Submitted by च्रप्स on 4 August, 2022 - 01:07
Lic घ्या म्हणून मागे लागणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करावे? एक जण फारच मागे लागला आहे.. व्हाटसप मुळे अमेरिकेत कॉल सोपा झालाय आणि वारंवार फोन करतोय... ऑनलाईन काढा अमेरिकेतून असा पिच्छा पुरवलाय .. नको म्हटले तर थोडेसे डॉलर टाका.. काकाची मदत होईल अशी विनवणी असते... कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय...
कसे हॅन्डल करावे? नकोय पॉलिसी.. इकडे आहे आल्रेडी...
फोन न उचलणे पर्याय आहे पण त्यांनी फोनच करू नये यासाठी काय करता येईल...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुहृद याच्या कळकळी बद्दल शंका
सुहृद याच्या कळकळी बद्दल शंका नाहीच. काही मुद्दे त्यांनी अशा प्रकारे मांडले ज्यामुळे थोडी दिशाभूल होऊ शकते. त्यांचे खंडन मंडन जरुरी होते.
वॉशिंग मशीन व डिश वॉशर या
वॉशिंग मशीन व डिश वॉशर या वेगवेगळ्या वस्तू आहेत. कपडे व भांडी धुणारे एकच मशिन कुणी बनवले तर ते धड कपडे ही धुणार नाही व भांडीही नाही. >>> या उदाहरणाचा काहिच संबध नाहि. चुकिचे उदाहरण आहे
विषयांतर आहे पण इलाज नाहि.
२० वर्षापुर्वी कोणी विचार केला नसेल की मोबाइल आणी कैमेरा एकत्र करता येइल.
Someone put a trolley and a suitcase together and got a suitcase with wheels.
Someone put copier and a telephone together and got a fax machine.
Someone put a bell and a clock together and got an alarm clock.
Someone put a coin punch and a wine press together and we got books.
भरपुर आहेत
पण इन्शुरन्स आणि सेव्हिंग हे
पण इन्शुरन्स आणि सेव्हिंग हे फेल झालेले उदाहरण आहे , ना घोडा ना गाढव
मोद जी, कृपया कोणते मुद्दे ते
मोद जी, कृपया कोणते मुद्दे ते सांगा जिथे दिशाभूल होईल.
उलट मी खरे खरे कॅलक्युलेशन दिले.
एंडॉमेंट घेऊ नका हा सल्ला देताना नक्की काय घ्या हे न सांगणे दिशाभूल नाही का? मला साहिल शहा नी दिलेले उदाहरण योग्य वाटते, कारण त्यात पर्याय आहे. मग मी त्याला उत्तर देऊ शकेन.
बोनस रेट बघण्यासाठी
https://licindia.in/Customer-Services/Bonus-Information
ही लिंक बघा.
पण इन्शुरन्स आणि सेव्हिंग हे
पण इन्शुरन्स आणि सेव्हिंग हे फेल झालेले उदाहरण आहे , ना घोडा ना गाढव >> म्हणुन्नच म्हणले वरच्या उदाहरणाचा याचाशी काहि संबध नाहि
{एंडॉमेंट घेऊ नका हा सल्ला
{एंडॉमेंट घेऊ नका हा सल्ला देताना नक्की काय घ्या हे न सांगणे दिशाभूल नाही का?}
मी आधीच लिहिलंय. ज्याला गुंतवणुकीचा जो पर्याय रुचेल , पचेल तो. त्या सगळ्या पर्यायांमध्ये इथे लिहायला हवं का?
गुंतवणूक विभागात अनेक धागे आहेत. त्यांवर लिहिलं गेलंय.
हा परृयाय व्यक्तीच्या परिस्थिती आणि वृत्तीवर ठरेल. इथे सल्ला का द्यावा?
मुद्दा विमा आणि गुंतवणूक यांत गल्लत नको हा आहे.
आता साहिल शहा यांनी दिलेल्या
आता साहिल शहा यांनी दिलेल्या उदाहरणात, परतावा तर जीवन लाभ चाच जास्त आहे. यासाठी मी बोनस ची लिंक दिली आहे.
करमुक्ततेसाठी मला १५ नं फॉर्म भरा हे पटले नाही, कारण ऑनलाईन त्याची लिमीट मला तरी ५०,००० दिसली. वेगळी असल्यास सांगा.
उलट लाभ मधिल परतावा पुर्ण पणे करमुक्त आहे.
