फुटबॉल विश्वचषक २०२२

Submitted by आशुचँप on 12 November, 2022 - 12:39

जगात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक २०२२ स्पर्धेला येत्या रविवार (२० नोव्हेंबर) पासून सुरुवात होत आहे. या महास्पर्धेच्या चर्चेसाठी हा धागा

स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यादाच कुठल्या अरब देशात ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे नोहेंबर डिसेंबर मध्ये ही स्पर्धा कारण तिथल्या उन्हाळ्यात खेळायची तर बातच नाही. आतासुद्धा कतारमध्ये एसी स्टेडीयम असतील असे जाहीर करण्यात आले आहे.

दरवेळी प्रमाणेच ८ ग्रुपमधून १६ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. असे म्हणले जात आहे की ३२ संघ असलेली ही कदाचित शेवटची स्पर्धा आहे. पुढील विश्वचषकाला संघांची संख्या वाढवली जाईल.

ग्रुप A : कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड
ग्रुप B : इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
ग्रुप C : अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
ग्रुप D : फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया
ग्रुप E: स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी, जपान
ग्रुप F: बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
ग्रुप G : ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
ग्रुप H: पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया प्रजासत्ताक

यावेळी चाहत्यांना धक्का म्हणजे माजी विजेता इटलीचा संघ मुख्य स्पर्धेतच नाही, ते क्वालिफायच झाले नाहीत. अजून दोन नसलेले संघ म्हणजे रशिया आणि युक्रेन. फिफाने रशिया क्वालिफाय झाला असतानाही त्यांच्या आक्रमक युद्धामुळे त्यांना बाद केले आहे तर युक्रेन प्रयत्न करूनही क्वालिफाय होऊ शकली नाही.
दर स्पर्धेत एक तरी ग्रुप ऑफ डेथ असतोच, तो परत एकदा जर्मनीच्या वाट्याला आलाय. ग्रुप E मध्ये स्पेन तर बलाढ्य संघ आहेच पण जपान आणि कोस्टा रिका हे धक्कादायक निकाल देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे फिंगर्स क्रॉस्ड.

ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. पहिल्या दिवशी एक आणि त्यानंतर दररोज दोन ते चार सामने होतील. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-16 चे सामने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम फेरी होईल.

फिफा वर्ल्ड कप २०२२ चे लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे बघू शकता?

Viacom-१८ कडे भारतातील FIFA विश्वचषक २०२२ चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-१८ आणि स्पोर्ट्स-१८ एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.30 आणि सायंकाळी 6.30 वाजता सुरू होतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ

ब्राझील चांगले खेळले. दुसरा गोल भारी होता.

सर्बिया चा डिफेन्स चान्गला होता पण कुठल्याही आक्रमक धोक्याचा अभाव त्यांना ब्राझील सारख्या टीम समोर नाडणारच होता.

जर्मनी अर्जेंटिना तर हरलेच
इव्हन ब्राझीलचे दोन्ही गोल अगदी सामना संपत आल्यावर झालेत
फ्रांस, बेल्जियम, पोर्तुगाल पण अजून चाचपडत खेळत आहेत

फक्त इंग्लंड आणि स्पेन हेच पहिल्या फेरीत दमदार खेळले आहेत

फिफा मध्ये आशियाई, मिडल ईस्ट आणि आफ्रिकन देशांना आता लिंबटिम्बु समजून चालणार नाही हा इशारा मिळाला असेल युरोपियन आणि लॅटिन संघांना

*ब्राझील चांगले खेळले. दुसरा गोल भारी होता.* +1 हायलाईटस बघितले. लवचिकता, नजाकत, उत्स्फूर्तता ह्या ब्राझिल-स्टाईल पारंपारिक ऑल-आऊट खेळाची थोडी कां होईना चुणूक मला जाणवली ( उदा. दुसरा गोल ). बघूं कसा बहरतो त्यांचा खेळ तें !

अर्जेंटिना 2 मेक्सिको 0
मेस्सी फॉर्मात !
" दक्षिण अमेरिकाच कां ?" , म्हणत अमेरिकने पण ' ब' गटात इंग्लंडला टपली मारत ( स्कोअर 0-0) आपलं घोडं पुढे दामटलंय !!

