नामस्मरणाचे फायदे व तोटे

Submitted by सामो on 4 May, 2022 - 08:22

हॅलो, बर्‍याच वर्षांपासून एक शंका आहे. आता शंका विचारायला बुद्धीमत्ता लागत नाही. हां उत्तर द्यायला कष्ट लागतात , बुद्धी, वेळ लागते हे मान्य. पण विचारतेच.

मला स्वतःला स्तोत्रे म्हणायला फार म्हणजे प्रचंड आवडते. कारण शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, नादमाधुर्य. मन गुंगून (गुंगाउन?) जाते. शिवाय मिळालेली शांती अनेक दिवस टिकते. बरेचदा मला 'अध्यात्मिक साधनेचे' झटके येतात पण ते फार काळ टिकत नाहीत. मात्र स्तोत्रांची आवड दीर्घ काळ, सातत्याने टिकलेली असल्याने त्या आवडीची हमी मी देउ शकते. (अर्थात इथे हमी हवीये कोणाला हा प्रश्न विचारु नये)

(०) माझा प्रश्न आहे - नामस्मरणाचे फायदे यावरती काही संशोधन (मोजमाप, डॉक्युमेंटेशन, पुनर्प्रयोग, ट्वीकींग करंट डॉक्युमेंटेशन बेस्ड ऑफ दोज एक्स्परीमेन्टस) वगैरे झालेले आहे का? मी करते मधेमधे प्रयत्न करते पण मला त्यात 'राम' वाटत नाही Wink सॉरी पीजे!
(१) तेच तेच नाम परत परत घेणे म्हणजे अक्षरक्षः 'कडबा चघळण्यासम बेचव' वाटते. बरं गोंदवलेकर महाराज म्हणतात नामाला स्वतःची गोडी नसते तुम्हाला त्यात गोडी घालावी लागते. नक्की कशी घालणार? Sad हां जरा चाल लावून म्हटले तर बरे वाटू शकेल.
(२) पण सतत एकच स्ट्रीम ऑफ वर्डस म्हटल्याने तासाभराने, मेंदूत कम्पल्सिव्हली तेच परत परत घुमू लागले तर कोणत्या डॉक्टरकडे धाव घ्यायची? Sad
(३) नाम कर्मबीजे जाळते असे म्हटले जाते परंतु पुरावा?
(४) उद्या, नामस्मरणाच्या अतिरेकाने जर ना घरका ना घाटका म्हणजे ना धड संसारात ना धड अध्यात्मात प्रगती असे होउन बसले तर?
(५) आमच्या गावात कीर्तन ग्रुप शोधले पण नाही सापडत. ऑनलाईन फक्त 'कृष्ण दासचा' ग्रुप सापडला पण अतोनात महाग आहे.
(६) कोणी म्हणेल, मग कशाला मागे लागताय, सोडून द्या. तर तेही नाही होत कारण एका कीर्तन इव्हेन्टला मी गेले होते. 'कुंडलिनी योगा' ग्रुपचा हा इव्हेन्ट होता. - https://www.youtube.com/watch?v=YQrs9zlOW1U
या इव्हेन्टमध्ये अगदी ॐ नमः शिवाय सुरु झाले आणि माझ्या डोळ्यातून अश्रूपात सुरु झाला. माझे नियंत्रण नव्हते त्यावर. धबधब्यासारखा अश्रूपात झाला. मला ते फार विचित्र वाटलेले. कारण थांबवता येत नव्हते ना अश्रूपाताचे काही कारण होते. हे मला चमत्कारीक वाटलेले.
फार अनोखा अनुभव होता.
(७) खरे तर या अनुभवाने बिचकायलाच झाले. आपल्यावरील, आपले नियंत्रण गमावणे म्हणजे काय हे पार्शली कळले. पण कुतूहल मात्र वाढून बसले.
(८) नाम घेताना बरेचदा 'वेळेचा अपव्यय' हा विचार डोक्यात येतो जो की टीव्ही पहाताना, मोबाईलवरती ब्राउझ करताना, चकाट्या पिटताना येत नाही. कारण बहुतेक डोपेमाइन. नाम घेताना, मेंदूची रिवार्ड सेंटर्स उत्तेजित होत नाहीत याउलट चकाट्या पिटताना, होत असावीत.
(९) बाकी नाम घेणे हे अकर्म आहे हे मान्य आहे. कारण त्या वेळेत आपण काहीही भलेबुरे कर्म करत नसता. नवीने कर्मबीजे पेरली जात नसतात.
(१०) मध्यंतरी असे वाचनात आलेले की 'चांगले-वाईट' दोन्ही कर्मे क्षय झालीच पाहीजेत. ऋषीमुनीही बरेचदा वर का देतात तर त्यांच्या उत्तम कर्मांचा क्षय व्हावा म्हणुन. कारण भोगावी दोन्ही लागतात - भली व बुरी दोन्ही प्रकारची कर्मे. मग पुढे संचित-प्रारब्ध-क्रियमाण या तीनही कर्मांविषयी उहापोह केलेला होता.
(११) मला तर कधी कधी वाटतं ज्यांना भौतिक जगात रेकगनिशन मिळालेले नसते, फारशी लीडरशिप नसते (= माझ्यासारखी लोकं) ते मग कुठेतरी अचिव्हमेन्टचे समाधान शोधतात. त्यांना हाच मानसिक आधार पुरेसा वाटतो की हां मी निदान अध्यात्मिक मार्गावरती अग्रेसर आहे. अर्थात हा सरसकट नियम नाही.

