Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा टास्क पण छान झाला.प्रसाद कसाही असला तरी अपूर्वाच न ऐकता,संचालकांच ऐकून अपूर्वाच्या स्टोरेजमध्ये धान्य टाकल म्हणून,नाहीतर अक्षय जिंकत होता.
टास्क झाल्यानंतर अक्षयने लाथ मारल्याची रडारड विनाकारण केली ,यातच अपूर्वा आणि अक्षयने सिझनभर मातु खाल्ली आहे,टास्क संपल्यावर एकीकडे टाळ्या वाजवायच्या आणि दुसरीकडे गळा काढायचा.तरी काल धोंगडे शांत होती,मला वाटल आता ही पण सुटते की काय.
संचालन बेस्ट होत.
गंमत आहे ना,ज्या प्रसादला अक्षय आणि अपूर्वाने सिझनभर टार्गेट केल ,या आठवड्यातल्या त्यांच्या यशामध्ये प्रसादचाच वाटा असावा,अशीच सिंपथी मिळत गेली.प्रसाद टास्क छान खेळतो,पण सिंपथी घरातल्याच लोकांनी भरपून मिळेल अशी सोय केली.
जर प्रसाद जिंकला,तर त्याच स्वत:च योगदान असेलच पण त्याहून घरातल्य सदस्यांज जास्त योगदान असेल.
बाकी,तेजूची एव्ही मस्त.कालही अर्ध्यावरती डाव मोडला ,याच मोडमध्ये होती,त्या धक्यातून अजून सावरलेली नाही अस वाटल.
गेस्टपैकी,उत्कर्षला वाव कमी मिळाला.
स्मिता अँज यूज्वल एकदम ग्रेसफूल.नेहा मला कधीच आवडली नाही छान खेळूनही,खुनशी वाटायची.त्यांचे टास्कपण छान झाले.
चारही सिझनचे मिळून टॉप3 काढायचे झाले तर
स्मिता,मिनल आणि तिसरा जय.निगेटिव्ह असूनही,कारण मस्त खेळला होता.
शिव पण आहे पण त्याच्या सिझनमध्ये खेळण्यापेक्षा त्याने लव्ह अँगलचा जरा जास्त फायदा घैतला अस वाटत.
पुढच्या सिझनला चारही सिझनच्या टॉप 3 किंवा 5सदस्यांना कंटेस्टंट म्हणून आणाव,मजा येईल बघायला.

प्रसाद चांगलाच खेळला, तो अजूनही काही टास्कस चांगले खेळलाय, नसता खेळला तरी सत्तर टक्के लोकं त्याच्या बाजूने आहेत. पहिल्या आठवडयापासून त्याला सिपंथी मात्र आहे, त्याला टार्गेट केलं होतं त्यामुळे. त्याला वोटिंग मध्ये टफ फक्त तेजु देऊ शकत होती. फक्त यावेळी विनर मटेरियल मला अजूनही कोणी वाटत नाही पण जिंकेल प्रसाद हे नक्की मात्र.

तेजु काल येऊन इमोशनल करून गेली. ती असती आणि जिंकली असती तर फार आनंद झाला असता, तो हिऱ्याचा सेट तिला कसला शोभून दिसला असता.

जे फिनालेला डायरेक्ट जातात ते मोस्टली पहीले दोन असतात त्यामुळे आता मला अपूर्वा आणि प्रसाद लाईट्स बंद करतील असं वाटायला लागलं आहे . मीन्स अपूर्वा असेल पहिल्या दोघांत आणि अक्षय नसेल .

सर्वांना हॅपी न्यु इयर.

सोमिवर प्रसाद गेल्याची हवा आहे...खरंखोटं रात्री कळलेच..पण मागच्या चावडीपासून मलाही हेच feeling येतंय की प्रसाद जाणार...

