Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या आठवड्यात दोन एव्हिक्शन्स?
विकास खूपच सरळ वाटले. लपवाछपवी करता येत नाही. किरण मानेंना नक्की वाईट वाटलं, अपराधी वाटलं की ते अभिनय करत होते काही कळायला मार्ग नाही.
भूत आल्यानंतरच्या या लोकांच्या रिअ‍ॅक्शन्सवरच्या मांजरे करांच्या कमेंट्स पर्फेक्ट होत्या.
अमृता देशमुखे बिग बॉसपेक्षा कॉलेजातल्या वादविवाद स्पर्धेत किंवा ग्रुप डिस्कशनमध्ये आहे असं वाटत आलंय. मुद्दे बरोबर. मांडणी उत्तम . पण हातचं राखून. झोकून देणं नाही. खरा चेहरा दिसला असं वाटत नाही. अर्थात मी फार कमी वेळ बघतो. त्यामुळे हे मत चूक असू शकेल.

मला अजूनही हिंदीतल्या सुरुवातीच्या सीझनचे टास्कस आवडतात. दोन टीम्स नाहीत. सगळ्यांना मिळून एक टास्क. त्यातल्या कामगिरीवर लक्झरी बजेट ठरणार. हल्ली दोन टीम्स असल्याने टास्क पूर्ण करण्याऐवजी दुसर्‍याचे कसे पूर्ण होणार नाही, यावरच फोकस असतो.

कालचे अमृताचे घरातुन बाहेर पडणे अगदीच शॉकिंग होते.... मानेंशी उघड पंगा घेतल्यानंतरच्या आठवड्यापासून तिचा ग्राफ उंचावत होता.... ती स्टॅन्ड घ्यायला लागली होती...... मुद्देसूद तर ती आधीपासूनच बोलत होती पण (बहुतेक) तिच्या स्वभावाविरुद्ध जाऊन भांडायलासुद्धा लागली होती ..... तिच्याबद्दल कुठेतरी सॉफ्टकॉर्नर तयार झाला होता!!
अगदी विनर वगैरे नाही पण तिच्याबद्दल ज्या कमेंट्स मांजरेकरांकडून येत होत्या ते बघता आणि तिला बहुतांश पोल्समध्ये जे वोट्स मिळत होते ते बघता ती फिनाले वीकपर्यंत तरी नक्की जाईल, पहिल्या तीनातही असू शकते असा विश्वास वाटायला लागलेला आणि कदाचित हेच इंप्रेशन मांजरेकरांच्या कमेंट्सवरुन तिचेही आत तयार झालेले असावे त्यामुळे ती स्वतासुद्धा इतकी शॉक्ड वाटत होती काल!!
धोंगडे, माने वगैरे लोकांपेक्षा ती नक्कीच उजवी होती आणि त्यांच्याआधी ती बाहेर जातेय हे अनपेक्षित आहे!!
पुरेशी सावरलेली नसतानाही ती स्टेजवरुन सगळ्यांशी जे बोलली ते बघता ती किती सॉर्टेड होती ते कळते..... अक्षय आणि अपूर्वाने ती बाहेर पडताना किमान पुढे होऊन भेटायचे, दोन शब्द बोलायचे सौजन्यही दाखवले नाही त्यांच्याबद्दलही ती स्टेजवरुन चांगलेच बोलली.
याउलट ज्या किरण मानेंशी तिने आक्खा सीझन उभा दावा मांडला ते तिला येऊन भेटण्यात, सावरण्यात पहिले होते..... माणसांची पारख तिची जरा चुकलीच घरात किंवा तिच्या चांगुलपणाच्या पात्र तिला कुणी भेटलेच नाही घरात असे म्हणू हवे तर!!
आरोहबद्दल अगदी छान शब्दात बोलली आणि प्रसादबरोबरचा "Why" वाला वनलायनरही मस्त होता Happy

