फुटबॉल विश्वचषक २०२२

Submitted by आशुचँप on 12 November, 2022 - 12:39

जगात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक २०२२ स्पर्धेला येत्या रविवार (२० नोव्हेंबर) पासून सुरुवात होत आहे. या महास्पर्धेच्या चर्चेसाठी हा धागा

स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यादाच कुठल्या अरब देशात ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे नोहेंबर डिसेंबर मध्ये ही स्पर्धा कारण तिथल्या उन्हाळ्यात खेळायची तर बातच नाही. आतासुद्धा कतारमध्ये एसी स्टेडीयम असतील असे जाहीर करण्यात आले आहे.

दरवेळी प्रमाणेच ८ ग्रुपमधून १६ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. असे म्हणले जात आहे की ३२ संघ असलेली ही कदाचित शेवटची स्पर्धा आहे. पुढील विश्वचषकाला संघांची संख्या वाढवली जाईल.

ग्रुप A : कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड
ग्रुप B : इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
ग्रुप C : अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
ग्रुप D : फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया
ग्रुप E: स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी, जपान
ग्रुप F: बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
ग्रुप G : ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
ग्रुप H: पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया प्रजासत्ताक

यावेळी चाहत्यांना धक्का म्हणजे माजी विजेता इटलीचा संघ मुख्य स्पर्धेतच नाही, ते क्वालिफायच झाले नाहीत. अजून दोन नसलेले संघ म्हणजे रशिया आणि युक्रेन. फिफाने रशिया क्वालिफाय झाला असतानाही त्यांच्या आक्रमक युद्धामुळे त्यांना बाद केले आहे तर युक्रेन प्रयत्न करूनही क्वालिफाय होऊ शकली नाही.
दर स्पर्धेत एक तरी ग्रुप ऑफ डेथ असतोच, तो परत एकदा जर्मनीच्या वाट्याला आलाय. ग्रुप E मध्ये स्पेन तर बलाढ्य संघ आहेच पण जपान आणि कोस्टा रिका हे धक्कादायक निकाल देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे फिंगर्स क्रॉस्ड.

ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. पहिल्या दिवशी एक आणि त्यानंतर दररोज दोन ते चार सामने होतील. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-16 चे सामने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम फेरी होईल.

फिफा वर्ल्ड कप २०२२ चे लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे बघू शकता?

Viacom-१८ कडे भारतातील FIFA विश्वचषक २०२२ चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-१८ आणि स्पोर्ट्स-१८ एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.30 आणि सायंकाळी 6.30 वाजता सुरू होतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यंगस्टर टू वॉच - जुड बेलिंगहॅम. एक नव्या दमाचा आणि परिपूर्ण मिडफिल्डर. त्याच्या वर खूप मोठी जबाबदारी असेल>>>

आज मारलाय गोल त्याने
इंग्लड ने धुव्वा केला इराण चा
हाफ टाईमलच 3-0 आहेत

आशुचॅम्प

आशियाई आणि बड्या यूरोपीय संघांमध्ये खूप मोठी क्वालिटी गॅप आहे.

हि गॅप भरून निघायला अजून काही दशकही लागू शकतील.

हो ना, कुठं जवळपास पण नसतात हे
त्यातल्या त्यात आफ्रिकन देश आता चमक दाखवत आहेत पण तेही फारसे ग्रुप स्टेजच्या पुढं जात नाहीत

