India's biggest cover up: अनुज धर ह्यांच्या २० वर्षांच्या नेताजींच्या रहस्याच्या अभ्यासाचा निष्कर्ष

Submitted by मार्गी on 13 August, 2022 - 02:26

सर्वांना नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस! लहानपणापासून त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते. "महानायक" आणि "नेताजी" अशी मोठी पुस्तकं व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांचा परिचय झाला. नव्हे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना मनावर बिंबली होती. लहानपणापासून त्यांचं वेगळेपण, त्यांचे विचार, त्यांची बंडखोर वृत्ती, शाळा- महाविद्यालयातील पराक्रम, नंतर ब्रिटनमधील शिक्षण, गांधीजींना विरोध, दुस-या महायुद्धामध्ये केलेला अभूतपूर्व प्रवास, परकीय देशांमध्ये जपलेला स्वाभिमान, देश प्रेम, पुन: एकदा रोमांचक पाणबुडी प्रवास, पूर्व आशियातील रोमहर्षक महाभारत आणि... असे सर्व प्रसंग मनावर कोरले गेले होते. पुढे २००५ मध्ये आलेला 'नेताजी द फरगॉटन हिरो' हा चित्रपटही हा अनुभव परत देऊन गेला. नेताजींचा शेवट नक्की काय झाला, ह्याबद्दल मनामध्ये नेहमी प्रश्न होता. आता ह्या प्रश्नाचं सुस्पष्ट असं उत्तर नाही, पण एक निश्चित दिशा मिळते आहे असं वाटतंय. निमित्त झालं नेताजींच्या रहस्यांवर गेल्या २० वर्षांपासून अभ्यास करणा-या अनुज धर ह्यांच्या विविध पोडकास्टसचं आणि 'India's biggest cover up' ह्या त्यांच्या पुस्तकाचं. त्यांचे दोन- तीन तासांचे पोडकास्टस अक्षरश: न थांबता ऐकले आणि मग त्यांचं पुस्तकही सलग वाचून काढलं. नंतर मुखर्जी आयोगाच्या कामकाजावर आधारित असलेला गुमनामी चित्रपटही बघितला. हे ऐकणं- बघणं आणि वाचणंही थरारक होतं. आणि त्यानिमित्ताने नेताजींबद्दल खूप काही कळालं. निश्चित उत्तरांची दिशा कळाली. भारतीय राजकारणाची एक नवीन आणि खोलवर ओळख झाली. हा छोटा लेख म्हणजे हे पोडकास्टस, हे पुस्तक आणि ह्या विषयावर समोर आलेल्या सद्यस्थितीला थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न.

(शब्द संख्या- २६३९ वाचन अवधी १० मिनिटे. हा लेख इंग्लिशमध्ये http://niranjan-vichar.blogspot.com/2022/08/indias-biggest-cover-up-infe... इथे वाचता येईल)

✈ नेताजींना जाऊन तर इतकी वर्षं झाली. आता त्याचं काय? "मेरे पिताजी हैं, उनका सच मुझे जानना है|"
✈ २० वर्षांचे परिश्रम आणि अथक अभ्यास- अनुज धर!!
✈ १९४५ नंतर रशियामध्ये नेताजींच्या उपस्थितीची साक्ष देणारे अनेक पुरावे
✈ आपला भारत देश असा- इतका उदासीन, इतका अंधारात आणि इतका भ्रष्ट?
✈ देशप्रेम आणि स्वाभिमानापुढे सगळ्या अडथळ्यांची शरणागती
✈ Your dead man- गुमनामी बाबा!
✈ नेताजींच्या केवळ १% हिंमत, साहस, शौर्य, बुद्धीमत्ता आपल्याला कशी मिळेल?
✈ जोदी तोर डाक सुने केउ ना आसे तोबे एकला चोलो रे एकला चोलो एकला चोलो रे

नेताजी! स्वातंत्र्याचे एक शिल्पकार! डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ब्रिटीश पंतप्रधान एटली ह्यांनी म्हंटलंय की, भारताला स्वातंत्र्य मिळालं‌ त्यामागे मुख्य कारण आझाद हिंद सेनेमुळे प्रेरित झालेली व ब्रिटीशांची चाकरी सोडून देण्यास सज्ज झालेली भारतीय सेना हे होतं. आता भारतीय सैनिकांचा भरवसा आपण धरू शकत नाही, ही खात्री ब्रिटीशांना झाली. आणि त्यातून देश सोडून जाण्याची भुमिका ब्रिटीशांना घ्यावी लागली. नेताजींनी वस्तुत: अशा शेकडो गोष्टी केल्या आहेत, ज्यापैकी एक गोष्टही कोणी करू शकला तरी तो स्वत:ला धन्य समजेल. मग ते तत्कालीन आयसीएस उत्तीर्ण होणं असेल, गांधीजींना थेट विरोध करणं असेल, मणिपूरपासून पेशावरपर्यंतच्या लोकांसोबत नातं जोडणं असेल, उद्दाम विदेशी सत्तेच्या गुहेमध्येही स्वाभिमान आणि देशप्रेमाने कार्यरत राहणं असेल! किंवा अतिशय भयंकर असा अंधारात उडी मारून केवळ स्वत:च्या हिमतीवर केलेला कोलकाता- काबूल- मॉस्को- जर्मनी असा प्रवास असेल किंवा १% पेक्षाही कमी शाश्वती असलेला अर्ध्या जगाला समुद्राखालून प्रदक्षिणा घालून केलेला पाणबुडीचा प्रवास असेल! किंवा पूर्व आशियामध्ये थायलंड- म्यानमार ते मणिपूर- इंफाळ परिसरामध्ये दिलेली अफाट झुंज- संपूर्ण भारतातील विविधतेचं केलेलं नेतृत्व! तेही‌ असं की, शेकडो सैनिकांनी युद्धात आहुती द्यावी आणि लाखो भारतीयांनी त्यांना सर्वस्व द्यावं! ह्या शेकडो गोष्टींपैकी जो एकही करू शकत असेल तो स्वत:ला धन्य समजेल. असे नेताजी! देशगौरव नेताजी! आत्ताच्या लेखाचा विषय त्यांच्या रहस्यावर अलीकडे पडलेला प्रकाश हा आहे, त्यामुळे त्यासंदर्भात बोलतो.