आता सगळे व्हिलनच उरलेत घरात (एक प्रसाद वगळता.... आरोह आणि राखीला ते चॅलेंजर असल्यामुळे यात धरत नाही) त्यामुळे त्यातल्या त्यात कोण कमी व्हिलनगिरी (किंवा कदाचित जास्त) करतोय/करतेय त्यावर ठरेल यावेळचा विजेता Happy

कालच देशमुखच एव्हिक्शन शॉकिंग केवळ तिला वोट्स असूनही झाल म्हणून वाटल.नाहीतर तिच्याऐवजी सँम ,यशला किंवा स्नेहलताला पण चान्स द्यायला हरकत नव्हती कारण देशमुख पहिले काही आठवडे किंवा नंतरही बोलण्याव्यतिरिक्त तशी दिसत नव्हतीच.
मग प्रसादला काढायच तो तर बोलत पण नाही,पण मग देशमुख जाताना आणि नंतर तिला वन लाईनरची विनंती करताना तर मुद्देसुद बोलत होता की.किंवा अगदी बँग फेकण्याच्या वेळी पण व्यवस्थित बोलला.म्हणजे खरच हा मुद्दाम करतो का,मग याच्यात तो काय कंटेंट देतो,त्याला का ठेवल मग.
या वीकमध्ये पण दोन एव्हिक्शन म्हणजे आरोह आणि राखीला काढतील आणि मग फँमिली वीक घेतील.ः
म्हणजे टॉप 5
प्रसाद,अपूर्वा, अक्षय,धोंगडे,माने.
मानेना पण करतील विनर सांगता येत नाही.
या वेळी निदान सोमि ट्रेंड्सप्रमाणे एव्हिक्शन न होता मेकर्स करत आहेत.

अमृता देशमुख गेली त्याचं खरतर जास्त वाईट तिची स्वत:ची रीअ‍ॅक्शन बघुन वाट्लं. पण पर्सनली मला ती कधीच आवडली नाही.
घरात कोणाशीच छान रीलेशन सेट करु शकली नाही. त्याचं मुख्य कारण प्रसाद. प्रसाद सारख्या चुकीच्या माणसाच्या मागे गेल्यामुळे तिचं नुकसान झालं. बरं, त्याच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणावं तर त्याला कायम नॉमिनेट करायची. त्यामुळे तिच्या मनात नक्की काय चाल्लय कधी कळलंच नाही. कधीच मनापासुन खरी खरी वागुन खेळली असं वाटलं नाही.कायम सावध राहुन कॅल्क्युलेटेड खेळायची. आपण वाईट दिसु नये याची काळजी घेत असायची असं वाटलं. सुरुवातीला सगळ्यांची भांडणं सोडवुन समजुतदारपणा दाखवायचा प्रयत्न केला पण त्यामुळे बिबॉ ला अपेक्शित अशी भांडणं होईनात म्हणुन मग तिला चावडीवर बोललं गेलं. मग नक्की कसं वागायचं कळेना म्हणुन प्रसाद सोबत लव्ह अँगल बनवायचा प्रयत्न केला पण तो फेल गेला. तोवर बाकी ग्रुप बनले होते त्यामुळे तिला कुठेच धड बस्तान बसवता आलं नाही. सुरुवातीला काहीच न करता सुद्धा भरपुर वोट असल्यामुळे प्रत्येक वेळी सेव्ह झाली. तिच्यापेक्षा यश, सॅम पण चांगल्या खेळत होत्या.पण तरी तेव्हा वोट च्या जोरावर वाचली होती. आता आता जरा स्टॅड घेउन खेळायला लागली होती आणी ममां अति कौतुक करायचे त्यामुळे तिला खुप होप्स असाव्यात आणि त्यामुळेच काल तिला खुप शॉक बसला असावा.
तिच्या ऐवजी धोंगडे जायला हवी होती असं सोमी वर लोक म्हणत आहेत पण धोंगडे इतक्या काड्या करणं कधी देश्मुख ला जमलं नाही. निगेटीव्ह का होईना पण देश्मुख पेक्षा जास्त कंटेंट धोंगडे ने दिलाय.
विकास गेल्यावर या आठवड्यात माने कसं खेळतात हे बघु आता. कारण त्यांचा सगळ्यात मोठा बकरा तोच होता. आता तोच गेला तर माने चर्चेत राहाण्यासाठी राखी ची मदत नक्की घेणार. धोंगडे ला पण गुंडाळतील कदाचित. काल पण "धोंगडे वाचावी कारण तिला मी नॉमिनेट केलं होतं" असा डायलॉग मारुन तिला ईमोशनल करुन सुरुवात केली त्यांनी. मोठे गेमर आहेत ते.

