नामस्मरणाचे फायदे व तोटे

Submitted by सामो on 4 May, 2022 - 08:22

हॅलो, बर्‍याच वर्षांपासून एक शंका आहे. आता शंका विचारायला बुद्धीमत्ता लागत नाही. हां उत्तर द्यायला कष्ट लागतात , बुद्धी, वेळ लागते हे मान्य. पण विचारतेच.

मला स्वतःला स्तोत्रे म्हणायला फार म्हणजे प्रचंड आवडते. कारण शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, नादमाधुर्य. मन गुंगून (गुंगाउन?) जाते. शिवाय मिळालेली शांती अनेक दिवस टिकते. बरेचदा मला 'अध्यात्मिक साधनेचे' झटके येतात पण ते फार काळ टिकत नाहीत. मात्र स्तोत्रांची आवड दीर्घ काळ, सातत्याने टिकलेली असल्याने त्या आवडीची हमी मी देउ शकते. (अर्थात इथे हमी हवीये कोणाला हा प्रश्न विचारु नये)

(०) माझा प्रश्न आहे - नामस्मरणाचे फायदे यावरती काही संशोधन (मोजमाप, डॉक्युमेंटेशन, पुनर्प्रयोग, ट्वीकींग करंट डॉक्युमेंटेशन बेस्ड ऑफ दोज एक्स्परीमेन्टस) वगैरे झालेले आहे का? मी करते मधेमधे प्रयत्न करते पण मला त्यात 'राम' वाटत नाही Wink सॉरी पीजे!
(१) तेच तेच नाम परत परत घेणे म्हणजे अक्षरक्षः 'कडबा चघळण्यासम बेचव' वाटते. बरं गोंदवलेकर महाराज म्हणतात नामाला स्वतःची गोडी नसते तुम्हाला त्यात गोडी घालावी लागते. नक्की कशी घालणार? Sad हां जरा चाल लावून म्हटले तर बरे वाटू शकेल.
(२) पण सतत एकच स्ट्रीम ऑफ वर्डस म्हटल्याने तासाभराने, मेंदूत कम्पल्सिव्हली तेच परत परत घुमू लागले तर कोणत्या डॉक्टरकडे धाव घ्यायची? Sad
(३) नाम कर्मबीजे जाळते असे म्हटले जाते परंतु पुरावा?
(४) उद्या, नामस्मरणाच्या अतिरेकाने जर ना घरका ना घाटका म्हणजे ना धड संसारात ना धड अध्यात्मात प्रगती असे होउन बसले तर?
(५) आमच्या गावात कीर्तन ग्रुप शोधले पण नाही सापडत. ऑनलाईन फक्त 'कृष्ण दासचा' ग्रुप सापडला पण अतोनात महाग आहे.
(६) कोणी म्हणेल, मग कशाला मागे लागताय, सोडून द्या. तर तेही नाही होत कारण एका कीर्तन इव्हेन्टला मी गेले होते. 'कुंडलिनी योगा' ग्रुपचा हा इव्हेन्ट होता. - https://www.youtube.com/watch?v=YQrs9zlOW1U
या इव्हेन्टमध्ये अगदी ॐ नमः शिवाय सुरु झाले आणि माझ्या डोळ्यातून अश्रूपात सुरु झाला. माझे नियंत्रण नव्हते त्यावर. धबधब्यासारखा अश्रूपात झाला. मला ते फार विचित्र वाटलेले. कारण थांबवता येत नव्हते ना अश्रूपाताचे काही कारण होते. हे मला चमत्कारीक वाटलेले.
फार अनोखा अनुभव होता.
(७) खरे तर या अनुभवाने बिचकायलाच झाले. आपल्यावरील, आपले नियंत्रण गमावणे म्हणजे काय हे पार्शली कळले. पण कुतूहल मात्र वाढून बसले.
(८) नाम घेताना बरेचदा 'वेळेचा अपव्यय' हा विचार डोक्यात येतो जो की टीव्ही पहाताना, मोबाईलवरती ब्राउझ करताना, चकाट्या पिटताना येत नाही. कारण बहुतेक डोपेमाइन. नाम घेताना, मेंदूची रिवार्ड सेंटर्स उत्तेजित होत नाहीत याउलट चकाट्या पिटताना, होत असावीत.
(९) बाकी नाम घेणे हे अकर्म आहे हे मान्य आहे. कारण त्या वेळेत आपण काहीही भलेबुरे कर्म करत नसता. नवीने कर्मबीजे पेरली जात नसतात.
(१०) मध्यंतरी असे वाचनात आलेले की 'चांगले-वाईट' दोन्ही कर्मे क्षय झालीच पाहीजेत. ऋषीमुनीही बरेचदा वर का देतात तर त्यांच्या उत्तम कर्मांचा क्षय व्हावा म्हणुन. कारण भोगावी दोन्ही लागतात - भली व बुरी दोन्ही प्रकारची कर्मे. मग पुढे संचित-प्रारब्ध-क्रियमाण या तीनही कर्मांविषयी उहापोह केलेला होता.
(११) मला तर कधी कधी वाटतं ज्यांना भौतिक जगात रेकगनिशन मिळालेले नसते, फारशी लीडरशिप नसते (= माझ्यासारखी लोकं) ते मग कुठेतरी अचिव्हमेन्टचे समाधान शोधतात. त्यांना हाच मानसिक आधार पुरेसा वाटतो की हां मी निदान अध्यात्मिक मार्गावरती अग्रेसर आहे. अर्थात हा सरसकट नियम नाही.

