
जगात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक २०२२ स्पर्धेला येत्या रविवार (२० नोव्हेंबर) पासून सुरुवात होत आहे. या महास्पर्धेच्या चर्चेसाठी हा धागा
स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यादाच कुठल्या अरब देशात ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे नोहेंबर डिसेंबर मध्ये ही स्पर्धा कारण तिथल्या उन्हाळ्यात खेळायची तर बातच नाही. आतासुद्धा कतारमध्ये एसी स्टेडीयम असतील असे जाहीर करण्यात आले आहे.
दरवेळी प्रमाणेच ८ ग्रुपमधून १६ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. असे म्हणले जात आहे की ३२ संघ असलेली ही कदाचित शेवटची स्पर्धा आहे. पुढील विश्वचषकाला संघांची संख्या वाढवली जाईल.
ग्रुप A : कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड
ग्रुप B : इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
ग्रुप C : अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
ग्रुप D : फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया
ग्रुप E: स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी, जपान
ग्रुप F: बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
ग्रुप G : ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
ग्रुप H: पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया प्रजासत्ताक
यावेळी चाहत्यांना धक्का म्हणजे माजी विजेता इटलीचा संघ मुख्य स्पर्धेतच नाही, ते क्वालिफायच झाले नाहीत. अजून दोन नसलेले संघ म्हणजे रशिया आणि युक्रेन. फिफाने रशिया क्वालिफाय झाला असतानाही त्यांच्या आक्रमक युद्धामुळे त्यांना बाद केले आहे तर युक्रेन प्रयत्न करूनही क्वालिफाय होऊ शकली नाही.
दर स्पर्धेत एक तरी ग्रुप ऑफ डेथ असतोच, तो परत एकदा जर्मनीच्या वाट्याला आलाय. ग्रुप E मध्ये स्पेन तर बलाढ्य संघ आहेच पण जपान आणि कोस्टा रिका हे धक्कादायक निकाल देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे फिंगर्स क्रॉस्ड.
ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. पहिल्या दिवशी एक आणि त्यानंतर दररोज दोन ते चार सामने होतील. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-16 चे सामने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम फेरी होईल.
फिफा वर्ल्ड कप २०२२ चे लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे बघू शकता?
Viacom-१८ कडे भारतातील FIFA विश्वचषक २०२२ चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-१८ आणि स्पोर्ट्स-१८ एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.30 आणि सायंकाळी 6.30 वाजता सुरू होतील.
पोर्तुगालने स्विस विरुद्ध
पोर्तुगालने स्विस विरुद्ध बादफेरीत रोनाल्डोला बाहेरच बसवून सामन्याच्या 74व्या मिनिटाला मैदानात उतरवला ! तो जायबंदी होवूं नये म्हणून किंवा इतर कांहीं कारण असावं. फुटबॉल विश्वचषकात प्रशिक्षक काय काय डावपेंच लढवतील, सांगणं कठीण !
डॉक्टरनी तुम्हाला सांगितलंय, जरा संभाळून, अजिबात धडपडूं नका . लक्षात असूंद्या, आतां बाद फेरीत आलाय तुम्ही !!
आज ब्राझिल वि. क्रोएशिया -
आज ब्राझिल वि. क्रोएशिया - हा चुरशीचा सामना बघणं व ब्राझिलसाठी नकळत प्रार्थनाही करणं आलंच !
मध्यंतर- ब्राझिल 0, क्रोएशिया
मध्यंतर- ब्राझिल 0, क्रोएशिया 0
आक्रमणात क्रोएशियाचं पासिंग कांहींसं अधिक नेमकं व उजवं वाटलं. बघूं मध्यन्तरानंतर ब्रझिल अधिक प्रभाव पाडतात का. चांगला सामना !
ब्राझील पेनल्टी शूटआऊट नंतर
ब्राझील पेनल्टी शूटआऊट नंतर बाहेर.