अमृता देशमुख गेली त्याचं खरतर जास्त वाईट तिची स्वत:ची रीअ‍ॅक्शन बघुन वाट्लं. पण पर्सनली मला ती कधीच आवडली नाही.
घरात कोणाशीच छान रीलेशन सेट करु शकली नाही. त्याचं मुख्य कारण प्रसाद. प्रसाद सारख्या चुकीच्या माणसाच्या मागे गेल्यामुळे तिचं नुकसान झालं. बरं, त्याच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणावं तर त्याला कायम नॉमिनेट करायची. त्यामुळे तिच्या मनात नक्की काय चाल्लय कधी कळलंच नाही. कधीच मनापासुन खरी खरी वागुन खेळली असं वाटलं नाही.कायम सावध राहुन कॅल्क्युलेटेड खेळायची. आपण वाईट दिसु नये याची काळजी घेत असायची असं वाटलं. सुरुवातीला सगळ्यांची भांडणं सोडवुन समजुतदारपणा दाखवायचा प्रयत्न केला पण त्यामुळे बिबॉ ला अपेक्शित अशी भांडणं होईनात म्हणुन मग तिला चावडीवर बोललं गेलं. मग नक्की कसं वागायचं कळेना म्हणुन प्रसाद सोबत लव्ह अँगल बनवायचा प्रयत्न केला पण तो फेल गेला. तोवर बाकी ग्रुप बनले होते त्यामुळे तिला कुठेच धड बस्तान बसवता आलं नाही. सुरुवातीला काहीच न करता सुद्धा भरपुर वोट असल्यामुळे प्रत्येक वेळी सेव्ह झाली. तिच्यापेक्षा यश, सॅम पण चांगल्या खेळत होत्या.पण तरी तेव्हा वोट च्या जोरावर वाचली होती. आता आता जरा स्टॅड घेउन खेळायला लागली होती आणी ममां अति कौतुक करायचे त्यामुळे तिला खुप होप्स असाव्यात आणि त्यामुळेच काल तिला खुप शॉक बसला असावा.>>>>शब्दन् शब्द पटला...100% अनुमोदन..

व्ह का होईना पण देश्मुख पेक्षा जास्त कंटेंट धोंगडे ने दिलाय. >>> निगेटिव्हच ठेवायचे असतील तर धोंगडेपेक्षा अक्षय, अपूर्वा, माने जास्त कंटेंट देतायेत.

स्मिता, वरचा अनॅलिसिस आवडला. मलाही तसेच काहीसे वाटले. तिचे एविक्शन सरप्रायजिंग होते पण काल तिने जेवढ्या इमोशन्स दाखवल्या, जी एक वल्नरेबल साइड दिसली ती आधी दिसली असती तर कदाचित जास्त लाइकेबल झाली असती ती. घरात तशी ह्यूमनली फीलिंग्स एरवी दिसलीच नाहीत.
माने पण हुषार आहेत पण लाइकेबल नाहीत! आता खरं तर उरलेल्यात अपूर्वाच जिंकली तर मला चालेल. बाकी कुणीच त्या लेवल चे, लायक नाहीत.

>>काल तिने जेवढ्या इमोशन्स दाखवल्या, जी एक वल्नरेबल साइड दिसली ती आधी दिसली असती तर कदाचित जास्त लाइकेबल झाली असती ती
खरय!! पण अश्या घरात कुठलेही लॉबिंग न करता, बाजुने बोलायला एकहीजण उभा रहात नसताना तुटून न जाता एकटीने किल्ला लढवत ठेवणे वाटते तितके सोपे नाही..... ती स्ट्रॉंग दिसली पण ह्युमन ॲंगल कमीच पडला जरा!! असो!!