काल किरण मानेंनी बोलतीच बंद केली मांजरेकरची...अपूर्वा finale मध्ये गेल्याने खूपच खुश दिसत होती..पण ती नक्कीच जिंकणार नाही....किरण माने किंवा अक्षय यांच्यापैकी एकजण winner असेल असे वाटते. बोगस season मुळे trophy पण बोगस बनवली....contestants ना पण आवडली नाही...थंड reaction होती सगळ्यांची Lol

प्रसादला नाही काढणार, अफवा उठवली असावी. यावेळी काढलं तर मला खरंच वाईट वाटेल कारण हा पुर्ण आठवडा तो सर्व टास्कस छान खेळला. काढायचं होतंच तर मागच्या विकमधे तो नव्हता खेळला तेव्हा काढायला हवं होतं.

सोमिवर प्रसाद एव्हिक्ट झाल्याची न्युज आहे,पण जर हे खर असेल तर याचा अर्थ प्रसाद वूट वोटिंग का कय असत तिथे बॉटमला असणार मग याधीही कधीतरी आला असेलच,मग तेव्हा का नाही काढल, इतर लोकांना संधी का नाही दिली.

वुट अ‍ॅपवरच वोटींग करायचं असतं ना, तिथलेच रिझल्टस बाहेर सांगतात ना. अजुन दुसरीकडे कुठे करतात. अजुन वुटचा दुसरा प्रकार आहे का, तो गुप्त असतो का.

प्रसाद गेला असेल तर यावेळेचा सीझन नक्की धोंगडे जिंकेल असं वाटायला लागलं आहे. तिचं नाव जास्त चर्चेत नाही विनर म्हणून, ट्विस्ट ट्विस्ट करत तिलाच जिंकवतील.

गेला प्रसाद....मला मागच्या चावडी पासूनच वाटत होतं की आता त्याला काढतील...पण सोमिवर बिग बॉस पाहणार्‍या जवळपास 50 % प्रेक्षकांचा प्रसादला इतका पाठींबा होता की ही feeling व्यक्त करायलाही भीती वाटली....
सोमिवर प्रसाद एव्हिक्ट झाल्याची न्युज आहे,पण जर हे खर असेल तर याचा अर्थ प्रसाद वूट वोटिंग का कय असत तिथे बॉटमला असणार मग याधीही कधीतरी आला असेलच,मग तेव्हा का नाही काढल, इतर लोकांना संधी का नाही दिली.>>>अगदी बरोबर प्रसादला वाचवण्याच्या नादात अनेक चांगल्या contenders ला काढलं बिग बॉसने...
आता midweek आरोहला काढतील.

यावेळी प्रसादला काढलं याचं पर्सनली वाईट वाटलं, खरंतर तो फार आवडत नव्हता. यावेळी सर्व टास्कस छान खेळला. मागच्यावेळी काढायला हवं होतं.

त्याला ओटीटीवर चान्स देतील कदाचित. मराठी ओटीटी सुरु होणार आहे म्हणतात.

मिडविक कदाचित अक्षय जाईल, मुलगी जिंकेल यावेळी वाटतंय.

वोटिंग आत्तापर्यन्त केळकर, समृद्धी आणि विकासला, तेजुला केलेलं आठवतंय तेही अकरा वगैरे, खूप दिवस झाले त्यालाही. वोटिंगचा काही उपयोग असेल तर करायचं, अक्षय केळकरलाच करेन. आवडत तेजुच होती, पण आता उरलेल्यात अक्षयच बरा वाटतोय, त्यामुळे त्यालाच करेन. 99 वगैरे द्यायचं ठरवलं तर हात दुखतात .

