"मी धामापूर तलाव बोलतोय'' लघुपट

Submitted by डी मृणालिनी on 30 July, 2022 - 14:05

"मी धामापूर तलाव बोलतोय'' लघुपटाचे मुंबई आणि पुण्यात पहिल्यांदा सादरीकरण:

'चुकला -माकला ढोर धामापूरच्या तळ्यात' ही तळकोकणातली प्रसिद्ध म्हण सर्वांनाच माहिती आहे. विपुल निसर्ग -संपदा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धामापूर तलावाने आजवर अनेक जीवांना आपल्या कुशीत आसरा दिला आहे आणि कित्येक शतकांपासून कोकणात मानाचा दर्जा मिळवला आहे. जुन्या -जाणत्या माणसांच्या बुद्धिमत्तेचे प्रतीक म्हणून आज धामापूर तलावाच्या रचनेकडे बघितले जाते. २०२० साली 'जागतिक वारसा सिंचन स्थळ' हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणारा धामापूर तलाव हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव तलाव आहे.
सतत ५ वर्षे पाणथळ जागांच्या संवर्धनात्मक कार्यामुळे धामापूर तलावाच्या विविध पैलूंचा सखोल अभ्यास झाला. धामापूर तलाव किनारी सापडलेल्या दुर्मिळ सजीवांचा अधिवास, तलाव व मंदिराचा मौखिक आणि लिखित इतिहास, गावसमाज व मंदिराचा स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून झालेला अभ्यास, जुन्या काळातील सिंचन पद्धती अशा अनेक विषयांचे सखोल अध्ययन विशेषज्ञाकडून करण्यात आले. या अभ्यासामुळे धामापूर तलाव हा केवळ एक पाण्याचा साठा नसून ५०० वर्षांपासून हस्तांतरित करण्यात आलेला जिवंत वारसा आहे, हे डोळ्यासमोर आले.
या जिवंत वारशाचे अस्तित्व अबाधित राहावे आणि धामापूर तलाव रचनेतून दृग्गोचर होणारी कोकणातील जुन्या जाणत्या माणसाची अलौकिक दूरदृष्टी जगासमोर यावी या उद्देशाने "मी धामापूर तलाव बोलतोय " या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. पूर्णपणे लोकसहभागातून बनलेल्या या लघुपटात थेट धामापूर तलावच सांगणार आहे त्याचा ५०० वर्षांचा प्रदीर्घ प्रवास. या लघुपटाची प्रस्तुती धामापूर येथील स्यमंतक "जीवन शिक्षण विद्यापीठ" मार्फत करण्यात आली आहे. "मी धामापूर तलाव बोलतोय" लघुपट तलावाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देईल. या १० मिनिटाच्या लघुपट सादरीकरणाआधी विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे चर्चासत्र असेल. डॉ विद्या कामत या दंतकथा आणि लोककथा यांचे समाजजीवन आणि पर्यावरणातील महत्व यावर माहिती देतील.
Screening poster.jpegScreening Poster Pune.jpeg
२०२० साली आय ई एस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ला धामापूर तलाव व मंदिर वास्तू रचनेचे डॉक्युमेंटेशन व 3D मॉडेलसाठी INTACH या संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. हा मॉडेल देखील लोकांना दाखवण्यासाठी ठेवण्यात येईल.
हा कार्यक्रम ०९ ऑगस्ट २०२२ रोजी आय ई एस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, बांद्रा येथे दुपारी ३;०० वाजता आहे. आणि पुण्याला हा कार्यक्रम १३ ऑगस्ट २०२२ रोजी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट येथे सकाळी १० वाजता असणार आहे. मुंबईत या शो चे आयोजन आय ई एस कॉलेज ऑफ architecture द्वारे करण्यात आले आहे तर पुण्याला या शो चे आयोजन इकोलॉजिकल सोसायटी आणि आरती किर्लोस्कर यांच्या "वसुंधरा" द्वारे करण्यात आले आहे.
तरी या ५०० वर्ष प्राचीन तलावाची कहाणी ऐकण्यासाठी सर्वांनी जरूर उपस्थित राहावे. (प्रवेश मोफत)

नक्की या मायबोलीकरांनो !

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख व माहिती. सौ. सुनिताबाई देश पांडे ह्यांच्या पुस्तकांमध्ये ह्या तलावाचे सुरेख वर्णन आहे. त्यामुळे जास्त आपूलकी वाट्ते. शो बघायला यायचा नक्की प्रयत्न करेन. सर्व टीम व तलावाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा.

छानच! पुण्याला असते तर नक्की आले असते पहायला. सुनीताबाईंच्या पुस्तकामुळेच मलाही धामापूरचा तलाव ओळखीचा वाटतो. बंगलोरला कधी असेल स्क्रीनिंग किंवा पुण्यातच परत कधी असेल तर इथे नक्की लिहा.

*सर्व टीम व तलावाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा.* +1 !
अगदीं लहानपणापासूनच्या अनेक ह्रद्य आठवणी या रम्य तलावाशी निगडीत आहेत. ( धामापूर- काळसे हें आमचं आजोळचं गांव ! ) . पुण्याचा कार्यक्रम पहाणं क्रमप्राप्तच.
धन्यवाद.

याच नावाचा तुमचा लेखही वाचला होता आणि त्यामुळे असा एक तलाव पण आहे माहित झाले होते...
छान होईल कार्यक्रम- शुभेच्छा !!!!

धन्यवाद लोकहो.... नक्की या सर्वांनी. उद्या दुपारी ३ वाजता बांद्रा येथील आय ई एस कोल्लेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये आहे. लीलावती हॉस्पिटल च्या समोर.