उरलेल्यात कुणीही लाइकेबल नाही हेही तितकेच खरे..... अपुर्वा तर नाहीच नाही!! म्हणजे एंटरटेनिंग आणि लिडरशिप क्वॉलिटीज असुनसुद्धा "माज" सगळ्याची माती करतो!!

माने कसे नाही झाले नॉमीनेट.

आरोह जायला हवा पण काय माहिती. धोंगडेला बघावे लागणार टॉप 5 पर्यन्त.

प्रसादला न करता अक्षयने मानेना करायला हवं होतं. अक्षयला बिग बॉस नॉमीनेट होऊ देत नाहीत, त्यांना महितेय त्याला votes नाही मिळत, त्यालाही कल्पना आलीय.

अपूर्वाला कित्ती राग येतो, अर्थात ती इंडिपेंडट खेळते म्हणा (टास्क व्यतिरिक्त).

अरे धमाल यावेळी वोटिंग लाईन्स बंद आहेत. अपूर्वा आणि अमृताचा पचका होणार.

बिचारी देशमुख. मला धोंगडेपेक्षा तिला बघायला आवडलं असतं.

म्हणजे एंटरटेनिंग आणि लिडरशिप क्वॉलिटीज असुनसुद्धा "माज" सगळ्याची माती करतो!!....
पण हीच या गेमची रिक्वायरमेंट आहे,मग माज असू देत ना,केवळ याच कारणामुळे मागच्या सिझनला जय विनर होऊ शकला नाही.
मला अपूर्वामध्ये फक्त माजच दिसतो,इंडिविज्युअल टास्कमध्ये सपशेल आपटते ,ग्रुपमध्ये पण आरडाओरडा करते.जर जयसारखी असतीतर माज असूनही मला आवडली असती विनर म्हणून.
आज वोटिंग लाईन्स बंद ठेवण्याची दोन कारण वाटतात
1.आरोह गेला असता,ते होऊ नये म्हणून.
2.बिबॉसला धोंगडे किंवा अपूर्वापैकी पाहिजे होत पण दोघीही आल्या नाहीत म्हणून.
13वा वीक हा प्रिफिनँले वीक असतो,कदाचित फँमिली वीक करतील.
मग 13व्या आठवड्यात डबल एव्हिक्शन करून वाईल्ड कार्ड्सना काढणार की अँग्रीमेंट आल असेल तर राखीला नेणार टॉप 5 मध्ये आणि या सिझनच्या कुठल्यातरी सदस्याचा बळी देणार.

इंडिविज्युअल टास्कमध्ये सपशेल आपटते >>> हे मात्र आहे. त्यामुळे तिला अक्षयवर अवलंबून आहे असं आरोह म्हणाला असेल. तिचा पारा किती चढला.

कालचा एपिसोड पुर्ण पणे राखी मय होता.
ते बाळ, त्याचे ४ बाबा आणि काय न काय... नंतर नॉमिनेशन च्या वेळी पण एकपात्री प्रयोग केला भारीपैकी... फुल एंटरटेन केलं बाईने...
या आठवड्यात कोणीच जाणार नाहिये म्हणे. फॅमिली वीक आहे बहुतेक.
अपुर्वा कसली खुनशी वाटली नंतर राखी शी बोलली तेव्हा. ती मजा दंगा करत असते तेव्हाच छान वाटते पण असा माज आणी खुन्नस देउन घालवते सगळं. आतातर मला वाटु लागलय की अक्षय मधल्या मधे जिंकतो का काय...
प्रसाद असा नाही हे अपुर्वा,माने हे त्याच्यासोबत काम केलेले लोक परत परत सांगत आहेत.. काल माने ला किती बोलत होता प्रसाद. हाच का तो वीकेंड चा प्रसाद असं वाटणारच ना कोणालापण...प्रसाद जिंकलेला मला अजिबात नाही आवडणार.
कोणीच जिंकावसं वाटत नाहिये आता मला.
यावर्षी कसं कोणीच पात्र नव्हतं म्हणुन "पुरुषोत्तम करंडक" कोणालाच दिला नाही तसं बिबॉ मधे पण कोणीच लायक नाही म्हणुन ट्रॉफीच देउ नका म्हणाव ... कसली मजा येइल ना ..हा हा हा...

