सर्वांना नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस! लहानपणापासून त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते. "महानायक" आणि "नेताजी" अशी मोठी पुस्तकं व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांचा परिचय झाला. नव्हे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना मनावर बिंबली होती. लहानपणापासून त्यांचं वेगळेपण, त्यांचे विचार, त्यांची बंडखोर वृत्ती, शाळा- महाविद्यालयातील पराक्रम, नंतर ब्रिटनमधील शिक्षण, गांधीजींना विरोध, दुस-या महायुद्धामध्ये केलेला अभूतपूर्व प्रवास, परकीय देशांमध्ये जपलेला स्वाभिमान, देश प्रेम, पुन: एकदा रोमांचक पाणबुडी प्रवास, पूर्व आशियातील रोमहर्षक महाभारत आणि... असे सर्व प्रसंग मनावर कोरले गेले होते. पुढे २००५ मध्ये आलेला 'नेताजी द फरगॉटन हिरो' हा चित्रपटही हा अनुभव परत देऊन गेला. नेताजींचा शेवट नक्की काय झाला, ह्याबद्दल मनामध्ये नेहमी प्रश्न होता. आता ह्या प्रश्नाचं सुस्पष्ट असं उत्तर नाही, पण एक निश्चित दिशा मिळते आहे असं वाटतंय. निमित्त झालं नेताजींच्या रहस्यांवर गेल्या २० वर्षांपासून अभ्यास करणा-या अनुज धर ह्यांच्या विविध पोडकास्टसचं आणि 'India's biggest cover up' ह्या त्यांच्या पुस्तकाचं. त्यांचे दोन- तीन तासांचे पोडकास्टस अक्षरश: न थांबता ऐकले आणि मग त्यांचं पुस्तकही सलग वाचून काढलं. नंतर मुखर्जी आयोगाच्या कामकाजावर आधारित असलेला गुमनामी चित्रपटही बघितला. हे ऐकणं- बघणं आणि वाचणंही थरारक होतं. आणि त्यानिमित्ताने नेताजींबद्दल खूप काही कळालं. निश्चित उत्तरांची दिशा कळाली. भारतीय राजकारणाची एक नवीन आणि खोलवर ओळख झाली. हा छोटा लेख म्हणजे हे पोडकास्टस, हे पुस्तक आणि ह्या विषयावर समोर आलेल्या सद्यस्थितीला थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न.
(शब्द संख्या- २६३९ वाचन अवधी १० मिनिटे. हा लेख इंग्लिशमध्ये http://niranjan-vichar.blogspot.com/2022/08/indias-biggest-cover-up-infe... इथे वाचता येईल)
✈ नेताजींना जाऊन तर इतकी वर्षं झाली. आता त्याचं काय? "मेरे पिताजी हैं, उनका सच मुझे जानना है|"
✈ २० वर्षांचे परिश्रम आणि अथक अभ्यास- अनुज धर!!
✈ १९४५ नंतर रशियामध्ये नेताजींच्या उपस्थितीची साक्ष देणारे अनेक पुरावे
✈ आपला भारत देश असा- इतका उदासीन, इतका अंधारात आणि इतका भ्रष्ट?
✈ देशप्रेम आणि स्वाभिमानापुढे सगळ्या अडथळ्यांची शरणागती
✈ Your dead man- गुमनामी बाबा!
✈ नेताजींच्या केवळ १% हिंमत, साहस, शौर्य, बुद्धीमत्ता आपल्याला कशी मिळेल?
✈ जोदी तोर डाक सुने केउ ना आसे तोबे एकला चोलो रे एकला चोलो एकला चोलो रे
नेताजी! स्वातंत्र्याचे एक शिल्पकार! डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ब्रिटीश पंतप्रधान एटली ह्यांनी म्हंटलंय की, भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यामागे मुख्य कारण आझाद हिंद सेनेमुळे प्रेरित झालेली व ब्रिटीशांची चाकरी सोडून देण्यास सज्ज झालेली भारतीय सेना हे होतं. आता भारतीय सैनिकांचा भरवसा आपण धरू शकत नाही, ही खात्री ब्रिटीशांना झाली. आणि त्यातून देश सोडून जाण्याची भुमिका ब्रिटीशांना घ्यावी लागली. नेताजींनी वस्तुत: अशा शेकडो गोष्टी केल्या आहेत, ज्यापैकी एक गोष्टही कोणी करू शकला तरी तो स्वत:ला धन्य समजेल. मग ते तत्कालीन आयसीएस उत्तीर्ण होणं असेल, गांधीजींना थेट विरोध करणं असेल, मणिपूरपासून पेशावरपर्यंतच्या लोकांसोबत नातं जोडणं असेल, उद्दाम विदेशी सत्तेच्या गुहेमध्येही स्वाभिमान आणि देशप्रेमाने कार्यरत राहणं असेल! किंवा अतिशय भयंकर असा अंधारात उडी मारून केवळ स्वत:च्या हिमतीवर केलेला कोलकाता- काबूल- मॉस्को- जर्मनी असा प्रवास असेल किंवा १% पेक्षाही कमी शाश्वती असलेला अर्ध्या जगाला समुद्राखालून प्रदक्षिणा घालून केलेला पाणबुडीचा प्रवास असेल! किंवा पूर्व आशियामध्ये थायलंड- म्यानमार ते मणिपूर- इंफाळ परिसरामध्ये दिलेली अफाट झुंज- संपूर्ण भारतातील विविधतेचं केलेलं नेतृत्व! तेही असं की, शेकडो सैनिकांनी युद्धात आहुती द्यावी आणि लाखो भारतीयांनी त्यांना सर्वस्व द्यावं! ह्या शेकडो गोष्टींपैकी जो एकही करू शकत असेल तो स्वत:ला धन्य समजेल. असे नेताजी! देशगौरव नेताजी! आत्ताच्या लेखाचा विषय त्यांच्या रहस्यावर अलीकडे पडलेला प्रकाश हा आहे, त्यामुळे त्यासंदर्भात बोलतो.
