भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी. त्यांना आपण बोलतो ती / त्या भाषा , आणि बिहेवियर पॅटर्न फार व्यवस्थित समजतात. माउई ला व्यवस्थित समजते कोण नेहमीप्रमाणे कामावर चाललेत, कोण इथल्या इथेच बाहेर गेलेत, कोण गावाला निघालेत. नवरा दिवसातून १० वेळा बाहेर जात येत असतो तर त्याकडे लक्षच देत नाही फार. मी ऑफिसला आठवड्यातून दोनदा जाते तेव्हा खिडकीत येऊन बसतो जाताना बाय बाय करायला. ५ वाजता परत येते त्या सुमारास पुन्हा खिडकीत येऊन बसलेलाच असतो बहुधा.
मुलगी बाहेर गेली असेल तर तिच्या येण्याचे अपडेट आम्हाला फोन वर देत असते ते त्याला माहित आहे. त्यामुळे ती बाहेर जाऊन बराच वेळ झालाय आणि माझा फोन किंवा मेसेज वाजला की एकदम होशियार होऊन माझ्या तोंडाकडे बघतो , चेहर्‍यावर अगदी प्रश्नचिन्ह असते "येतीय का ती?" असे. मग त्याला सांगितले की आली/ येतीय ती , की धावत खिडकीत जाऊन बसतो . एरवी कितीही फोन वाजला तरी ढिम्म !

आमच्यापण हिरोला सगळं मराठी कळते. विषेशता त्याचे आवडते शब्द बाहेर, चला, पहा, बिस्कीट, चूप, शांत बस , तिकडे जा आणी एकदम आवडता शब्द बाकर वडी, त्याचे नाव काढले की एक तुकडा तरी द्यावाच लागतो

मै सगळ्या हुमन एजचे कॅरेक्टर एकातच एकवटले आहेत Lol
नवरा दिवसातून १० वेळा बाहेर जात येत असतो तर त्याकडे लक्षच देत नाही फार. >>>>> टिनेजर
५ वाजता परत येते त्या सुमारास पुन्हा खिडकीत येऊन बसलेलाच असतो बहुधा.>>> आई
प्रश्नचिन्ह असते "येतीय का ती?" असे>>> आजी आजोबा

अगदी अगदी. त्यांना आपण बोलतो ती / त्या भाषा , आणि बिहेवियर पॅटर्न फार व्यवस्थित समजतात. +१
सकाळी फिरायला जाताना गाडीच्या किल्लीला हात लावलेला कळतो पण ऑफिसला निघताना फक्त नजर वर करून बघतो

सर्व भुभु बाळांना, माऊ बाळांना आणि त्यांच्या पालकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा

ओड्या ची लेटेस्ट गंमत

थंडीमुळे का पाणी जास्त प्यायला माहिती नाही पण एकदा रात्री त्याची पॉटी ची गडबड झाली, झोप पण आलेली जाम आणि त्यात त्याने कुई कुई करून उठवलं तर त्याला खोलीतच थोडीशी शु झालेली आणि बिचारा अगदी मान वगैरे खाली घालुन बसलेला
मग गच्चीत नेलं तर करेल ना, नाहीच त्याला बाहेरच न्यावं लागतं
मग साहेबांना बाहेर नेऊन शु करवून आणली.
दुसरे दिवशी दादू ल सांगितलं तर म्हणे बिचारा ओडीन

म्हणलं तो कसला बिचारा? तो खुशाल शु करून आल्यावर झोपला
मला एकतर रात्री उठून त्याला शु करायला हिंडवून आणायला लावलं, खोली पुसून घ्यावी लागली, वास जायला उदबत्ती लावावी लागली
मी बिचारा आहे यात Happy

मग साहेबांना बाहेर नेऊन शु करवून आणली.>> माझे पण सध्या हेच, लोकांसमोर एंबरॅस होणे चालू आहे. १५ डिसेंबर पासून स्वीटी चालेनाशी झाली. नखे कापायला व्हेट कडे न्यायचेच होते तेव्हाही तिला उचलून नेले. सलाइन लावले. औषधे सुरू केली. एका माणसाने घरी येउन एक्स रे काढून दिला. ही सुविधा मुंबईत तरी उपलब्ध आहे. हवे असल्यास त्याचा नंबर इथे देइन. मग हेच पुर्ण वेळ झोपा काढणे, मध्ये उठवुन रिकव्हरी फूड एक दोन चमचे, पाणी अर्धी वाटी पाजणे सर्व सेवा केली. तिला शु चा काही अंदाज येइना.