लाभ मधिल मिळणारा परतावा एकत्र नको असल्यास दर महिन्याला थोडी रक्कम अशी पंधरा वर्षात विभागून घेतल्यास साडेतीन कोटी जवळपास परतावा वाढतो. एक्झॅक्ट रक्कम आधी च्या पोस्ट मध्ये लिहीली आहे.
हे एकच उदाहरण होते, म्हणून त्यावर लिहीले आहे.
तरीही ज्यांना टर्म प्लान घेऊन इतर गुंतवणूक करायची आहे त्यांनी कराच.
नुसते विमा आणि गुंतवणूक वेगळे आहे, गल्लत नको म्हणताना फक्त तोंडी न सांगता सोदाहरण दाखवा. म्हणजे काय ते कळेल.
मोद जी, कृपया मुद्दे सांगा.
मोद जी, कृपया मुद्दे सांगा. ज्याचे खंडन मंडन? झाले ते ही..
The very fundamental
The very fundamental principle of financial planning is to separate protection and investment. Life insurer’s job is to provide max protection for each rupee of premium paid. However u don’t seem to agree with it and advise insurance as investment. Another point is you started out with saying maturity benefits under all policies are tax free. When I repeatedly raised that point, u changed your stand slightly although for some reason u still not seemed to be convinced about it. Thirdly u seem to give too much importance to procedural aspects like filling up a form.
For any investment, the rate
For any investment, the rate of return (expected or assured) should matter the most. Taxability or taxation related benefits off course have a role to play but can’t be the sole deciding factor.
All the points which I have
All the points which I have raised are all well recognised points in financial planning. Lot of literature is available online /offline for the same. I may not have been able to articulate it as well as I would’ve liked to. People who are interested can search online. I haven’t even mentioned XIRR formula which is used to assess the return from an investment over a multi year horizon.
I don’t think I have anything more to add to this discussion.
किती गोष्टी आपण फंडामेंटल
किती गोष्टी आपण फंडामेंटल प्रिन्सिपल नुसार करतो? काहीजण असे असु शकतात, ज्यांना हे आवडते, परवडते त्यावर तुमचा आक्षेप का?
प्रत्येक विमा कंपनी, टॅक्स मॅच्युरिटी ची अट लक्षात ठेऊनच प्रॉडक्ट तयार करतात. आता शंभर पैकी एखादा असा असेल कि ज्यालआ काही प्रमाणात कर लागू शकतो, आणि तोच जर शोधून ग्राहक घेत असेल तर चुकीच्या कोणाची.
आपण सांगत असलेल्या गुंतवणूकीच्या ईतर पर्यायामध्ये काहीही घेतले तरी इतके टक्के नफा नक्की असे तर असणार नाही, त्यातही किमान काळजी घ्यावी लागेल.
तुम्ही मुद्दे काढण्यावर माझा आक्षेप नाही, पण वैयक्तिक कमेंट वर आहे.
@मोद
@मोद
Why are you preaching to the choir?
@सुहृद
<< ज्यांना हे आवडते, परवडते त्यावर तुमचा आक्षेप का? >>
याच्यावर प्रतिप्रश्न भरत यांनी आधीच विचारला आहे.
लोकांनी अर्थसाक्षर होऊ नये हा अट्टाहास का?
विमा आणि गुंतवणूक वेगळे आहे, याची गल्लत नको, हे तुम्ही आधी एका वाक्यात मान्य कराल का?
आम्ही घेतलेल्या पहिल्या
आम्ही घेतलेल्या पहिल्या पॉलिसी अगदी कमी प्रिमीअमच्या होत्या. तेव्हा पगारही कमी होते. अहो गेल्यावर इतकी कमी रक्कम हातात आली त्यात नुसते जगणे सुद्धा अवघडच होते. आपण पॉलिसी घेतो तेव्हा ते जे परतावा ऑफर करतात . तो इन्फ्लेशन मुळे वीस तीस वर्शांनी कमी पडतो. पण त्या हिशेबाने प्रिमिअम पे करणे जमत नाही. फॉरिन मध्ये राहताना ज्याच्या नावाने पॉलिसी आहे त्याची डेथ झाली तर ते पैसे कसे घ्यायचे ही प्रोसीजर पण माहिती पाहिजे व ती बायकोला मोठ्या मुलांना माहीत पाहिजे. अनेक का गदपत्रे द्यावी लागतात. ओरिजिनल डेथ सर्टिफिकेट डॉक्टर सर्टिफिकेट, अॅक्सिडेंट रिपोर्ट हे सर्व लागते ते कुठे सबमिट करायचे ते माहीत पाहिजे नाहीतर प्रिमिअमचे पैसे पाण्यात.