गेला का प्रसाद ? अजिबात नाही आवडायचा मला Happy
पण गंमतच आहे या सिझनला, पब्लिक मधे सर्वात पॉप्युलर स्पर्धक तेजु, देशमुख आणि प्रसाद टॉप ६ मधेही नाहीत आणि ज्यांची टॉप १० ची लायकी नाही असे धोंगडे , अक्षय फिनालेत जाणार !
आरोह तर कसला बावळट्ट शाळा व्हरायटी तुपकट माणुस आहे, शिवच्या नावाने नुकतीच काँट्रव्हर्सी केली आणि इथे राखीने त्याची आयडेन्टिटी विचारली तर निर्लज्ज म्हणे शिव जो सिझन जिंकला त्यावेळी मी होतो !
तरी पब्लिक येड्यासारखे वोट करते, ट्रेन्ड करते.. मेकर्सना XX फरक पडत नाही.
शेवटून पहिल्या नंबरची स्पर्धा दिसते आहे या वेळी Biggrin

तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत पण मी बिग बॉसमध्ये जास्त दिवस राहिलो आहे - आरोह वेलणकर किरण मानेंना.

मी खरं तर बिगबॉस (मराठी वा हिंदी) चा एकही भाग बघितला नाही, केवळ यूटूब वरील शॉर्ट व्हिडिओमधून व मायबोलीवरील ह्या धाग्यातून ठळक घडामोडी समजत असतात. विशेषतः विकेंड चावडीचे जे शॉर्ट विडिओ बघण्यात आले त्यातून प्रसाद हा पक्का बनेल वाटत असे. चेहऱ्यावर उगीचच केविलवाणे भाव आणून, खूप साधा-भोळा असण्याचा आव आणण्याचा प्रयत्न करत असे. पण प्रत्यक्षात खूप 'ढ' असावा. त्याला बघून मला माझे अनेक विद्यार्थी आठवतात. ज्यांना वर्गात अजिबात काहीही येत नाही, पण प्रॅक्टिकल परीक्षेत एक्सटर्नलसमोर असेच काहीतरी वर्तन करत असतात. खाली मुंडी पाताळ धुंडी

ह्यावेळचा बिगबॉसचा पूर्णतः गंडला आहे, हे कदाचित कलर्स मराठीलाही उमगले असावे. फिनाले वीक मध्ये जे कुणी उरले आहेत ते केवळ नशीब बलवत्तर म्हणून तरले आहेत. त्यामुळे आता 'वासरांत आंधळी गाय शहाणी' ह्याला जागून कुणाला तरी विजेता घोषित करतील. राखीला विजेती करू शकत नाही, अन्यथा बिगबॉसच्या (मराठी वा हिंदी) पुढच्या हंगामांत टीआरपी वाढवायला कोण येणार? धोंगडेबाईंची पहिली मालिका केवळ झी मराठीच्या पाठबळामुळे वर्षभर तरी चालली, तर सोनी मराठीवरील दुसरी मालिका कोविडच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाउनचा फायदा घेऊन बंद पडली (म्हणजेच चॅनेलचा सुंठीवाचून खोकला गेला). तिकडे वेलणकर दोन्हीही वेळा वाइल्ड कार्ड एंट्रीनीच आला आहे, तो तर कायमच दुय्यम भूमिकेत दिसत आला आहे. त्यामुळे, शेवटी माने, अपूर्वा, व अक्षय (तेही पुन्हा त्यांच्या नशिबाच्या जोरावरच) राहतील असा माझा अंदाज आहे.

बिगबॉस हिंदीची चर्चा इकडे नको. पण माझ्या मते बरीचशी मंडळी केवळ वेळ घालवायला आली असावी. जसे अब्दू. कसल्यातरी शूटिंगसाठी बाहेर पडला, परत घरात आला.