आस्तिक, नास्तिक, नामी, न-नामी सर्वांच्या मतांचे स्वागत आहे. फार वेळखाऊ किंवा विनाकारण काढलेला धागा वाटत असेल तर तेही मांडू शकता. उलट-सुलट पण स्वानुभव मांडले तर फारच छान. वेळ मिळेल तशी येउन प्रतिसाद चेक करत जाईन. शक्यतो धाग्यावर स्वतःचे उप प्रतिसाद देउन, धागा अर्थपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न करेन. थोडक्यात 'कोतबो' टाकून पळून जाणार नाही. ऑफिसच्या कामातून वेळ काढणार आहे. फक्त धीर धरा. इनपुटस द्या.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्न पडलेच नाही पाहिजेत इतका विश्वास हवा. >> Absolutely wrong! उलट प्रश्न पडणे ही तर सर्वात पहिली पायरी आहे! कोऽहम्? हा किती आद्य आणि all encompassing प्रश्न आहे! प्रश्न पडणाऱ्या माणसांनी जरूर भारतीय तत्त्वज्ञान वाचावे असे मी म्हणेन. It offers a very holistic perspective on many things.

जिज्ञासा, त्या निमित्ताने कमिटमेंट दिली जाऊन होत असावे - असे मला वाटते (speculation)

अस्सल भारतीय कन्फॉर्मेटिव्ह अ‍ॅटिट्युड असल्याशिवाय या वाट्याला जाऊ नये. प्रश्न पडलेच नाही पाहिजेत इतका विश्वास हवा. >> Not really.
मी खूप regular आहे किंवा खूप नामस्मरण करते असे म्हणणार नाही.. पण माझा शंकेखोर स्वभाव असूनही , वेळ आल्यावर आपल्यात बदल घडतो असा अनुभव आला..

वासुदेवानंद सरस्वती (टेंभे स्वामी) ह्यांच्या चरित्रात त्यांनी नामस्मरणामुले होणारे ऐहिक फायदे दिले आहेत.
त्यातला "स्वताहातले दोष दिसणे, ते दूर करावेसे वाटणे, त्यादृष्टीने पाऊल पडणे" हा फायदा मी अनुभवाला आहे.