कोणत्याही कारणा ने एल आयसी नाकारू शकेल. ही धावपळ करणा रे भारतीय नाते वाईक आहेत का? दोन तीन दा तरी फेरे मारावे लागतात.
एजंट मदत करणार का? ते ही विचारा कारण वरील केस मध्ये तो ही नातेवाइक आहे.
मी एक पॉलिसी घेतली होती तर मला ब्रांच ऑफिस मध्ये बोलावुन फुले देउन सत्कार केला. एजंट कलीगचा भाउ धाकटा. आता ती मॅचुअर होईपरेन्त खट म्हातारी होउन ते पैसे पदरात पाडून घेणे हा एक गोल आहे.
धागा वाचून कळतंय की एल आय सी
धागा वाचून कळतंय की एल आय सी वाले नातेवाईक हँडल करणं खरंच कठीण असतं Wink >>
लोकांनी अर्थसाक्षर होऊ नये हा
लोकांनी अर्थसाक्षर होऊ नये हा अट्टाहास का? कधी आहे माझे म्हणणे असे? सगळ्यांनी फक्त एन्डॉमेंट पॉलिसी घ्यावी असा हट्ट मी कुठे धरला. पहिल्यापासून मी हेच म्हणते आहे की बरीच जनता अशी आहे जी, बॅंक, पोस्ट आणि चिटफंडात गुंतवणूक करते... त्याच्या बरोबरीचा परतावा जर इथेही मिळत असेल हा पण पर्याय आहे हे मान्य करायला तुमची का हरकत आहे?
बरोबरीचा परतावा मिळत नाही, हे
बरोबरीचा परतावा मिळत नाही, हे नंतर सिद्ध करतो.
प्रथम तुम्ही financial planning मधील महत्त्वाचा मुद्दा मान्य करा एका वाक्यात, की विमा आणि गुंतवणूक वेगळे आहे, याची गल्लत नको.
माझे मत जाऊ दे, SEBI registered financial advisor काय म्हणतो ते वाचा.
Is life insurance a good investment?
If you want a one-word answer, then its NO.
Life insurance is not an investment. Period.
विमा आणि गुंतवणूक वेगळे आहे, याची गल्लत नको, हे तुम्ही आधी एका वाक्यात मान्य कराल का?
अ मा, पेराल तितकेच उगवेल.
अ मा, पेराल तितकेच उगवेल.
इन्फ्लेशन रेट मुळे जसा हा परतावा कमी होईल तसे इतरही परतावे कमीच होतील.
पहिल्या पोस्ट पासून माझे म्हणणे आहे की योग्य माणूस आणि योग्य वेळ हवी... माझ्या माहिती मध्ये क्लाएंट चे हप्ते याला अडचण असल्याने स्वतः भरणारे एजंट आहेत. नंतर ते परत घेतात, एजंट चांगला असेल क्लेम ला मदत करतोच.. घरी सांगायची माहिती ही त्या व्यक्तीने स्वतः सांगितले पाहिजे, मृत्यू दावा मिळण्यासाठी कागदपत्रे सादर करावीच लागतील.
पॉलिसी घेताना तुम्ही खट म्हातारी होईपर्यंत ची असेल हे तुम्हांला माहीत नव्हते का?
डेथ क्लेम कंपनी नाकारत नाही, तुम्ही क्लेम रेशो चेक करा, जो काही राहिलेला असेल त्यातही वारसदार स्पष्ट नसणे, हयात नसणे अशा कित्येक अडचणी आहेत. सुसायडल क्लेम पण देतो, पॉलिसी च्या एक वर्ष नंतर.
मॅच्युरिटी क्लेम साठी तर आम्ही सगळ्या मार्गाने सम्पर्क करतो, बर्याचदा जुन्या पॉलिसी असतात, लोक घर/शहर बदलून जातात, फोन नंबर नसतात, त्या त्या क्षेत्रात काम करणारे नवे-जुने कोणतेही एजंट हाताशी धरून, शोधून आम्ही ग्राहकाला मॅच्युरिटी देतो. ते पैसे वा त्यावरचे व्याज LIC वापरत नाही/ वापरु शकत नाही. त्याला नियम आहेत.