सध्या, भारतात क्रिकेट ' ऑफ़ साइड' ? Wink

आणखी मिळणार नाहीं ! ह्यापुढे क्रिकेटसारखे तीन तीन कप बंद , फुटबॉल सारखा फक्त एकच विश्वकप !!!20190201_190757_0 (1).jpg

भारी जमलाय

Happy

*नुसता धिंगाणा* - कतारला स्टेडियममधे बीयर वगैरेला मज्जाव आहे पण मैदानात खेळताना मात्र तें घेणं सक्तीचं आहे, असं तर नाहीं ना !!! Wink

ब्राझिल बाद फेरीत. जर्मनी शेवटच्या क्षणिच्या गोलमुळे जेमतेंम स्पर्धेत टिकून . कमरुन3 वि.3 सर्बिया सामना रंगतदार.

बाद फेरीत कोण जाणार याचे बर्याच संघांचे आज तळ्यात- मळ्यात सामने !!

ऑफिसरचं प्रमोशन घेवून तिथे पहिल्याच फेरीत बाद होण्यापेक्षा इथेच झांकली मूठ बरी आहे ना तुझी !! 20190110_122942.jpg

बाद फेरीत आता
अमेरिका वि नेदरलँड
इंग्लड वि सेनेगल

बाकी आज अजून कळतील पुढचे दोन कोण ते

या वेळी प्रचंड धक्कादायक निकाल लागलेत

जर्मनी सलग दुसऱ्या वर्ल्ड कप मध्ये ग्रुप स्टेज मधेच बाहेर पडले आहेत

फारच लाजिरवाणी गोष्ट

तिकडे अर्जेंटिना कसेबसे बचावले आहेत पण फिफा रँकिंग मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेले बेल्जियम पण बाहेर

मोरोक्को आणि जपान त्यांच्या ग्रुप मध्ये अववल स्थानावर

ही स्पर्धा भलतीच इंटरेस्टिंग होत चालली आहे

जपान जबरी फास्ट आहे .. लवकर बॉल पझेशन मिळत नाही त्यांना पण मिळाला तर सोडत नाहीत गोल अटेम्प्ट केल्या शिवाय....

पहिला बाद फेरीचा सामना झाला

अपेक्षेप्रमाणे नेदरलँड अमेरिकेला हरवून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेशते झाले आहेत

आणि एकदंर मायबोलीवर फुटबॉल बद्दल फारच उत्साह दिसत नाही हे जाणवलं Happy

अरे मी बऱ्याच मॅचेस बघतो आणि अधूनमधून हा बाफपण वाचतो. पण इथे येऊन लिहायला होत नाही.
ग्रुप गेम्समध्ये मला सगळ्यात स्पेनचा खेळ आवडला. एकदम फास्ट तरीपण नजाकतदार! फ्रान्स चांगले खेळलेच. बाकी टीममध्ये घाना, केमेरून, कॅनडा, जपान अधेमधे भारी खेळले. जपान तर दोन सामने भारी खेळला.
फ्रान्सची शेवटची मॅच एकदम हाय ड्रामा होती ! पण Tunisia जिंकले ते भारी वाटलं. तेच जिंकायला हवे होते.
मला तो. ऑफसाईड प्रकार काही नीट कळत नाही बऱ्याचदा वाचायचा प्रयत्न केला आहे.

अर्जेंटिना विजयी ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ - १
शेवटच्या मिनिटात अर्जेंटिनाच्या गोलीने बॉल अडवला ते एकदम भारी.

अर्जेंटिना विजयी ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ - १
शेवटच्या मिनिटात अर्जेंटिनाच्या गोलीने बॉल अडवला ते एकदम भारी.

शेवटच्या मिनिटात अर्जेंटिनाच्या गोलीने बॉल अडवला ते एकदम भारी >>> हो !! मारलेल्या दुसऱ्या गोलपेक्षा तो अडवलेला गोल जास्त भारी होता.. Happy मेस्सी मार्टिनेज जोडीने भारी अटॅक केले! पूर्णवेळ प्रेशर ठेवलं होतं. मला मेस्सीचं फार कौतुक वाटतं नाही कारण मी क्लब फुटबॉल बघत नाही आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो ठीकठाक खेळतो. पण आजचा त्याचा खेळ आवडला. त्याने मारलेला पहिला गोल एकदम अचूक आणि तरीही अगदी सहज मारल्यासारखा होता. नेदरलँड अर्जेंटिना भारी होईल.