. You can also choose any of your favorite fictional characters! डंबलडोरचं नाव घ्या. Doesn't really matter.
>>> मी एकांतात नोरा फतेही चे नामस्मरण करिन म्हणतो Light 1

>>>>>>>>तुझ्यासाठी योग्य नामजप शोध.
तो मिळाला की कंटाळवाण होणार नाही.
ह्म्म्म!!!
>>>>>>>>पण माझा शंकेखोर स्वभाव असूनही , वेळ आल्यावर आपल्यात बदल घडतो असा अनुभव आला..
ओहके!! हां असा स्वानुभव ऐकायला आवडेल.

>>>>>निरपेक्ष कर्म
बाकी निरपेक्ष कर्म मला तरी शक्य नाहीये. किती अवघड आहे ते. साधं, मुलीनी सोन्याचं कानातलं हरवलय २ वर्षांपूर्वी, ते अजुनही खुपतं मला.

वेल सेड जिज्ञासा. असच काहीसं लिहायला आलो होतो. You said it better. इतर काही मुद्द्यांविषयी लिहितो.

मुद्दा १ : जिज्ञासांनी वर लिहिल्या प्रमाणे, नामस्मरण का करावे हे लक्षात आलं की मग ते बेचव वाटणार नाही. First conceptually, we need to understand that we are nothing but awareness and everything else are just forms. Now, the conceptual understanding of that is not enough (कळलं तरी वळावं लागतं) and namasmaran is a tool that can be used to reinforce that understanding. So focusing on namasmaran basically takes you away from other thoughts that normally make you drift off and helps you settle in the understanding that you are awareness. How are you awareness? You are not just the "one" doing the namasmaran but you are who is watching the one that's doing the namasmaran. That understanding deepens and takes root in your after a long period (relatively quickly with some people. It depends how spiritually mature you are at the point of beginning).

मुद्दा नं २: This is a bit tricky and I would strongly suggest to stop doing this practice if it is giving you a negative experience. This is true with other practices like focusing on the breath. Some people may have some other trauma or deeply hidden feelings, thoughts that sometimes start bubbling up and it actually makes things worse. Please be very careful and see a therapist if that happens. Do not experiment with these things.

मुद्दा नं ३: कर्म बीजे आणि ओवरॉल कर्म हा कॉनसेप्ट मला समजतो आणि त्याला बरच वेगळं महत्व आहे वेगवेगळ्या स्पिरिचुअल ट्र्डिशन्स मध्ये. मी कर्मापेक्षा संस्कार ह्या शब्दाला महत्व देइन. Basically, when you are born, you have a very innate sense of I/me. That sense is used as a base to later develop the ego "I/me". Whenever we do anything as a human being/man/woman (कर्म) to strengthen the ego "I/me" , I would say those are संस्कार. संस्कार ह्याचा आपण बोलीभाषेत बोलताना वेगळा अर्थ घेतो, हा तो अर्थ नाही.
Whatever spiritual practices you do to try and loosen up this very rigidly formed sense of the ego I/me, will try and wipe out the संस्कार that happened to strengthen them. If we extend that example, then we can say any spiritual practices can also wipe out karma. This is just to prove the correlation but personally I don't believe in the concept of karma, especially from past lives etc.

मुद्दा नं ४: Like I said above in point number 2. If you (I mean anyone for that matter) are known to have psychological issues/mental health issues then do not experiment. But if you don't have any problems and practicing namasmaran gives you positive feelings then there is no need to worry. A lot of simple practices have shown to bring a lot of peace in everyday life as the basis of them is to look through the chaos of life and find peace. Any practice that makes you miserable cannot be a true spiritual practice.

मुद्दा नं ६: I have read a little about kundalini yoga and awakening. This is another thing that should not be experimented with. I don't know enough to say how or what happens but have read some really weird experiences. Not sure how much were true but overall, I didn't have a good feeling about it.