तरीही मी इथे कोणताही प्रॉडक्ट, पॉलिसी खपवत नाही, बरीच जण विरोध करतात पण त्यातल्या बर्याच जणांना LIC बद्दल बेसीक माहिती सुद्धा नसते.
अमितव, प्यार है भाई...
याला आम्ही Drinking the Kool
याला आम्ही Drinking the Kool aid असे म्हणतो.
"Drinking the Kool-Aid" is an expression used to refer to a person who believes in a possibly doomed or dangerous idea because of perceived potential high rewards. The phrase typically carries a negative connotation.
@अमा,
मी वर दिलेली SEBI advisor ची लिंक कृपया बघा. त्यात उदाहरण दिले आहे की काय करावे.
मी क्लेम मध्ये सध्यातरी काम
मी क्लेम मध्ये सध्यातरी काम करते, तुम्हाला कसलीही अडचण असेल तर सांगा, मी जरी माझे डिपार्टमेंट बदलले तरी मदत करेन, यात माझा वैयक्तिक नफा नाही.
ते सगळं ठीक आहे ओ, पण माझे तर
ते सगळं ठीक आहे ओ, पण माझे तर म्हणणे आहे की तुम्हाला तुमच्या जिवंतपणी क्लेम करावा लागूच नये (term insurance घेतल्यामुळे)
पण तो नंतरचा मुद्दा. विमा आणि गुंतवणूक वेगळे आहे, याची गल्लत नको, हे तुम्ही आधी एका वाक्यात मान्य कराल का?
जो पर्यंत यापेक्षा कमी
जो पर्यंत यापेक्षा कमी परतव्याचे, कमी खात्रीचे पर्याय आहेत तोवर नाही.
मृत्यू नंतर च्या साठी ही गरज
मृत्यू नंतर च्या साठी ही गरज लागली तर मदत करेन.
सुहृद यांनी अतिशय चुकीचे
सुहृद यांनी अतिशय चुकीची उत्तरे दिली आहेत.
१ विमा आणि गुंतवणूक या वेगळ्या गोष्टी आहेत, हे त्या मान्य करत नाहीयेत.
२. एन्डावमेंट विकल्या जाण्याचा दोष फक्त एजंट चा नसून ग्राहकाचा पण आहेच, असे त्या म्हणतात.
३. निवृत्तीनंतर (६० वयानंतर) सुद्धा टर्म इन्शुरन्स उपयोगी पडेल, असे त्या म्हणतात.
४. मी स्वतः काही गुंतवणूक, शेअर्स, म्युच्युअल फंड, बॉंड्स, स्थावर यात केलेली आहे. पण हे प्रत्येकाला जमते असे नाही असे म्हणतात.
थोडक्यात FUD (Fear, Uncertainty, Doubt)
५. आम्ही Sovereign guarantee देतो असे म्हणतात, पण rbi bonds तशी खात्री देते का हे विचारतात. LIC च्या या गॅरंटीचा भुर्दंड पॉलिसीहोल्डरना पडतो, ते सांगायला त्या सोईस्करपणे विसरतात.
त्यांचा conflict of interest आणि अर्थसाक्षरतेचे अज्ञान इथे दिसून येत आहे.
नेमके प्रश्न विचारले की ते टाळून इतरच सांगतात.
किमान २ गोष्टी तरी थोड्याफार खऱ्या सांगितल्या आहेत.
१. आम्ही (LIC) विमा घेतानाच विमा कमाईला योग्य आहे का ते चेक करतो, क्लेम देताना नाही.
२. एजंटला २५% पर्यंत कमिशन मिळते. (प्रत्यक्षात ३५% पर्यंत आणि पुढे दरवर्षी ५-७% कमिशन मिळते).
सर्वाँना नम्र विनंती आहे की
माझे, भरत, विकु, साहिल शहा, मोद यांचेकुणाचेही म्हणणे शब्दश: मानू नका, पण तुम्ही स्वतः अभ्यास करून ठरवा. शक्य झाले तर CFP (certified financial professional, fee-only adviser) बरोबर सल्लामसलत करा, इन्शुरन्स क्षेत्रातील संबंधित व्यक्तीबरोबर नको.पुढील प्रश्न विचारा:
१. विमा आणि गुंतवणूक फायनांशियल प्लॅनिंगच्या दृष्टीने एकच आहे का वेगळ्या गोष्टी आहेत?