क्रोएशिया सलग दुसऱ्या वर्ल्डकपला सेमी फायनल मध्ये.
भारी ! क्रोएशिया प्रेशर
भारी ! क्रोएशिया प्रेशर असताना जास्त चांगले खेळले.
पुढची मॅचपण भारी होणार.
*क्रोएशिया प्रेशर असताना
*क्रोएशिया प्रेशर असताना जास्त चांगले खेळले.* - +1. पहिल्या एक्सट्रॉ वेळात नेमारच्या सुंदर गोलने 1-0 स्कोअर झाल्यावर ब्राझीलचे खेळाडू सामना जिंकल्याच्या उन्मादात कांहिसे बेसावध झाले व तेंच त्याना महागात पडले , असं मला जाणवलं.
अभिनंदन क्रोएशिया !
ब्राझील आले घरी, अर्जेन्टिना
ब्राझील आले घरी, अर्जेन्टिना काठावर पास
आजच्या दोन्ही क्वार्टर
आजच्या दोन्ही क्वार्टर फायनल्समध्ये फुल ऑन ड्रामा !! मजा आली.
मेसीने पहिल्या गोलच्या वेळी दिलेला पास भारी होता... कमेंटिटर म्हणे "He has eyes all over his head and quickly spotted someone waiting there !"
माझे सगळेच अंदाज चुकले
माझे सगळेच अंदाज चुकले म्हणायचे.
असो, खेळाची हीच तर मजा आहे.
आता मात्र पोर्तुगाल ला फुल चांस वाटतोय जिंकण्याचा
काल रात्रीचे दोन्ही सामने
काल रात्रीचे दोन्ही सामने अप्रतिम होते. "It's a beautiful game" याची प्रचिती आली. सहज स्कोअर बघावा म्हणून ब्राझील आणि क्रोएशिया हा सामना लावला तेव्हा 100 मिनिट होऊन गेली होती. शेवटाला तो इतका रोमहर्षक झाला की पुढचा सामना बघायचाच असं झालं. त्या सामन्याने पण निराशा केली नाही.
काल रात्रीचे दोन्ही सामने
.
काल रात्रीचे दोन्ही सामने
.
मोरोक्को 1 वि पोर्तुगाल 0. !!
मोरोक्को 1 वि पोर्तुगाल 0. !!!!!!!!!!
या स्पर्धेतलीं सर्वात मोठी उलथापालथ!!! पोर्तुगाल बाहेर. !
ही स्पर्धा एकूणच उलथा
ही स्पर्धा एकूणच उलथा-पालथोंसे भरी हुई आहे !!
आजची मॅच ठिक ठिकच होती.. मोरोक्कोचा गोली निभावून नेतो आहे !
*मोरोक्कोचा गोली निभावून नेतो
*मोरोक्कोचा गोली निभावून नेतो आहे !* खरंय. कांहीं सेव्ह अफलातून होते त्याचे. अर्थात मोरोक्कोचा गोलही अप्रतिम होता..
इंग्लंडचं आव्हान संपलं.
इंग्लंडचं आव्हान संपलं. कर्णधार केन ची हुकलेली पेनल्टी महागात पडली.
No comments on Argentina
No comments on Argentina entering the final? France is also leading in first half by 1-0.. Messi retirement announced after final.
चुरशीचा सामना झाला नाही पण
चुरशीचा सामना झाला नाही पण मोरोक्कोही लेचेपेचे नव्हते. Match stats बोलके आहेत. आफ्रिकी देशांसाठी एक स्फुर्ती देणारा ठरेल.
मेस्सी कृशल मोमेंट्स ला तुफान
मेस्सी कृशल मोमेंट्स ला तुफान खेळाला. तिसरा गोल भारी बनवला.
Stage is set for a great
Stage is set for a great Final !!!!!
