Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसादचा खून सोपा सांगितला bb ने, challenging नव्हता.

राखी मस्त खेळली. अक्षयकडून तीच वदवून घेऊ शकली पण आधीच देशमुखचा झालेला म्हणून तो वाचला.

अपूर्वा टास्क मध्ये मुर्खच ठरते, अजिबात लक्षात आलं नाही, राखीने साप टाकला गळ्यात ते. अक्षयवर डूख धरून बसली.

बाय द वे अक्षयला दोन जणांनी नॉमीनेट केलं असेल तर तोही नॉमीनेट व्हायला हवा होता.

प्रसादच्या आईने काहीतरी कविता करुन पाठवली आहे त्याच्या चाहत्यांसाठी पण प्रसादला उद्देशून. ती वायरल होतेय म्हणे एक युट्युबर.

अपूर्वा टास्क मध्ये मुर्खच ठरते, अजिबात लक्षात आलं नाही, राखीने साप टाकला गळ्यात ते. अक्षयवर डूख धरून बसली.>>>राखी नेहमीच विचित्र वागते त्यामुळे तिच्यावर लगेच डाऊट घेतला नसेल...

बाय द वे अक्षयला दोन जणांनी नॉमीनेट केलं असेल तर तोही नॉमीनेट व्हायला हवा होता.>>प्रत्येक फेरीत दोन्ही खुन्यांना खून करण्यासाठी ठराविक कालावधी दिला होता त्यापैकी ज्याने आधी खून केला तो ग्राह्य धरला गेला आणि खुन्याला पण 1 point मिळेल

हे नॉमिनेशनचे वेगळं आणि खूनी टास्क वेगळा.

मी आधी विचारलेलं अक्षयला आरोहने नॉमिनेट केलं आणि अजुन कोणी त्यावर युपि यांनी उत्तर दिलं, विकास असावा त्यावर ते लिहीलं आहे .

हे नॉमिनेशनचे वेगळं आणि खूनी टास्क वेगळा.

मी आधी विचारलेलं अक्षयला आरोहने नॉमिनेट केलं आणि अजुन कोणी.>>> हो हो correct....सॉरी... मला वाटलं तुम्ही आजच्या एपिसोड बद्दल बोलताय..

प्रसाद वैयक्तीक ठरवायचं म्हणाला ते कोणाला समजलं का. मला असं वाटलं की आठ जणांचा स्वयंपाक करायचा, त्यावेळी जो हेड शेफ असेल त्याने ठरवायचं राखीला त्यातला भाग द्यायचा की नाही. माझ्या नवऱ्याला असं वाटलं की indivisually ज्याने त्याने ठरवायाचं की आपला भाग राखीला द्यायचा की नाही.

त्यामुळे प्रसाद confusing बोलत होता, त्याचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात, अपूर्वाची विचारण्याची पद्धत चुकीची होती आणि शब्द चुकीचे होते पण देशमुख त्याला नीट विचारत होती तर भडकला. माने उगाच मध्ये प्रसादला बोलायला आले.

आर जे आदिश चे कधी कधी बघते, त्यात एकाची कमेन्ट होती, प्रसाद मागच्या सीझनला असता तर सहातही नसता, कसले दिग्गज होते, आदिश करेक्ट आहे म्हणाला. तो प्रसादच्या फेवर मध्ये आहे पण चुकांबद्दलही बोलतो.

राखी - मुलं पटु दे रे देवा मुलं पटु दे .. हा हा हा... काहीही कशी करु शकते ही बाई....
प्रसाद हुकल्यासारखा का वागतो आणि लोकं तरीही त्याला सिंपथी देतात .. काय भानगड आहे काही कळत नाही.
अपुर्वा काल विचारत होती की सगळ्यांसाठी केलेला स्वयंपाक राखी ला द्यायला चालेल का ? सिंपल प्रश्ण होता. बाकी सगळ्यांना मुद्दा कळला पण प्रसाद मधेच काहीतरी वैयक्तीक निर्णय वगैरे भलतच बोलत बसला.. हात टेकले त्याच्यापुढे आता... काय माणुस आहे...
राखी चं घरात भांडण लावायचं कार्य पुर्ण झालं आणि मग तिला स्वयंपाकाला मूड आला Wink
घरात निवांत बसलेल्या लोकांना जागं करायचं काम ती बरोब्बर करते आहे... तिला नाही काढणार इतक्यात

तिला त्यासाठीच पाठवलं आहे. हे सगळे अक्कलशून्य लोकं आहेत.