१८ ऑगस्ट १९४५ ला तैपेई येथे झालेला त्यांचा अपघात हा तेव्हाही जाणकारांनी स्वीकारला नाही आणि तो ब्रिटीश- अमेरिकन अशा विरोधकांनीही मान्य केला नाही. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमध्ये असंख्य विसंगती होत्या, पुरावे उपलब्ध नव्हते. अनेक गोष्टी संशयास्पद होत्या. परंतु काही जणांना नेताजी गतप्राण झाले, हे सांगणं सोयीस्कर होतं, त्यामुळे ती‌ बाजूच खरी आहे, असं रेटून सांगितलं गेलं. तुटक तुटक ठिकाणी नेताजी रशियात असल्याचे पुरावे लोकांना माहिती होते, कालांतराने भारतातही त्यांना काही जणांनी बघितलं होतं. पण ही गोष्ट कधीही "सरकारी सत्य" बनली नाही. का? हे जाणण्यासाठी अनुज धरचे काही पोडकास्टस ऐकावे लागतील. अनुज धर ह्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे! ज्या काळी हा विषय जवळ जवळ मागे पडलेला होता, तेव्हा 'एकला चोलो रे' हा मंत्र घेऊन ह्यांनी नेताजींच्या रहस्याच्या उत्खननाला स्वत:ला वाहून घेतलं. आज हे त्यांचं जीवन झालं आहे. २००४- ०५ च्या सुमारास 'Enigma of Netaji Subhas Bose' अशी हिंदुस्तान टाईम्सची लेखमालिका नेटवर वाचल्याचं आठवतं. ती त्यांनीच केलेली होती. हिंदुस्तान टाईम्समधली कव्हर स्टोरी म्हणून त्यांचा हा प्रवास सुरू झाला आणि पुढे पुढे तर हेच त्यांचं मिशन बनलं. कालांतराने इतर नेताजीप्रेमी व संशोधक असे चंद्रचुड घोष व इतर लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. सरकार दरबारी असंख्य अडथळ्यांमधून आणि विरोधाच्या अनेक स्तरांवर सतत संघर्ष करून त्यांनी वाट काढली. सरकारी लोकांकडून एक एक गोष्ट करून घेणं ही अशक्य बाब असते! हळु हळु काही सरकारी अधिकारी, नेताजीप्रेमी, माजी अधिकारी अशांच्या मदतीने काही तथ्य समोर आणली. पारदर्शकतेला मानणा-या विदेशांमधील माहितीचा छडा घेतला. कालांतराने आलेल्या माहितीचा अधिकारासारख्या शस्त्राचा व इंटरनेटवर होणा-या जागतिक संपर्काचा उपयोग करून घेतला. त्याच काळात म्हणजे १९९९ मध्ये नेताजींच्या रहस्यासाठी तिसरा आयोग- मुखर्जी आयोग स्थापन झाला होता. मुखर्जी आयोगाने खूप उत्तम काम केलं आणि १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैपेई येथे अपघात झालाच नव्हता, हे सिद्ध केलं. नेताजींचं रशियातलं आणि भारतातलं वास्तव्य जवळ जवळ उघड होईल, अशा स्वरूपाचे इतर पुरावे समोर आणले. पण २००५ मधल्या केंद्र सरकारने ह्या आयोगाचा अहवालच फेटाळला. परंतु तरीही सत्य प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रकारे समोर येतच आहे. अप्रत्यक्ष प्रकारे हे अनेकांना तुटक तुटक माहिती होतंच, पण आता अनेक धागे दोरे एकत्र येत आहेत. नवीन युगामध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक डॉटस जोडले जात आहेत. २०१६ मध्ये मोदी सरकारने नेताजींच्या अनेक फाईल्स डिक्लासिफाय केल्या. सरकारने मान्य केलेलं सत्य नसलं तरी आज अनेक गोष्टी उजेडात आलेल्या आहेत. देश म्हणून आपल्यामध्ये देशप्रेम आणि देशासाठी काम केलेल्यांसाठी प्रेम असेल तर इतर लपलेल्या गोष्टीही समोर येतील.

मांचुरियामार्गे रशिया!

ह्या सर्व संशोधनातून समोर आलेले धागे मांडतो. ज्यांना अधिक रस असेल त्यांनी अनुज धरचे पोडकास्टस वाचावेत आणि २० वर्षांच्या अभ्यासासह व शेकडो कागदपत्रांचा पुरावा देऊन त्याने लिहीलेलं 'India's biggest cover up' पुस्तक वाचावं. त्यातून समोर आलेले निष्कर्ष- धागे इथे मांडतोय. ह्या गोष्टींना अप्रत्यक्ष प्रकारे दुजोरा मिळालेला आहे, पुरावे मिळालेले आहेत. १८ ऑगस्ट १९४५ चा अपघात हा केवळ बनाव होता. ज्याप्रमाणे कोलकत्यावरून नेताजी जर्मनीला जाण्यासाठी निसटले होते व ते प्रत्यक्षात काबूलजवळ पोहचल्यानंतर ते घरात नसल्याची 'बातमी' सांगण्यात आली होती, त्याप्रमाणे १८ ऑगस्टच्या कथित अपघाताची बातमी टोकिओवरून २२ ऑगस्टला देण्यात आली होती व तेव्हा ते मांचुरियाजवळ पोहचले असावेत. पुढे मांचुरियामार्गे सोव्हिएट रशियात ते गेले. आल्फ्रेड वेग ह्या अमेरिकन पत्रकाराने १८ ऑगस्टनंतर त्यांना एकदा बघितल्याचं नेहरूंच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. स्वातंत्र्यानंतर एक भारतीय इंजिनिअर एका ऑटोमोबाईल प्रोजेक्टसाठी सोव्हिएट रशियात गेला होता. त्या विशिष्ट प्रकल्पावर त्याचा प्रमुख एक जर्मन होता. तो जर्मन रशियामध्ये अनेक वर्षांपासून काम करत होता. त्याने त्या भारतीय इंजिनिअरला विश्वासात घेऊन सांगितलं की, तो नेताजींना भेटला होता. आणि १९४१ मध्ये त्याने जर्मनीमध्ये नेताजींना समोरून बघितलं होतं. व्यावसायिक व राजकीय नेत्यांच्या एका कँपवर तो असताना त्याने तिथे नेताजींना ओळखलं व जर्मनमधून संवादही साधला होता. त्यांना राजदुताचा दर्जा दिलेला होता. जेव्हा त्या इंजिनिअरने मॉस्कोच्या भारतीय राजदुताला ही बातमी सांगितली, तेव्हा त्या राजदुताने त्याला धमजीवजा सूचना केली की, तुझ्या कामाकडेच लक्ष दे. पुढे भारतात आल्यावर आणि निवृत्त झाल्यावर त्याने ही आठवण सांगितली व मुखर्जी आयोगापुढे तशी साक्षही दिली. तथाकथित तैपेई अपघातानंतर एक वर्षाने म्हणजे जुलै १९४६ मध्ये गांधीजींची सेक्रेटरी व दादाभाऊ नवरोजींची नात खुर्शीद नवरोजीने अमेरिकन पत्रकार लुई फिशरला लिहीलेल्या पत्रात म्हंटलं होतं की, जर रशियन सेनेच्या मदतीने नेताजी भारतात आले तर गांधी- नेहरू काही करू शकणार नाहीत. सगळा देश त्यांच्यासोबत जाईल.