फुटबॉल सगळा युरोपियन आणि लॅटिन अमेरिकी देशांनी डोमीनेट केलाय

*फुटबॉल सगळा युरोपियन आणि लॅटिन अमेरिकी देशांनी डोमीनेट केलाय* - माझा सखोल अभ्यास अजिबात नाहीं. तरी पण अनेक विश्वचषक स्पर्धा पाहून आनंद घेताना झालेली इन्प्रेशनस -
1) पूर्वी युरोपियन व लॅटिन अमेरिकेतीलही प्रत्येक देशाची कांहींशी वेगळी अशी खेळाची शैली जाणवायची. आतां, बहुतेक सर्वच देशांतील चांगले खेळाडू युरोपमधेच क्लब फुटबॉल अधिकतर खेळत असल्याने, वैविध्य कमी होवून खेळ एकसुरी वाटतो. अर्थात, खेळ अधिकाधीक स्पर्धात्मक, नियोजनबद्ध व दर्जेदार झालाय व कसब एका वेगळ्याच उंचीवरही गेलंय ( उदा. मेस्सी, रोनाल्डो इ.चे अफलातून गोल ) हें निर्विवाद.
2) क्लबशी व क्लबच्या चाहत्यांशी जडलेलं घट्ट नातं हें देशासाठी खेळतानाचं मोटिव्हेशन कांहीसं मवाळ बनवत असावं. ( नेमार ब्राझिलसाठी, मेस्सी अर्जेटिनासाठी अपेक्षाभंगाचंच सातत्य दाखवतात).
3 )दर वेळी, एखादा तरी आफ्रिकन देश चमकदार, आकर्षक खेळ करुन, अफ्रिका जागतिक फुटबॉलमधे मुसंडी मारणार अशी हवा निर्माण करतो. पण अजून तसं घडत नाहीं.कदाचीत, देशातल्या खेळाला फायदा होण्यापूर्वीच प्रतिभावान खेळाडूना युरोपमधले घेवून जात असावेत .
4) मीं स्वत: ब्राझिलचा चाहता आहे व आतां तरी त्यांत बदल होणे नाहीं.
(* २०१० चा नेदरलँड्स आणि पोर्तुगालचा सामना मस्त होता . ४ लाल कार्ड्स आणि १६ पिवळी कार्ड्स दिले* -
90च्या दशकातल्या एका विश्वचषकात ह्या ' पिवळ्या कार्ड' मुळे मला एक खास थरार अनुभवता आला होता. इंडियन एक्सप्रेसच्या खास विश्वचषक पुरवणीत माझं पहिलं कार्टून प्रसिद्ध झालं होतं. पेथोलॉजीस्ट एका आडदांड फुटबॉलपटूला रिपोर्ट बघून सांगतो, " Definitely No Jaundice ! Must be those yellow cards you are seeing too often !! " )

मेस्सी अर्जेटिनासाठी अपेक्षाभंगाचंच सातत्य दाखवतात >>>>

हे वाक्य मला थोडं हार्श वाटतं.

मेस्सी स्वतःच्या जोरावर अर्जेन्टिना ला 4 मोठ्या अंतिम सामन्या पर्यंत घेऊन गेला (3 वेळा - कोपा अमेरिका / दक्षिण अमेरिके ची खंडप्राय स्पर्धा आणि एकदा वर्ल्ड कप).

यातले 3 अंतिम सामने ते एक्सट्रा टाइम मध्ये / नंतर हरले (2 वेळा पेनल्टी शूटआऊट आणि एकदा गोल्डन गोल ने).

फुटबॉल सांघिक खेळ असल्याने ह्या एक्सट्रा टाइम मधल्या पराभवांचे खापर फक्त त्याच्या डोक्यावर फोडणे अनफेयर होईल.

आतां, बहुतेक सर्वच देशांतील चांगले खेळाडू युरोपमधेच क्लब फुटबॉल अधिकतर खेळत असल्याने, वैविध्य कमी होवून खेळ एकसुरी वाटतो. >>>>

हे अगदी खरं आहे.

गेल्या 10-15 वर्षांतल्या मोठाल्या स्पर्धांचा आढावा घेतला तर एखाद दुसरा अपवाद वगळल्यास अंतिम फेरीत पोचलेले संघ बहुतांशी सेफ्टी फर्स्ट टाईप चा गेम खेळतात.

मुळात क्लब कडून खेळताना हे स्टार्स गॅलरी गेम खेळतात
भारी ड्रिबल, बायसिकल किक वगैरे
पण तोच खेळाडू देशाकडून खेळताना कोच सांगेल तसा शांतपणे खेळताना दिसतो
एकतर हे खेळाडू देशापेक्षा जास्त वेळ क्लब च्या टीमसोबत जास्त असतात, त्यांच्यात जास्त bonding असल्याचे जाणवते
ते फाईन ट्युनिंग इथं इतकं दिसत नाही कारण वर्ल्ड कप किंवा युरो कप किंवा काँनोंबोल, कॉनकाफ़ सोडलं तर असे किती वेळ ते देशाच्या टीमसोबत असतात?
याउलट दर आठवड्याला क्लबची match असते आणि त्यांच्या त्यांच्यात रायव्हली पण भरपुर असते
म्हणजे क्लब हा त्यांच्यात देशातून मोठा असं म्हणणार नाही पण स्टार्स हे जितक्या परसेंट मध्ये क्लबकडून खेळतात तितके ते देशाकडून खेळताना दिसत नाहीत

याचे अजून एक कारण म्हणजे रियल माद्रिद किंवा बार्सिलोना किंवा मॅन्यु वगैरे टीम मध्ये तितकेच बेस्ट मिडफिल्डर, डिफेडर असतात
त्यांच्यासोबत खेळताना लागलेली सवय देशातल्या त्या मानाने तितक्या स्ट्रॉंग खेळाडूंसोबत खेळताना जड जात असणार