१८ ऑगस्ट १९४५ ला तैपेई येथे झालेला त्यांचा अपघात हा तेव्हाही जाणकारांनी स्वीकारला नाही आणि तो ब्रिटीश- अमेरिकन अशा विरोधकांनीही मान्य केला नाही. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमध्ये असंख्य विसंगती होत्या, पुरावे उपलब्ध नव्हते. अनेक गोष्टी संशयास्पद होत्या. परंतु काही जणांना नेताजी गतप्राण झाले, हे सांगणं सोयीस्कर होतं, त्यामुळे ती बाजूच खरी आहे, असं रेटून सांगितलं गेलं. तुटक तुटक ठिकाणी नेताजी रशियात असल्याचे पुरावे लोकांना माहिती होते, कालांतराने भारतातही त्यांना काही जणांनी बघितलं होतं. पण ही गोष्ट कधीही "सरकारी सत्य" बनली नाही. का? हे जाणण्यासाठी अनुज धरचे काही पोडकास्टस ऐकावे लागतील. अनुज धर ह्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे! ज्या काळी हा विषय जवळ जवळ मागे पडलेला होता, तेव्हा 'एकला चोलो रे' हा मंत्र घेऊन ह्यांनी नेताजींच्या रहस्याच्या उत्खननाला स्वत:ला वाहून घेतलं. आज हे त्यांचं जीवन झालं आहे. २००४- ०५ च्या सुमारास 'Enigma of Netaji Subhas Bose' अशी हिंदुस्तान टाईम्सची लेखमालिका नेटवर वाचल्याचं आठवतं. ती त्यांनीच केलेली होती. हिंदुस्तान टाईम्समधली कव्हर स्टोरी म्हणून त्यांचा हा प्रवास सुरू झाला आणि पुढे पुढे तर हेच त्यांचं मिशन बनलं. कालांतराने इतर नेताजीप्रेमी व संशोधक असे चंद्रचुड घोष व इतर लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. सरकार दरबारी असंख्य अडथळ्यांमधून आणि विरोधाच्या अनेक स्तरांवर सतत संघर्ष करून त्यांनी वाट काढली. सरकारी लोकांकडून एक एक गोष्ट करून घेणं ही अशक्य बाब असते! हळु हळु काही सरकारी अधिकारी, नेताजीप्रेमी, माजी अधिकारी अशांच्या मदतीने काही तथ्य समोर आणली. पारदर्शकतेला मानणा-या विदेशांमधील माहितीचा छडा घेतला. कालांतराने आलेल्या माहितीचा अधिकारासारख्या शस्त्राचा व इंटरनेटवर होणा-या जागतिक संपर्काचा उपयोग करून घेतला. त्याच काळात म्हणजे १९९९ मध्ये नेताजींच्या रहस्यासाठी तिसरा आयोग- मुखर्जी आयोग स्थापन झाला होता. मुखर्जी आयोगाने खूप उत्तम काम केलं आणि १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैपेई येथे अपघात झालाच नव्हता, हे सिद्ध केलं. नेताजींचं रशियातलं आणि भारतातलं वास्तव्य जवळ जवळ उघड होईल, अशा स्वरूपाचे इतर पुरावे समोर आणले. पण २००५ मधल्या केंद्र सरकारने ह्या आयोगाचा अहवालच फेटाळला. परंतु तरीही सत्य प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रकारे समोर येतच आहे. अप्रत्यक्ष प्रकारे हे अनेकांना तुटक तुटक माहिती होतंच, पण आता अनेक धागे दोरे एकत्र येत आहेत. नवीन युगामध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक डॉटस जोडले जात आहेत. २०१६ मध्ये मोदी सरकारने नेताजींच्या अनेक फाईल्स डिक्लासिफाय केल्या. सरकारने मान्य केलेलं सत्य नसलं तरी आज अनेक गोष्टी उजेडात आलेल्या आहेत. देश म्हणून आपल्यामध्ये देशप्रेम आणि देशासाठी काम केलेल्यांसाठी प्रेम असेल तर इतर लपलेल्या गोष्टीही समोर येतील.
मांचुरियामार्गे रशिया!