यावेळी पहीले तीन नंबर काढूच नका. मीनल या सीझनमधे हवी होती, मागच्या सीझनमधे अन्याय झाला तिच्या टॅलेंटवर, यावेळी ट्रॉफी मिळवली असती.

अक्षयपेक्षा जय व्हिलन म्हणून बेस्ट होता, त्याची सारंगेबरोबर लवस्टोरी आवडायची नाही, मी बघत नव्हते पण म मां समोर उलट उत्तर न देता शांत असायचा आणि नंतर आठवडाभर हवं तेच करायचा. हे त्या अक्षय अपूर्वाला जमत नाही अजिबात.

कॅप्टन्सी ट्विस्ट भारी आहे.

अक्षयने मस्त प्रोवोक केलं, राखीने भांडी टाकली खाली आणि त्यातली काचेची फुटली. राखी तेवढाच वेळ घेऊन आली असणार त्यामुळे तिला bb ने नॉमीनेट केलं हा ड्रामा असेल किंवा दुसरं कारण तिच्यामुळे trp अजिबात वाढला नसेल त्यामुळे bb ना ती परवडत नसेल .

एकदा त्या प्रसादला करा बाबा कॅप्टन, त्याच्या fans चा जीव शांत होईल.

धोंगडे एक नंबर चॅप्टर आहे, राखीला कॉफीबद्दल खरं सांगून टाकलं.

जे बिग बॉसला, मांजरेकरांना, इतर स्पर्धकांना, चुगली बुथवाल्यांना, आरोपी कोण वाल्यांना, सिक्रेटरुमला आणि चक्क विशाल निकमला जमले नाही ते काल फायनली राखीने करुन दाखवले.... माने आणि विकास एकमेकांशी कडकडून भांडले (अर्थात अजुन दोनचार दिवसांनी एकमेकांना कडकडून मिठी मारणारच नाहीत याची काही खात्री नाही) पण सध्यातरी राखीची किल्ली चांगली बसली आहे.

बाकी काल राखीने एव्हढा राडा करुनसुद्धा सगळे घर एक होऊन तिच्याविरुद्ध लढू शकले नाही..... प्रसाद चम्या केर काढत बसला आणि धोंगडे तिला उगीउगी करत होती
अमृताने राखीने गूळ चोरल्याचा आरोप केल्यावर अपूर्वा राखीला सोडून अमृतावर उचकली की तुला माहित असून तू का सांगितले नाहीस म्हणून..... अपूर्वा आणि धोंगडे काही झाले की अमृता देशमुखला टारगेट करतात आणि म्हणूनच काल धोंगडे राखीची हांजीहांजी करत असताना अमृता देशमुख उचकली असणार!!

इतकी उजळणी करुन आलेल्या स्पर्धकांना सांकेतिक खुनाच्या टास्कमध्ये खुन्यांकडे फोन देतात हे ऐकून इतके आश्चर्य का वाटावे? कुणाला गंडवताय?

बाकी तो राखीचा कॉफीचा ड्रामा आणि त्यावरची बिगबॉसची शिक्षा सगळेच कसे लुटूपुटूचे होते Wink

बिगबॉसला बहुतेक माने आणि धोंगडेला कॅप्टन होऊ द्यायचे नाहिये त्यामुळे मागेपण ते दोघे कॅप्टन्सीला आले होते तेंव्हा टास्क रद्द करवला आणि आता हा ट्विस्ट टाकला!!

या ट्विस्टमुळे अक्षय आणि अपूर्वात राडा झाला तर मजा येईल, आरोह बहुतेक अमृताला देऊन टाकेल उमेदवारी, माने-प्रसाद आणि धोंगडे-विकास मध्ये पण चांगली फाईट होवू शकेल!!

प्रसाद चम्या केर काढत बसला >>> हाहाहा. प्रसादचे सो कॉल्ड फॅन्स, प्रसाद कित्ती बिचारा, कित्ती काम करतो, स्वच्छ केलं त्याने करत गुणगान गात बसतील.

धोंगडे कसली आहे, राखीला कॉफीबद्दल सांगितलं.

तो प्रसाद एवढ शो क्विट करण्याबद्दल विनवण्याकरूनही वोटिंगमध्ये पहिलाच.
माने प्रसादशी कचाकचा भांडला आणि कँप्टन्सीच्या वेळी सपोर्टर म्हणून त्यालाच विचारल.

त्या अक्षय केळकरला किती सपोर्ट आहे ? फिनालेत फायनल ३ मध्ये येईल का ? मला तो बरा वाटलेला. त्याचे एक सिरीयल पण मी पाहिले होते.