मेरा भारत महान

एक प्रश्न इथे पडतो की, नेताजी रशियात होते तर भारतात का आले नाहीत? किंवा नंतरही आले तेव्हा लपून का राहिले? त्याचं एक कारण हे आहे की, भारतीय स्वातंत्र्याच्या करारात (Transfer of powers) मध्ये कदाचित एक गोपनीय अट ही होती की, जर नेताजी भारतात आले असते तर युद्ध गुन्हेगार म्हणून सरकारला त्यांना ब्रिटीशांच्या स्वाधीन करावं लागलं असतं. किंबहुना आतील धागे असंही सांगतात की, हे स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य नव्हतंच, Dominion status होता हा. आणि वस्तुत: अगदी १९५५ पर्यंत भारतीय सेनेचं नेतृत्व ब्रिटीशच करत होते. स्वत: नेहरूंनी १९५६ मध्ये ब्रिटनच्या दौ-यात राणीच्या एकनिष्ठेची प्रतिज्ञा घेतलीही होती. आणि ह्यासंदर्भात धक्कादायक पण कोणाला माहिती नसलेली वस्तुस्थिती ही आहे की, जालियांवाला बागेमध्ये गोळ्या झाडणारे जे पोलिस होते- ते भारतीय पोलिस होते- त्यांना स्वतंत्र भारतामध्ये सरकारी नोकर म्हणून पेंशन मिळत होती आणि आझाद हिंद सेनेमध्ये लढलेल्या सैनिकांना व अधिका-यांना स्वातंत्र्यसैनिकसुद्धा मानलं जात नव्हतं. त्याबरोबर स्वतंत्र भारतात असे अनेक कायदे होते जे कोणी स्वाभिमानी व देशप्रेमी मान्य करणार नाही. अस्पृश्यता ही कायद्याने समाप्त होण्यासाठी १९५५ वर्षं यावं लागलं. गुन्हेगार जमाती अधिनियमासारखा काळा कायदा १९५२ पर्यंत होता. तेव्हा हे स्वातंत्र्य खरोखर स्वातंत्र्य होतं का केवळ dominion status होतं, हाही मुद्दा समोर येतो. ब्रिटीश नेताजींना युद्ध गुन्हेगार मानत होतेच, पण एकाही भारतीय नेत्याने पारतंत्र्याच्या काळात केलेल्या अत्याचारांमुळे ब्रिटीशांना गुन्हेगार म्हंटलं नाही.

सरकारची भुमिका काहीही असो, नेताजींचे जवळचे सहकारी, त्यांचे दोन्ही भाऊ, पत्नी एमिली अशा जवळच्यांना जाणीव होती की, नेताजी रशियात आहेत. त्याचं आणखी एक कारण म्हणजे १९६८ पर्यंत नेताजींच्या कुटुंबावर सरकार पाळत ठेवून होतं. मृत व्यक्तीच्या कुटुंबावर पाळत ठेवण्याची काय गरज? त्यामुळे हे एक प्रकारे ज्यांना आतल्या गोष्टी माहिती आहेत, त्यांच्यासाठी उघड सत्य होतं. त्यामुळेच तर हे रहस्य सोडवण्यासाठी पहिला आयोग १९५६ च्या सुमारास व दुसरा आयोग १९७० साली स्थापन केला गेला. अनेकदा सरकारने प्रयत्न केला की, टोकिओच्या रेनकोजी मंदिरात नेताजींच्या तथाकथित अस्थी भारतात आणून हा विषयच संपवावा. पण नेताजींच्या कुटुंबियांच्या विरोधामुळे हे करता आलं नाही.

सरकारची‌ भुमिका जास्त करून सत्य समोर येण्यापासून टाळण्याची होती. तत्कालीन तैवानसोबत भारताचे राजकीय संबंध नाहीत, म्हणून सरकारने पहिल्या दोन आयोगांना तैवानला जाऊ दिलं नाही. किंवा कदाचित प्रत्यक्ष तिथे गेल्यावर तिथे असलेल्या "पुराव्यांचा" फोलपणा उघड होण्याची भिती असेल. त्यावेळी नेताजी मात्र केवळ स्वत:च्या हिमतीच्या बळावर आणि त्यांना ओळखणा-या देश- विदेशातील जीवाभावाच्या सहका-यांच्या मदतीने मांचुरिया- चीन- रशिया अशा अज्ञात देशात झेप घेत होते. किती वेगवेगळे देश- प्रदेश! अफघनिस्तान- रशिया- इटाली- जर्मनी नंतर म्यानमार- थायलंड- इंडोनेशिया- सिंगापूर- जपान! हे काही त्यांच्या मित्रांचे देश नव्हते. इथेही उर्मट राज्यकर्ते आणि अधिकारी होतेच. पण त्या सर्वांना नेताजींनी आपल्या देशप्रेमाच्या शक्तीपुढे झुकवलं. उर्मट राज्यकर्त्यांनी त्यांनाही दाबण्याचा प्रयत्न केल, पण ते कुठे झुकले नाहीत आणि आपल्या उद्दिष्टावर ठाम राहिले. अगदी हिटरलरलाही त्यांनी आपल्या स्वाभिमानाची‌ चुणूक दिली. भारतीय लोक म्हणजे शेळ्या- मेंढ्या आहेत असं मानणारा हिटलर वरमला. डोळ्याला डोळे भिडवून आणि प्रचंड आत्मविश्वासाने शेक हँड करून त्यांनी हिटलरची भेट घेतली. आणि विदेशी शक्तींची मदत ही एका स्वतंत्र देशाला केलेली मदत आहे जी स्वातंत्र्यानंतर हा देश कृतज्ञतेने परत करेल ही त्यांची भुमिका होती. पण तेव्हाचे भारतातले मुख्य नेते हिटलरला भेटणं म्हणजे नरकात बुडाल्यासारखी गोष्ट करत होते. "हिटलरने सैतानावर जरी स्वारी केली तरी माझा सैतानाला पाठिंबा आहे" असं म्हणणारा भारतद्वेष्टा चर्चिल त्यांना चालत होता. कृत्रिम दुष्काळामुळे ३० लाख बंगाली लोकांचा बळी घेणारा व भारताला गुलाम ठेवू इच्छिणारा चर्चिल त्यांना चालत होता.

Your dead man- गुमनामी बाबा!

