Submitted by बिचुकले on 27 July, 2022 - 23:13
खाद्यपदार्थांच्या जोड्या तशा टरलेल्या आहेत उदा वरण भात, सामोसा चटणी, इडली सांबार, वगैरे
पण कोणी हटके ट्राय केला असल्यास इथे लिहा
जोडीच हवी आणी हटकेच हवी !
उदा
ताजी गरम बाकरवडी आणी ओले खोबरे
जिलेबी आणी ब्रेड
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ईकडे सिंगपूर ला पावाच्या
ईकडे सिंगापूर ला पावाच्या स्लाईस मधे आईस क्रीम चा तुकडा असे काँबो मिळते. पॉपुलर आहे, छान लागते.
दही आम्लेट
दही आम्लेट
फरसाण सँडविच
फरसाण सँडविच
चिवडा भात
चिवडा भात
ऋ सर, असा धागा होता एक.
ऋ सर, असा धागा होता एक. आबासाहेबांनी (खाली प्रतिसाद आहे) अचूक शोधून दिल्याबद्दल त्यांचे आभार .
https://www.maayboli.com/node/36551
हा पण पळवूयात.
डाळ जास्त असलेल्या तिखट
डाळ जास्त असलेल्या तिखट सांबारात पाव बुडवून छान लागतो.एक प्रकारचं डीपच ते.
आणि पाण्यात मारी बुडवून पण.
मी वरण मारी किंवा वरण टोस्ट पण खाल्ला आहे.वेळेला चालतं.
बाजरीची भाकरी दूध.
बाजरीची भाकरी दूध.
बाजरीची भाकरी दूध + तिखट + मीठ
ईडली+ मटण रस्सा
ईडली+ मटण रस्सा
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/4481
इथे यावरून भरपूर टैम्पास झाला आहे.
वरच्या धाग्याचं नाव आधी वेगळं
वरच्या धाग्याचं नाव आधी वेगळं होतं का ? कारण नाव नाही ओळखीचं. प्रतिसाद ओळखीचे वाटतात.
दुसरा कुठला असा धागा होता का ? पोह्यात शेव कि काहीतरी घालून खायचा प्रतिसाद आठवतोय त्यातला.
हा धागा वाटतं
हा धागा वाटतं
https://www.maayboli.com/node/36551
आबा काय मेमरी आहे.
आबा काय मेमरी आहे.
पाण्यात मारी बुडवून पण>> अनू
पाण्यात मारी बुडवून पण>>
अनू तुला असलं काँबो खाऊन पण भन्नाट जोक सुचतात की गं! 
पाण्यातून बिस्कीट खाणे सवयीने
पाण्यातून बिस्कीट खाणे सवयीने जमत असावे.
माझे एक काका ब्रिटानियात कामाला होते. तिथले सारे जण फुकटची बिस्कीटे पाण्यातून खायचे असे ते सांगायचे.
हा सुद्धा एक धागा होता. ईथेही
हा सुद्धा एक धागा होता. ईथेही काही चित्रविचित्र खाद्यपदार्थ आले आहेत.
अंड्याची खादाडी
https://www.maayboli.com/node/40225
मला धाग्याच नाव थोड थोड आठवत
मला धाग्याच नाव थोड थोड आठवत होत..
मायबोली शोध मध्ये जाऊन असे खायला आवडतात हे सर्च केलं
ओह्ह !!
ओह्ह !!
चहात टाकून मुरमुरे..
चहात टाकून मुरमुरे..
ईकडे सिंगापूर ला पावाच्या
ईकडे सिंगापूर ला पावाच्या स्लाईस मधे आईस क्रीम चा तुकडा असे काँबो मिळते. पॉपुलर आहे, छान लागते. >>>> तिथे दुरवर ' फिजी' जवळ (जवळ नाही पण त्याच दिशेने) एक टोंगा आयलंड आहे, तिथे कडक ब्रेड (oval shape) आतुन पोखरून त्यात soft drinks ओतुन द्यायचे. लहान मुलं, टिनएजर्स ते मजेमजेत खात फिरत असायचे. मोस्टली मिरींडा असायचं. मला ती कल्पना किंचितही आवडली नव्हती.
(हे मी अजुनही कुठे तरी प्रतिसादात लिहिलं होतं. )
वडापाव उकलुन त्यात कोल्ड्रींक
वडापाव उकलुन त्यात कोल्ड्रींक ओतुन....
तिथे कडक ब्रेड (oval shape)
तिथे कडक ब्रेड (oval shape) आतुन पोखरून त्यात soft drinks ओतुन द्यायचे. > आइस्किम कोन मध्ये soft drink सारखे झाले हे.
आमच्या Next Gen ने जॅम संपला
आमच्या Next Gen ने जॅम संपला होता म्हणून बेदाणे व पोळी आवडीने खाल्ली होती. घासाला एक बेदाणा. नंतर मीही एक घास घेऊन पाहिला. नॉट बॅड कॉंबिनेशन.
तसंच कोबीची भाजी घातलेल्या फ्रॅंकीचे पिनव्हील्स + स्ट्रॉबेरी/द्राक्षाचे काप. हे ट्राय करायचा धीर झाला नाही.
वरणभाताचा घास पोळीत घालून पण
वरणभाताचा घास पोळीत घालून पण छान लागतो.
चहा-फरसाण
चहा-फरसाण
चहा- बाकरवडी
चहा- चकली.
यात चहा अगदी ग्गोड हवा हं.
दही-जिलेबी.
दही-जिलेबी. (मी नाही खात पण हरयाणात पाहिले आहे)
माझे असे...
शेवचिवडा + कोणतीही मसाल्याची रस्सावाली भाजी.
फरसाण + कोणतीही मसाल्याची रस्सावाली भाजी.
पोहे + कोणतीही मसाल्याची रस्सावाली भाजी.
शेवचिवडा + मटणाचा रस्सा
फरसाण + मटणाचा रस्सा
मोनॅको बिस्कीटावर उरलेली सुकी भाजी रचुन इ.इ.इ.
गरम सामोसा आणी दहि
गरम सामोसा आणी दहि
इडली मटण
इडली मटण
ईडली चिकन
मसाला म्यागी + चपाती
फोडणीचा भात + चपाती
इडली मटण
.
दही-जिलेबी. (मी नाही खात पण
दही-जिलेबी. (मी नाही खात पण हरयाणात पाहिले आहे)
>>>
ताक वा मठ्ठा जिलेबी हे आपल्याकडेही फेमस आहे.
लहानपणी पंगतीच्या जेवणात स्पर्धा लाऊन जिलेब्या खाताना त्या मठ्ठ्यात बुडवून खाल्याने जास्त खाल्या जातात आणि त्रास होत नाही.
आमच्या ऑफिस मध्ये एक जण
आमच्या ऑफिस मध्ये एक जण आपले कांदे पोहे आणि पोळी आणत असे. पोळी पोह्यांना लावून खात असे.
आमरस भात हे ही एक हटके कॉम्बिनेशन आहे , आणि पॉप्युलर ही आहे कोकणात
Pages