प्रेक्षकांचा अजिबात सपोर्ट नाहीये. व्हिलनगिरी करतो म्हणून प्रेक्षक शिव्या देतात. कधी कधी टास्क चांगला खेळतो मात्र.

फक्त मी एक सांगू शकेन अक्षय पुढे जाऊदे अथवा न जाऊदे, करियरमध्ये तो खूप पुढे जाईल. त्याला व्हिलनचे रोल मिळू शकतात. तो वयानेही फार मोठा नाहीये. आधीही त्याला हिंदीत रोल मिळत होते. प्रसाद जिंकूनही रोल किती मिळतील पुढे याबद्दल शंका आहे. अक्षयचे youtube चॅनेल आहे, तिथे बरा वाटतो. मी काही दापोलीचे वगैरे बघितले त्याचे vlogs.

मेघा धाडे जिंकूनही फार काम करताना दिसत नाहीये.

खरंय अंजू.
रिऍलिटी शो जिंकले तरी पुढे फारसे काम मिळतेच असे नाही. नुसते बिग बॉसच नाही तर इंडियन आयडॉल किंवा इतर सुद्धा शोचे विनर पुढे काही करत नाहीत. उलट आधीच जे बाहेर पडतात ते बरेच यशस्वी होतात. उदा. अरिजित सिंग किंवा नेहा कक्कर,

प्रसाद, माने, विकास यांचा खेळ आवडला.

दोन फ्रेंडसच्या जोड्यात समजून उमजून झालं तेही छान होतं.

बाकी धोंगडे, माने डबल ढोलकी आणि आगलावे एक नंबर आहेत.

राखी फेअर होती.

युट्यूबरमध्ये मी बघितलं तर आर जे आधीशचे बघते, तो मस्त गप्पा मारतो अर्थात मी कमेंट किंवा like करत नाही. उशिरा बघते, live असते तेव्हा बघत नाही.

हा पूर्ण आठवडा अमृता देशमुख बोअर खेळली..... मागचे एक दोन आठवडे जरा चमक दाखवली होती पण तिला घरात कुणी फारसा भावच देत नाहीये..... तिने त्या येड्या प्रसादचा आणि चक्रम अक्षयचा नाद सोडून आता धोंगडे-माने-अपूर्वा बरोबर संधी मिळेल तसे उघड पंगे घ्यायला सुरुवात केली पाहिजे..... तिचा आणि आरोहचा कालचा गेम फारच गुडीगुडी होता आणि त्यावर शेरेबाजी करायची संधी घरातल्या सदस्यांनी अज्जिबात सोडली नाही...... पहिल्या पाचात वगैरे येणे एव्हढेच ध्येय असेल तर ठीक आहे पण चुकून जिंकायचा वगैरे विचार ती करत असेल तर आता तिला थोडे एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागतील.
आरोह फक्त आणि फक्त अमृता देशमुखला सपोर्ट सिस्टीम म्हणूनच घरात आल्यासारखा वाटतोय म्हणजे कारण नसताना बाहेर इतका सपोर्ट मिळतो म्हणून प्रसाद जसा बऱ्याच जणांच्या मनातुन उतरलाय तसे हा 'जास्तीचा' सपोर्ट अमृताच्या विरोधात जायला नको!!
अक्षय आणि अपूर्वा बाकी चांगाले खेळाडू आहेत पण चार चांगल्या गोष्टी करुन ते एखाद दुसरी इतकी वाईट गोष्ट करतात किंवा बोलतात की ते त्या व्हिलनिश शेडमधून बाहेरच येत नाहीत!!
किरण माने हा मला सुरुवातीला अज्जिबात न आवडलेला खेळाडू आता मधूनअधून आवडतो..... अपेक्षेपेक्षा बरेच टिकलेयत ते आणि अजुन चिकाटीने खेळतायत!!
धोंगडेने या आठवड्यात किती पण सकारात्मकता दाखवली असली तरी तिच्या आधीच्या वागणूकीवरुन हा सगळा आवच वाटतो आणि कुठल्याही क्षणी ती परत आपल्या जुन्या जेलस मोड मध्ये परत येईल असे वाटत राहते.
प्रसाद जरा खेळला आणि तोंड उचकटून बोलला हेच काय ते नवल या आठवड्यातले!!
विकास ओक्के खेळला या आठवड्यात
राखी तिला सोपवलेले काम तिला जमेल तसे इमाने इतबारे करायचा प्रयत्न करत आहे!!

काही केल्या कुणी फेव्हरिट नाही म्हणजे नाहीच होत आहे या सीझनला!!