रशियामध्ये काही काळ अज्ञातवासात राहून आणि देशामधील राज्यकर्ते आपल्याला अनुकूल होतील अशी वाट अनेक वर्षं बघून नेताजी गुमनामी बाबांच्या रूपात भारतात आले, असं आज म्हणता येऊ शकतं. अर्थात् ते रशियात असतानाही भारतीय जनतेच्या हिताच्या दृष्टीने कम्युनिस्ट देशांमध्ये प्रवास करायचे, अनेक नेत्यांसोबत संपर्क ठेवायचे, असेही तुटक धागे दिसतात. १९५५ नंतरच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये नेपाळ सीमेपासून जवळ बस्ती, फैजाबाद व तशा इतर साध्या गावांमध्ये गुमनामी बाबांचं वास्तव्य होतं. पूर्णपणे पडद्याआड ते राहायचे, एकांतात असायचे, सतत चेहरा झाकून ठेवायचे आणि कोणालाही भेटायचे नाहीत. पण त्यांच्या साहित्यात मात्र इंग्लिश- बंगाली- जर्मन पुस्तकं, युद्ध, गुप्तहेर क्षेत्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी ह्यावरची पुस्तकं होती. कालांतराने त्यांचा आझाद हिंद सेनेचे वरिष्ठ सेवक व नेताजींचे म्हणजे त्यांचेच जुने मित्र- सहकारी ह्यांच्यासोबत संपर्क झाला. आणि हळु हळु नेताजींच्या 'इनर सर्कलला' त्यांच्या आगमनाची जाणीव होते. त्यांचे लहानपणीचे मित्र, तरुणपणीचे सहकारी, कार्यकर्ते व आझाद हिंदचे लोक अशा अनेक मंडळींनी गुमनामी बाबा किंवा भगवनजी किंवा पर्देवाले बाबा ह्यांच्या भेटी घेतल्याचे व दीर्घ काळ त्यांचा संपर्क असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. गुमनामी बाबांनी लिहीलेली पत्र उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या लोकांचं एकच विचारणं असायचं की, तुम्ही समोर का येत नाही? त्यावर ते म्हणायचे की, माझं समोर येणं देशहिताचं नाही. कदाचित देशांतर्गत सत्ता संघर्ष, अहिंसावाद्यांचा विरोध, अन्न- धान्य व मदतीसाठी भारताचं अनेक देशांवर अवलंबून असणं व देश ख-या अर्थाने स्वतंत्र नसणं अशी कारणं असतील. असो.

अनेकांना प्रश्न पडतो की, मग नेताजी अशा अज्ञातवासात व लपून राहताना करत काय होते? ह्याची दोन- तीन उत्तरं स्पष्ट मिळतात. एक तर ते साधना करत होते. श्री अरविंदही क्रांतिकारक होते, पण ते पुढे साधनेत गेले आणि ती साधनाही देशासाठी होती. नेताजी १७ व्या वर्षी ७ महिने हिमालयात निघूनही गेले होते. ती त्यांची एकांत साधना आता पुढे जात होती. त्याबरोबर ते कम्युनिस्ट फोल्डसह अनेक आशियातल्या नेत्यांच्या गुप्त संपर्कात होते आणि वेगवेगळे प्रश्न, व्हिएतनामसारखं युद्ध ह्याबद्दल त्यांना मदतही करत होते, असंही गुमनामी‌ बाबांच्या पत्रातून व बोलण्यातून दिसतं. अगदी भारत- चीन युद्ध आणि बांग्लादेश मुक्तीसंग्राम ह्यामध्येही त्यांनी गुप्त प्रकारे मध्यस्थी/ हस्तक्षेप केलेला आहे, असं ते सांगतात. एका बाजूला हे अविश्वसनीय वाटेल. पण हा माणूस कसा होता, हे आपल्याला परत एकदा आठवायला पाहिजे. आयसीएस राजीनाम्यानंतर म्हणजे १९२१ पासून १९४१ पर्यंत ते भारतात सक्रिय होते (त्यातही काही वर्षं तब्येतीमुळे विदेशामध्ये सक्तीची विश्रांती घेत होते व राज्यकर्त्यांच्या भेटीही घेत होते), ह्या २० वर्षांच्या सक्रिय आयुष्यात तुरुंगवास, स्थानबद्धता, मंडालेचा विजनवास अशा गोष्टी धरल्या तर जेमतेम तीन- साडेतीन वर्षं ते मुक्त होते आणि तरीही इतका मोठा प्रभाव त्यांचा होता. संपूर्ण देशभर त्यांचे लोक होते. गांधीजींविरुद्ध निवडणूक लढून ती ते जिंकू शकले व अगदी मद्राससारख्या राज्यांमधून त्यांना समर्थक मिळाले होते. अशी त्यांची योग्यता असेल तर त्यांना पारख असलेले विदेशी राज्यकर्तेसुद्धा कधीच दूर करणार नाहीत. ब्रिटीशांच्या पोलादी पकडीमधून जो अगदी शिवाजी महाराजांच्या हुशारीने पसार झाला होता, ज्याच्याकडे गुप्त संपर्काचं इतकं प्रभूत्व होतं जो नाझींमधील हिटलरविरोधी गटही लगेच ओळखू शकला, त्याला कोणत्या सीमा अडवू शकतील? आणि मग तो माणूस गुप्त प्रकारे अनेक देशाच्या नेत्यांच्या संपर्कात असणं ह्यात आश्चर्य ते काय? आणि मग अशा माणसाला काम करण्यासाठी समोर येऊनच केलं पाहिजे अशीही गरज उरत नाही. असो. ह्याबद्दल असंख्य अप्रत्यक्ष पुरावे दिसतात, अनेक डॉटस दिसतात, जे आपण आपल्या बुद्धीने कनेक्ट करू शकतो. शास्त्रीजींच्या मृत्युचं गूढ, स्वतंत्र भारतातील अनेक राज्यकर्त्यांचा कार्यकाळ, अगदी इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, व्ही पी सिंह, नरसिंह राव, अटलजी, मनमोहन सिंह अशा पंतप्रधानांचे कार्यकाळ असे अनेक संदर्भ ह्यात येतात. प्रत्येक बिगर काँग्रेस सरकारने हे गूढ उलगडण्यासाठी केलेली मदत त्यात दिसते. आणि १९९५ च्या सरकारमधले विदेश मंत्री व नंतर राष्ट्रपती झालेले नेते एमिली शेंकलना टोक्योच्या अस्थी आणण्याच्या प्रस्तावावर सही करण्याची सक्ती करताना दिसतात (त्यांना त्या घराबाहेर जायला सांगतात). अशा अनेक गोष्टीचे पुरावे सरकारी कागदपत्रांत आहेत. आता डिक्लासिफाय केलेल्या कागदपत्रांत दिसतात. असो.

