LIC वाले नातेवाईक

Submitted by च्रप्स on 4 August, 2022 - 01:07

Lic घ्या म्हणून मागे लागणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करावे? एक जण फारच मागे लागला आहे.. व्हाटसप मुळे अमेरिकेत कॉल सोपा झालाय आणि वारंवार फोन करतोय... ऑनलाईन काढा अमेरिकेतून असा पिच्छा पुरवलाय .. नको म्हटले तर थोडेसे डॉलर टाका.. काकाची मदत होईल अशी विनवणी असते... कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय...
कसे हॅन्डल करावे? नकोय पॉलिसी.. इकडे आहे आल्रेडी...
फोन न उचलणे पर्याय आहे पण त्यांनी फोनच करू नये यासाठी काय करता येईल...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोनती पोलिसी आहे याचि माहिती घ्या. ती कशी फालतु आहे याचा अभ्यास करुन त्यांना सांगा (खरेच फालतु असेल तर)
असे करण्यात आपल्यालाच भरपुर गोष्टी कळतात असा माझा अनुभव आहे. फायनान्शिअल क्नोलेज जेवढे मिळेल तेवढे चांगले

माझ्या investment consultant ne नाही सांगितले म्हणून सांगा.
बाकी काय मदत करू विचारा

Modi सरकार LIC विकणार आहे, म्हणून घेत नाही सांगा,
Lol

पण जोक्स अपार्ट, वर nanba नी म्हंटले आहे तसे directly सांगणे कधीही चांगले

पहिलेच तुम्ही विचारात पडलात त्यामुळे तो तुमच्या मागे लागणारच आणि तुमच्या पर्यायांना त्याच्याकडे उत्तर असणारच. पण "अरे मी आताच काढली आहे" असं उत्तर दिलं असतंत तर प्रश्न संपला असता.

मित्रच एजंट आहे. त्याच्याकडुन एक पॉलीसी घेतली तर काही वर्षांनी आणखी दुसरीपण घे म्हणुन मागे लागला.त्याचे फोन उचलणे बंद केले. दुसरा एक लोकल गृप मध्ये होता, इतके वर्ष पैसे भरा, तितके रुपये मिळतील असं रोजच काय काय सांगायचा. आधी मला मॅच्युरिटीची रक्कम दे मग हप्ते भरतो असं सांगुन त्याला कटवलं.

सिम्बा Lol
मलाही जवळच्या मैत्रीत असं सारख विचारलं की पटकन नकोय म्हणता येत नाही. सेम अनुभव आलेला . नानबा नी परफेकट सांगितलंय. मी पण हेच सांगितलं होतं जी मात्रा लागू पडली.

'नो' म्हणायला शिका च्रप्स. होकाराचीची एडिशन एकदम मर्यादित ठेवायची. आता त्या काकांनाही आशा लागली असेल. बट दॅट इज नन ऑफ युअर प्रॉब्लेम.

अरे पॉलिसीबजार साइट वर सर्व पॉलिसी कंपेअर कर्ता येतात. तसे करतो असे त्याला सांगता येइल पण तडक तोडलेले जास्त बरे.

कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय... >>> आता ते कंटाळेपर्यंत हेच म्हणत राहा

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कुठलाही नात्यातला ओळखीचा एलआईसी एजंट हा नातेवाईक नंतर असतो. आधी तो एल आय सी एजंटच असतो.

एका एल आई सी एजंटने माझ्या सासुरवाडीच्या लोकांच्या पॉलीसीज काढलेल्या. तो त्यांच्या नात्यातला होता आणि ग्यान वाटताना मी सुद्धा तिथे उपस्थित होतो. त्यामुळे तो नंतर माझ्याही मागे लागलेला. मी सरळ त्याचा नंबरच ब्लॉक केला. असशील सासुरवाडीचा नातेवाईक, पण आधी तू एक एल आई सी एजंटच आहेस.

त्यानंतर दोनेक वर्षांनी मला पॉलिसी काढावीशी स्वतःलाच वाटली. तेव्हा त्याचा नंबर अनब्लॉक केला आणि त्याच्याकडूनच पॉलिसी काढून घेतली. कारण तो जावयाला फसवायची हिंमत नाही करणार Happy

हे बेस्ट आहे वीरू
मागे तीनेक महिने माझ्या बायकोनेही हे पीलिसी विकायचे काम सुरू केलेले.
त्यानंतर सोडले तरीही तेच कारण देऊन मला आता कोणालाही कटवता येते.

पण च्रप्स आता हे कारण देऊ शकणार नाही .. हे पहिल्याच फटक्यात द्यायचे कारण असते.

LIC च्या मनी बॅक वगैरे पॉलिसी अज्जिबात घेऊ नका. तुम्ही विदेशात असाल तर नक्कीच नको. पैसे परत येताना प्रचंड त्रास होतो. त्या पॉलिसी वर सुरुवातीचे काही हप्ते आपण भरलेल्या हप्त्यातून मोठी रक्कम कमिशन म्हणून मिळते म्हणून ते एजंट उत्साहाने घरी येऊन पैसे घेतात व हप्ते भरतात. नंतर मात्र उत्साह मावळतो व आपले पैसे बुडतात. आपले पैसे बुडावेत असेच एल आय सी ला वाटत असते.