ह्या सर्व संशोधनातून समोर आलेले धागे मांडतो. ज्यांना अधिक रस असेल त्यांनी अनुज धरचे पोडकास्टस वाचावेत आणि २० वर्षांच्या अभ्यासासह व शेकडो कागदपत्रांचा पुरावा देऊन त्याने लिहीलेलं 'India's biggest cover up' पुस्तक वाचावं. त्यातून समोर आलेले निष्कर्ष- धागे इथे मांडतोय. ह्या गोष्टींना अप्रत्यक्ष प्रकारे दुजोरा मिळालेला आहे, पुरावे मिळालेले आहेत. १८ ऑगस्ट १९४५ चा अपघात हा केवळ बनाव होता. ज्याप्रमाणे कोलकत्यावरून नेताजी जर्मनीला जाण्यासाठी निसटले होते व ते प्रत्यक्षात काबूलजवळ पोहचल्यानंतर ते घरात नसल्याची 'बातमी' सांगण्यात आली होती, त्याप्रमाणे १८ ऑगस्टच्या कथित अपघाताची बातमी टोकिओवरून २२ ऑगस्टला देण्यात आली होती व तेव्हा ते मांचुरियाजवळ पोहचले असावेत. पुढे मांचुरियामार्गे सोव्हिएट रशियात ते गेले. आल्फ्रेड वेग ह्या अमेरिकन पत्रकाराने १८ ऑगस्टनंतर त्यांना एकदा बघितल्याचं नेहरूंच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. स्वातंत्र्यानंतर एक भारतीय इंजिनिअर एका ऑटोमोबाईल प्रोजेक्टसाठी सोव्हिएट रशियात गेला होता. त्या विशिष्ट प्रकल्पावर त्याचा प्रमुख एक जर्मन होता. तो जर्मन रशियामध्ये अनेक वर्षांपासून काम करत होता. त्याने त्या भारतीय इंजिनिअरला विश्वासात घेऊन सांगितलं की, तो नेताजींना भेटला होता. आणि १९४१ मध्ये त्याने जर्मनीमध्ये नेताजींना समोरून बघितलं होतं. व्यावसायिक व राजकीय नेत्यांच्या एका कँपवर तो असताना त्याने तिथे नेताजींना ओळखलं व जर्मनमधून संवादही साधला होता. त्यांना राजदुताचा दर्जा दिलेला होता. जेव्हा त्या इंजिनिअरने मॉस्कोच्या भारतीय राजदुताला ही बातमी सांगितली, तेव्हा त्या राजदुताने त्याला धमजीवजा सूचना केली की, तुझ्या कामाकडेच लक्ष दे. पुढे भारतात आल्यावर आणि निवृत्त झाल्यावर त्याने ही आठवण सांगितली व मुखर्जी आयोगापुढे तशी साक्षही दिली. तथाकथित तैपेई अपघातानंतर एक वर्षाने म्हणजे जुलै १९४६ मध्ये गांधीजींची सेक्रेटरी व दादाभाऊ नवरोजींची नात खुर्शीद नवरोजीने अमेरिकन पत्रकार लुई फिशरला लिहीलेल्या पत्रात म्हंटलं होतं की, जर रशियन सेनेच्या मदतीने नेताजी भारतात आले तर गांधी- नेहरू काही करू शकणार नाहीत. सगळा देश त्यांच्यासोबत जाईल.
मेरा भारत महान
एक प्रश्न इथे पडतो की, नेताजी रशियात होते तर भारतात का आले नाहीत? किंवा नंतरही आले तेव्हा लपून का राहिले? त्याचं एक कारण हे आहे की, भारतीय स्वातंत्र्याच्या करारात (Transfer of powers) मध्ये कदाचित एक गोपनीय अट ही होती की, जर नेताजी भारतात आले असते तर युद्ध गुन्हेगार म्हणून सरकारला त्यांना ब्रिटीशांच्या स्वाधीन करावं लागलं असतं. किंबहुना आतील धागे असंही सांगतात की, हे स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य नव्हतंच, Dominion status होता हा. आणि वस्तुत: अगदी १९५५ पर्यंत भारतीय सेनेचं नेतृत्व ब्रिटीशच करत होते. स्वत: नेहरूंनी १९५६ मध्ये ब्रिटनच्या दौ-यात राणीच्या एकनिष्ठेची प्रतिज्ञा घेतलीही होती. आणि ह्यासंदर्भात धक्कादायक पण कोणाला माहिती नसलेली वस्तुस्थिती ही आहे की, जालियांवाला बागेमध्ये गोळ्या झाडणारे जे पोलिस होते- ते भारतीय पोलिस होते- त्यांना स्वतंत्र भारतामध्ये सरकारी नोकर म्हणून पेंशन मिळत होती आणि आझाद हिंद सेनेमध्ये लढलेल्या सैनिकांना व अधिका-यांना स्वातंत्र्यसैनिकसुद्धा मानलं जात नव्हतं. त्याबरोबर स्वतंत्र भारतात असे अनेक कायदे होते जे कोणी स्वाभिमानी व देशप्रेमी मान्य करणार नाही. अस्पृश्यता ही कायद्याने समाप्त होण्यासाठी १९५५ वर्षं यावं लागलं. गुन्हेगार जमाती अधिनियमासारखा काळा कायदा १९५२ पर्यंत होता. तेव्हा हे स्वातंत्र्य खरोखर स्वातंत्र्य होतं का केवळ dominion status होतं, हाही मुद्दा समोर येतो. ब्रिटीश नेताजींना युद्ध गुन्हेगार मानत होतेच, पण एकाही भारतीय नेत्याने पारतंत्र्याच्या काळात केलेल्या अत्याचारांमुळे ब्रिटीशांना गुन्हेगार म्हंटलं नाही.
सरकारची भुमिका काहीही असो, नेताजींचे जवळचे सहकारी, त्यांचे दोन्ही भाऊ, पत्नी एमिली अशा जवळच्यांना जाणीव होती की, नेताजी रशियात आहेत. त्याचं आणखी एक कारण म्हणजे १९६८ पर्यंत नेताजींच्या कुटुंबावर सरकार पाळत ठेवून होतं. मृत व्यक्तीच्या कुटुंबावर पाळत ठेवण्याची काय गरज? त्यामुळे हे एक प्रकारे ज्यांना आतल्या गोष्टी माहिती आहेत, त्यांच्यासाठी उघड सत्य होतं. त्यामुळेच तर हे रहस्य सोडवण्यासाठी पहिला आयोग १९५६ च्या सुमारास व दुसरा आयोग १९७० साली स्थापन केला गेला. अनेकदा सरकारने प्रयत्न केला की, टोकिओच्या रेनकोजी मंदिरात नेताजींच्या तथाकथित अस्थी भारतात आणून हा विषयच संपवावा. पण नेताजींच्या कुटुंबियांच्या विरोधामुळे हे करता आलं नाही.