मुखर्जी आयोगाने गुमनामी बाबांच्या हस्ताक्षराची व डिएनएची चाचणी केली होती. एका तज्ज्ञाने हस्ताक्षर जुळतं हा निष्कर्ष दिला. सरकारी तज्ज्ञांनी नकारात्मक निष्कर्ष दिला. आणि नेताजींच्या कुटुंबियांसोबतच्या डिएनए चाचण्यांचे परिणाम नकारात्मक आले. पण सरकारी प्रयोगशाळा ह्या चाचण्यांचे खोटे अहवाल देत होत्या, हे आयोगाच्या कामकाजावेळी तिथे असलेल्या नेताजी प्रेमींना माहिती आहे. त्यामुळे मुखर्जी आयोगाने गुमनामी बाबांबद्दल हे नेताजीच होते, असं निर्विवाद प्रकारे म्हणता येत नाही, असा निष्कर्ष काढला. कारण पुरावे आहेत, पण ते कागदोपत्री सबळ ठरले नाहीत. कारण आपल्या देशाची उदासीनता, अनास्था आणि भ्रष्टाचार! पण खाजगीमध्ये बोलताना न्यायमूर्ती मुखर्जींनी गुमनामी बाबा हे तेच होते, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि योगायोगाने त्यांचं हे सांगणं एका कॅमेरामध्ये शूट झालं आहे व तो व्हिडिओ इंटरनेटवर आज उपलब्धही आहे. गूगल करू शकता. गुमनामी बाबा हे तेच हे त्यांनाही माहिती होतं, पण चाचण्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे आणि सरकारने असहकार केल्यामुळे ते तसं सिद्ध करू शकले नाहीत. पण अप्रत्यक्ष पुरावे आहेतच. अनेक बंगाली क्रांतीकारक आणि राजनेते लीला रॉय, समर गुहा, आझाद हिंद सेनेतील दिग्गज, तत्कालीन युपीचे मुख्यमंत्री संपूर्णानंद अशा अनेकांनी त्यांनाच नेताजी म्हणून दुजोरा दिला होता. फक्त वर दिलेल्या कारणांमुळे हे उघड सत्य होऊ शकलं नाही. असो.

आजच्या काळात नेताजी आणि त्यांचं सत्य आणि योगदान हे सगळं आठवण्याचे दोन उद्देश निश्चित आहेत. एक तर माझ्या बाबांचं पुढे काय झालं, हे जाणणं माझा अधिकार आहे. किंबहुना जो मुलगा- मुलगी असेल त्याला/ तिला त्याशिवाय चैन पडणार नाही. आणि त्याबरोबर हेही महत्त्वाचं आहे की, ही प्रेरणा, ही ऊर्जा आजच्या पिढीला व पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे. असंही अविश्वसनीय व्यक्तिमत्व होतं, आपण त्यांच्या निदान १% होण्याचा प्रयत्न करावा, इतका विश्वास मिळाला पाहिजे. असंख्य अडथळे असले तरी त्यावर मात करण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास आपल्यालाही मिळाला पाहिजे. आणि आपण आज जे स्वातंत्र्य- मर्यादितच पण तरीही स्वातंत्र्य उपभोगतोय, जे सुख अनुभवतोय, त्याची किंमत किती मोठी होती, ह्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. ही जाणीव झाली, ही आठवण राहिली तर आपण निदान १% तरी त्यांना आत्मसात करू शकू. हे करण्याचे अनेक मार्ग असतील. आपल्या आपल्या क्षेत्रात हिंमतीने, स्वाभिमानाने आणि स्वयंप्रेरणेने काम करणं असेल. नवीन पिढीला पथनाट्य, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा अशा माध्यमातून हे सांगणं असं असेल. आपल्या ठिकाणी सत्याचा शोध घेत राहणं असेल. आपण १% जरी हे करू शकलो तरी आपलं आयुष्य कृतार्थ ठरेल.

'नेताजी द फरगॉटन हिरो' चित्रपटात एकला चोलो रे गाण्यात एक ओळ आहे. जर आपण देश म्हणून आणि नेताजींचे वारस म्हणून त्यांना १% आत्मसात करू शकलो तर त्याच गाण्याची पुढची ओळही सार्थक ठरेल-

मज़िलें कभी क्या मिलेगी हमें
होगी क्या सहल कभी जो राह है कड़ी
आज हर जवाब हमको मिल जाएगा
आ गई है आज फैसले की घड़ी

(निरंजन वेलणकर 09422108376, niranjanwelankar@gmail.com)

Group content visibility: 
Use group defaults

बरं, मग? >>> बोसांचा अपमान होत आहे यबद्दल वर परत बर मग विचार ता ?
आणी हे म्हणे झेंडे लावणार !
पाकिस्तानात जा बोसांचा अप मान करायचा असेल तर

हे पुस्तक पूर्वी वाचलं होतं.
बाकी सगळे मुद्दे खोडून काढता येतील पण नेताजींच्या इनर सर्कलमधील लोक गुमनामी बाबांच्या संपर्कात का होते, त्यांना स्पेशल ट्रीटमेंट का देत होते हा प्रश्न अनुत्तरित राहतो आणि सत्य काय ते यातच दडलेलं आहे.
छान परीक्षण. माबोट्रोलधाडीकडे दुर्लक्ष करून हा विषय मांडल्याबद्दल अभिनंदन.

आणी हे म्हणे झेंडे लावणार !
पाकिस्तानात जा बोसांचा अप मान करायचा असेल तर>>>>

तुम्हीही झेन्डे लाऊ शकता, कोणीही अडवलेले नाही.

पाकिस्तानात जायचीही खुप इच्छा आहे. स्वात व्हॅलीबद्दल खुप
ऐकलेय. प्रत्यक्ष पाहायला मिळाली तर दुधात साखर.

पाकिस्तानात जायचीही खुप इच्छा आहे. स्वात व्हॅलीबद्दल खुप >> जरुर जा, बोसांचा अपमान करता म्हणुन बिर्याणी आणी केक खिलवतात तिथे !

तुम्हीही झेन्डे लाऊ शकता, कोणीही अडवलेले नाही. > आम्हि दर्वर्षीच लावतो. २००२ नंतर नाहि लावयला सुरवात केली. आनी आमच्या पुर्बजानी तिरंग्याला कधीच विरोध हि केला नाहि
ना कोनीए तिरंगा लावला म्हणुन केस केली

ते नेहरूंचे नाव असलेले , सही नसलेले लेटर इथे लावा

नाहीतर अजून 4 दिवसांनी अजून एक त्यावर सनसनाटी धागा निघेल

gandhi land.jpghttps://www.altnews.in/the-truth-of-the-letter-written-by-nehru-calling-...