सेनेगल ने काल सुरवातीला चांगली आक्रमणे केली
त्यांची एक पेनलटी हिरावून घेतल्यावर मात्र काहीसे ढिले पडले
इंग्लड ने पण मस्त गेम केला, स्पेशली पासींग आणि डीप अटॅक भारी होते

ब्राझील चा गेम क्लास होता कालचा
पुन्हा एकदा ब्राझील चे युग अवतरणार असे वाटलं
काय पासींग काय फिनिश
सांबा डान्स
फुल्ल धमाल

त्यांचा फॉर्म बघता कप घेतील असं वाटत आहे

भाहारीही पेनल्टी शूट आऊट !! Happy
मोरक्कन गोली अमेझिंग होता. त्याने आधी फिल्ड गोल पण आडवले होते चांगले.

हार्ड लक स्पेन !

ब्राझील चा गेम क्लास होता कालचा
पुन्हा एकदा ब्राझील चे युग अवतरणार असे वाटलं
काय पासींग काय फिनिश
सांबा डान्स
फुल्ल धमाल

त्यांचा फॉर्म बघता कप घेतील असं वाटत आहे >>> मम्

ब्राझील १९९४ सालचा फुटबॉल विश्वचषक विजेता असला तरी मला त्या वेळी काहीही कळत नव्हते. पुढे १९९८ साली मी शाळकरी वयात (आठवी-नववीत) असतांना ब्राझील फ्रांसकडून अंतिम सामना हरल्याने फारच वाईट वाटले होते (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री कधीतरी सामना झाला होता, आणि सकाळी ६ च्या क्लासला ही बातमी समजल्यानंतर फारच मूड ऑफ झाला होता). मात्र २००२ साली (बारावी व PMT ची परीक्षा आटोपल्याने निवांत वेळ होता) अंतिम सामन्यात जर्मनीला नमवल्याने, ब्राझीलला विश्वविजेता म्हणून बघण्याची ईच्छा पूर्ण झाली. अत्यंत आनंद झाला होता. त्यानंतर दुर्दैवाने ब्राझील पुन्हा कधी विश्वचषक जिंकू शकला नाही. २००६, २०१० व २०१८ मध्ये अनुक्रमे फ्रान्स, नेदरलँड व बेल्जीअम कडून उपउपांत्य फेरीत हरला होता. विशेषतः २०१४ च्या विश्वचषकाचा यजमान ब्राझील असल्याने संघाला जरा फायदा होईल असे वाटत होते, त्याचबरोबर भारत व ब्राझील दोन्ही देशांच्या प्रमाण वेळेत ८.३० - ९.३० तासांचा फरक असल्याने तेथील सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्य वा उत्तररात्री होत असत. पण तेव्हाही ब्राझीलचे दुर्दैव आड आले. उपांत्य फेरीत जर्मनीकडून ब्राझीलचा ७-१ असा मानहानीजनक पराभव (गेल्या अनेक वर्षात ब्राझील एवढ्या गोलफरकाने कधीही हरला नव्हता) बघून सबंध रात्र झोप आली नव्हती. त्यामुळे कदाचित संघाचे (माझे नव्हे) मनोधैर्य खचल्याने तिसऱ्या व चौथ्या स्थानाच्या लढतीतही नेदरलँडकडून ब्राझीलचा ३-० असा पराभव बघून तीही रात्र दुःखात जागून काढली.

प्रत्येक विश्वचषक खेळलेला ब्राझील हा एकमेव संघ आहे. शिवाय १९९४ पासून तो कमीतकमी सातत्याने उपउपांत्य फेरी गाठत आहे. त्यामुळे ह्यावेळीतरी २० वर्षांचा दुष्काळ संपून ब्राझील पुन्हा एकदा विश्वचषक जिंकावा ही मनोमन ईच्छा आहे.

*ब्राझील पुन्हा एकदा विश्वचषक जिंकावा ही मनोमन ईच्छा आहे.* - +1. शिवाय, पेले गंभीर आजारी असल्याने, त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करताना ब्राझिल संघाच्ं विश्वचषक जिंकण्यासाठीचं मोटीव्हेशंन द्विगुणीत झालं असावं .

ब्राझील जिंकावा यासाठी माझंही मम! त्याखालोखाल पोर्तुगाल फेवरेट!

सेमी फायनल साठी माझे फेवरेटस

नेदरलँड - ब्राझील
फ्रान्स - पोर्तुगाल

सध्यातरी टॉप ८ मध्ये पोर्तुगालचा पेपर सगळ्यात सोपा वाटतोय, आणि त्याखालोखाल ब्राझीलचा.
बाकीचे चारही संघ तुल्यबळ!

फायनल ब्राझील आणि पोर्तुगाल आणि कप टू ब्राझील! (स्वप्नरंजन पुरे)

Pages