>>कोणीच जिंकावसं वाटत नाहिये आता मला.
यावर्षी कसं कोणीच पात्र नव्हतं म्हणुन "पुरुषोत्तम करंडक" कोणालाच दिला नाही तसं बिबॉ मधे पण कोणीच लायक नाही म्हणुन ट्रॉफीच देउ नका म्हणाव
ज्जे बात!!

हे तिच्या आईचे पण छोटेसे मनोगत >>> आत्ता बघितलं, किती योग्य प्रकारे व्यक्त झालीय तिची आई. यावरून तिला लास्ट मोमेंटला काढायचे ठरवलंकी काय वाटलं. फार shocking आणि राग येण्यासारखी गोष्ट आहे खरंतर ही . तुम्ही एकीकडे फॅमिली वीकला तुम्हाला यायचं आहे कळवता एखाद्याला आणि काहीतरी आवडीचा तिचा खाऊ घेऊन या सांगता आणि एकीकडे त्यांच्या मुलीला काढता. खरंच यार बिग बॉस, किती यातना देता.

धोंगडेला बघवत नाही अजिबात आता. देशमुखची खूप आठवण येत होती एपिसोड बघताना.

हा फॅमिली विकच होताना मग अजुन दोन फॅमिलीज आल्या असत्या तर जड होतं का बिग बॉसला. विकास आणि अ दे ची फॅमिली आली असती तर काय झालं असतं, या विकेंडला काढायचे होतं.

ललिता माने मस्त जॉली, शालजोडीतले हाणत होती पण राखीबरोबर फ्लर्ट करायला होकार दिला, आता माने सुटतील. मुलगी म्हणाली पपा मीच वीस वर्षाची आहे हो. मुलीचा आवाज छान आहे.

अपूर्वा फॅमिलीने मात्र अक्षयविरोधात कान भरले, हाहाहा. खरंतर अक्षय तिचा काही बाबतीत तोंडावर विरोध करतो, तीही तोंडावर करते विरोध त्याला. आता ह्या दोघांचे नातं बघायला मजा येईल.

धोंगडे, माने ट्रॉफी घेणार अशी त्यांच्या फॅमिलीला खात्री आहे.

मिसेस माने मस्त आहेत....मुलगी पण छान आहे त्यांची...तिला स्कोप आहे नेक्स्ट एखाद्या सीजन मध्ये यायला..छान वाटली ती...राखीला पटकन म्हणाली,"मी तुझ्याकडूनच तर आलीये "खूप गोड वाटलं ते...
अपूर्वाची आई पण आवडली...संयत वावर होता त्यांचा...strong वाटल्या त्या...अपूर्वा आणि धोंगडेने मात्र उगाच रडारड केली...किती विचित्र वाटत होतं ते...फॅमिली वीक छान असतो पण या दोघींनी त्याचीही वाट लावली....अपूर्वाला अक्षयच्या विरोधात विनाकारणच भडकावले...कदाचित तो बाहेर निगेटिव्ह दिसतो म्हणून असे सांगितले असेल...

अक्षय अपूर्वामध्ये बिबॉसला भांडण लावायची असतील फिनँलेच्या आधीच्या वीकमध्ये.म्हणून कदाचित पढवून पाठवल असेल आईमामाला.
अक्षयने अपूर्वाला धोका दिल्याच अजूनतरी दिसलेल नाही,नॉमिनेट मात्र केल होत ज्याच अपूर्वानेच कौतुक केल.
पण आता अपूर्वाने आईवडिलांच भाकित खर असेल तर त्याचा फायदा करून घ्यायला हवा,भांडण न करता,शांतपणे अक्षयशी वागायला हव,तो खरच जर विश्वासघातकी असेल तर आधीच निगेटिव्ह आहे ,पूर्ण व्हिलन ठरेल.