एखाद्या देशाला स्वातंत्र्य दिल्यानंतर तिथल्या जुन्या शत्रूंना युद्धकैदी म्हणून ब्रिटिश पकडून जेलात घालत बसले असते तर त्यांना 150 देशातील असे लाखो युद्धकैदी ठेवायला अजून एक बेट खरेदी करायला लागले असते आणि 300 वर्षे जगाला लुटून जे मिळवले , ते ह्यांच्या वरणभातावरच खर्च झाले असते

Proud

हे लेटर बोगस आहे.

कोठे वाद घालत आहात. तुम्हि कितीहि प्रुव्ह केले तरी अजुन १० धागे येणार. त्यांना तेच पसरवायचे आहे

वरच्या लेखात चक्क हिटलरची भलावण केली आहे. आणि त्याच्या विरोधातील युद्धाला पाठिंबा दिला म्हणून ब्रिटिशधार्जिणं म्हटलं आहे.

Lol तरी हे ओरिजिनल नसावे. "ओरिजिनल" मधे खुद्द नेहरूंच्या स्पेलिंगच्या चुका होत्या. मात्र त्याच्यावरचा वॉटरमार्क बघून हे खरोखरच कोणी खरे पत्र समजून नंतर नॅशनल आर्काइव्हज मधे तर टाकले नाही अशी शंका आली Happy

!

मार्गी - तुमचे इतर लेख मी अजून फारसे वाचलेले नाहीत. हा लेख एखादा एकांगी प्रचार पाहून भारावून जाउन लिहील्यासारखा वाटतो. यातल्या काही गोष्टी सहज क्रॉसचेक करण्यासारख्या आहेत - ज्या गोष्टींवर या आरोपांचा सगळा डोलारा उभा आहे. ते तुम्ही केलेत का? ही मते खोडून काढणारे काही वाचलेत्/पाहिलेत का? नसेल तर ते करा व त्यातून तुमची स्वतःची मते ठरवा.

इथे नेतांजींवर शंका घेण्याचे काहीच कारण नाही. त्यांची देशभक्ती व स्वातंत्र्याकरता त्यांनी केलेले प्रयत्न वादातीत आहेत. त्यांच्या कुटुंबियांचे प्रयत्नही समजू शकतो.

पण या लेखांत जो भारत सरकारवर रोख आहे तो नक्की का आहे ते समजत नाही.

सरकार त्यांच्याच एका पूर्वीच्या सहकार्‍याच्या विरोधात इतके वागायला काहीतरी मोटिव्ह हवा. उगाच कोणी असे करणार नाही. या लेखावरून तो मोटिव्ह नीट दिसत नाही. नेताजी स्वातंत्र्यानंतर जर हयात असते, तर बहुधा सरकारमधेच सामील झाले असते.

बाकी असंख्य गोष्टी नावडतीचे मीठ अळणी स्वरूपाच्या आहेत. स्वातंत्र्यानंतर सर्व सैनिक, पोलिसांच्या नोकर्‍या पुढे भारत सरकारमधे सुरू राहिल्या, जे पेन्शनीत होते त्यांची पेन्शने पुढे सुरू राहिली. नोकरशाही सुरू राहिली. त्यामुळेच मूळ ब्रिटिश सिस्टीम आपल्याकडे तशीच पुढे अनेक वर्षे राहिली. यात कोणी आवर्जून "आणा रे ती जालियनवालाची फाइल, आणि त्या पोलिसांना त्यांची पाकिटे पोहोचवा" असे केले नाही. हिंसक/अहिंसक दोन्ही गटांपैकी कोणालाही आवर्जून हे असले उद्योग करण्यात काही इंटरेस्ट असेल हा दावाच अनाकलनीय आहे.

दुसरे मोठे "गेपिंग होल". १५ ऑगस्ट १९४७ ते २५ जानेवारी १९५० या काळात भारत डॉमिनियन होता. त्यापुढे नाही. एकदा सार्वभौम प्रजासत्ताक झाल्यानंतर ब्रिटिशांशी एकनिष्ठता वगैरे संपले. ज्या नेहरूंवर १९५५ साली राणीशी एकनिष्ठ राहण्याचा बिनबुडाचा आरोप केला आहे त्या नेहरूंनीच बाणेदारपणे "ब्रिटिश कॉमनवेल्थ" चे स्ट्रक्चर बदलायला लावून एकाच वेळी भारत त्या ग्रूपमधे राहील पण राणीचे अधिपत्य मानणार नाही हे पदरात पाडून घेतले होते हे ही लक्षात घ्या (आत्ता ज्या कॉमनवेल्थ गेम्स सुरू आहेत त्यात एक सार्वभौम देश असूनही भारत भाग घेतो याचे कारण तेच आहे). एका स्वतंत्र देशाचा पंप्र स्वातंत्र्यानंतर चांगल्या ८-१० वर्षांनी असली एकनिष्ठता वगैरे शपथ कशाला घेईल? त्याचा काही ठोस पुरावा आहे का? मला दाट शंका आहे की लोकशाहीवादी राष्ट्रांबरोबर राहण्याची हमी वगैरे दिली असेल, आणि त्याचा कोणीतरी टोटल विपर्यास केला आहे.

आझाद हिंद सेनेतील लोकांना नक्की काय वागणूक दिली गेली याबद्दल मला माहीत नाही. पण इतर जाणकार लिहितीलच.

बाकी अस्पृश्यता कायदा, गुन्हेगार जमाती वगैरेंचा उल्लेख यात असणे याचा संबंध काय आहे? गुन्हेगारी जमातींबद्दलचा कायदा "आपोआप पुढे सुरू राहणे" शक्यच नाही. कारण २६ जाने. १९५० ला नवीन राज्यघटना आली. आता विकीवर पाहिले तर १९४९ साली तो कायदा रद्द झाला. हे सगळे १९४७-१९५० च्या दरम्यान होणे हे साहजिक आहे. आणि अस्पृश्यता स्वतःहून संपवायला कोणी रोखले होते? नावडतीचे मीठ म्हणतोय ते असल्या असंबद्ध गोष्टी आल्या आहेत म्हणून.

आणि "चर्चिल चालत होता" म्हणजे काय? भारतावर हिटलर राज्य करत नव्हता. ब्रिटिश करत होते. तत्कालीन ब्रिटिश नेत्यांशी चर्चा करूनच स्वातंत्र्याची मागणी पुढे जाणार होती ना? चर्चिल निवडणूक हरल्यावर हे सगळे अ‍ॅटलीबरोबर सुरू झाले.

अजून एक क्रमवारी बघा. ऑगस्ट १९४५ पर्यंत जर्मनी, जपान नेस्तनाबूत झालेले होते. नेताजी त्यांच्याबरोबर ब्रिटिशांविरूद्ध लढत होते. त्यामुळे ब्रिटिशांकडूनच घातपात झालेला असण्याची शक्यता असू शकते. पण तो पूर्ण वेगळा मुद्दा आहे.