मुद्दा नं ८: खरं तर अपव्यय नाही होत माझ्यामते. आपल्या डोक्यात एका वेळी २-३ तरी गोष्टी करायची क्षमता असते आणि त्यातलं एक स्टेशन जर नामस्मरणाला लावलं तर फायदा होउ शक्तो. पण परत तुम्ही नामस्मरणाबरोबर इतर कुठली कामं करत आहात त्यावर ते अवलंबून आहे. आकडेमोड, किंवा अनॅलिसिस करायचं असेल तर ते आणि नामस्मरण जमणार नाही. त्यावेळी त्या एका कामावर फोकस करुन ते झाल्यावर परत नामस्मरण करणे योग्य ठरेल.

मुद्दा नं ११: That's an honest thought. Kudos to you for being honest with yourself. It makes sense and it may be the beginning of your spiritual journey but as you progress you start realizing that the recognition you were craving for is not the only way to be happy. As you make more progress, you may just start feeling comfortable in the situation you are. This is why not just people who lack recognition go on to this path but people who are wildly successful also start realizing that their success didn't necessarily gave them the happiness they expected. Good luck! Happy

>>>>>>>This is another thing that should not be experimented with.
अगदी अगदी.

संस्कारांचा अर्थ तुम्हाला म्हणायचाय तो कळला मला. जी सूक्ष्म आयडेंटिटी निर्माण होत जाते, crystallization ऑफ मल्टिपल फॅसेटस ऑफ परसनॅलिटी- आपली लिमिटेशन्स, बलस्थाने, मर्यादा आदिं बद्दलची एक निश्चितता, स्वतःचेच स्वतःला, लेबलिंग.
म्हणजे हॅबिच्युअल पॅटर्न्स म्हणा.

वैद्यबुवा आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल खूप आभार.

>>>That's an honest thought. Kudos to you for being honest with yourself. It makes sense and it may be the beginning of your spiritual journey but as you progress you start realizing that the recognition you were craving for is not the only way to be happy. ................. they expected. Good luck!
धन्यवाद!! हे मी केलेले मनोविश्लेषण आपल्यालाही योग्य वाटते. असे असूही शकेल अशी पुष्टी. त्याबद्दल धन्यवाद.

>>>>>>>psychological issues/mental health issues then do not experiment.
बरोबर आहे. मी स्तोत्रे जर जास्त वेळ म्हटली तरी वाईट स्वप्ने पडतत. एकदा नाही दोनदा नाही हे १० वेळा अनुभवलेले आहे.

>>>>>>This is true with other practices like focusing on the breath. Some people may have some other trauma or deeply hidden feelings, thoughts that sometimes start bubbling up and it actually makes things worse.
अगदी खरे आहे. विपश्यनाही सर्वांकरता नसते असे ऐकलेले आहे.

नाम गुरुकडून घेण्याची प्रथा आहे. शोधली चार पाच नामं आणि केलं सुरू असं नसतं हे महाराजांची चरित्रं ( मराठीत अशी पन्नासच्या वर आहेत.) वाचल्यावर कळतं.

नामस्मरण हा भक्ती मार्गातील एक प्रकार. तो गुरु ठरवतो आणि केव्हा नाम द्यायचे तेही. शेवटी म्हटलं "विपश्यनाही सर्वांकरता नसते असे ऐकलेले आहे." तसंच नामस्मरणाचं आहे.

क्रमांक (८) च्या विरूद्ध उद्देश आहे. वेळेचा अपव्यय होण्यासाठीच असतं. मनुष्यास स्मरणशक्ती अधिक आहे. त्यातून पूर्वीच्या घटना आठवणीतून मुक्तिसाठी.

नामस्मरणात कोणते नाम घेतात याची चर्चा करत नाहीत, गुप्त ठेवतात. कारण श्रद्धेवर चर्चा नसते.

>> You can also choose any of your favorite fictional characters! डंबलडोरचं नाव घ्या. Doesn't really matter.
>> शोधली चार पाच नामं आणि केलं सुरू असं नसतं

माझ्यासारख्या नवख्यासाठी यातलं कुठलं मत ग्राह्य धरायचं?

