Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<<भुभे प्रामाणिक असतात, ते
<<<भुभे प्रामाणिक असतात, ते स्वतःचं खरं नाव, पत्ता सांगतीलच शिवाय जाताना शेक हॅन्ड पण करून जातील Happy
नवीन Submitted by आशुचँप >>
हो ना.. आणि चहाला पण बोलावतील..
मांजरीचे पोट भरले की "कोण तुम्ही?? " असा भाव असतो चेहर्यावर..
या धाग्यावर अजून मावांचे फोटो
या धाग्यावर अजून मावांचे फोटो पण हवेत.माऊपालक गौर फरमाए. <<>>>>>> अनु, हुकूमावरुन,
हे आमचं माऊबाळ थिओ. मी काम करत असले की लॅपटॉपवर असा येऊन बसतो. नाहीतर मागे जाऊन खाडकन बंद करतो. तो आला की घाईघाईने सगळ्या विंडोज बंद/ मिनिमाइ ज कराव्या लागतात.
संध्याकाळची विश्रांती.
लॅपटॉपवर बसतो नाहीतर असा बघत बसतो. ती खुर्ची मी माझ्यासाठी घेतली होती. वाचन करतांना बसायला म्हणून. आता त्याच्या मालकीची आहे. पाहुणे आले तरी आम्हाला ती धरता येत नाही कारण हा ढिम्म हलत नाही त्याच्यावरुन. कोणी बसलंच तर सरळ उडी मारतो आणि बसलेल्याला उठावचं लागतं.
बाकी माऊ गोड असतात. इतक्या आर्जवाने हुकूम चालवतात !
इथले सगळे भुभे बघून एक भुभू
इथले सगळे भुभे बघून एक भुभू पण असावं अशी जाम इच्छा होते.
मस्त आहे थिओ बाळ
मस्त आहे थिओ बाळ
नाहीतर मागे जाऊन खाडकन बंद करतो. तो आला की घाईघाईने सगळ्या विंडोज बंद/ मिनिमाइ ज कराव्या लागतात. >>>> हा हा हा, हे भारी आहे
थिओ darling क्यूट आहे.
थिओ darling क्यूट आहे.
थिओ फारच क्यूटू क्यूटू!
थिओ फारच क्यूटू क्यूटू!
कसला सुंदर आहे थिओ.एकदम
कसला सुंदर आहे थिओ.एकदम राजघराण्यातला वाटतो.(याची गर्लफ्रेंड मांजरी आणल्यावर नाव 'ब्रोमा' ठेवणार का? )
धनश्री, थिओ आणि माझी स्नोई
धनश्री, थिओ आणि माझी स्नोई एकदम आवळी- जावळी भाऊ बहिण आहेत दिसायला. फक्त स्नोई अतिशय लाजरी बुजरी आहे....
तिने पण बाबाने स्वतःसाठी आणलेली ऑफिस खुर्ची ढापली आहे... त्यावर कोणी बसले तर ती खूप अस्वस्थ होते..
थिओ बोका आहे का? जुव्हेनाइल
थिओ बोका आहे का? जुव्हेनाइल असावा. नंतर मन्यांच्या चेहर्यापेक्षापेक्षा, रुंदावतो चेहरा. रुबाबही येतो. खूपच देखणा होणार हा. हार्ट ब्रेकर
मस्त आहे थिओ एकदम रूबाबदार
मस्त आहे थिओ एकदम रूबाबदार
(No subject)
आशुचॅम्प, गोविंद यशदा चौकात
आशुचॅम्प, गोविंद यशदा चौकात लिनीयर गार्डन च्या बाजूला डॉग पार्क बनला आहे, तो ओडिन ला दाखवला का?
इथले सगळे भुभे बघून एक भुभू
इथले सगळे भुभे बघून एक भुभू पण असावं अशी जाम इच्छा होते. —>> केवळ ईथे वाचून नका घेऊ… एकतर आवड असावी आणी तुमच्याकडे त्यांना द्यायला वेळ हवा.
थिऑला खूप खूप प्रेम. देखणं
थिऑला खूप खूप प्रेम. देखणं आहे प्रकरण. ऑड आइड कॅट आहे का? (दोन्ही डोळे वेगवेगळ्या रंगांचे?)
या धाग्यावर अजून मावांचे फोटो
या धाग्यावर अजून मावांचे फोटो पण हवेत.माऊपालक गौर फरमाए.
++++++११११
येऊ द्या फोटो आणि किस्से माऊंचे!
आशुचॅम्प, गोविंद यशदा चौकात
आशुचॅम्प, गोविंद यशदा चौकात लिनीयर गार्डन च्या बाजूला डॉग पार्क बनला आहे, तो ओडिन ला दाखवला का?>> नाही हो, मला असं काही झाल्याचेच माहिती नव्हतं, चेक करतो आता
थिओ जामच क्यूट आहे!
थिओ जामच क्यूट आहे!