नेताजींच्या कुटुंबियांसोबतच्या डिएनए चाचण्यांचे परिणाम नकारात्मक आले. पण सरकारी प्रयोगशाळा ह्या चाचण्यांचे खोटे अहवाल देत होत्या, हे आयोगाच्या कामकाजावेळी तिथे असलेल्या नेताजी प्रेमींना माहिती आहे. त्यामुळे मुखर्जी आयोगाने गुमनामी बाबांबद्दल हे नेताजीच होते, असं निर्विवाद प्रकारे म्हणता येत नाही, असा निष्कर्ष काढला.
सबळ पुरावे धुडकावून लागले की काहीही बोलता येते.
बायदवे, पुन्हा डीएनए टेस्ट करू शकत नाही काय ?

पण मग गुमनामी बाबांशी नेताजींचे निकटवर्तीय अशा प्रकारे सतत संपर्क का ठेवून होते? त्या वेळी गुमनामी बाबाना भेटलेल्या अनेकांच्या मुलाखती युट्युबवर आहेत. बाबांच्या मृत्यूनंतर ज्या वस्तू रिकव्हर झाल्या त्याची inventory पण रोचक आहे. बोसांच्या वाढदिवशी गुमनामी बाबांना भेटायला कलकत्याहून लोक येत असत ते का येत असतील.

किंबहुना आतील धागे असंही सांगतात की, हे स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य नव्हतंच, Dominion status होता हा. आणि वस्तुत: अगदी १९५५ पर्यंत भारतीय सेनेचं नेतृत्व ब्रिटीशच करत होते.
My BS senses are tingling Happy

पण भाषा, शब्दरचना/ वाक्यरचना संध्यानंद स्टाईल किंवा भोंदू फॉरवर्डस् मध्ये वापरतात तशी वाटली.

सहमत....

खोटे पसरवण्याच्या प्रकारातला हा धागा आहे.

मोदी सरकार दर महिन्याला १०० कागदे / फायली प्रसिद्ध करणार होती ( सुभाषचंद्र बोस यांच्या बद्दल महत्वपूर्ण माहिती असणार्‍या गोपनिय फायली आहेत आणि प्रत्येक महिन्याला १०० फायली प्रसिद्ध होणार होत्या.... पैकी किती प्रसिद्ध झाल्या? प्रसिद्ध करायच्या तर प्रत्येक महिन्याला कशासाठी. १०० म्हणायच्या आणि केवळ २५ च प्रसिद्ध केल्या कारण त्या कुठल्याही फायलीत नेहरुं किंवा गांधी यांची जनमानसातली प्रतिमा मलिन करता येण्यासारखे काहीच मिळाले नव्हते.

काही कागदे प्रसिद्ध झालीत पण त्यात नेहरु यांनी बोस कुटुंबाची/ मुलीची किती काळजी घेतली याचाच उल्लेख होता. प्रत्येक महिन्याला एक छोटी रक्कम पाठविण्याची त्यांनी व्यावस्था केली होती.

https://www.thehindu.com/news/national/Nehru-arranged-financial-support-...’s-daughter-and-wife/article14016320.ece

<< पण भाषा, शब्दरचना/ वाक्यरचना संध्यानंद स्टाईल किंवा भोंदू फॉरवर्डस् मध्ये वापरतात तशी वाटली. >>

------- हे भोंदू फॉरवर्डच आहे... शंका घेण्यासाठी काहीच जागा ठेवली नाही.

पांढरी टोपी, सध्याच्या सरकारला विनंती करून गुमनामी बाबा संबंधी माहिती गोळा करायला सांगू शकता. ह्यासाठी मायबोलीवरील अनेक स्वयंसेवक तुमच्यासोबत येतील. कमी पडले तर 2024 च्याआधी अनेक भक्त पण असतीलच.

वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! इतक्या लोकांचे प्रतिसाद! खूप खूप धन्यवाद.

वेगवेगळे सर्व अँगल्स, बाजू, मतांचं व भुमिकांचं स्वागत करतो. मी लिहीली तीच भुमिका एकमेव बरोबर आहे, असं मला अजिबातच वाटत नाही. पुस्तक वाचल्यावर व पोडकास्टस ऐकल्यानंतरची प्रतिक्रिया, इतकाच लेखाचा स्कोप होता. अनेक जणांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे, त्यांना विशेष धन्यवाद. माझ्या माहितीमध्ये त्यामुळे भर पडली. आझाद हिंद सैनिकांना पेन्शन इंदिरा गांधींनी सुरू केलं हे माहिती होतं. इंदिरा गांधींचं अनेक बाबतीतलं योगदान मोठं आहे (सिक्कीम, बांग्लादेश युद्ध इ.). ह्या विषयाच्या इतरही बाजू आहेत. मुळात २०१६ मध्ये डिक्लासिफाय केलेल्या कागदपत्रांमध्ये नव्याने समोर आलेले मुद्दे ह्या विषयामध्ये आहेत, ते लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.

प्रत्येकाला कशाला योग्य मानायचं, कोणत्या गोष्टी, कोणते स्रोत खरे मानायचे, ह्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहेच. प्रत्येकाकडे विचार क्षमता व सद्सद्विवेकबुद्धी आहे. सो प्रत्येक जण त्या आधारे मत ठरवत असतो. पटणं न पटणं किरकोळ गोष्ट आहे. वेगवेगळे व्यापक मुद्दे विचारात घेता यावेत, इतकंच वाटतं.

आश्चर्य ह्या गोष्टीचं थोडं वाटलं की, मी नेताजी मिस्टरी किंवा अनुज धरचं संशोधन ह्याबरोबर नेताजींबद्दलही लिहीलं होतं. त्यांचं जीवन, त्यांनी केलेल्या अविश्वसनीय गोष्टी. अगदी १८.८.१९४५ पूर्वीच्या. त्याबद्दल कोणीच ह्या चर्चेमध्ये फारसं बोललं नाही, ह्याचं आश्चर्य वाटलं. ज्यांना वाटत असेल की, ते खुलेपणाने नवीन गोष्टी व नवीन बाजू विचारात घेऊ शकतात, त्यांना मी सुचवेन की, ते अनुज धरचं https://open.spotify.com/episode/0orD4XiUYwKk6vIdO5AmaP?si=9RKOxwpZSlerF... पोडकास्ट पूर्ण ऐकून आपली प्रतिक्रिया द्यावी.

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.

@ मानव पृथ्वीकर जी, सहाय आयोगाने गुमनामी बाबा नक्की कोण, हे स्पष्ट सांगता येत नाही असा निष्कर्ष काढला होता.