धोंगडे कम्प्लीट निगेटिव वाटतेय. अत्यन्त स्वार्थी. अन नुसतीच सतत भांडते, एकांगी विचार करते. काल विकास चा शर्ट ओढून काढला तिने! Uhoh असा त्याने तिच्या शर्ट ला हात जरी लावला असता तर? नुसते नंतर तिला दाबून धरले तर वुमन कार्ड खेळत होती. मुलगी समोर आहे ते समजत नाही का वगैरे! किती दुटप्पीपणा!! पण हे कोणीच बोलले नाही.
आरोह किती रड्या आहे, सतत कप्लेन करत असतो.
देशमुख काहीच चमक दाखवत नाही अहे सध्या. तिला गेम कळतो, हुषार आहे पण लाइकेबल नाहीये ती. त्यातल्या त्यात आता अपुर्वा आणि माने जरा ह्यूमनली आणि जेन्युइन वाटतात त्यामुळे बरे वाटतायत.

धोंगडेबद्दल मम.

ती जायला हवी पण तिला वोटस मिळतायेत. विकास वाचायला हवा. त्याची भीती वाटतेय. मी थोडी वोटस दिली त्याला.

यावेळीही कॅप्टन कोणी नाही. अमृता दे आणि प्रसादमध्ये क्लियरली देशमुख जिंकली, प्रसाद पहिल्यापासून नियम पाळत नव्हता तरी त्याने रिझल्ट आधी किती कटकट केली पुष्कर जोग आणि ज्युनियर सो कु समोर.

प्रसाद खूप अॅक्टिव झालाय, बाहेर सपोर्ट आहे हे समजलं आहे बहुतेक फक्त चावडीवर भोळा बिचारा चेहेरा घेऊन बसू नये आता.

अपुर्वा अक्षय धोंगडे विकास टीमने वीस हजारांच्या एअरटेल वॉवचर्सचा टास्क सहज जिंकला.

काही केल्या कुणी फेव्हरिट नाही म्हणजे नाहीच होत आहे या सीझनला!! >>> अगदी अगदी. तेजुच जरा आवडत होती.

हा सीझन ट्रॉफीविना ठेवा.

तिचे fans बघत असतील तर वाढला असेल. वोटिंग करतील का ते पुढच्या आठवड्यात कळेल.

तिला प्रसाद अमृतापेक्षा जास्त votes असतील तर देऊन टाका ट्रॉफी, हा का ना का, हाहाहा.

यावेळी मीनल हवी होती असं मला राहून राहून वाटतं. प्रसाद जिंकला ना तर खरंच नशीबवान आणि मागच्या सीझनला tallent असून मीनल कमनशिबी म्हणायला लागेल.

काल राखीने अपूर्वाला मस्त सुनावले...आयुष्याबद्दल खूप तत्त्वज्ञान सांगत होती...तेव्हा राखी म्हणाली," आम्ही पण आयुष्यात खूप काही गमावलं आहे..म्हणूनच आम्हाला value कळते...तुला तुझ्या cap ची value नाही " खूप हसलो आम्ही त्या scene ला...नंतर अपूर्वा अजून मोठमोठे डायलाॅग मारून तेथून जायला निघाली तर राखी म्हणाली, "तथास्तू !!! गुरू आहे तुझी मी.." Lol
इतकं होऊनही अपूर्वाचा माज कमी होईल असे तर वाटत नाही पण राखी तिला पुरून उरणार हे नक्की...

अपूर्वाने प्रसादची केलेली मिमिक्री आणि अमृता आरोहचं भांडण तर आज झालं...मग मांजरेकरांनी कधी पाहिलं??

यावेळेस ५ स्टार स्पॉन्सर का आहे हे कळले....

कधी काही न करून पाहा......
(आणि विनर व्हा)

जे टास्क खेळतात त्यांना बाहेर काढले जाईल
यावेळेस
विकास चा नंबर

मांजरेकर प्रसाद आणि अमृता देशमुख ची वकिली न विसरता करतात.

त्यांना संयुक्त विजेते करून टाका

विकास गेला मला वाईट वाटलं, फॅमिली वीक मध्ये त्याच्या आईला भेटायचं होतं, बघायचं होतं मला.

मला अपूर्वा मस्त नडते राखीला असं वाटतं. तिने actually प्रसादची अॅक्टिंग परफेक्ट केलेली.

नंतर अपूर्वा अजून मोठमोठे डायलाॅग मारून तेथून जायला निघाली तर राखी म्हणाली, "तथास्तू !!! गुरू आहे तुझी मी.. >>> हे missed .