प्रसाद बाहेर पडला तर सोशल मिडीयावर लोक जगबुडी झाल्यासारखे प्रतिक्रीया देत आहेत. एक तर पुर्ण सिझन मधे हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या टास्क मधे ( पैसे परत मिळवणे, वेळ मोजणे, अपुर्वाला फिनाले टिकीट ला मदत .. सध्यातरी इतकेच टास्क आठवत आहेत ) नीट खेळला. नाहीतर प्रत्येक टास्क मधे गोंधळ केला आहे याने. घरात पण फार काही भारी वावर नव्हता ( नाना ची अ‍ॅक्टींग सोडल्यास ) मग कशाच्या जोरावर लोकांना हा विनर वाटतो देव जाणे. असो. तो गेला म्हणून बरं वाटलं. उरलेल्यात कोणी फार भारी आहे अशातला भाग नाही पण प्रसाद टॉप ला वगैरे गेला असता तर अजिबातच आवडलं नसतं.प्रसाद मुळे बरेच चांगले लोक उगीच बाहेर पडले असं वाटतं.
माने नी मांजरेकर ना बरोबर क्रॉस केलं वीकेंड ला. माने हुषार आहेत. जाणुनबुजुन ते वाक्य बोलले की आरोह अ‍ॅग्रीमेंट करतानाच चावडी वर बोलणी बसणार नाहीत असं करुन आलाय. ममां ना लागलं ते एकदम...बरोबर तीर निशाने पे लगा. माने ना ट्रीक कळली आहे आता चर्चेत रहाण्याची. आरोह आहेच ममां चा फेवरेट.
अपुर्वा ला धोंगडे ची चुगली देउन बरोबर अडकवलं बिबॉ ने. ती धड मान्य पण करु शकत नाही की तिला आई आणि मामा ने अक्षय विरुद्ध भडकवलं म्हणुन.आणि तिचं बदललेलं वागणं नीट जस्टीफाय पण नाही करु शकत.
आता या वीक मधे धोंगडे जाईल असं वाटतय. आरोह आणि राखी फिनाले पर्यंत जाण्याच्या बोलीवर आले असणार आहेत नक्कीच नाहीतर इतक्या उशीरा येउन फिनाले मधे जाणं शक्य नाही.
अपुर्वा आणि माने टॉप २ आणि अपुर्वा विनर होईल असं मला वाटु लागलंय आता.

हा सिझन मी फक्त सुरवातीला एक दोन एपिसोड अर्धा एक तास पाहिले तेव्हा मला माने, तेजु आवडले बाकी जे लोक ज्या क्रमाने जायला हवे त्या क्रमानेच गेले (हे क्रम मी जे तासभर पाहिले त्यावरून ठरवले होते), राखी सावंत आल्यावर मैत्रीणिने आग्रह केला म्हणून एक दोन एपिसोड थोडा वेळ पाहिले आणि माझे राखी बद्दल पूर्व ग्रह होते ते दूर झाले (मजा म्हणजे हे सगळे ऐकीव माहितीवर होते). ती फार हुशार, प्रोफेशनल ,चांगली एंटरटेनर वाटली. तिला विनर नाही करणारेत नाही तर तीच खरी विनर आहे.
हा सिझन सटल झालाय, पण दुसऱ्या सिझन पेक्षा मी यांना जास्त रेटिंग देईन कारण ते लोक भयंकर बिनडोक, फालतू वाटत होते. सज्जन गटातील प्रतिनिधी म्हणून माने विनर व दुर्जन गटातील प्रतिनिधी म्हणून अपूर्वा उपविजेती हा माझा चॉईस असेल. अर्थात चॅनेलचा चॉईस हाच फायनल असणारे.

यावेळी सोमिवर ज्याला वोट्स जास्त तो बाहेर अस चालू आहे या सिझनला.
म्हणजे आता हे जे 5सदस्य आहेत त्यापैकी ज्याला वोट्स कमी तो पुढे जाणार.
माझ्यामते यावेळी बिबॉसने ठरवल असणार की पहिल्या तीन चार आठवड्यात जे सोमिवर हीरो ठरतात त्यांना यावेळेस जिंकवायच नाही.
त्यामुळे यावेळेस कोण विनर ठरेल याचा भरवसा नाही.
राखी जिंकली तरी नवल वाटणार नाही.
पण अपूर्वाच पारड उजव वाटत आहे.
मिडवीकला आरोहला काढतील ,नाही काढल तर हा सिझन धन्यवाद आहे.

