संघांना सलाम ! मेस्सीला त्रिवार मुजरा !!!

मेस्सीला मुजरा.. चिडून पेनल्टी किक्स मिळवणे आणि गोल्स करणे सोपे नाही.. अर्जेंटिना मिसाल आहे...

आजची फायनल भारी होती! आतापर्यंत बघितलेल्या वर्ल्डकपच्या सगळ्या फायनल्स मधली बेस्ट. मला फ्रान्स जिंकावं असं वाटत होतं पण अर्जेंटीना जिंकले तरी ठिके. अर्जेंटीनाचा दुसरा गोल आणि एम्बाप्पेने मारलेला फिल्ड गोल अशक्य भारी होते !
पेनल्टी शूट आऊटमध्ये फ्रान्सची खेळाडूंची निवड चुकली की काय काय माहित.
एकंदरीत हा वर्ल्डकप जबरी झाला. मस्त मॅचेस, बरेच अपसेट्स त्याचबरोबर फायनलला नेहमीचे यशस्वी आणि अशक्य भारी फायनल. मजा आली. Happy

अर्जेंटिना 2-0 झाल्यावर आता हे असेच वेळ घालवत कंटाळवाणा गेम करतील असे वाटलेलं
पण नंतर एकदम चित्रच बदलले
पहिल्या हाफ मध्ये फ्रांस चे काहीच कोऑर्डईनेशन वाटत नव्हतं
नंतरही एम्बापे एकटाच झुंजत होता
ग्रीझमन, जिरु सगळे बाहेर गेले

पण फायनल जशी व्हायला हवी होती तशीच झाली, एकदम उत्कंठावर्धक

*ग्रीझमन, जिरु सगळे बाहेर गेले* - जिरुडला तर मध्यंतराच्याही खुप आधी बाहेर बोलावलं होतं. हे जरा खटकणारंच होतं. पण कोच याबाबतीत सार्वभौम समजणच योग्य.

सॉलिड झाली कालची मॅच . पाच वर्षाची लेक झोपत न्हवती मग तिला हि बसवले मॅच बघायला . म्हटलं उद्या मोठी झालीस कि सांगशील कि मेस्सी ची वर्ल्डकप फायनल बघितलीय म्हणून .
मेस्सी ग्रेट का आहे हे त्याचा दुसरा गोल बघून पुन्हा कळले . एम्बापे ने मस्त फाईट दिली . मॅच तर एम्बापे विरुद्ध अर्जेंटिना अशीच झाली . एम्बापे बद्दल वाईट वाटलं शेवटी. पहिली ८० मिनिटे तर तो एकदम न्यूट्रलाइज होता. शेवटच्या १० मिनिटात एकदम ऍक्टिव्ह झाला.

च्रप्स, तुम्ही सार्कॅस्टिकली तसे बोलत असाल तर मला काही तुम्ही म्हणता तसे मेसीने रेफरी वर चिडुन पेनल्टी मिळवुन काल गोल केले असे वाटत नाही. नाहीतर तुम्ही बघीतलेला गेम व मी काल बघीतलेला फायनलचा गेम हे दोन वेगवेगळे गेम असावेत.

कालच्या अर्जेंटिनाच्या दुसर्‍या गोलचा सिक्वेन्स असा होता.. अल्व्हारेझ टु मेसी, मेसी बॅक टु अल्व्हारेझ विथ इनक्रेडिबल डेलिकेट क्रॉस बॅक फ्लिप, देन अल्व्हारेझ टु मॅकअ‍ॅलिस्टर अँड फायनली मॅकॅलिस्टर टु डि मरिया क्रॉस पास! हे सगळे वन टच पासेस इतके अचुक होते व इतक्या वेगात घडले की एकाही फ्रेंच डिफेंडरचा पाय या ४ पासेसच्या दरम्यान फुटबॉलला लागु शकला नाही!

हे सगळे आपल्या डोळ्यासमोर घडायला १० सेकंदापेक्षाही कमी वेळ लागला असेल! अहाहा! एखाद्या आर्टिस्टने आपल्या डोळ्यासमोर एक सुंदर चित्र साकार करावे तसेच त्या चार फुटबॉल आर्टिस्टनी आपल्यापुढे तो सुंदर गोल साकार केला! प्युअर आर्ट! मजा आली बघताना!

भाउ, आशुचँप, खर म्हणजे ग्रिझमानला बाहेर काढलेले मलाही आवडले नाही. तो पण मेसी सारखाच जबरदस्त प्लेमेकर आहे. पण काल पहिल्या हाफमधे त्याचेच नाही तर फ्रांसच्या सगळ्या मिडफिल्डर व फॉरवर्ड्सचे पिकपॉकेटींग अर्जेंटिनाचे मिडफिल्डर्स रिलेंटलेसली व बिनदिक्कत करत होते! ते बघुन मला वाटते फ्रेंच कोचला कळुन चुकले की नजाकती गुझमनच्या जागी ठगासारखे रफ खेळणारे कोणीतरी पाठवुन अर्जेंटिनाच्या खेळाच्या र्हिदममधे काहीही करुन व्यत्यय आणला पाहीजे.

