हॅलो, बर्याच वर्षांपासून एक शंका आहे. आता शंका विचारायला बुद्धीमत्ता लागत नाही. हां उत्तर द्यायला कष्ट लागतात , बुद्धी, वेळ लागते हे मान्य. पण विचारतेच.
मला स्वतःला स्तोत्रे म्हणायला फार म्हणजे प्रचंड आवडते. कारण शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, नादमाधुर्य. मन गुंगून (गुंगाउन?) जाते. शिवाय मिळालेली शांती अनेक दिवस टिकते. बरेचदा मला 'अध्यात्मिक साधनेचे' झटके येतात पण ते फार काळ टिकत नाहीत. मात्र स्तोत्रांची आवड दीर्घ काळ, सातत्याने टिकलेली असल्याने त्या आवडीची हमी मी देउ शकते. (अर्थात इथे हमी हवीये कोणाला हा प्रश्न विचारु नये)
(०) माझा प्रश्न आहे - नामस्मरणाचे फायदे यावरती काही संशोधन (मोजमाप, डॉक्युमेंटेशन, पुनर्प्रयोग, ट्वीकींग करंट डॉक्युमेंटेशन बेस्ड ऑफ दोज एक्स्परीमेन्टस) वगैरे झालेले आहे का? मी करते मधेमधे प्रयत्न करते पण मला त्यात 'राम' वाटत नाही
सॉरी पीजे!
(१) तेच तेच नाम परत परत घेणे म्हणजे अक्षरक्षः 'कडबा चघळण्यासम बेचव' वाटते. बरं गोंदवलेकर महाराज म्हणतात नामाला स्वतःची गोडी नसते तुम्हाला त्यात गोडी घालावी लागते. नक्की कशी घालणार?
हां जरा चाल लावून म्हटले तर बरे वाटू शकेल.
(२) पण सतत एकच स्ट्रीम ऑफ वर्डस म्हटल्याने तासाभराने, मेंदूत कम्पल्सिव्हली तेच परत परत घुमू लागले तर कोणत्या डॉक्टरकडे धाव घ्यायची? 
(३) नाम कर्मबीजे जाळते असे म्हटले जाते परंतु पुरावा?
(४) उद्या, नामस्मरणाच्या अतिरेकाने जर ना घरका ना घाटका म्हणजे ना धड संसारात ना धड अध्यात्मात प्रगती असे होउन बसले तर?
(५) आमच्या गावात कीर्तन ग्रुप शोधले पण नाही सापडत. ऑनलाईन फक्त 'कृष्ण दासचा' ग्रुप सापडला पण अतोनात महाग आहे.
(६) कोणी म्हणेल, मग कशाला मागे लागताय, सोडून द्या. तर तेही नाही होत कारण एका कीर्तन इव्हेन्टला मी गेले होते. 'कुंडलिनी योगा' ग्रुपचा हा इव्हेन्ट होता. - https://www.youtube.com/watch?v=YQrs9zlOW1U
या इव्हेन्टमध्ये अगदी ॐ नमः शिवाय सुरु झाले आणि माझ्या डोळ्यातून अश्रूपात सुरु झाला. माझे नियंत्रण नव्हते त्यावर. धबधब्यासारखा अश्रूपात झाला. मला ते फार विचित्र वाटलेले. कारण थांबवता येत नव्हते ना अश्रूपाताचे काही कारण होते. हे मला चमत्कारीक वाटलेले.
फार अनोखा अनुभव होता.
(७) खरे तर या अनुभवाने बिचकायलाच झाले. आपल्यावरील, आपले नियंत्रण गमावणे म्हणजे काय हे पार्शली कळले. पण कुतूहल मात्र वाढून बसले.
(८) नाम घेताना बरेचदा 'वेळेचा अपव्यय' हा विचार डोक्यात येतो जो की टीव्ही पहाताना, मोबाईलवरती ब्राउझ करताना, चकाट्या पिटताना येत नाही. कारण बहुतेक डोपेमाइन. नाम घेताना, मेंदूची रिवार्ड सेंटर्स उत्तेजित होत नाहीत याउलट चकाट्या पिटताना, होत असावीत.
(९) बाकी नाम घेणे हे अकर्म आहे हे मान्य आहे. कारण त्या वेळेत आपण काहीही भलेबुरे कर्म करत नसता. नवीने कर्मबीजे पेरली जात नसतात.
