
भारता मध्ये नवरात्र देशभरात साजरा होतो. बंगाली लोकांची दुर्गा पूजा, गुजरातचा गरबा प्रसिध्द. पण आता त्याची जागा दांडिया, डिस्को दांडियाने घेतलीये
महाराष्ट्रात घटस्थापना. घरोघरी पारंपरिक पद्धतीने घट बसवले जातात. देवींच्या देवळांमध्ये खूप मोठा उत्सव असतो. ओटी भरण्यासाठी मोठ्या मोठ्या रांगा असतात. नऊ दिवसात नऊ रंगांनी न्हाऊन गेलेला असतो अवघा आसमंत! ह्या सगळ्यात हात न धुवून घेतील ते राजकारणी कसले. लगेच त्यांच्यात चढाओढ. मोठ मोठे मंडप. सेलेब्रिटी बरोबरचे दांडिया. हैदोस, उत्साह ज्याला जे हवं ते त्यानं म्हणावं.
थोड लहान असताना आम्ही देवी बघायला जायचो, विशेषतः अष्टमीच्या दिवशी, बिल्डिंग मधील काही जणी मिळून देवीला जात असू. मोठं कुंकू लावलेल्या, मळवट भरलेल्या बायका घागरी फुंकायच्या. तेव्हा त्यांना बघुनच माझी खूप टरकायची.
ह्या सगळ्यात अगदी मनापासून आवडणारा म्हणजे भोंडला. माझ्या आठवणीत काही वर्षांपूर्वी, विसरला जातोय की काय असं वाटतं असतानाच, परत भोंडला करायला सुरुवात झाली.
आमच्या सोासायटीतील काही वर्षांपूर्वीचा भोंडला आठवतो. खुप वर्षांनी भोंडला खेळायला मिळणार म्हणून मी खूपच उत्सुक होते.
एक दिवशी खाली नोटीस लागली, " अमुक तमुक दिवशी भोंडला आहे. नोंदणी करा. ५०रू वर्गणी.
खिरापत - वडापाव आणि खोबऱ्याची वडी "
झालं! "खिरापत - वडापाव" अरे आता कधी गंमत येणार. पण म्हटलं असू दे आताच्या नवीन पद्धती.
भोंडल्याच्या दिवशी मात्र खूप साऱ्या बायका मस्त छान जरीच्या साड्या नेसून खाली जमल्या. ज्या काकूंनी सगळं अरेंज केलेलं त्यांनी एक छोटा हत्ती आणलेला. मग तो मध्यभागी ठेवला, पूजा केली. सगळ्यांनी फेर धरला. आणि speaker वर भोंडल्याची गाणी सुरू झाली. मला वाटतं खूप कमी जणींना गाणी येत असावी. आता उत्साह अजूनच कमी झाला. भोंडला करायला जास्त करून आज्या आणि आयाच होत्या. गोल गोल फिरत फिरत शेवटी
"आडात पडला शिंपला आणि संपला आमचा भोंडला" म्हणत भोंडला संपला.
सगळ्यांनी लगेच फेर सोडला, वडापाव चे वाटप सुरू झाले. आणि मी इकडे " सर्प म्हणे मी एकला..." म्हणत बसले ( बहुदा मनातच).
त्या काकू आणि त्यांच्या मैत्रिणींनी खरंच मनापासून चांगल्या हेतूने नवीन पिढीला ओळख व्हावी म्हणून भोंडला ठेवला, सगळी तयारी केली त्याबद्दल कौतुकच! पण भोंडल्याची खरी ओळख आणि मजा नवीन पिढीला द्यायची तर मग तो भोंडला खासच झाला पाहिजे, अगदी आमच्या लहानपणी खेळायचो तसा.
सुरुवातीचे काही वर्ष, प्रत्येकीच्या घरी स्वतंत्र भोंडला असे. एकीकडाचा संपला की दुसरीकडे, कधी कधी २-३ भोंडले असायचे. पण हळू हळू अभ्यास वाढले, लगेचच सहामाही परीक्षा असायच्या मग आमचा सगळ्यांचा भोंडला वर गच्चीवर होऊ लागला.
कोणी पाट आणायचे, हत्ती आणायचे, मग फुल वगैरे वाहून व्यवस्थित पूजा करून फेर धरला जायचा.
ऐलोमा पेलमा, एक लिंबू झेलू बाई, हरीच्या नैवेद्याला, अडकित जाऊ खिडकीत जाऊ, श्रीकांता कामला कांता, कारल्याचा वेल, कोथिंबीरी बाई ग....
शेवटचं आड बाई आडोणी ... तरी अजून एक शेवटचं "सर्प म्हणे मी एकला...खिरपतीला काय ग? " म्हणून जोरात फतकल मारून खाली बसायचं.