खरच पहिल्या ८० मिनिटात फ्रांस वॉज नो शो! पण मग रेग्युलेशनच्या शेवटच्या १०-१५ मिनिटात व नंतरच्या ३०-३५ मिनिटाच्या ओव्हरटाइममधे इतका नाट्यमय, वेगवान, चुरशीचा व सी सॉ सारखा गेम झाला की मजा आली बघताना. मी एका जागेवर बसुन गेम बघुच शकत नव्हतो. दोन्ही संघांनी सर्वस्व पणाला लावुन व जिव तोडुन खेळ केला. दोन्ही संघांनी खुप गोल अ‍ॅपोर्चुनीटीज निर्माण केल्या. दोन्ही संघांनी बरेच "ऑलमोस्ट" गोल केले होते त्या वेगवान ३५-४० मिनिटाच्या खेळादरम्यान! पेनल्टी शुट आउट च्या आधी ३-३ असा स्कोर असण्याऐवजी स्कोर ५-५ असाही होउ शकला असता! दोन्ही टीम्सना एक्स्ट्रा टाइमच्या शेवटी शेवटीपर्यंत गोल करुन पेनल्टी शुट आउटच्या आधीच गेम संपवुन वर्ल्ड कप जिंकायच्या अनेक संध्या आल्या होत्या.

म्हणुनच आपल्याला शेवटपर्यंत कधी अर्जेंटिना जिंकेल तर कधी फ्रांस जिंकेल असे आलटुन पालटुन वाटत राहीले व कोण वर्ल्ड कप उचलेल हे आपण शेवटपर्यंत सांगु शकत नव्हतो. टु मी दॅट्स द हॉलमार्क ऑफ एनी ग्रेट गेम रिगार्डलेस ऑफ द स्पोर्ट!

पहिली पेनल्टी... खरेच फ्रान्स चा fault होता का...
अर्जेंटिना फायनल पर्यंत येताना किती पेनल्टी मिळवून आला ते बघितले तर कळेल किती चीटिंग झाली आहे...
अर्थात मेस्सी ने त्या पेनल्टी कन्व्हर्ट केल्या त्याचे क्रेडिट आणि स्किल त्याचे आहेच....

मी फुटबॉलमधे तुमच्या इतका अभ्यासु व दर्दी नाही . मी एक साधारण फुटबॉलप्रेमी आहे. माझ्या साध्या च्ष्म्यातुन मला मेसीचे बॉल कंट्रोल चे कमालीचे कसब दिसते. तेच एमबापे बाबत. हा खेळाडु अर्जेंटिनाचा आहे म्हणुन आवडता व एमबापे फ्रान्सचा म्हणुन नावडता असे मनात धरुन मी कधीच फुटबॉलच काय पण कुठलाही खेळ बघत नाही. जो खेळाडु व जो संघ चांगला खेळतो त्याला मी दाद देतोच. म्हणुन मग मला पाकिस्तानचे असुनही झहीर अब्बास व इन्झमाम उल हक हे क्रिकेटर सुनिल गावस्कर व सचिन तेंडुलकर एवढेच आवडायचे.

मला एवढेच म्हणायचे आहे की फक्त पेनल्टी मिळाल्यामुळे अर्जेंटिना जिंकले असे म्हणणे अन्यायकारक होइल. यु हॅव्ह टू गिव्ह द क्रेडिट व्हेअर इट्स ड्यु! कालच्या फायनलमधे मेसी अँड हिज अर्जेटाइन टीम वेअर द डिझर्व्हिंग विनर्स( आणी जर फ्रांस जिंकले असते तर मी एमबापे व त्याच्या फ्रांस टीमलाही डिझर्व्हिंग विनर्स म्हटले असते.. मार्जिन ऑफ व्हिक्टरी वॉज सो लिटल अँड क्वालिटी ऑफ द गेम वॉज सो हाय फ्रॉम बोथ टीम्स.. खासकरुन शेवटची ४०-४५ मिनिटे!)

काल दोन्ही टिम्स ने विजेत्यांना साजेसा खेळ केला
त्यामुळे कुणीही जिंकले असते तरी तेवढाच आनंद झाला असता

फ्रांस चा विक्रम होता होता राहिला आणि आता जवळपास अशक्यच वाटत आहे त्यांना हे साधायला
लागोपाठ दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या देशात त्यांचा समावेश झाला असता
पण आता बाकी नवीन संघ ज्या तडफेने, उमेदीने पुढे येत आहेत त्यावरून तरी कुठल्याही संघाला आता निर्विवाद वर्चस्व गाजवता येणारे नाही

पुढच्या वर्ल्ड कप ला तर आता 48 संघ येणार असे म्हणत आहेत
तसं झालं तर मग अजूनच धुमाकूळ
Happy

जबरदस्त मॅच. अर्जेंटिनाच्या हातातोंडाशी आलेला घास जातोय का असे बऱ्याचदा वाटले. असो, शेवटी अर्जेंटिना जिंकले ते महत्त्वाचे.

>>पहिली पेनल्टी... खरेच फ्रान्स चा fault होता का...<
१००% फॉल्ट होता. नो डाउट अबौट इट.

मला अर्जेंटिनाचा तिसरा गोलहि एक्दम चाबूक वाटला. या क्लिपमधे ३:१५च्या पुढे बघा. इट एफिंग क्रॉस्ड द लाइन...

Pages