सज्जन गटातील प्रतिनिधी म्हणून माने विनर व दुर्जन गटातील प्रतिनिधी म्हणून अपूर्वा उपविजेती >>
दुर्दैवाने यावेळी सज्जन आणि दुर्जन असे गट झालेच नाहीत. बी टीम मधे धोंगडे, प्रसाद यांच्यासारखी मंडळी भरलेली त्यामुळे त्यांचा पण खुप राग यायचा. जसे पहिल्या सिझन ला रेशम आस्ताद आणि टीम, दुसर्‍या वेळी शिवानी आणि टीम, तिसर्‍या सिझन ला मीरा , जय या लोकांचा रागच यायचा त्यामुळे दुसरी टीम अपोआप हीरो व्हायची तसं यंदा झालंच नाही असं मला वाटतं. तसं झालं असतं तरच सिझन मधे ईंटरेस्ट आला असता.
आणी माने स्वत: कधीही सज्जन वाटलेच नाहीत. नेहेमी काड्या करुनच, विकास ला हाताशी धरुन तरुन गेले. आणि काड्या करुन च्या करुन वर मी नाही त्यातला असं म्हणुन नामानिराळे झाले. याउलट अपुर्वा जशी आहे तशी दिसली. माज तर माज आणि मजा तर मजा करत राहिली. कोणासाठीही मनात राग धरुन बसली नाही. अक्षय सोबत तिचा गैरसमज करुन दिल्यामुळे भांडली पण तरी काल सर्वात चांगला मित्र विचारला तेव्हा अक्षय चच नाव घेतलं. त्यामुळे माने आणि अपुर्वा मधे निवडायचं असेल तर माझा चॉईस अपुर्वा असेल. तेजा राहिली असती तर कदाचित तिचे चान्सेस जास्त होते कारण अपुर्वा च्या पेक्षा ती सर्वांना धरुन राहाणारी आणि बी टीम मधली सगळ्यात संतुलित व्यक्ती दिसायची.

प्रसाद बाहेर पडला तर सोशल मिडीयावर लोक जगबुडी झाल्यासारखे प्रतिक्रीया देत आहेत. एक तर पुर्ण सिझन मधे हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या टास्क मधे ( पैसे परत मिळवणे, वेळ मोजणे, अपुर्वाला फिनाले टिकीट ला मदत .. सध्यातरी इतकेच टास्क आठवत आहेत ) नीट खेळला. नाहीतर प्रत्येक टास्क मधे गोंधळ केला आहे याने. घरात पण फार काही भारी वावर नव्हता ( नाना ची अ‍ॅक्टींग सोडल्यास ) मग कशाच्या जोरावर लोकांना हा विनर वाटतो देव जाणे. >>>तेच तर प्रसाद लोकांना का आवडायचा हेच कळत नाहिये...बरं तो स्वभावाने,मनाने चांगला होता असं मानलं तर त्याची कोणाशीच खूप छान अशी मैत्री दिसली नाही...देशमुखला तर तो सतत nominate करायचा आणि captaincy टास्क आला की जीव तोडून,प्रसंगी मित्रांचा विश्वास तोडून अतिशय स्वार्थीपणे खेळायचा...बरेच टास्क even weekend ला चावडीवर असणारे साधे साधे टास्क त्याला समजत नव्हते...सुरवातीला तर तो ज्या group मध्ये जाईल त्या group ची अर्धी energy प्रसाद ला समजवण्यात waste व्हायची तरी प्रेक्षकांना त्याला top 5 मध्ये का पहायचं होतं देवंच जाणे...याउलट अक्षय सगळे tasks मनापासून खेळलाय..त्याने खूप emotions दाखवले नाही पण अपूर्वा सोबतची मैत्री शेवटपर्यंत निभावली..शिवाय खूप mature होती त्यांची मैत्री...आणि nominations मध्ये त्याने त्याच्या मित्रांना जरी nominate केले तरी ते निकषांच्या आधारावर केले त्यामुळे तो खूपच fair खेळला असे मला वाटते...तो कुणालाही घाबरत नाही...अगदी राखीने जे मनसुबे आखून त्याच्या bed वर अंडी फोडली ते मनसुबे त्याने एका फटक्यात हाणून पाडले...
मानेसारख्या लावालाव्या ,छक्के पंजे त्याने कधी केले नाहीत...घरात सगळ्यांसोबतच त्याची मैत्री आहे...तो मुलींसोबत फिजिकल होतो असे सगळे म्हणायचे पण जेव्हा त्याने टॅक्सीच्या टास्क मध्ये मीराला धरलं तेव्हा आरोह विशाल वरुन ओरडले तेव्हा त्याचा चेहरा एकदम पडला आणि त्याने मानेंना तुम्ही इकडे येता का? असेही विचारले ते फार genuine वाटले...जर तो मुलींसोबत वाईट वागत असता तर इतके दिवसात ते त्या मुलींना नक्कीच जाणवलं असतं..कदाचित टास्क खेळताना त्याला भान राहत नसेल पण म्हणुन त्याचं intension वाईटच असेल असं नाही...actually त्याचा YouTube वरचा birthday चा video मी पाहिला..तो अज्जिबातच आवडला नाही...पण व्यक्तिगत आयुष्यात तो कसाही असला तरी 100 दिवसांचा हा खेळ बघता तो winner म्हणून deserving वाटतो.