नाही म्हणायला अगदीच जमत नसेल तर टर्म लाईफ इन्शुरन्स घ्या. पहिले २ हप्ते एजंटला भरायला सांगा, मग पॉलिसीचे हप्तेच भरू नका, पॉलिसी रद्द होईल आपोआप.

<<<आपले पैसे बुडावेत असेच एल आय सी ला वाटत असते.>>> माझ्या बाबांचेही हेच मत आहे, अनुभवातून बनलेले मत. !!!!

ऍक्च्युली पॉलिसी घ्यायला त्यांना डॉक्युमेंट्स द्यायची इच्छा नाहीय.. सॅलरी स्लिप्स वगैरे...
पहिले दोन हफ्ते एजेंट भरू shakto? इतका कमिशन मिळतो का?

ऍक्च्युली पॉलिसी घ्यायला त्यांना डॉक्युमेंट्स द्यायची इच्छा नाहीय.. सॅलरी स्लिप्स वगैरे...>>याच कारणासाठी मी ओळखीच्या एकीकडून IT ची काम करून घेत नक्षी,तिला सांगितलं आहे की वरिष्ठांची बायको CA आहे त्यामुळे तिलाच सांगावे लागते
तुम्हीही असच काहीतरी सांगून कटवा

मूळ प्रश्नाचं उत्तर नाही. उगाच टँजंट आहे खरंतर .. पण एलआयसीला पे-स्टब कशाला हवी आहे?
त्यांच्याकडून लोन घेत नसाल तर पे-स्टब कशाला कोणाला लागते?

आपले पैसे बुडावेत असेच एल आय सी ला वाटत असते. >>> माझे एल आय सी कधीच पैसे डुबले नाहित, वेळेवर मनी बैक चे सुद्धा मिळाले.
खाजगी कंपन्या आणी त्यांच्या एजंट नी पसरवलेले भांड आहे.

ऍक्च्युली पॉलिसी घ्यायला त्यांना डॉक्युमेंट्स द्यायची इच्छा नाहीय.. सॅलरी स्लिप्स वगैरे... >>> च्रप्स हा मेन प्रॉब्लेम असेल तर त्यांना सांगा इथले काही (आर्थिक) डॉक्युमेण्ट्स न देता जर पॉलिसी मिळत असेल तर घेईन. एलआयसीला चालते की माहीत नाही. पण नसेल चालत तर एनीवे हा प्रश्न इथेच मिटेल.

बाकी नाहीतर जवळचे नातेवाईक असतील तर it wouldn't hurt कॅटेगरी समजून घेउन टाका एखादी कमी प्रीमियम वाली, ज्याचे हप्ते इथून जड नसतील आणि आणखी कव्हरेज भारतात मिळत असेल तर काय वाईट आहे. आणि एकदा ही घेतली की इतर सर्व LIC नातेवाईकांना सांगायला कारण होईल Happy

अमित - ते हप्ते भरू शकतो का याची खात्री करायला असेल (लोनसारखेच). पण भारतात एकूणच सॅलरी स्लिप अगम्य ठिकाणी मागतात Happy

हम्म.. पण हप्ते भरू शकलो नाही तर पॉलिसी तशीही कॅन्सल होतेच. सेकंड थॉट, कदाचित जॉब गेला तर काही टक्के कवरेज असेल म्हणून हवी असेल. तसं असेल तर ते कवरेज नको म्हणावं.
अगम्य ठिकाणी ला+१.
अती रच्याकने: देशातून आंबे मागवले तर त्या आंबेवल्याचे आधारकार्ड आणि pan कार्ड मला इकडे आले.

LIC वाले पापभिरू प्रकारचे असतात. त्यात फसवणूक - फसवणूक नसते. सिंगल फसवणूक असू शकते. Proud
अ‍ॅम्वेवाल्यांशी मात्र संबंध तोडावे. त्यांचा अपमान केला तरी अपमान पण पोटात घालणारी जन्ता असते ती. तुला पुण्यात भेटली म्हणजे आता पुण्यात अपमान पोटात घेणारी जन्ता उपजत्येय यात आनंद मान झालं! Proud

<LIC च्या मनी बॅक वगैरे पॉलिसी अज्जिबात घेऊ नका. तुम्ही विदेशात असाल तर नक्कीच नको.>>
अनुभव उलट आहे. काहीही त्रास झाला नाही घरच्या आणि माहितीतल्या काही.
आमच्या कंपनी तर्फे keyman policy होती तिचे पूर्ण पैसे सुद्धा एका visit मध्ये मिळाले.

अर्थात money back policy पेक्षा इतरत्र गुंतवणुक केल्यास अधिक परतावा मिळतो तेव्हा term insurance घ्यावा. LIC अथवा इतर कंपनीचा.

Pages