अपूर्वा, अक्षय जोडी तोडायची असेल तर बिग बॉस एकाला काढतील. आरोह हमी घेऊन आला असणार फायनल पाच ची, राखी डीजरविंग आहे फायनलसाठी आणि धोंगडेचा वशिला दिसतोय, तिला पुढे नेतील, हाहाहा.

एकदा तेजुशी डील केलं नव्हतं ना त्याने अपूर्वाला वाचव मग मी तुला वाचवेन असा डबल राग असेल अपूर्वा कुटुंबाचा अक्षयवर. जे काही आहे ते अक्षय तोंडावर सांगतो मात्र, त्याचे मामा पाठीत सुरा खुपसतो म्हणाले ते तेवढं पटले नाही.

तेजु आणि देशमुखच्या जाण्याचा फायदा मात्र प्रसादला होणार. निगेटिव्ह मध्ये धोंगडेला ही दुसरी नेतील, देशमुख गेल्यापासून काही सांगता येत नाही या लोकांचे.

फायनली फॅमिली वीक आला.
धोंगडे चा रडण्याचा ओव्हरडोस झाला.. काय भयंकर रडते राव.. तिचे बाबा पण एक सेकंद घाबरले.
धोंगडे चे बाबा नॉन स्टॉप बोलत होते. प्रसाद ची अ‍ॅक्टींग पण केली.
अपुर्वा चं रडणं पण भयंकर... बिबॉ म्हणाले की कुटुंबियांना बघुन आता सगळ्यात मोठा आवाज असणारा सदस्य नि:शब्द होणार तर ही जास्तच जोरात भोकाड काढुन रडली. आई पण वैतागल्या सारखी वाटली तिचं रडणं बघुन. आई आणि मामा ने अक्षय विरुद्ध सावध रहायला सांगितलं तर बहुतेक आता ही भांडण करुन माती करणार.
माने ची बायको एक नंबर टोमणे मारत होती. घरात कधी पोरांना कपडे घातले नाहीत म्हणे आणि इथे राखी च्या बाळाचं कौतुक. घरचा मिक्सर बिघडलाय आता पाटा वरवंटा वापरायला लागतो म्हणे.
मानेंची मुलगी पण मस्त आहे. सुंदर गायली. मुलगा एकदम बुजला होता बहुतेक.
राखी म्हणाली की माझ्याकडुन कधीच कोणी येत नाही तर माने कन्या लगेच म्हणाली की मी आले आहे तुझ्याकडुन. सो स्वीट ऑफ हर... पोरगी हजरजबाबी आणि गोड आहे.
प्रसाद नेहेमीप्रमाणे काय मुद्द्यावर भांडला काहीही कळलं नाही. वेळ मोजायचा मुद्दा असेल तर आत्तापर्यंत प्रसाद मुळे बरेच टास्क हारले आहेत टीम बी वाले. त्यामुळे त्याने तेच तेच बोलुन उगीच आरोह ला गिल्ट देउ नये. वाईट दिसतोय तो फार.

मला आता वाटायला लागल आहे की मानेलाच विनर करतील.तसही वोट्स असणार्यांना बाहेरच काढत आहेत.
हिंदीसारख,राखी मनी बँग घेऊन जाईल.
पण तिच्यासाठी सिझनपैकी कुणाला एकालातरी जागा रिकामी करावी लागेल.
टॉप 6 घेतल तर
प्रसाद,अपूर्वा, अक्षय, माने राखी आणि आरोह किंवा धोंगडेपैकी एक.
नाहीतर यावेळी तशीही भट्टी जमली नाहीच आहे,तर टॉप 7 करतील.
मग हव त्याला करतील विनर.

Pages