२. विमा घ्यायचा तर मी term life विमा घेऊ की whole life?
३. Whole life/endowment/Cashback ऐवजी मी कमी प्रीमियमची टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली आणि उर्वरित पैसे गुंतवले तर माझा जास्त फायदा होईल का? रिस्क-रीवॉर्ड काय असेल?
४. किती वयापर्यंत विमा आवश्यक आहे? ६० वर्षी निवृत्त झाल्यावर विम्याची गरज आहे का?
५. विमा विकणाऱ्याच्या खिशात किती कमिशन जाणार आहे? म्हणून तो इतक्या आग्रहाने मला विमा विकत आहे का?
६. पेन्शन देणारी पॉलिसी विकत असेल तर annuity बद्दल अभ्यास करा आणि प्रश्न विचारा.
लक्षात ठेवा: तुमच्या पैशावर तुमच्याइतके प्रेम कुणीच करत नाही, त्यामुळे तुम्हाला स्वतः:लाच त्याची काळजी घ्यायची आहे. अर्थसाक्षरता मिळवण्यासाठी कंटाळा करू नका, ते फार महाग पडू शकते.
अर्थसाक्षरता मिळवण्यासाठी
अर्थसाक्षरता मिळवण्यासाठी कंटाळा करू नका, ते फार महाग पडू शकते.
>>> यही तो मालूम नही है ना... कुठे मिळेल हे ज्ञान?
ebay वरून CFP ची पुस्तके
ebay वरून CFP ची पुस्तके स्वस्तात घ्या आणि अभ्यास करा. मी तेच केले. परीक्षा दिली नाही तरी चालेल.
सर्वाँना नम्र विनंती आहे की
सर्वाँना नम्र विनंती आहे की माझे, भरत, विकु, साहिल शहा, मोद यांचे म्हणणेदेखील शब्दश: मानू नका >>>
कॉग्रेस ला हे ५० वर्षात जमले नाही. BJP नी ५ वर्ष तुट कमी ठेवली होती तेव्हा रुपया strong झाला होता.
Submitted by साहिल शहा on 2 July, 2013 - 18:51 >>>>>
हा हा हा
साहिल शहा !
मी ही तेच सांगते आहे, ज्याचे
मी ही तेच सांगते आहे, ज्याचे त्याने ठरवावे.
मी चुक का बरोबर ह्याचा संबंध नाही, मला जे योग्य वाटेल ते मी करेनच.
शहानी जे उदाहरण दिले त्या उदाहरणाला उत्तर मी दिलेले आहे. परतावा लाभला जास्त मिळतोय.. तसे उदाहरण द्या मग ठरवू.
CFP (certified financial professional) सगळीकडे असतात का? असावेत ही ईच्छा.
मी ज्या शाखेत काम करते, तिथे रुजु झाल्याच्या दुसऱ्या दिवशी एक धनगर (क्षमा करा) शाखाधिकार्याला भेटायला आले. शिक्षण फक्त चौथी. घोंगड्या तून पाच लाख नगद काढले आणि समोर ठेवले, ठेव
ठेवायचे आहेत म्हणून. आता त्याला बाहेर ईतर पर्याय असतीलही पण हे त्याला कोण आणि कसे सांगणार. त्याला कितपत कळणार?
सर्वाँना नम्र विनंती आहे की
सर्वाँना नम्र विनंती आहे की माझे, भरत, विकु, साहिल शहा, मोद यांचे म्हणणेदेखील शब्दश: मानू नका >>>
सरकारचे काम सर्वांना केवळ धान्य देणे नाही तर आर्थिक सबलता प्राप्त करुन देणे आहे >>> विजय कुलकर्णी आहेत का ? मोदीने ८० कोटिना धान्य मोफत दिले आहे आणी नोकर्या गेल्या आहेत. >>>>
हा हा हा
विजय कुलकर्णी !
<अर्थ साक्षरता यामध्ये पहिला
<अर्थ साक्षरता यामध्ये पहिला टप्पा योग्य संस्था निवडणे, मग ती ठेव असो वा आरडी. बॅंक असो, पोस्ट असो नाही तर LIC . हा नको का?>
नाही. पहिला टप्पा गुंतवणुकीचा योग्य प्रकार निवडणे. मग संस्था.
त्याआधी स्वतःची गरज , कुवत आणि वृत्ती यांचा विचार करणे.
Pages