सरकारची भुमिका जास्त करून सत्य समोर येण्यापासून टाळण्याची होती. तत्कालीन तैवानसोबत भारताचे राजकीय संबंध नाहीत, म्हणून सरकारने पहिल्या दोन आयोगांना तैवानला जाऊ दिलं नाही. किंवा कदाचित प्रत्यक्ष तिथे गेल्यावर तिथे असलेल्या "पुराव्यांचा" फोलपणा उघड होण्याची भिती असेल. त्यावेळी नेताजी मात्र केवळ स्वत:च्या हिमतीच्या बळावर आणि त्यांना ओळखणा-या देश- विदेशातील जीवाभावाच्या सहका-यांच्या मदतीने मांचुरिया- चीन- रशिया अशा अज्ञात देशात झेप घेत होते. किती वेगवेगळे देश- प्रदेश! अफघनिस्तान- रशिया- इटाली- जर्मनी नंतर म्यानमार- थायलंड- इंडोनेशिया- सिंगापूर- जपान! हे काही त्यांच्या मित्रांचे देश नव्हते. इथेही उर्मट राज्यकर्ते आणि अधिकारी होतेच. पण त्या सर्वांना नेताजींनी आपल्या देशप्रेमाच्या शक्तीपुढे झुकवलं. उर्मट राज्यकर्त्यांनी त्यांनाही दाबण्याचा प्रयत्न केल, पण ते कुठे झुकले नाहीत आणि आपल्या उद्दिष्टावर ठाम राहिले. अगदी हिटरलरलाही त्यांनी आपल्या स्वाभिमानाची चुणूक दिली. भारतीय लोक म्हणजे शेळ्या- मेंढ्या आहेत असं मानणारा हिटलर वरमला. डोळ्याला डोळे भिडवून आणि प्रचंड आत्मविश्वासाने शेक हँड करून त्यांनी हिटलरची भेट घेतली. आणि विदेशी शक्तींची मदत ही एका स्वतंत्र देशाला केलेली मदत आहे जी स्वातंत्र्यानंतर हा देश कृतज्ञतेने परत करेल ही त्यांची भुमिका होती. पण तेव्हाचे भारतातले मुख्य नेते हिटलरला भेटणं म्हणजे नरकात बुडाल्यासारखी गोष्ट करत होते. "हिटलरने सैतानावर जरी स्वारी केली तरी माझा सैतानाला पाठिंबा आहे" असं म्हणणारा भारतद्वेष्टा चर्चिल त्यांना चालत होता. कृत्रिम दुष्काळामुळे ३० लाख बंगाली लोकांचा बळी घेणारा व भारताला गुलाम ठेवू इच्छिणारा चर्चिल त्यांना चालत होता.
Your dead man- गुमनामी बाबा!
रशियामध्ये काही काळ अज्ञातवासात राहून आणि देशामधील राज्यकर्ते आपल्याला अनुकूल होतील अशी वाट अनेक वर्षं बघून नेताजी गुमनामी बाबांच्या रूपात भारतात आले, असं आज म्हणता येऊ शकतं. अर्थात् ते रशियात असतानाही भारतीय जनतेच्या हिताच्या दृष्टीने कम्युनिस्ट देशांमध्ये प्रवास करायचे, अनेक नेत्यांसोबत संपर्क ठेवायचे, असेही तुटक धागे दिसतात. १९५५ नंतरच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये नेपाळ सीमेपासून जवळ बस्ती, फैजाबाद व तशा इतर साध्या गावांमध्ये गुमनामी बाबांचं वास्तव्य होतं. पूर्णपणे पडद्याआड ते राहायचे, एकांतात असायचे, सतत चेहरा झाकून ठेवायचे आणि कोणालाही भेटायचे नाहीत. पण त्यांच्या साहित्यात मात्र इंग्लिश- बंगाली- जर्मन पुस्तकं, युद्ध, गुप्तहेर क्षेत्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी ह्यावरची पुस्तकं होती. कालांतराने त्यांचा आझाद हिंद सेनेचे वरिष्ठ सेवक व नेताजींचे म्हणजे त्यांचेच जुने मित्र- सहकारी ह्यांच्यासोबत संपर्क झाला. आणि हळु हळु नेताजींच्या 'इनर सर्कलला' त्यांच्या आगमनाची जाणीव होते. त्यांचे लहानपणीचे मित्र, तरुणपणीचे सहकारी, कार्यकर्ते व आझाद हिंदचे लोक अशा अनेक मंडळींनी गुमनामी बाबा किंवा भगवनजी किंवा पर्देवाले बाबा ह्यांच्या भेटी घेतल्याचे व दीर्घ काळ त्यांचा संपर्क असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. गुमनामी बाबांनी लिहीलेली पत्र उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या लोकांचं एकच विचारणं असायचं की, तुम्ही समोर का येत नाही? त्यावर ते म्हणायचे की, माझं समोर येणं देशहिताचं नाही. कदाचित देशांतर्गत सत्ता संघर्ष, अहिंसावाद्यांचा विरोध, अन्न- धान्य व मदतीसाठी भारताचं अनेक देशांवर अवलंबून असणं व देश ख-या अर्थाने स्वतंत्र नसणं अशी कारणं असतील. असो.