आधी एकट्याने जाऊन बघून या आशु
आधी एकट्याने जाऊन बघून या आशु. मला तो पार्क एकदम नॉर्मल माणसांच्या पार्क सारखाच दिसला उगीच ओडिन च्या अपेक्षा वाढवून नको ठेवायला.(एकही डॉग पार्क बघितला नसल्याने माझ्या डोळ्यासमोर बहुतेक कुत्र्यांची घसरगुंडी झोके असं काही काल्पनिक चित्र असेल.)
https://maps.app.goo.gl/xenADs2c7hzQLzoN7
>>>>>>एकही डॉग पार्क बघितला
>>>>>>एकही डॉग पार्क बघितला नसल्याने माझ्या डोळ्यासमोर बहुतेक कुत्र्यांची घसरगुंडी झोके असं काही काल्पनिक चित्र असेल.
हाहाहा
अगं इथेही अॅलॉटेड एरिआज असतात. तिथे खूप कुत्री जमून चेंडू वगैरे खेळत असतात. आणि त्यांचे मालक मालकिण गप्पा मारत असतात.
आमच्या इथे २-३ डॉग पार्क आहेत
आमच्या इथे २-३ डॉग पार्क आहेत. अगदी बेसिक म्हणजे मोकळे ग्राउंड, बॉल, वॉटर बोल्स, पूप बॅग डिस्पेन्सर आणि बेन्चेस असे असते. काही ठिकाणी रँप्स, टायर्स, छोटे बोगद्यासारखे स्ट्रक्चर्स असतात कुत्र्यांना खेळायला. पण बहुतेक वेळा मी असंच पाहिलेय की सगळे डॉग्ज एक तर आपल्या पेरेन्ट्स सोबत बॉल फेच वगैरे खेळतात नाहीतर एकमेकाशी कुस्ती खेळणे, शेपट्या हुंगणे असलेच करत असतात. ते जंगल जिम टाइप वस्तू वापरताना दिसतच नाहीत.
माउई तर मुलीसोबत गेला तर जरा बॉल वगैरे खेळतो पण मी सोबत असेन तर माझ्यापासून एक सेफ डिस्टन्स राखून असतो. कोणी कुत्रा आला तर खेळतो पण दर २ मिनिटांनी माझ्याकडे एकदा चक्कर मारतो मग मी सांगते हो जा हं खेळ. मी आहे इथेच! जर मी बेन्च वर जाऊन बसले तर तोही बावळा माझ्याशेजारी पेन्शनर सारखा बेन्च वर येऊन बसतो मुलीने मला पार्क मधे यायला मनाई केली शेवटी.
माऊई मनाने मॅच्युअर आहे,
माऊई मनाने मॅच्युअर आहे, जबाबदार कर्ता पुरुष वगैरे
सिम्बाचा किस्सा...
सिम्बाचा किस्सा...
मुलगा घराच्या ऍटीक मध्ये चढला होता फिल्टर बदलायला, सिम्बा आधी खाली होता पण त्याने जिन्यातून मुलाला शिडीवरून वर जातांना पहिले आणि मग काळजीपोटी जोरदार धाव घेऊन हा पठ्ठा शिडीपाशी पोहचला. त्याला शिडी काही चढता आली नाही आणि त्यात दादा दिसेनासा झाला मग काय जोरदार भुंकाभुंकी सुरु झाली पार जीवाची घालमेल. दादा परत शिडीवरून उतरतांना दिसला आणि मग त्याला दम देणे सुरु झाले कि लवकर खाली ये. जसा तो खाली आला तसा त्याच्या सर्वांगाचा वास घेऊन तो सुखरूप असल्याची खात्री पटली तेव्हाच त्याला सोडले...
हे सगळे झाल्यावर मोठे युद्ध जिंकल्याच्या अविर्भावात खाली गेला
इन्स्टावर एक छोटा विडिओ टाकला आहे या खटाटोपाचा
व्हिडीओ लिंक द्या..
व्हिडीओ लिंक द्या..
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/C191iVYOETx/?igsh=cG5jdmhodG9lZjFq
कित्ती गोड !
कित्ती गोड !
सो स्वीट सिंबा! काळजी अगदी
सो स्वीट सिंबा! दादाची काळजी अगदी दिसते आहे आवाजात आणि बॉडी लँग्वेज मधे
सिंबा दादाचा दादा झालाय एकदम.
सिंबा दादाचा दादा झालाय एकदम. केवढी ती काळजी!
मस्त आहे क्युट सिंबा.
मस्त आहे क्युट सिंबा.
माउई ममाज बॉय
माउई ममाज बॉय
ऑ किती क्युट!! सिम्बा फार काळजी वाहु सिबलिन्ग आहे मागे पण ताई शेजारी खेळायला गेली तर यार्डात राखण म्हणून बसला होता ना?
ओह सिंबा.एकदम बरेच डायलॉग
ओह सिंबा.एकदम बरेच डायलॉग मागे लिहिता येतील त्याच्या भुंकण्यावर.
"हे काय, उतर खाली, उतर म्हणतोय ना, काही झालं म्हणजे?"
"लवकर ये.ही हल्लीची मुलं म्हणजे नुसता घोर आहे जीवाला.काय गरज होती वर तडमडायची?"
Pages