*आफ्रिकी देशांसाठी एक स्फुर्ती देणारा ठरेल.* -. +१. मोरोक्कोने अप्रतिम खेळ करत उपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश केला व तिथेही आपली गुणवत्ता दाखवली . सलाम व शुभेछा !!
कुणीतरी बाईसिकल किक (उलट
कुणीतरी बाईसिकल किक (उलट मागच्या बाजूला )मारून गोल करेल का हे स्वप्न मोरोक्कोच्या खेळाडूने खरे केले. चेंडू अडवला गेला पण अप्रतिम आविष्कार होता.
सेल्फ गोल झाला का या वेळच्या फिफा सामन्यांत?
फायनल अटीतटीची होऊ दे,
फायनल अटीतटीची होऊ दे, पेनल्टी किका नको रे म्हाराजा.
*फायनल अटीतटीची होऊ दे, *. +१
*फायनल अटीतटीची होऊ दे, *. +१ ! दोन्ही संघांचा खेळ फॉर्म व मूड बघता सामना चुरशीचा होणं अपरिहार्य वाटतंय.
मेस्सी तर आयुष्यातला सर्वोत्तम खेळ करण्याच्याच इर्शेने. सामन्यात उतरणार हे निश्चित !
फ्रांस अर्जेंटिना match सॉलिड
फ्रांस अर्जेंटिना match सॉलिड होणारे
दोन्ही टीम भन्नाट फॉर्म मध्ये आहेत
फ्रांस चा एमबापे, जिरु, ग्रीझमन
आणि तिकडे मेस्सी, डी मारिया आणि अलावरेझ
दोन्ही गोलकीपर पण भारी आहेत
त्यामुळे पेनलती ला गेली तर अजूनच धमाल
"चुरशीचा सामना झाला नाही पण
"चुरशीचा सामना झाला नाही पण मोरोक्कोही लेचेपेचे नव्हते. Match stats बोलके आहेत. आफ्रिकी देशांसाठी एक स्फुर्ती देणारा ठरेल." ------> नक्कीच !
क्रोएशिया पेक्षा मोरोक्को ने खूपच चांगला खेळ केला. 3rd पलेस मोरोक्को जिंकेल असं वाटतंय.
फायनल अटीतटीची होईल आणि अर्जेंटिना जिंकेल असं वाटतंय. बघूया!
मेस्सीने निवृत्ती जाहीर करून
मेस्सीने निवृत्ती जाहीर करून अप्रत्यक्षपणे संघावर आता मोरल जबाबदारी टाकली आहे जिंकायची
आपल्या एवढ्या स्टार खेळाडूचा शेवटचा सामना गोड व्हावा यासाठी ते आता अजून तडफेने खेळतील
सचिन ला कसा वर्ल्ड कप मिळवून दिला तसा
सचिनने शंभरावे शतक करण्यात
सचिनने शंभरावे शतक करण्यात वात आणलेला ना?
>>चुरशीचा सामना झाला नाही पण
>>चुरशीचा सामना झाला नाही पण मोरोक्कोही लेचेपेचे नव्हते. <<
सेमायफायनला येउनहि मोराकोच्या खेळात जान नव्हती. गतविजेत्या फ्रांसचं दडपण असावं. मोराकोचा परफॉर्मंस म्हणजे मोक्याच्या वेळी/ठिकाणी पास न करणे, केला तर तिथे कुणिच नसणे किंवा स्कोर करण्याची संधी गमावणे इ. बाबींचा परिपाक होता. फ्रांसला, एस्पेशियली बापेला जिंकण्याकरता जास्त मेहनत घ्यावी लागली नाहि.
फ्रांस मे रिपिट द हिस्टरी...
10 मिनिटं. क्रोएशिया 1-
10 मिनिटं. क्रोएशिया 1- मोरोक्को 1. !!!
दोन्ही संघांचं आक्रमक खेळून निर्णायक आघाडी घेण्याचं धोरण दिसतंय.
भागते भूत कि लंगोटि...
भागते भूत कि लंगोटि...
Pages