अनेकांना प्रश्न पडतो की, मग नेताजी अशा अज्ञातवासात व लपून राहताना करत काय होते? ह्याची दोन- तीन उत्तरं स्पष्ट मिळतात. एक तर ते साधना करत होते. श्री अरविंदही क्रांतिकारक होते, पण ते पुढे साधनेत गेले आणि ती साधनाही देशासाठी होती. नेताजी १७ व्या वर्षी ७ महिने हिमालयात निघूनही गेले होते. ती त्यांची एकांत साधना आता पुढे जात होती. त्याबरोबर ते कम्युनिस्ट फोल्डसह अनेक आशियातल्या नेत्यांच्या गुप्त संपर्कात होते आणि वेगवेगळे प्रश्न, व्हिएतनामसारखं युद्ध ह्याबद्दल त्यांना मदतही करत होते, असंही गुमनामी बाबांच्या पत्रातून व बोलण्यातून दिसतं. अगदी भारत- चीन युद्ध आणि बांग्लादेश मुक्तीसंग्राम ह्यामध्येही त्यांनी गुप्त प्रकारे मध्यस्थी/ हस्तक्षेप केलेला आहे, असं ते सांगतात. एका बाजूला हे अविश्वसनीय वाटेल. पण हा माणूस कसा होता, हे आपल्याला परत एकदा आठवायला पाहिजे. आयसीएस राजीनाम्यानंतर म्हणजे १९२१ पासून १९४१ पर्यंत ते भारतात सक्रिय होते (त्यातही काही वर्षं तब्येतीमुळे विदेशामध्ये सक्तीची विश्रांती घेत होते व राज्यकर्त्यांच्या भेटीही घेत होते), ह्या २० वर्षांच्या सक्रिय आयुष्यात तुरुंगवास, स्थानबद्धता, मंडालेचा विजनवास अशा गोष्टी धरल्या तर जेमतेम तीन- साडेतीन वर्षं ते मुक्त होते आणि तरीही इतका मोठा प्रभाव त्यांचा होता. संपूर्ण देशभर त्यांचे लोक होते. गांधीजींविरुद्ध निवडणूक लढून ती ते जिंकू शकले व अगदी मद्राससारख्या राज्यांमधून त्यांना समर्थक मिळाले होते. अशी त्यांची योग्यता असेल तर त्यांना पारख असलेले विदेशी राज्यकर्तेसुद्धा कधीच दूर करणार नाहीत. ब्रिटीशांच्या पोलादी पकडीमधून जो अगदी शिवाजी महाराजांच्या हुशारीने पसार झाला होता, ज्याच्याकडे गुप्त संपर्काचं इतकं प्रभूत्व होतं जो नाझींमधील हिटलरविरोधी गटही लगेच ओळखू शकला, त्याला कोणत्या सीमा अडवू शकतील? आणि मग तो माणूस गुप्त प्रकारे अनेक देशाच्या नेत्यांच्या संपर्कात असणं ह्यात आश्चर्य ते काय? आणि मग अशा माणसाला काम करण्यासाठी समोर येऊनच केलं पाहिजे अशीही गरज उरत नाही. असो. ह्याबद्दल असंख्य अप्रत्यक्ष पुरावे दिसतात, अनेक डॉटस दिसतात, जे आपण आपल्या बुद्धीने कनेक्ट करू शकतो. शास्त्रीजींच्या मृत्युचं गूढ, स्वतंत्र भारतातील अनेक राज्यकर्त्यांचा कार्यकाळ, अगदी इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, व्ही पी सिंह, नरसिंह राव, अटलजी, मनमोहन सिंह अशा पंतप्रधानांचे कार्यकाळ असे अनेक संदर्भ ह्यात येतात. प्रत्येक बिगर काँग्रेस सरकारने हे गूढ उलगडण्यासाठी केलेली मदत त्यात दिसते. आणि १९९५ च्या सरकारमधले विदेश मंत्री व नंतर राष्ट्रपती झालेले नेते एमिली शेंकलना टोक्योच्या अस्थी आणण्याच्या प्रस्तावावर सही करण्याची सक्ती करताना दिसतात (त्यांना त्या घराबाहेर जायला सांगतात). अशा अनेक गोष्टीचे पुरावे सरकारी कागदपत्रांत आहेत. आता डिक्लासिफाय केलेल्या कागदपत्रांत दिसतात. असो.
मुखर्जी आयोगाने गुमनामी बाबांच्या हस्ताक्षराची व डिएनएची चाचणी केली होती. एका तज्ज्ञाने हस्ताक्षर जुळतं हा निष्कर्ष दिला. सरकारी तज्ज्ञांनी नकारात्मक निष्कर्ष दिला. आणि नेताजींच्या कुटुंबियांसोबतच्या डिएनए चाचण्यांचे परिणाम नकारात्मक आले. पण सरकारी प्रयोगशाळा ह्या चाचण्यांचे खोटे अहवाल देत होत्या, हे आयोगाच्या कामकाजावेळी तिथे असलेल्या नेताजी प्रेमींना माहिती आहे. त्यामुळे मुखर्जी आयोगाने गुमनामी बाबांबद्दल हे नेताजीच होते, असं निर्विवाद प्रकारे म्हणता येत नाही, असा निष्कर्ष काढला. कारण पुरावे आहेत, पण ते कागदोपत्री सबळ ठरले नाहीत. कारण आपल्या देशाची उदासीनता, अनास्था आणि भ्रष्टाचार! पण खाजगीमध्ये बोलताना न्यायमूर्ती मुखर्जींनी गुमनामी बाबा हे तेच होते, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि योगायोगाने त्यांचं हे सांगणं एका कॅमेरामध्ये शूट झालं आहे व तो व्हिडिओ इंटरनेटवर आज उपलब्धही आहे. गूगल करू शकता. गुमनामी बाबा हे तेच हे त्यांनाही माहिती होतं, पण चाचण्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे आणि सरकारने असहकार केल्यामुळे ते तसं सिद्ध करू शकले नाहीत. पण अप्रत्यक्ष पुरावे आहेतच. अनेक बंगाली क्रांतीकारक आणि राजनेते लीला रॉय, समर गुहा, आझाद हिंद सेनेतील दिग्गज, तत्कालीन युपीचे मुख्यमंत्री संपूर्णानंद अशा अनेकांनी त्यांनाच नेताजी म्हणून दुजोरा दिला होता. फक्त वर दिलेल्या कारणांमुळे हे उघड सत्य होऊ शकलं नाही. असो.