@ हीरा जी, हो, शहानवाज खान निश्चितपणे अतिशय वेगळा माणूस होता. आणि सर्व प्रकारचं टॉर्चर- उलट तपासणी होऊनही त्याने स्टेटमेंट बदललं नाही. पण नेताजींनीच त्याला ते सत्य प्रचलित करण्याचं सांगितलं असेल तर? अशीही शक्यता तर असू शकते ना?

बाकी सर्व जाऊ दे, पण मार्गी, तुमची वरची पोस्ट फार आवडली. ट्रोलिंगला कसं उत्तर द्यावं याचं उत्तम उदाहरण.

मला व्यक्तीश: लेख पटला नाही. अगदी खरं सांगायचं तर याबाबतीत काहीच मत नाही किंवा काही सखोल वाचन नाही त्यामुळे फारसा इंटरेस्टही नाही. पण तरीही लेख एकांगी वाटला आणि अनेक मुद्दे अतर्क्य वाटले.

वर फारेण्डने लिहिलेला प्रतिसादही आवडला.

साळसुदपणे विखार पसरवणे ६० वर्षापासुन या देशात आर एस एस चे लोक करत आहेत , मार्गी सारखे त्याचे स्लिपिंग सेल तेच पुढे रेटत आहेत.
असो. हे सर्व सपेल , मोदी भारताची वाट लावेल , पुढच्या पिढ्यांना या लोकांचा मुर्खपणा भोगावा लागेल, तेव्हा इतिहास या सर्व प्रोपगंडाची नोंद घेइलच !

<<<@ मानव पृथ्वीकर जी, सहाय आयोगाने गुमनामी बाबा नक्की कोण, हे स्पष्ट सांगता येत नाही असा निष्कर्ष काढला होता.>>>

मार्गी हा लेख गुमनामी बाबा हे सुभाषचंद्र बोस होते / असतील या बद्दल आहे ना? तेव्हा त्या अनुशंगाने सहाय आयोगाने काय निष्कर्ष दिला हे अपेक्षीत होते.
त्याचा या अनुशंगाने निष्कर्ष :
Head No.1:- Witnesses who claim that Gumnami Baba alias Bhagwanji was/may have been Netaji Subhash
Chandra Bose.
Commission's Answer:- Claim not correct for reasons mentioned in Part III and Part V of this Report.

Head No.2:- Witnesses who claim that Gumnami Baba alias Bhagwanji was not Netaji Subhash Chandra Bose.
Commission’s Answer:- Claim correct, for reasons mentioned in Part III and Part V of this Report.

विषयानुसार, विष्णु सहाय आयोग यांचा निष्कर्ष असा की गुमनामी बाबा हे नेताजी नव्हते.
या उपर ते कोण होते हे सांगता येत नाही हा भाग वेगळा झाला. तो गुमनामी बाबा या विषयाला घरुन असेल पण नेताजी या विषयाला धरुन नाही.

मी सहाय आयोग बद्दल विचारले की तो आयोग २०१६ साली स्थापन करण्यात आला . त्यावेळ पर्यंत म्हणजे "२०१६ मध्ये मोदी सरकारने नेताजींच्या अनेक फाईल्स डिक्लासिफाय केल्या. सरकारने मान्य केलेलं सत्य नसलं तरी आज अनेक गोष्टी उजेडात आलेल्या आहेत.  “ असे तुम्हीच लिहिलेले आहे. तेव्हा या आयोगावर आता दबाव आणुन सत्य लपवण्याचे काही कारण नसावे. आणि या आयोगाचा निष्कर्ष वर दिलाच आहे.

http://uphome.gov.in/writereaddata/Portal/Event/EventType/283_1_1_Gumnam...

खरे तर
1)बोस जिवंत होते की खरेच विमान अपघात मध्ये मृत्यू पावले.
२) मृत्यू का लपवलं?
३) हा घात होता की अपघात.
४) जे कोण बाबा होते ते बोस होते तर लपून का बसले
अनेक प्रश्न निर्माण करता येतात
पण उत्तर त्या वेळी जे पुरावे मिळाले त्या मध्येच असणार
ब्रिटन,अमेरिका,जपान,भारत ह्या संबंधित देशातील सरकारी दप्तरात ते आज पण असतील.
पण फक्त शंका घेणे.इथ पर्यंत च सर्वांचा इंटरेस्ट आहे
बोस ह्यांची बाजू घेणारे मोठे त्यांचे भक्त आहेत असे पण काही नाही
न घेणारे त्यांचे विरोधी आहेत असे पण काही नाही.
फक्त राजकीय फायदा उचलण्याची वृत्ती वाद निर्माण करण्या मागे आहे
सामान्य लोकांनी असल्या आताच्या स्थिती शी काही संबंध नसलेल्या विषयात बिलकुल इंटरेस्ट घेवू नये.

माझे तर अगदी स्पष्ट मत आहे किती ही ग्रेट माणूस असू ध्या त्याच्या अस्तानंतर त्याचा उदो उदो करण्याची गरज नाही
वर्तमानात च जगले पाहिजे..
इतिहास पासून कोणी काही शिकत नाही.
काल घडलेला प्रसंग माणूस आज विसरतो .
इतिहास पासून काय शिकणार
सर्व परिस्थिती चे गुलाम आहेत जशी परिस्थिती असेल तसे प्रतेकाची मत आणि निष्ठा बदलत असतात.

बोस ह्यांचा अपघात घडवून आणला अशी अफवा पसरवली तर आज च्या स्थिती मध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा फायदा होईल त्या पक्षाचे नेते आणि लोक तो घातपात होता असेच समजणार.
खरे काय घडले ह्याच्या शी कोणाला काही देणे घेणे नसते.
शोध निबंध लीहणाऱ्या अनुज नी पण त्याचा शोध निबंध विकलाच असेल.
किंवा असेच लीह म्हणून त्याला कोणी पैसे पण दिले असतील
लष्कराच्या भाकऱ्या तो नक्कीच भाजत नाही.

असे अनेक प्रकार चे लेख अनेक समाज माध्यम,अनेक न्यूज चॅनल ,न्यूज पेपर,tv dabate ह्या मध्ये चर्चेला येणार.
आणि २०२४ ची निवडणूक होई पर्यंत लोकांना इतिहासात, आताच्या स्थिती शी काही संबंध नसलेल्या विषयात गुंतवून ठेवणार.
मूर्ख जनता पण त्या सापळ्यात अडकणार.
आणि भ्रष्ट कारभार,महागाई,बेरोजगारी शिक्षणाचा बाजार,आरोग्य सुविधा चा खेळ खंडोबा,धार्मिक उन्माद .लोकशाही संस्थेचा विनाश,
सर्व विसरणार.
आभासी विश्वात फक्त रममान होणार.
निवडणूक संपली सत्ता आली की परत सर्व विषय तीन चार वर्षासाठी बंद.

Pages