आता खरी गंमत, ती म्हणजे खिरापती ओळखणे.
मग एक एक काकू पुढे येत.
"तिखट की गोड?", " गोल की चपटा?", "ओला की सुका" "चमच्याने खायचा की हाताने?" आमचे प्रश्न आणि त्यांची "हो" किंवा "नाही" ची उत्तरं.
कधी कधी तर " मीठ, साखर" एवढ्यावर पण गाडी येत असे.
त्या सगळ्याजणी पण दरवर्षी काहीना काही नवीन नवीन शोधून आणायच्या. जेवढ्या जास्त खिरापती, तेवढी अजूनच मजा, तेवढा जास्त वेळ. धमाल यायची.
एक तासाचा भोंडला असेल तर एक तास खिरापती ओळखणे, मग त्यांचे वाटप, आणि मग ती खिरापत स्वाहा होई.
तर अशी ही साठा उत्तराची नवरात्रीची थोडी आधुनिक थोडी पारंपरिक कहाणी संपन्न!
तुम्हाला अजून गाणी आठवत असतील तर नक्की कमेंट्स मध्ये टाका! तुमच्या गावाच्या, भोंडल्याची, हादग्याच्या आठवणी असतील तर please शेअर करा.
>>>>>>>>अस्सा समाज जागरूक बाई
>>>>>>>>अस्सा समाज जागरूक बाई
भोवताली असावा....---- सौ. वृषाली वैशंपायन, डोंबिवली.
Submitted by पल्लवी ०९ on 26 September, 2022 - 20:26
हे नवीन गाणे खूपच आवडले.
परत परकरी पोर होउन भोंडला
परत परकरी पोर होउन भोंडला खेळावा परता निरागस आयुष्य जगावे असे वाटते. तेव्हा मैत्रिणी केवढ्या होत्या. किती गप्पा , शाळेत भटकणे. किती मजा होती.
मला एक गाणं आठवतं, जे आमच्या
मला एक गाणं आठवतं, जे आमच्या कडे आधी म्हणत नसत. पण कुणीतरी दुसरीकडून शिकून आले आणि हे सुरू केलं.
त्यातले शब्द लहानपणी जसे (चुकीचे ) ऐकल्या गेले तसे आठवतात, अर्थात मूळ शब्द वेगळे असावेत. कुणाला हे गाणं माहीत असेल?:
घ्या घ्या कुऱ्हाडी, चला जाऊ वऱ्हाडी
चंदन वृक्ष तोडावायस तोडावयास
महादेवाचे देऊळ बांधावयास बांधावयास
महादेवाच्या देवळात गजाननाचे गजाननाचे
आली आली पार्वती टाकिले फासे फासे
शेवटल्या दोन ओळी चुकीच्या ऐकू आलेल्या, अर्थ लागत नाही.
एकदा आम्ही भोंडला खेळल्यानंतर
एकदा आम्ही भोंडला खेळल्यानंतर त्या मुलीच्या आईने प्राऊडली सांगीतले की तुम्हाला ओळखूच येणार नाही खिरापत आणि झालेही तसेच. खिरापत होती पुडिंग अरे बापरे किती पूर्वी हे पुडिंग प्रकरणच माहीत नव्हते तेव्हाची गोष्ट आहे ही.>>>
ह्याच्या वरून मला पण एक आठवलं. आमच्या building मध्ये एक थोडी मोठी मुलगी होती. एकदाच तिच्या आईने भोंडला ठेवला होता त्यांच्या घरी.. आणि खिरपतीला वडा आणि फ्रूट सलाड, त्यात जेली घातलेली. पहिल्यांदाच इतकी फॅन्सी खिरापत कुणी ठेवलेली.
बाकी एरवी ओळखू कसे येणार नाही याला महत्त्व असल्यामुळे चित्र विचित्र पदार्थच जास्त असायचे..
अजून छान छान गाणी शेअर करतायत
अजून छान छान गाणी शेअर करतायत .. मस्त.
आला माझ्या माहेरच्या / सासरच वैद्य.... म्हणायचो.
भोंडला हा प्रकार खरंतर फक्त
भोंडला हा प्रकार खरंतर फक्त पुण्यातल्या वाड्यांमध्येच चालायचा.
माझे लहानपण शुक्रवार पेठेतल्या एका वाड्यात गेले. वाड्यात प्रत्येकाच्या घरातल्या मुलांचा भोंडला असायचा. माझे आजोबा चित्रकार होते त्यामुळे हत्ती काढायचं काम ते अतिशय उत्साहाने करत . दरवर्षी मोठ्या आकाराचा हत्ती ते एका मोठ्या लाकडी पाटावर काढत. पुढे वर्षभर हे हत्तीचे रंगीत चित्र वाड्यात मोक्याच्या ठिकाणी सगळ्यांना दिसेल असे ठेवले जात असे.