आजच्या काळात नेताजी आणि त्यांचं सत्य आणि योगदान हे सगळं आठवण्याचे दोन उद्देश निश्चित आहेत. एक तर माझ्या बाबांचं पुढे काय झालं, हे जाणणं माझा अधिकार आहे. किंबहुना जो मुलगा- मुलगी असेल त्याला/ तिला त्याशिवाय चैन पडणार नाही. आणि त्याबरोबर हेही महत्त्वाचं आहे की, ही प्रेरणा, ही ऊर्जा आजच्या पिढीला व पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे. असंही अविश्वसनीय व्यक्तिमत्व होतं, आपण त्यांच्या निदान १% होण्याचा प्रयत्न करावा, इतका विश्वास मिळाला पाहिजे. असंख्य अडथळे असले तरी त्यावर मात करण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास आपल्यालाही मिळाला पाहिजे. आणि आपण आज जे स्वातंत्र्य- मर्यादितच पण तरीही स्वातंत्र्य उपभोगतोय, जे सुख अनुभवतोय, त्याची किंमत किती मोठी होती, ह्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. ही जाणीव झाली, ही आठवण राहिली तर आपण निदान १% तरी त्यांना आत्मसात करू शकू. हे करण्याचे अनेक मार्ग असतील. आपल्या आपल्या क्षेत्रात हिंमतीने, स्वाभिमानाने आणि स्वयंप्रेरणेने काम करणं असेल. नवीन पिढीला पथनाट्य, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा अशा माध्यमातून हे सांगणं असं असेल. आपल्या ठिकाणी सत्याचा शोध घेत राहणं असेल. आपण १% जरी हे करू शकलो तरी आपलं आयुष्य कृतार्थ ठरेल.
'नेताजी द फरगॉटन हिरो' चित्रपटात एकला चोलो रे गाण्यात एक ओळ आहे. जर आपण देश म्हणून आणि नेताजींचे वारस म्हणून त्यांना १% आत्मसात करू शकलो तर त्याच गाण्याची पुढची ओळही सार्थक ठरेल-
मज़िलें कभी क्या मिलेगी हमें
होगी क्या सहल कभी जो राह है कड़ी
आज हर जवाब हमको मिल जाएगा
आ गई है आज फैसले की घड़ी
(निरंजन वेलणकर 09422108376, niranjanwelankar@gmail.com)
मला तर कधी कधी वाटतं.
मला तर कधी कधी वाटतं.
पाहिले महायुध्द ,दुसरे महायुध्द,ब्रिटिश कडून जग जिंकणे, communist चळवळ,जर्मनी मधील हत्याकांड.
ह्या सर्व घटना घडल्या त्या मुळेच जगाची सामाजिक रचना बदलली.
पूर्वी प्रचंड अत्याचार प्रजेवर होत च होते.
कोणते हक्क नव्हते.
वरील सर्व घटना घडल्या आणि.
मानवी मूल्य,मानवी हक्क,लोकशाही,असे अनेक विचार जगात पसरले आणि लोकांना त्याची किंमत समजू लागली.
उल्कापात नी daynosar गेले आणि मानवजात उदयास आली .
तसेच काहीसे.
विनाश मधून चांगले घडले.
+111
+111
दोन अणुबॉम्ब पडून भयंकर विनाश झाल्याने आणि शरण जावे लागल्याने जपानी नागरिकांच्या मानसिकतेला प्रचंड धक्का बसला. शिवाय युद्धानंतर काही वर्षे स्वतःचे सैन्यदल ठेवण्याससुद्धा जपानला बंदी होती. ह्या मानहानीतून जपान अजूनपर्यंत मान वर करू शकलेला नाही. ३०-३५ वर्षांपूर्वी जपानने बरीच औद्योगिक प्रगती साधली होती पण दोन प्रचंड भूकंपांमुळे तीही लयाला गेली. युद्ध -तहातल्या अटींनुसार परराष्ट्र व्यवहारावर अमेरिकेची कडक नजर आणि निर्बंध राहिले. आक्रमकता, विस्तारवाद हे आतापर्यंत डोके वर काढू शकलेले नाहीत. युध्दापूर्वीचे जपान आणि नंतरचे जपान ह्यांच्या मानसिकतेत जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. युद्धात हरल्यामुळेच हा बदल झाला. जिंकले असते तर. हा मवाळपणा दिसला असता का?
शिवाय शेजारी चीनचा महासत्ता म्हणून उदय झाला आणि त्याचेही दडपण आलेच. पॅसिफिक भागात गपचूप बसावे लागले. सगळे सीमाप्रश्न आणि मालकी हक्क गुंडाळून ठेवावे लागले..
हे आठवलंhttps://en.wikipedia
हे आठवलं
https://en.wikipedia.org/wiki/The_Man_in_the_High_Castle_(TV_series)
बरोबर आहे.
बरोबर आहे हेमंत.
यामुळे दळणवळणाचे अनेक शोध सुद्धा झपाट्याने लागले, त्याचाही फायदा सैन्या सोबत जनतेलाही झाला. जगभरातील बातम्या तसेच देशांतर्गत विचार, चळवळी पसरणे सुलभ झाले.
इंटरेस्टिंग पुस्तक अमितव.
इंटरेस्टिंग पुस्तक अमितव. वाचतो, बघतो किंडल वर आहे का ते.
पुस्तक आहे का कल्पना नाही,
पुस्तक आहे का कल्पना नाही, प्राईमवर टीव्ही शो आहे.
आहे पुस्तक, किंडल एडिशन
आहे पुस्तक, किंडल एडिशन सुद्धा.
Homfreyganj massacre >>
Homfreyganj massacre >>
छान माहिती.
Wikipedia वर वाचलं आत्ता. भयाण आहे हे
Aftermath
The worst atrocities were saved for last. Food became increasingly scarce, so the Japanese decided to get rid of the old and unemployable. On 13 August 1945, 300 Indians were loaded onto 3 boats which were taken to an uninhabited island. When the boats were several hundred yards from the beach, they were forced to jump into the ocean. About ⅓ of them drowned, and the ones who made it ashore starved to death. Only 11 were alive when British rescuers arrived 6 weeks later. The following day 800 civilians were taken to another uninhabited island where they were left on the beach. 19 Japanese troops came ashore and shot or bayoneted every last one of them. Later, troops came to burn and bury all the dead bodies.