अपूर्वा नाही वाटत deserving winner...specially family week झाल्यापासून...तिचा focus टोटली हलला आहे अक्षयला घाबरते ती..तो to the point बोलला की हिची बोलती बंद होते...एकदम बालिश बुद्धी आहे ती..सतत आपलं याने मला असं म्हटलं तिने तसं म्हटलं ... अवास्तव महत्त्व देते ती स्वतःला, खूपच सेल्फ centered आहे...आधी स्पष्टवक्ती म्हणून आवडायची पण आता वाटतंय अक्षयसोबत होती म्हणून इतके दिवस टिकली. ज्या आठवड्यात आरोहने तिला nominate केलं त्याच आठवड्यात राखीने,विशालने आणि मीरानेही कोणाला ना कोणाला nominate केलंच ना..त्यांनी कोणी त्याचा issue नाही केला आणि या बाईचं शेवटच्या आठवड्यातही तेच रडगाणं चाललंय की याने मला nominate केलं होतं...एकंदरीत फारच गर्विष्ठ आहे अपूर्वा नेमळेकर....
यावेळी अजून पत्रकार परिषद झाली नाही...या आठवड्यात होईल का?

दुर्दैवाने यावेळी सज्जन आणि दुर्जन असे गट झालेच नाहीत[[ <<<मी जे थोडे पाहिले त्यात असे फिलिंग आले होते की काही अर्धवट इंग्रजी बोलणारे तरुण पोरपोरी एकत्र येऊन मध्यमवयीन साधे सरळ मराठी बोलणाऱ्या मानेला टारगेट करताहेत. ती एक लावणीवाली बळेच त्या गटाला चिकटत होती, त्यामुळे तो गट निगेटिव्ह वाटला. उलट मानेंबरोबर जुळवून घेतलेली तेजू जी त्या आंग्ल गटात सहज फिट झाली असती ती जास्त पॉझिटीव्ह वाटली.
प्रसाद सोमिवर हिट होता हे ऐकून मला धक्का बसला आहे.

एकंदरीत फारच गर्विष्ठ आहे अपूर्वा नेमळेकर...... एक्झॅक्टली हेच तर वर्क होणार आहे, she played it all out, consistently. अर्धवट चांगले अर्धवट वाईट डझन्ट मेक एनी सेन्स. म्हणून उपविजेतेपदावर ती योग्य दावेदार आहे.