(१०) मध्यंतरी असे वाचनात आलेले की 'चांगले-वाईट' दोन्ही कर्मे क्षय झालीच पाहीजेत. ऋषीमुनीही बरेचदा वर का देतात तर त्यांच्या उत्तम कर्मांचा क्षय व्हावा म्हणुन. कारण भोगावी दोन्ही लागतात - भली व बुरी दोन्ही प्रकारची कर्मे. मग पुढे संचित-प्रारब्ध-क्रियमाण या तीनही कर्मांविषयी उहापोह केलेला होता.
(११) मला तर कधी कधी वाटतं ज्यांना भौतिक जगात रेकगनिशन मिळालेले नसते, फारशी लीडरशिप नसते (= माझ्यासारखी लोकं) ते मग कुठेतरी अचिव्हमेन्टचे समाधान शोधतात. त्यांना हाच मानसिक आधार पुरेसा वाटतो की हां मी निदान अध्यात्मिक मार्गावरती अग्रेसर आहे. अर्थात हा सरसकट नियम नाही.
आस्तिक, नास्तिक, नामी, न-नामी सर्वांच्या मतांचे स्वागत आहे. फार वेळखाऊ किंवा विनाकारण काढलेला धागा वाटत असेल तर तेही मांडू शकता. उलट-सुलट पण स्वानुभव मांडले तर फारच छान. वेळ मिळेल तशी येउन प्रतिसाद चेक करत जाईन. शक्यतो धाग्यावर स्वतःचे उप प्रतिसाद देउन, धागा अर्थपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न करेन. थोडक्यात 'कोतबो' टाकून पळून जाणार नाही. ऑफिसच्या कामातून वेळ काढणार आहे. फक्त धीर धरा. इनपुटस द्या.
नामस्मरण - नाव पुन्हा पुन्हा
नामस्मरण - नाव पुन्हा पुन्हा आठवणे.
जप - एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणणे. हे नाव असेल किंवा श्लोक, मंत्र ,इ.
नामस्मरण म्हणजे प्रार्थनाच...
नामस्मरण म्हणजे प्रार्थनाच...
नुकताच रजनीश यांचा एक व्हिडिओ पहिला...
त्यात स्पष्ट म्हटलंय काही मागण्यांसाठी प्रार्थना नाही...
ज्या प्रार्थनेत अपेक्षा आहे ती देवळापर्यंत कशी पोहचेल.
फायदा शब्द जरा मिसफिट वाटला...
फायदा तोटा असा विचारच नसावा... फक्त कृतज्ञता...
निर्व्याज भावनेने प्रार्थना करावी...मला वाटतं आपली संत परंपरा ही अशीच आहे...कधीही वैयक्तिक सुखाची साधनं संतांनी पांडुरंगाला मागितली नाहीत.
नामस्मरण - नाव पुन्हा पुन्हा
नामस्मरण - नाव पुन्हा पुन्हा आठवणे.
जप - एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणणे. हे नाव असेल किंवा श्लोक, मंत्र ,इ...... छान!
श्लोक दोन ओळींचा किंवा
श्लोक दोन ओळींचा किंवा जास्तीत जास्त ४ ओळींचा पाहीलेला आहे.
मंत्राला अर्थ असेलच असे नाही उदा - गण गण गणात बोते हा मंत्र म्हणता यावा.
ॐ दुं दुर्गायै नमः
ॐ घॄणि आदित्याय नमः
यात हे दुं नामक बीज किंवा घॄणि फॉर दॅट मॅटर या शब्दांना अर्थ आहे का - नसावा.
स्तोत्रे ही 'स्तुती' शी निगडीत असावीत. हर्पांना दोन्ही शब्दांचे मूळ माहीत असेल.
भरत यांचे दोन्ही प्रतिसाद
भरत यांचे दोन्ही प्रतिसाद (श्लोक, स्तोत्र, मंत्र, नामस्मरण आणि जप यांबद्दलचे) पटण्यासारखे आहेत.
स्तोत्रे ही 'स्तुती' शी निगडीत असावीत >> अगदी बरोबर. स्तोत्र आणि स्तुती दोन्ही एकाच धातूची रूपे आहेत.
नामस्मरण - नाव पुन्हा पुन्हा
नामस्मरण - नाव पुन्हा पुन्हा आठवणे.<<
जप - एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणणे. हे नाव असेल किंवा श्लोक, मंत्र ,इ.<<
हे बरोबर!
नामस्मरण- म्हणजे माळेवर किंवा मनाने नाम घेतांना प्रत्येक नामात त्या त्या देवतेचे स्मरण ठेवणे.
आणि जप म्हणजे रिपिटेशन ऑफ नेम.पण यात प्रत्येक वेळी स्मरण असेलच असे नाही.
Pages