सगळे हुकूमशहा हे कमी अधिक
सगळे हुकूमशहा हे कमी अधिक फरकाने मोहराचे नसरुद्दीन शहा होते
जपान ची ही बाजू खूप कमी
जपान ची ही बाजू खूप कमी लोकांना माहीत असावी भारतात.
जपान नी इतका अत्याचार लोकांवर केला होता हे वाचून च धक्का बसतो.
आता एकदम शांतता वादी झाला आहे.
जपान ची ही बाजू खूप कमी
जपान ची ही बाजू खूप कमी लोकांना माहीत असावी भारतात. >> इंपिरियल जपान ने हेच प्रयोग चायना, कोरीया मधेही केलेले आहेत.
जपानी हे अत्यंत हिंसक आणि
जपानी हे अत्यंत हिंसक आणि क्रूर होते. जर ते भारताचे राज्यकर्ते बनले असते तर कल्पनाही करवत नाही.
नी ने बहुधा ह्याच संदर्भातली
नी ने बहुधा ह्याच संदर्भातली एक पोस्ट टाकली होती, फेबु की माबो ते आठवत नाही
महायुद्धकाळात जपान्यांनी
महायुद्धकाळात जपान्यांनी क्रूरतेची परिसीमा गाठली होती. जपानी सैन्य भारतीय सैनिकांना कस्पटाप्रमाणे वागवत असे. त्यांचे हाल हाल केले गेले. जपानी उच्चवर्गाने हा युद्धज्वर अश्या प्रकारे भडकवला होता की कुठल्याही समझोत्याची शक्यताच उरली नव्हती. सगळे समाजमन वंशाचा दुराभिमान, आपण सोडून अन्य सर्व देशांचा विनाश आणि 'मरण पत्करावे पण शरण जाऊ नये' असल्या खुळचट कल्पनांच्या आहारी गेला होता. चीन, कोरिया ह्या देशांत जपानने जे केले ते माणूसकीला काळीमा फासणारे.
ब्रिटिश काही संत नव्हते, त्यांनीदेखिल वसाहतींवर प्रचंड अत्याचार केले पण त्यांना स्वातंत्र्य अन लोकशाहीप्रेमी ब्रिटिश नागरिकांच्या दबावामुळे का होईना जरा बरे वागावे लागत असे. भारतावर इंग्लंडच्या ऐवजी जपानसारखा क्रूर अन हुकुमशाही पूर्ण अंगी बाणवलेला देश असता तर आपले हाल कुत्र्याने खाल्ले नसते.
आताशा मी अशा विचारावर आलो आहे
आताशा मी अशा विचारावर आलो आहे की कुठलाच देश ह्याबाबतीत चांगला वाईट करता येणार नाही. संधी मिळाली की शोषण करायला पुर्वीचे शोषीतही हिरिरीने पुढाकार घेतात.
वाचूनच च अंगावर काटा येतो.
वाचूनच च अंगावर काटा येतो.
अंकित देशाचे नागरिक ह्यांना माणूस च समजत नव्हतं जपान.
त्या काळात अनेक राष्ट्र अशीच वागत होती.
जर्मनी नी तसाच वागत होता.
अणू बॉम्ब टाकून अमेरिकेने पण क्रूर पणाची सीमा पार केली होती.
एकमेकांच्या जीवावर सर्व उठले होते.
अशा जागतिक वातावरणात ..विकास,सुविधा ह्याच्या कडे दुर्लक्ष झाले असावे.
त्या मुळेच त्या काळात जनता उपाशी पोटी राहतं होती.
खूप गरिबी होती.
आपल्या पण एक पिढी मागे गेले की अनेक लोक सांगतात.
खूप गरीब होतो.एक वेळ चे जेवण पणं मिळत नसे. हलाकी चे दिवस होते.
पैसे नव्हते एक वेळ पटेल पण खूप शेती असून पण दोन वेळ चे जेवण मिळणे कठीण होते .
ह्याचा अर्थ लोक भीती नी शेती पण धड करू शकत नसले पाहिजेत.
असुरक्षित वातावरण असले की काही सुचत नाही.
स्वातंत्र्यानंतरची साधारण १५
स्वातंत्र्यानंतरची साधारण १५ वर्षे दूध दुभते आणि अन्नधान्याची पुष्कळ टंचाई होती हे खरे. राशनवर निकृष्ट धान्य स्वस्त दरात दिले जात असे. रांग लावावी लागत असे. पण नंतर हरितक्रांती आणि धवलक्रांतीमुळे उपलब्धता वाढून अनेक लोकांना खुला बाजार परवडू लागला आणि राशनवरचे अवलंबित्व खूप कमी झाले. ह्या काळात कोट्यवधी निर्वासितांची जबाबदारीआली, दोन मोठी युद्धे झाली. शास्त्रींनी लोकांना आठवड्यातून एक दिवस उपास राखण्याचे आवाहन केले होते. लोकांनी पाळले. देशाची भूक भागली आणि धान्य आयात जवळ जवळ थांबली.
जपान्यांनी दुसर्या
जपान्यांनी दुसर्या महायुद्धादरम्यान भारतीयांवर केलेल्या अत्याचाराबद्दल लिहिलंय का अनुज धर यांनी ? की कव्हर अप केलंय?
वॉर्निंग - वेदनादायक वर्णन
मार्गी, तुम्हांला पुढचा लेखक सुचवतो. विक्रम संपथ. खूप आवडेल तुम्हांला.
आणि ह्या असल्या जपानी
आणि ह्या असल्या जपानी युद्धकैद्यांना निर्दोष सोडलं म्हणून तो आयसीजीचा बंगाली जज जपान्यांच्या गुड बुक्स मध्ये जाऊन बसलाय.