एक दोन वेळा बाहेर नेले तर एकदम बाहेर गेल्या गेल्या नाही तर लिफ्ट मध्ये अ‍ॅक्सिडेंट!!. आता तब्येत ताळ्यावर आली आहे. ह्या वीकांताला आम्ही तीन दिवस फार आराम केला. आज तिने फुल वॉक केला व नो अ‍ॅक्सिडेंट.

हिचा पण एक हेटर आहे. क्रिस मस वीकेंडला आम्ही तिला बघु फिरतेय का म्हणून मागुन हार्नेस घालुन उचलले तर उभी राहिली व लिफ्ट मधुन ग्राउंडला आली. व नेमके हेटर बाहेरुन येत होता त्या च्या समोरच!!! मी टिशु घेउन तयार होते. पण तिने त्याला जागा दाखविली म्हणून मला सिक्रे टली आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. लेक बरोबर होती त्यामुले दाखविता येइना. !!!!

तिच्या साठी व्हेट ने सांगितले म्हणून बेड घ्यायचे ठरवले, ह्या कुत्र्यांच्या वस्तु किती महाग आहेत. बेड सात हजार, बाबागाडी आठ हजार ते लाखात आहेत. मेण कापड डायपर, पॅड्स सर्व्च फार महाग. व मला डिलिव्हरीचा प्राबलेम. सर्व हपिसात मागवायचे म्हणजे सिकुरिटी शिव्या घालणार . मग एक दिवस चक्क बेबी शॉप मध्ये गेले तिथून स्वस्तातला बेबी गादी बेड घेतला, प्लस मेण कापड. आता मेण कापड वापरतो आहे व बेड दूर ठेवला आहे त्यात तिचा युनिकॉर्न व एक टॉय झोपवले आहे. तर ह्याचे बिल भरताना चा संवाद

तुमचे नावः
फोन नं
बे बी बॉय की गर्लः गर्ल.
बेबीचे नाव!!! स्वीटी
बेबीचा बर्थडे: मला नक्की माहीत नाही मी आता व्हिजिटला जाईन.
बेबीचा फोन नंबर!!! माझ्याकडे नाही.
तर अश्या पद्धतीने एका दुकानात स्वीटीची न्युबॉर्न बेबी म्हणून नोंद झाली आहे.

घरात काही झाले तर डेटॉलने जमीन पुसून घेणे. व वॉक वर काही नको तिथे केले तर बॅगेत्न भरपूर टिशू व टर्किश टावेल चे जुन्या, एक दोन तुकडे ठेवणे.

बेबीला सुदिन्ग म्हणून एक मस्त पिलो कंफ र्ट स्प्रे मिळत होता तो पण घेतला. लवेंडर, युकॅलिप्टस, असे काही मिक्स आहे. त्यामु ळे ह्या वीकांताला आम्ही तो स्प्रे बेड व पिलोवर लावुन प्रचंड झोपा काढल्या आहेत.

रिकव्हरी फूड चा पण उपयोग होतो. अगदी दीड चमचा खाल्ले तरी फर बेबी तग धरु शकते. व त्यातुन औषधे पण वाटून देता येतात.

सर्व फर बेबी व पालकांना नवीन वर्शाच्या हार्दिक शुभेच्छा. भरपूर खोड्या वॉक्स ट्रीट्स होउद्यात.