>> जेव्हा नामस्मरणाचा हेतू जर निरपेक्ष कर्म करण्याची सवय लागावी असा असेल तेव्हा मग ते घेता येईल
>> क्रमांक (८) च्या विरूद्ध उद्देश आहे. वेळेचा अपव्यय होण्यासाठीच असतं

जर नामस्मरणाचा हेतू निरपेक्ष (निरर्थक?) कर्म करुन वेळेचा अपव्यय करणं हाच असेल तर एक किलो गव्हात किती दाणे असतात हे मोजायला सुरुवात केलेली चालेल का? जसजसे दिवस जातील तसतसं ज्वारी, नाचणी, खसखस अशी प्रगती करता येईल.

प्रश्न उपरोधिक वाटले तरी इथली चर्चा वाचुन मला खरोखरच पडलेले प्रश्न आहेत हे.

वैद्यबुवा, उत्तम पोस्ट!
Srd, गुरूचे मार्गदर्शन आणि दीक्षा मिळाली तर उत्तमच. पण त्याशिवाय तरणोपाय नाही असे नाही. मरा मरा म्हणून वाल्याचा वाल्मिकी झालाच. आपल्यापाशी जे सारे ग्रंथ आहेत ते आपल्या पूर्वसुरींना झालेले ज्ञान आहे. त्या ग्रंथांना गुरू मानून सुरूवात करायला हरकत नाही. अर्थात वैद्यबुवांनी त्यांच्या पोस्ट मध्ये यातले धोके मांडले आहेत ते लक्षात घेऊनच!

व्यत्यय, का नाही! नामस्मरणासाठी वेगळा वेळ काढावाच असे कुठे म्हटलेले नाही. उलट जसजसे नामस्मरण सहज होईल तसे ते श्वासोच्छ्वासाइतके involuntary होते/व्हावे. बुवांनी म्हटले आहे तसे मूळ मुद्दा awareness चा आहे. आपण दैनंदिन कर्मात आणि इच्छा अपेक्षांच्या जंजाळात इतके गुंतत जातो की त्यापासून अलिप्त होणे कठीण होते. त्यासाठी नामस्मरण उपयोगी पडते.
सुखदुःख समे कृत्वा धर्माधर्मौ जयाजयौ अशी स्थितप्रज्ञता गाठता यावी असा उद्देश असतो. सुख आणि दुःख, जय पराजय दोन्ही क्षणभंगुर आहेत आणि सत्य हे त्यापलीकडे आहे ही जाणीव आपल्याला नाम करून देते.
जितके आपण वाचू तितके एकं सत् विप्राः बहुधा वदंति.. सगळ्या संतवचनांमध्ये कशी एकवाक्यता आहे हे जाणवतं! It's fun!

नामस्मरणाने मानसिक स्वास्थ्य लाभत असावे, चित्त एकाग्र होत असावे असे वाटते.

देव असा जगात कोणी नाही. पण जसे देवावर विश्वास ठेवल्याने आयुष्य जगायची उमेद मिळते, आत्मविश्वास वाढतो तसेच असावे.

काही लोकं देवाच्या जास्त आहारी जाऊन आपले नुकसान करून घेतात तसाच धोका नामस्मरणाकडून भलत्याच अपेक्षा ठेऊन त्याच्या आहारी गेलेल्यांनाही असावा.

नामस्मरणावर विश्वास ठेवणाऱ्यांचा पिंड आस्तिकांचा असावा. कारण जे करतोय त्यावर विश्वास आणि श्रद्धा गरजेची. नास्तिक लोकं नामस्मरणातून जे फायदे मिळतात ते मिळवण्यासाठी वेगळे मार्ग अवलंबवत असावेत. ईतरांचे ऐकून नाही तर स्वत:ला जे सोयीस्कर वाटेल ते निवडत असावेत.

उलट जसजसे नामस्मरण सहज होईल तसे ते श्वासोच्छ्वासाइतके involuntary होते/व्हावे. बुवांनी म्हटले आहे तसे मूळ मुद्दा awareness चा आहे.