उपविजेतेपदावर ती योग्य दावेदार आहे.>>>उपविजेता होईल कदाचित पण विजेते पदासाठी deserving नाही असं म्हटलं मी...

आता राखी सोडून व्हिलन आहेत सगळे. सज्जन गटातले दुर्जनच पुढे आले , माने आणि धोंगडे. अक्षय अपुर्वा यांनी पहील्यापासून तो बहुमान मिळवलेला. यावेळी सज्जन म्हणावेत असे तेजु, रोहीत, रुचिरा, समु, विकास होते . प्रसाद म्हणजे अति भोळा (आव की खरं माहिती नाही), पण यावेळी टास्कस उत्तम खेळला, कधी कधी टास्क समजत नसे हेही खरं, नको त्या विषयावर भांडायचा . बहुसंख्य पब्लिकच्या लाडक्याला काढलं हे आश्चर्य वाटतं.

धोंगडेचा प्रचंड वशिला दिसतो. तिला जिंकवू नका, अपूर्वा चालेल. ज्याचं चावडीवर कौतुक तो गेला समजायचं, प्रसाद कौतुक तो गेला. अक्षय अपूर्वा मध्ये अक्षय बरोबर, किंचित कौतुकच केलं, आता त्याचं काही खरं नाही, हाहाहा.

त्यातल्या त्यात अक्षय जिंकला तर आवडेल. तोच मला बरा वाटतो आणि काहीही माहिती नसताना अपूर्वाला त्याने बरोबर उघडे पाडले, अपूर्वाला तिच्या आईने सांगितलं होतं हळूहळू वागण्यात बदल कर, तिने सडनली केला बदल. धोंगडेची चुगली ऐकून आई मामाने काही सांगितलं नाही म्हणाली आणि हे किती चुकीचे आहे, प्रेक्षकांना सरळ बिग बॉसने दाखवलं. इतकी उघडी पडली अपूर्वा की बास रे बास.

राहुल म्हणतात तसं वासरात लंगडी गाय शहाणी जिंकणार, ती अपूर्वाच आहे.

कंटेट व्हिलन लोकंच देतात त्यामुळे त्यांना पुढे नेतात पण जिंकवत नाहीत, यावेळी एक व्हिलन जिंकेल.

यावेळचा विनर लॉटरी सिस्टीम ने किंवा दहा वीसने ठरवतील बिबॉस कारण त्यांनाच कळत नाही की कोणाला करायच विनर.पण मुळात सज्जन दुर्जन कोणाला आणि कस ठरवायच हेच बिबॉसच्या हातात असत त्यालाआपण काय करणार?
प्रसाद,अपूर्वी इव्हन सँम , देशमुख यांचे कितीतरी एकत्र हलकेफुलके सीन्स आहेत पण ते न दाखवता ,जर त्यांची निगेटिव्ह साईडच दाखवायची ठरवल असेल तर ते तेच दाखवणार.विनरही तेच ठरवणार.
मला वाटत की त्यांचे इंडेमॉल,कलर्स,स्पॉन्सर्स यांचाही हिस्सा असणार डिसिजन मध्ये.
म्हणजे वूट वोटिंग नावाचा प्रकार यांचाच असेल.
एरवी सोशलमिडिया वोटिंग प्रमाणे जायच ,पण ज्याला काढायच असेल त्याला जर सोमिवर जास्त मत असतील तर तिथे सोमिवोटिंग बाजूला ठेवून यांनी ठरवल त्याला काढायच ,तेच वूट वोटिंग असेल.
99वोट्स अलाऊड असतील तर एकच वोट ग्राह्य धरायच.
जस या वीकमध्ये प्रसादला काढायचच हे फरवल होत ,मग त्याप्रमाणे सेटिंग करून नॉमिनेशन निकष लावायचे वोटिंग मध्ये एकच वोट ग्राह्य धरायच आणि मग त्याला जर 80% वोटिंग असेल.तर ते इतर नॉमिनेट झालेल्या सदस्यांच्या खाली आणायच,हेच वूट वोटिंग असेल जे आपल्यासमोर कधीच येत नाही,येणार नाही आणि ममां चावडीवर सोयीस्कर रित्या पब्लिक वोटिंग च्या नावावर बिल फाडणार.
यावेळणा एकही उमेदवार डिझर्व्हिंग नाही हे जरी खर असल तरीही ज्या पध्दतीने नॉमिनेशन टास्क प्लँन झालज आणि जास्त वोट्स मिळणारे एकामागोमाग गेले
अगदी देशमुख, प्रसाद आणि तेजू हे मँक्झिमम वोट्स मिळवणारे असले तरी रुचिरा,योगेश हे जेव्हा बाहेर गेले त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर उमेदवारांच्या वरच होते पण तरीही गेलेच.
कारण यावेळी सिझन उमेदवार खेळलेच नाहीत तर बिबॉस खेळले.म्हणूनच सिझन आपटला आणि ममां उमेदवारांसमोर निष्प्रभ ठरले .