>>>>म्हणलं तो कसला बिचारा? तो खुशाल शु करून आल्यावर झोपला
हाहाहा! मलाही ओड्याच बिचारा वाटला. पण त्याने तुम्हाला बरं कामाला जुंपले आहे.

>>>>>>बेबीला सुदिन्ग म्हणून एक मस्त पिलो कंफ र्ट स्प्रे मिळत होता तो पण घेतला. लवेंडर, युकॅलिप्टस, असे काही मिक्स आहे. त्यामु ळे ह्या वीकांताला आम्ही तो स्प्रे बेड व पिलोवर लावुन प्रचंड झोपा काढल्या आहेत.
मज्जा आहे की Happy
किती लाड. 'समर्थाघरचे श्वान' या वाक्प्रचाराची उक्तीची आठवण झाली Happy स्वीटी अशीच लाडात वाढू देत.

अजून एक किस्सा सांगतो मग माझ्या बिचारेपणावर शिक्कामोर्तब होईल Happy

आमच्या नेहमीच्या पान वाल्याकडे गेलो तर उशीर झालेला, शटर डाऊन
पण खालून लाईट दिसत होता,म्हणलं सगळी आवराआवर केली नसेल तर विचारावं आणि शटर वर टकटक करून म्हणलं जमत असेल तर एक पान दे माझं लावून

आतून आवाज आला हा, देतो ना साहिब थांबा

म्हणलं अरे काय देतो, आधी शटर उघडून बघ तरी कोणाला कुठलं पान ते

तर म्हणे आवाज ओळखतो ना साहिब, ओडीन ना?

म्हणलं अरे ओडीन माझ्या भुभ्याचे नाव आहे माझं नाही

हा ना, साहेब तेच, ओडीन सोबत येतात ते साहेब असं बोललो

म्हणलं, घ्या, मी नाही ओडीन सोबत येत, ओडीन माझ्यासोबत येतो Happy

पान खाणार मी, पैसे देणार मी, आणि ओळख काय तर ओडीन सोबत येणारे साहेब Happy

Lol नशीब ओडीन ज्यांना वॉकला नेतो ते साहेब ना असं नाही म्हणाला.

आवाज ओळखतो ना साहिब, ओडीन ना? >> Lol भारी किस्सा आहे हा! बरोबरच आहे पण ओडिन सेलेब्रिटी आहे आणि तुम्ही त्याचे म्यानेजर!

मस्त किस्से एकेक ओडीन आणि स्वीटीचे Happy ओडीन बराच पोपूलर आहे कि. पानवाला सुद्धा ओळखतो Lol

लगे हात मी सुद्धा एक किस्सा शेअर करतो मग.

MaaoYaa.jpg
 
गिंयाऽऽ हुं आणि माओ यांऽऽऽ

"नाव काय रे तुझं?" मी विचारलं.

"माओ यांऽऽऽ" त्याने सांगितलं.

"आणि तुझं गं?"

"गिंयाऽऽऽ हुं" ती म्हणाली.

"वाह छान नावं आहेत की तुमची" असे म्हणून मी त्यांना चिकन खायला घातलं. मग काय मनमुराद तुटून पडली त्यावर. बघता बघता संपवलं. हॉटेलात हळूच कुठूनतरी टेबलाखालून पायात येणारी मांजरं मला फार भारी वाटतात. वर्षानुवर्षे ओळख असल्यासारखी आपल्याकडे पाहतात. हि दोघं परवा एका रिसॉर्ट मधल्या रेस्टॉरंट मध्ये मला भेटली. चिकन खाऊन झाल्यावर मी त्याला पुन्हा विचारलं,

"नाव काय म्हणालास तुझे?"

"बाओ वांऽऽऽ" तो म्हणाला.

"अरे? मघाशी तर वेगळेच नाव सांगितलेस?"

यावर काही बोलला नाही. डोळे मिचकावून माझ्याकडे बघत राहिला. मला माहिती होतं त्याच्याकडे काही उत्तर नसणार. "बरं ठीक आहे" असे म्हणून मी पुन्हा थोडे चिकन खायला घातले. ते खाऊन झाल्यावर दोघेही दूर जाऊन अंग चाटत पुसत बसले. तेंव्हा ते दोघे एकमेकांशी गप्पा मारत असतील अशी कल्पना केली.

