पाककृती स्पर्धा-१ - तिरंगी पास्ता - sonalisl

Submitted by sonalisl on 11 September, 2022 - 17:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पास्ता- ३ रंगांसाठी मी ३ (छोटी) वाटी farfalle/bow-tie पास्ता घेतला आहे.
१ नारंगी भोपळी मिर्ची किंवा स्विट पेपर( हि भो.मि. पेक्षा लहान असते)
१ हिरवी भोपळी मिर्ची
लाल पास्ता सॅास
बेसिल पेस्तो सॅास
पांढऱ्या सॅाससाठी : २ चमचा बटर, ४ चमचे मैदा, वाटीभर दुध, मिरपूड, लसूणपूड

क्रमवार पाककृती: 

पास्ता मीठ घालून उकळत्या पाण्यात ७-८ मि. शिजवून घेतला. चाळणीत निथळला.
CCB60E0E-8832-4917-B2F6-7E2CA0260A90.jpeg

पास्ता शिजवतानाच पांढरा सॅास करायला घेतला.
AFB75194-FB28-4B08-BFE1-B3BFDC73BC5E.jpeg
पॅनमधे बटर वितळताच त्यात मैदा परतला. त्याचा खमंग वास यायला लागल्यावर त्यात हळूहळू दूध घालून एकजीव केले. त्यात पास्ता घालून सगळे एकत्र केले. वरून मिरपूड आणि लसूणपूड घातली. पांढरा पास्ता तयार!
पॅनमधे नारंगी मिर्ची परतून लाल सॅास घातला. २-३ मि. परतल्यावर त्यात पास्ता मिसळला. केशरी पास्ता तयार!
पॅनमधे हिरवी मिर्ची परतून पास्ता व पेस्तो सॅास घालून सगळे गरम होईपर्यंत परतून घेतले. हिरवा पास्ता तयार!
हे तीनही एका ताटात सजवले.
4F4238BD-04AF-49C8-9138-D8620BE00D3B.jpeg

वाढणी/प्रमाण: 
एकास पुरे
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसतोय.. मला तो व्हाईट सॉसवाला जास्त आवडतो.. पहिला तो गट्टम करून लगेच तीनाचे दोन रंग करीन Happy

छान.
मला पण व्हाईट सॉसवाला रोस्टेड चिकन, पेपर आणि पॉमेजाँ असा आवडतो. पण फेटुचिनी किंवा पेने. Happy बोटाय आमचा पोरगा खातो त्यामुळे तो लहान मुलांचा पास्ता वाटतो.. काही लॉजिक नाही पण वाटतो.

छान!
मलाही व्हाइट सॉसवाला पेने पास्ता आवडतो.

छान!
मलाही व्हाइट सॉसवाला पेने पास्ता आवडतो.