पुण्यातल्या वाड्यांमध्ये समृद्ध सांस्कृतिक जीवन अनुभवायला मिळत असे.
या दिवसात भोंडल्याच्या
या दिवसात भोंडल्याच्या गाण्यांचा शेजार- पाजारच्या वाड्यां मधून ऐकू येणारा स्वर, ग्रामीण लोकगीतांसारखा अजूनही माझ्या कानात गुंजत असतो..
आमच्या शाळेतही होई -
आमच्या शाळेतही होई - हुजूरपागा.
मला सर्वात 'शिवाजी आमुचा राणा
मला सर्वात 'शिवाजी आमुचा राणा, किल्ला तो त्याचा तोरणा' हे गाणं जाम आवडायचं. शिवाजी महाराज आले की एक जोश वाटायचा.
छान धागा. ह. पा. प्रमाणे
छान धागा. ह. पा. प्रमाणे मलाही लहानपणी श्रीकांदा कमळकांदा.. असं काहीतरी वाटायचं.
"आज मथुरेचा बाजार, झाला उशीर.. " हेही गाणं म्हणत असू. आणखी बऱ्याच गोष्टी आठवताहेत. सवडीने लिहते.
सामो,गाणे आवडले.
सामो,गाणे आवडले.
भोंडला हा प्रकार पुस्तकातून वाचला.भा.रा. भागवतांच्या "बाबुरावांचा ग्रंथराज"ह्या बाल साहित्यकृतीतून. मात्र बरीचशी गाणी आईमुळे माहीत होती.
ज्या सगळ्यांनी ह्या धाग्यात
ज्या सगळ्यांनी ह्या धाग्यात गेल्या दोन वर्षात जी भर घातली त्यांना धन्यवाद!
नवनवीन गाणी/ प्रथा - जुन्या प्रथा नव्याने कळल्या.
पुण्यातल्या वाड्यांमध्ये समृद्ध सांस्कृतिक जीवन अनुभवायला मिळत असे. >>
आईकडून ह्याविषयी बरेच ऐकून आहे.
परत परकरी पोर होउन भोंडला खेळावा परता निरागस आयुष्य जगावे असे वाटते. >> हम्म . मलाही तसेच पूर्वीचे वातावरण आणि तसाच साधा भोंडला अनुभवायला मिळाला तर आवडेल.
हादगा, भोंडला, भुलाबाई (?) चे दिवस सुरू झाले.
संध्याकाळी भोंडला आणि रात्री गरबा / दांडिया असे काही जणांचे ( जणींचे ) होत असेल.
प्राचीन आता यंदा वेळ.मिळाल्या त्या आठवणी जरूर लिहा. वाचायला आवडेल.
शाळेत व शेजारी दर दर वर्षी न
शाळेत व शेजारी दर दर वर्षी न चुकता भोंडला होत असे. खिरापत ओळखायला तर फारच मजा येत असे. गाणी किती सुंदर. फॉन्ड मेमरीज. खूप जीवाभावाच्या आठवणी जपलेल्या आहेत.
हस्तात येतो ना भोंडला? म्हणुन मधे हत्ती.
हस्तात येतो ना भोंडला? म्हणुन
हस्तात येतो ना भोंडला? म्हणुन मधे हत्ती.>>> वाह, सामो!
हस्त नक्षत्रातील पावसाला हत्तीचा पाऊस म्हणतात. म्हणून हत्ती नक्षत्र. हस्त चा अपभ्रंश हत्ती. ..
तसेच हत्ती मेघाच प्रतीक आहे. जाणारा पाऊस शेतकऱ्यासाठी महत्वाचा असतो म्हणून हत्तीची पूजा करतात..
(जेमिनी जिंदाबाद :))
कोथिंबीरी बाई गं
आता कधी येशील गं
आता येईन चैत्र मासी
चैत्रा चैत्रा लवकर ये
हस्त घालीन हस्ताचा
देव ठेवीन देव्हा-या
देव्हा-याला चौकटी
उठता बसता लाथा-बुक्की
सगळे प्रतिसाद परत वाचले.
सगळे प्रतिसाद परत वाचले.
वर भुलाबाई आणि भूलोजी विषयी काही उल्लेख आलेत.

परवा fb वर एकांकडून प्रतिसादात भुलाबाई आणि भूलोजीचा फोटो मिळाला. मी पहिल्यांदाच बघितला.
---
---
गांधारीच्या एका गाण्याचा वर एक उल्लेख येऊन गेलाय,. तसंच एक अजून गाणं कळलं
हादगा गांधारी पूजते
मस्त आहे फोटो.
मस्त आहे फोटो.
खरं आहे.
खरं आहे.
फोटो क्रेडिट मनोज नायक यांना जाते.
Pages