प्रसाद अमृता पहिले दोन असणार हे चॅनेल आणि पब्लिकने जवळजवळ ठरवून टाकलंय.

एक व्हिलन तिसरा कोण असेल माने, अक्षय, अपूर्वा मध्ये काय माहिती. का धोंगडे असेल, तिला विकासच्या आधी काढलं असतं तर आवडलं असतं.

विकास गेला मला वाईट वाटलं >> मलासुद्धा खूप वाईट वाटलं....
फॅमिली वीक मध्ये त्याच्या आईला भेटायचं होतं, बघायचं होतं मला.>>>यावेळी फॅमिली वीक किती लेट करत आहेत...या वीक मध्ये तरी असावा...
मला अपूर्वा मस्त नडते राखीला असं वाटतं.>>>हो...अपूर्वाचा निडरपणा मलाही आवडतो. पण त्या सीन मध्ये ती जे काही तत्त्वज्ञान सांगत होती...आणि मोठमोठे डायलॉग फेकत होती ते फारच बोजड आणि अनावश्यक वाटले आणि मग राखीने त्यावर react केल्यामुळे हसू आलं...
तिने actually प्रसादची अॅक्टिंग परफेक्ट केलेली.>>>+111..यावेळी मांजरेकर कोणालाही कशासाठीही बोलत बसतात...आधीच contestants बोअर आहेत आणि त्यात मांजरेकर अजूनच बोअर करतात.
किरण माने अगदीच अविश्वसनीय माणूस आहे...चावडीवर बोलतानाही ते पटकन आजुबाजुला डोळे फिरवतात (मान न हलवता) ते फारच विचित्र वाटतं...गेल्या 2 आठवड्यातपासून विकास पुढे जातोय ,बोलायला लागलाय हे observe करून लगेच त्याला down फील करवून द्यायला लागले ...
विकासाच्या AV मध्ये त्याचे भांडणंच जास्त दाखवले. तो टास्क किती छान खेळायचा ते अगदी कमी दाखवले....त्याची AV positive बनवायला पाहिजे होती....त्याला स्वतःला AV बघून अजिबात चांगले वाटले नाही...चांगलाच हालला होता तो AV बघून...तेव्हा पण वाईट वाटले..

विकासला फॅमिली वीक नंतर काढायला हवं होतं.

चॅनेल एवढी सिंपथी प्रसादला देत असतं, विकासला थोडी दिली असती तर काय झालं असतं. त्याच्या आईने त्याला कसं वाढवले हे उलट बिग बॉसनी तिला व्यक्त करायला लावायला हवं होतं, खरंतर ही real स्टोरी असती सिंपथीपेक्षासुद्धा, प्रेरणा देणारी. याने trp वाढलाच असता.

मायबोली सुरू नव्हती का बराच वेळ.

मी रविवार एपिसोड बघितला नव्हता, बाहेर गेलेले. आल्यावर मस्तपैकी फुटबॉल फायनल नवऱ्याच्या मोबाईलवर बघत होते, मस्त थरारक झाली. ते बघताना थोडा वेळ bb लावलं की शेवट आला असेल, कोण बाहेर पडले ते बघूया, उगाच लावला टीव्ही. नेमकी देशमुख बाहेर पडत होती. टोटली shocking eviction . धोंगडेला ठेऊन हिला काढलं, अनफेअर बिग बॉस. आता पुढे अक्षयची विकेट जाऊ शकेल. प्रसादला देशमुखच टक्कर देऊ शकत होती.

राखी आणि आरोह फायनलपर्यन्तची हमी घेऊन आले असणार. अपूर्वाला votes कमी असले तरी तरी कंटेट छान देते पण धोंगडेला का ठेवलं, देशमुख नक्कीच उजवी होती तिच्यापेक्षा.

आर जे अधीश म्हणाला यांना जोड्या फोडायच्या असतील तर पुढच्या वेळी अक्षय अपूर्वापैकी एक जाईल. प्रसाद अमृता आणि किरण विकास जोडी फोडली. अपूर्वा अक्षयपेक्षा कंटेट जास्त देते त्यामुळे ही जोडी फोडायची असेल तर अक्षयला काढतील.

नाहीतर आता तेजुला आणा, ती जिंकणार नाही पण पाचात जाऊ शकते, हात बरा झाला असेल तिचा. ती शिवानी नव्हती का परत आली आणि चौथी आली.

श्या आता अजिबात बघू नये, इतका फालतू सीझन. असं म्हणून मी सवयीने टीव्ही लावणार bb वेळी.

Pages