आज जर्नी एवी . राखीची नीट बघितली, धोंगडे आली आणि टीव्ही बंद ठेवला, ती दिसत छान होती पण मला नाहीच आवडत, अभिनय आवडला होता सिरीयलमधला पण जास्त बघितली नव्हती. माने आहेत आत्ता, टीव्ही म्युट.

मला फक्त तेजुची बघायला आवड्ली असती असं वाटतंय. विकासची आवडली असती, त्यात अनेक रंग असते. समु, देशमुख, रोहीतचीही आवडली असती .

केल असेलच, बिग बॉसची लाडकी आहे ती. तिला ठेऊन इतरांना काढलं. माझीच इच्छा नव्हती बघायची. तिचं स्वयंपाक करणं आणि टास्कस आवडायचे पण भांडखोर नंबर एक वाटते मला ती.

राखी सांगते बाबांची इच्छा होती मराठी बिग बॉस मध्ये जा अशी पण पुर्वी तिच्या काही मुलाखती बघितल्या आहेत त्यात ती सांगायची बाबांना मी ह्या क्षेत्रात आले तेच आवडलं नाहीये म्हणून ते बोलत नाहीत माझ्याशी, आईचा पाठिंबा आहे, आई गुजराथी आहे माझी . तिचा भाऊ राकेश पण फिल्म प्रोड्यूसर होता किंवा हिच्याच साठी हिने पैसे देऊन एक फिल्म प्रोड्यूस करायला लावलेली. त्यामुळे फॅमिलीशी आता अजिबात संबंध राहिला नाही हे आश्चर्य वाटतं . तिचं लग्न ठरलं होतं एका चॅनेलच्या reality शो मध्ये तेव्हा आईची मुलाखत बघितली होती, ती म्हणाली की राखी आता बोलत नाही, कॅनडावाला मला जावई म्हणून आवडेल आणि मला शेवटच्या एपिसोडला जायला आवडेल . कॅनडावाला गुजराथी जिंकलेला तो शो पण राखीची आई आली नव्हती तेव्हा. एकदा बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेली पण तेव्हा मी बघायचं सोडलेलं .

मी मेघा धाडेचे काही vlogs बघतेय सध्या, तिचं सासर कोकणात गणेशगुळे, तिथला vlog मला आवडला. फार छान आहे ते गणपतीचे देऊळ. तिथून आजूबाजूचे जंगल बघताना कसलं भारी वाटलं.

फक्त तिला कामं का मिळत नाहीये किंवा काही करत असेल तर मला माहिती नाहीये . आर्थिकदृष्ट्या तिला गरज नसेल असं वाटतंय पण अभिनेत्री म्हणून रोल मिळाले तर प्रोग्रेस होतो आणि समाधान मिळतं (असं मला वाटतं) .

Pages