भरत
भरत
सकाळच्या बातमीत इतिहास- कारही नाही तज्ज्ञच लिहिलय. आता फक्त भारतातील थोर हा शब्दप्रयोग बाकी आहे. लागेल तोही ... कपाळबडवंती!
हो
हो
ओहहह. इतकी सविस्तर चर्चा!
ओहहह. इतकी सविस्तर चर्चा!
@ हेमंत ३३ जी, @ पुंबा जी, @ भरत जी, @ हिरा जी व सर्वांना चर्चेत महत्त्वाच्या मुद्द्यांची भर घातल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. मला माहित नसलेले अनेक मुद्दे समोर आले. ते निश्चितच मी समजून घेईन. अंदमान- निकोबार बेटांवर जपानने इतके अत्याचार केले होते हे माहित नव्हतं. आणि आत्ता वर दिलेल्या लिंकमध्ये तर भयानक गोष्टी आहेत. हे अतिशय धक्कादायक आहे. जपानने कोरिया, फिलिपाईन्स, चीन अशा ठिकाणच्या लोकांवर अत्याचार केल्याचं माहिती होतं, पण तेच भारतीय लोकांबद्दल, हे माहिती नव्हतं. फारशी समोर न आलेली माहिती इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
सावरकरांचे तिर्थक्षेत्र
सावरकरांचे तिर्थक्षेत्र अंदमान जेल जपानी लोकांनीच पाडले , 7 पैकी 4 विंग पाडल्या गेल्या आहेत , की त्या शिल्लक 3 विंगेतच ह्यांची रूम होती ?
आता जे भक्त बघून डोळे पाणावून येतात ते खरे आहे की प्रतिकृती आहे बहुतेक
कन्फर्म करावे
Amazing...
Amazing...
मूळ लेखच इतका मनोरंजक आहे की कोणत्याही प्रतिक्रिया वाचायची गरज वाटली नाही.
त्यातल्या त्यात.
स्वतःच्या देशात, देशबांधवांसमोर यायला जो माणूस टाळतो तो माणूस कोणताही सपोर्ट नसताना आंतरराष्ट्रीय राजकारणात पडद्या आडून सूत्र हलवतो हे गृहितक भयानक मजेशीर आहे. _/\_
नारायणी सेना एकीकडे आणि नारायण एकीकडे वगैरे समजले का हे नेताजींना?
विषयाला धरून पण अवांतर.
विषयाला धरून पण अवांतर.
अन ते सगळं बारगळलं. पण कोणी इंट्रेसेटेड असाल तर मला विपु करा. कथाबीज पाठवेन.
यावर एक फार छान कादंबरी - फिक्शन लिहिता येईल. थोडा अभ्यास करावा लागेल. पण भन्नाट होईल. मी सुरुवातही केलेली. पण माझ्यातला इतिहासकार कथाकारावर हावी झाला
सिम्बा
सिम्बा
दिलेल्या लिंक वाचल्या.
दिलेल्या लिंक वाचल्या.
जपानी भलतेच अत्याचारी होते.
पण त्यांना नशा वंश श्रेष्ठ पणाची होती.की विस्तारवादी नशा होती.
धर्माची नशा तर नसणार.पण एक अजब शोकांतिका आहे.
बौद्ध धर्म शांती चा प्रतीक आहे पण अतीव अत्याचार ह्याच बौद्ध धर्मीय जास्त असलेल्या देशांनी केला लोकांवर.
चीन ची लाल सेना,जपान,उत्तर कोरिया. ही उदाहरणे जगासमोर आहेत.
कंबोडिया राहिला होता. त्या साठी परत
Abp वर सकाळी एक व्हिडिओ
Abp वर सकाळी एक व्हिडिओ बघितला.
माउंट बॅटन ह्यांच्या डायरी विषयी.
स्वतंत्र देण्याच्या अगोदर काय घडले त्याचे वर्णन त्यांनी डायरी मध्ये केले आहे
धक्कादायक वाटले.
भारताचे तीन हिस्से करायचे होते.
भारत,पाकिस्तान आणि प्रिंसिस्थान.
भोपाळ च्या नवाब ला प्रिन्सेसस्थान निर्माण करायचा होता.
भारताची स्वतंत्र चळवळी चा
भारताची स्वतंत्र चळवळी चा इतिहास शांत पने वाचला.
सर्वांची मत वाचली आणि त्या वर मनन केले तर .
मला तरी असेच वाटते ..
गांधी जी हे खूप परिपक्व व्यक्तिमत्त्व होते.
नेहरू पण विचारी होते.
स्वतंत्र चळवळी च्या नावाखाली.
धार्मिक ,वैचारिक उन्माद वाढू नये
जो हिंसाचार होण्यास कारणीभूत होईल ह्यांची त्यांनी काळजी घेतली.
उन्माद वाढून हिंसाचार होण्याची शक्यता तीव्र होती.
विचारी नेते नसते तर.
त्याच बरोबर
भारताच्या स्वतंत्र चळवळी चा फायदा तिसऱ्या देशाने घेवून नये त्याची काळजी घेतली.
महायुद्धात ब्रिटिश सरकार ला पाठिंबा देणे हा खूप महत्वाचा निर्णय गांधी,नेहरू नी घेतला होता.
नाही तर अनर्थ घडला असता .
असे माझे मत झाले आहे.
सिंगापूर national museum मधे
सिंगापूर national museum मधे जपानच्या अत्याचाराविषयी खूप छान माहितीपूर्ण विभाग आहे. तो बघून मला मलापण असेच वाटल की ब्रिटिश परवडले. तेथे आझाद हिंद सेने विषयी पण माहिती आहे. Must visit place if you are going to Singapore. पण हे केसरी वगैरे टूर मधे नसते.
Pages