पण नामस्मरण involuntary झाले म्हणजे त्याबद्दलचा awareness शिल्लक राहिला नाही ना?

एकुणातच ही माहिती मला गोल गोल काहीतरी ज्ञान दडपून देण्यातली वाटली.

अमितने लिहिल्यानुसार "अस्सल भारतीय कन्फॉर्मेटिव्ह अ‍ॅटिट्युड असल्याशिवाय या वाट्याला जाऊ नये. प्रश्न पडलेच नाही पाहिजेत इतका विश्वास हवा." यावर विश्वास बसतोय

व्यत्यय, अहो श्वासोच्छ्वासाइतके ही उपमा आहे. You are aware every second of life असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. 24*7 म्हणून श्वासाची उपमा दिली. तुमची शंका बरोबर आहे पण तिला उत्तर आहे. तुम्हाला पटले तर छानच.

ऋन्मेष, अर्थात. अनेक रूढार्थाने नास्तिक लोक हे बऱ्यापैकी संतवृत्तीचे असतात. देव न मानण्याने काही फरक पडत नाही.

>>> सुखदुःख समे कृत्वा धर्माधर्मौ जयाजयौ
धर्माधर्मौ नव्हे, लाभालाभौ. (धर्म आणि अधर्मातला फरक कळला नाही तर सगळंच मुसळ केरात, नाही का?)

अर्र! धन्यवाद स्वाती! आता संपादनाची वेळ टळून गेली:( जरा नीट गुगल करून लिहायला हवं होतं. माझ्या लक्षात असलेला श्लोक चुकीचा आहे हे तरी या निमित्ताने कळलं!
(धर्म आणि अधर्मातला फरक कळला नाही तर सगळंच मुसळ केरात, नाही का?) >> खरं आहे! थिअरीच्या बिगरीत असल्याचे परिणाम!

>>>>>धर्माधर्मौ नव्हे, लाभालाभौ. (धर्म आणि अधर्मातला फरक कळला नाही तर सगळंच मुसळ केरात, नाही का?)
सिक्सर!!! सुपरकुल. नेमके.

>>>>>>>खरं आहे! थिअरीच्या बिगरीत असल्याचे परिणाम!
जिज्ञासा ठीक आहे. कोणीच इथे फार वरच्या यत्तेत नाही. होता है. प्रतिसाद आवडले तुमचे.

देव असा जगात कोणी नाही.
>>> असे मलाही वाटायचे... आणि भूत हि नसते असेही... पण भुताचा अनुभव आला... नात्यातील पाच वर्षाची मुलगी... आता अँटीमॅटर आहे मग मॅटर असणारच.. त्यामुळे देव असावा...

देव असा जगात कोणी नाही.
>>> असे मलाही वाटायचे... आणि भूत हि नसते असेही... पण भुताचा अनुभव आला... नात्यातील पाच वर्षाची मुलगी... आता अँटीमॅटर आहे मग मॅटर असणारच.. त्यामुळे देव असावा...

हाहाहा
च्रप्स सां गा ना किस्सा

भूत एकवेळ असू शकते यावर माझाही विश्वास आहे. म्हणजे दुष्ट अतृप्त आत्मा वगैरे किंवा कुठलीही अमानवीय गूढ शक्ती जिचे आपण काही उखाडू शकत नाही. त्यामुळे भूताला मी सुद्धा घाबरतो. पण आपल्या कर्मांचा हिशोब ठेवून आपले भले बुरे करायला कोणी देव वगैरे बसलाय हे काही पटत नाही. माणसाच्या डोक्यातली एक संकल्पना आहे देव.

आपल्या कर्मांचा हिशोब ठेवून आपले भले बुरे करायला कोणी देव वगैरे बसलाय >> तो देव नव्हे. चित्रगुप्त म्हणतात त्याला. चित्रगुप्तावर विश्वास नाही असं म्हणता येईल. Happy

Pages