बहुतेक सर्वच देशांतील चांगले खेळाडू युरोपमधेच क्लब फुटबॉल अधिकतर खेळत असल्याने, वैविध्य कमी होवून खेळ एकसुरी वाटतो. >>>
मान्य, आणि कौशल्य हे पॉवर गेम्स मध्ये बदलत चाललं आहे
प्रचंड वेगाने बॉल न्यायचा, फास्ट पासींग आणि ताकदीने खेळायचा असं काहीसे चित्र आहे

माने च्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या सेनेगल ने नेदरलँड ला चांगलेच रोखून धरलाय की

65 मिनिटं झाली एकही गोल नाही

गोल केल्यावर खेळाडूने टिशर्ट काढले तर त्याला फ्री किक बसून जेल ची हवा खायला लागणार आहे का
आणि कतार मध्ये प्रेक्षकांसाठी एक नवे हॅक बाजारात आले आहे म्हणे
Cola Can.jpg

Wink
( फुटबॉलप्रेमी सौरव गांगुलीला तर कतारच्या आसपासही न फिरकण्याचा सल्ला देण्यात आला आहे; त्याला तर स्टेडियममधेच शर्ट काढून तो हवेत फिरवायची वाईट संवय आहे !! Wink )

अर्जेंटिना हरली
सौदी अरेबिया कडून

ओव्हर कॉन्फिडन्स नडला Happy

हो स्पेशली त्यांचा डिफेन्स
हेडर ने काय अडवलाय सॉलिड
गोल सुद्धा अप्रतिम मारले

आता अर्जेंटिना ला मेक्सिको आणि पोलंड आहे
दोन्ही टीम अगदी हलक्यात घेण्यासारख्या नाहीत

*जपान ने जर्मनी ला हरवले.* - सगळ्या मोठ्या टीम बहुतेक " पहिला डाव देवाचा/ भूताचा " असं म्हणतच ह्या स्पर्धेत उतरल्या आहेत !! आज लाडका ब्राझिल पहिला सामना खेळतोय, म्हणून काळजी !! नेमारचा तर कधीच काय नेम नसतो !!! Wink

जर्मनी ने स्वतःच्या हाताने दिला दान
अतिशय चांगला अटॅक, पझेशन असूनही गोल खाल्ले काय बोलावे कळत नाही
सेम अर्जेंटिना सौदी सारखी झाली
त्यानंही पहिला गोल पेनलटी वर मारला
आणि सेकंड हाफ मध्ये दोन गोल खाल्ले
Ditto त्या लाईन वर जर्मनी खेळली
गोल कंर्व्हर्ट करण्यात अपयश, ऑफसाईड सगळं

पोर्तुगाल वि. घाना.मध्यंतर स्कोअर 0-0.
पोर्तुगाल पहिल्या हाफमधे बव्हंशी बॉलचा ताबा आपल्याकडे ठेवण्यातच मग्न व समाधानी वाटली. अगदीं शेवटीं मात्र आक्रमक चाली खेळायला सुरवात केली. बघूं दुसर्या हाफमधे गोल करण्यावरच दोन्ही संघांचा भर बघायला मिळतो का.

पोर्तुगालने पेनल्टीवर गोल केला पण ती पेनल्टी देणं जरा हार्शच वाटलं. घानाचा लगेचच अप्रतीम फिलड गोल. स्कोअर 1-1 !! पोर्तुगाल सरस संघ असूनही घाना अधिक purposeful , goal oriented खेळताहेत असं जाणवतं.

हो ती पेनलटी बळच दिली असं वाटलं
इव्हन पोर्तुगाल चा दुसरा गोल पण धापाळाय असं वाटलं
ऑफसाईड वाटत होता

घाना ने फारच मस्त खेळ केला

शेवटी धडपडत पोर्तुगल जिकंले 3-2 ने...घाना ने शेवट पर्यंत पोर्तुगाल ची हवा टाईट केली होती ...मजा येणार आहे ह्या वर्ल्ड कप मध्ये

<<हो ती पेनलटी बळच दिली असं वाटलं>>
गोल होत नसतील, तर पेनल्टी कशी मिळवायची हे रोनाल्डोला चांगलंच जमतं. मागच्या वर्ल्ड कपपासून त्याचं हे कसब दिसत आहे.

-- आज उरुग्वे - कोरिया आणि पोर्तुगाल - घाना दोन्ही चांगल्या झाल्या.

Pages