खाद्यपदार्थाची हटकी जोडी

Submitted by बिचुकले on 27 July, 2022 - 23:13

खाद्यपदार्थांच्या जोड्या तशा टरलेल्या आहेत उदा वरण भात, सामोसा चटणी, इडली सांबार, वगैरे
पण कोणी हटके ट्राय केला असल्यास इथे लिहा

जोडीच हवी आणी हटकेच हवी !

उदा
ताजी गरम बाकरवडी आणी ओले खोबरे
जिलेबी आणी ब्रेड

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझा एक सिंदी कलीग भाजी भात कालवतो आणि पोळीला लाऊन खातो.

वळावटाची खीर आणि भात ...कालवून. मला हिम्मत नाही झाली, पण खाताना पाहिलंय इतरांना.

दूध-खिचडी. आमच्याकडे सगळ्यांना आवडतं. ही तुपाच्या फोडणीची फारशी मसालेदार नसलेली खिचडी असते. नवर्‍याकडे हे कॉम्बी आवडत नाही. पण माझं कम्फर्ट फूड आहे.

घट्ट वरण आणि भात. ते फार कोरडं होतं म्हणून त्यात दूध घालायचं . मस्त लागतं.

तुरीच्या डाळीच्या वरणात तूप आणि मीठ-मिरपूड घालून गरम गरम सूप सारखं प्यायचं. माझे एक काका असं करायचे. त्यांचं बघून मी पण ट्राय केलं आणि आवडलं मला.

हे मला ही फार म्हणजे फार आवडतं. मला फक्त वरण कुकर मधून काढलेलं गरम लागत , गार झालेलं गरम करून नाही आवडत. लिंबू पिळते मी त्यात थोडं. हे वरण आणि पोळी पण खूप आवडतं मला.

दही भात , त्यावर शेंगदाण्याचे कोरडे तिखट आणि ते भाकरीला लावून खाणे

काही काही पदार्थ इन्ट्युइटिव्हली यमी वाटतायत. काही अगदी कसेतरीच.

इडली आणि त्यावर फक्त तूप...अप्रतिम चव लागते.
प्लस घास घेतला की आतल्या भागावर पण तूप टाकायचं थोड किंवा छोट्या वाटीत घेऊन तूप लाऊन खायचं.

You can't stop at 1

आमच्या ऑफिसमधली एक tea boy चहा करताना त्यात थोडा ग्लुकोज बिस्कीटचा चुरा घालत असे , तिचा चहा अप्रतिम असायचा.

कोक फ्लोट
मलाही फार आवडायचे ते. मुलांना आवडणे स्वाभाविक आहे.
पण तरी मुलांना देणे टाळतो. कारण त्यात कोकाकोला हा मुळातच एक वेस्ट पदार्थ असतो. मी सुद्धा त्यामुळे सोडून दिलेय.

वेळेला एकदा हाती काही नव्हतं आणि भूक खूप लागली होती तेव्हा श्रीखंड पाव खाल्ला होता, होपलेस कॉम्बिनेशन.

फ्राय अंडे. त्यातच भात परतून. थोडी डाळ. आणि तिखट शेवफरसाण.. हे माझ्या आवडीचे काँबो. रेग्युलर करतो.
हे मुख्य घटक झाले. याऊपर फ्रिजमध्ये जे जे सापडते ते ते चवीनुसार कमी अधिक प्रमाणात टाकतो.
यासोबत लिंबाचे लोणचे असले की चव वाढते.

IMG_20220729_090010.jpg

.

IMG_20220729_090031.jpg

पोहे,उपमा एकेक चमचा घेवून चहा/कॅाफीत डीप करून खायचे मला खूप आवडत. अळू आणि पोळे, लोणच्याचा खार आणि ब्रेड. आमरस आणि भात मुलगा खातो आवडीनं.
शेव/ फरसाण आणि पोळी.

माझी एक साऊथ इंडियन मैत्रीण बरं नसताना दूध- साखर - इडली खायची. तिचं कम्फर्ट फूड होतं ते. मी ट्राय करून पाहिलेलं, तितकंसं वाईट लागलं नाही.

खिचडी -थालीपीठ,
आमटी भात त्यावर तळलेला पापड, कुरडया.

Pages