"हि माणसं विचित्रच प्रश्न विचारतात बुवा. नाव काय म्हटल्यावर काय सांगायचे? आपण एकमेकांना नावानी हाक मारतो का गं?" त्याने तिला विचारले असेल

"नाही ना" ती खट्याळपणे त्याच्याकडे बघत म्हणाली असेल

"मग काय तर. त्यामुळे मला कुणी जर नाव काय असे विचारले तर मी काय वाट्टेल ते जे तोंडात येईल ते नाव सांगतो. आपल्याला काय, चिकन खायला मिळाल्याशी मतलब"
grinning-cat-with-smiling-eyes_1f638.png

>>>>>>पान खाणार मी, पैसे देणार मी, आणि ओळख काय तर ओडीन सोबत येणारे साहेब Happy
हाहाहा

आशू Lol
असा similar किस्सा माझ्या नवर्यासोबत झाला होता.. रोज संध्याकाळी माझे बाबा बाळाला घेऊन सोसायटीत बागेत घेऊन जायचे .. कधी नव्हे ते नवरा मुलाला घेऊन फिरायला गेला होता.. शेजारच्या काकूने विचारलं की ह्याचे आजोबा नाही आले का? अन् तुम्ही कोण ह्याचे?! Proud

आशुचाम्प Lol
ओडिन सेलेब्रिटी झालाय

अमा, आधी वाचून जरा टेन्शन आले पण आता ऑल वेल वाचून बरे वाटले.
2024 मध्ये ही ह्या धाग्यावर फार छान किस्से वाचायला मिळणार ह्याची नांदी झाली.

चना Proud

अतुल... Lol गिंयाऽऽ हुं आणि माओ यांऽऽऽ
जपानी किस्साच वाटला.
तुषार कपूर परफेक्टली यांची नावं घेऊ शकेल. Lol

ओडीन द सेलेब्रिटी Happy

अतुल - कसला जबरदस्त लिहलाय प्रसंग
अगदी डोळ्यासमोर आला
गिया हु मिया हु हाहहा हा
अगदी हेच संभाषण झालं असणार, मांजरी दंबिस असतात Happy

भुभे प्रामाणिक असतात, ते स्वतःचं खरं नाव, पत्ता सांगतीलच शिवाय जाताना शेक हॅन्ड पण करून जातील Happy

सिम्बा परफेक्ट पोलीस डॉग वाटतोय या फोटोत
ऑन ड्युटी दक्ष

माव्या आणि ऑशकू ची काय खबरबात, बरेच दिवसात भाऊ भाऊ दिसले नाहीत
येऊ द्या त्यांचेही किस्से

ओड्या ची रेग्युलर व्हेट व्हिजिट होती, ते म्हणे याला अजून व्यायाम करवा, म्हणलं त्याला पळवून मी बारीक व्हायला लागलोय अजून किती व्यायाम करवणार Happy

ग्राउंडवर सोडलं आणि तुझं तू पळून ये म्हणलं तर ऐकत नाही, मी थांबलो की तोही निवांत थांबतो आणि थोड्या वेळाने मस्त मातीत फतकल मारून बसतो, तुझं झालं की सांग, मग जाऊ म्हणत
त्यामुळे सतत चालत नैतर पळत राहावं लागतं की मग पळतो बरोबर

म्हणलं काहीतरी गैरसमज झालाय तुझा, ग्राउंडवर आपण तुला व्यायाम व्हावा म्हणून येतो, तू मला आणत नाहीस पोट कमी करायला म्हणून Happy

ओडिन ची दैनंदिनी भारीच.
सिंबा एकदम हॅन्डसम दिसतोय.
या धाग्यावर अजून मावांचे फोटो पण हवेत.माऊपालक गौर फरमाए.

Pages