आस्तिक, नास्तिक, नामी, न-नामी सर्वांच्या मतांचे स्वागत आहे. फार वेळखाऊ किंवा विनाकारण काढलेला धागा वाटत असेल तर तेही मांडू शकता. उलट-सुलट पण स्वानुभव मांडले तर फारच छान. वेळ मिळेल तशी येउन प्रतिसाद चेक करत जाईन. शक्यतो धाग्यावर स्वतःचे उप प्रतिसाद देउन, धागा अर्थपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न करेन. थोडक्यात 'कोतबो' टाकून पळून जाणार नाही. ऑफिसच्या कामातून वेळ काढणार आहे. फक्त धीर धरा. इनपुटस द्या.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख वाचनीय आहे.बराचसा वाचला.बराचसा डोक्यावरून गेला.
तर नामस्मरणाचा माझ्या मते फायदा म्हणजे अस्थिर मनाला तात्पुरते स्थिरवणे हा असावा.काही वर्षांपूर्वी मी काही अडचणींमुळे सैरभैर झाले होते.त्यावेळी walking करताना एक जप म्हणत असे.जास्त नाही 21 वेळच.पण नंतर लक्षात आले की शांत वाटतेय.एका प्रकारे विचारांचे diversion होते.बाकी पाप पुण्य वगैरे भानगडीत अजिबात पडणार नाही.

तोटा म्हणाल तर काहीजण जप करताना बोलत नाहीत ,बसले असता दार उघडायला उठत नाहीत.मग बाहेर माणूस ताटकळत का राहिना! माझ्या मैत्रिणीने ,तिच्या सासर्यांना असेच दाराबाहेर ठेवले namasmrnapayi.

अर्र्र चेक नाही केले.
- https://www.maayboli.com/node/80402 - नामस्मरण:सल्ला हवा आहे.
https://www.maayboli.com/node/53180 - नामस्मरण व त्याचे फायदे

हे दोन सापडले Sad
शेतकरी-नारद कथा मस्त आहे.

>>>>>>>काही वर्षांपूर्वी मी काही अडचणींमुळे सैरभैर झाले होते.त्यावेळी walking करताना एक जप म्हणत असे.जास्त नाही 21 वेळच.पण नंतर लक्षात आले की शांत वाटतेय
हां २१ वेळाच म्हणजे प्रमाणात करायचात. हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे खरा. ते प्रमाणात/ मात्रेत करायचे असते असे ऐकून आहे. औषधाप्रमाणे.

10-१२ महिन्यांपासून एक मंत्र जपत आहे.अर्थात बरेचदा जपले गेले नाही.कंटाळा आला.पण मैत्रिणीने अगदी सालस आग्रह केला.तिच्या शब्दाला किंमत म्हणून जप करते.पण मला जितक्या वेळ शक्य होईल तितकाच वेळ करते.केला नाही तर रुखरुख बिलकुल वाटत नाही.बघू किती दिवस करू शकते ते.

२१ वेळाच म्हणजे प्रमाणात करायचात...कसले प्रमाण कप्पाळ!विश्वास नव्हता आणि जास्त वेळ करू शकले नसते इतकेच.

>>>>>>कसले प्रमाण कप्पाळ!विश्वास नव्हता आणि जास्त वेळ करू शकले नसते इतकेच.
हाहाहा
मी उत्साहाने एक जपमाळ घेतली होती पण मग नियम पाहीले की अंगठा व अनामिकेतच पकडायची. स्वतःकडे ओढायचे मणी का उलटे - आय मीन काहीतरी एक होते - आता आठवत नाही.
मग मेरुमणी आला की ओलांडायचा नाही. परत उलटे जायचे वगैरे.

ते सर्व क्लिष्ट नियम वाचले व जप केलाच नाही. ती माळ आता धूळ खात पडलेली आहे कुठेतरी.

ओह ओके. इन्टरेस्टिंग. पण या बाह्योपचारात अडकून, कर्मकांडात अडकून मूळ उद्देश दूरच रहातो?
बरं मूळ उद्देश काय आहे? कर्मबीजांचा र्‍हास? ते कसे कळते की किती बुवा घटलेत किती वाढतायत? Sad

मी सुद्धा देवकीच्या बोटीत आहे. सेम असच मत आहे माझं. मला बेचैन वाटायला लागलं तर रामरक्षा म्हणते. पण नियम असा काहीच नाही.

अगं रामरक्षा वेगळी त्यात मन रमतं. पण श्रीराम जय राम जय जय रामा Sad मला तरी अतोनात कंटाळा येतो.
रामरक्षेत 'आरुह्य कविता-शाखां वन्दे वाल्मीकि-कोकिलम" वगैरे उत्तमोत्तम उपमा आहेत की कवितारुपी वॄक्षावरती रामनाम गात बसलेल्या वाल्मिकीरुपी को़किळास मी वंदन करते.
ते मजा येत वाचताना.
पण राम-राम-राम किंवा ॐ नमः शिवाय?

त्यातही मला ॐ नमः शिवायचा त्रास होत नाही. रामनामाचा चक्क त्रास होतो. ॐ दुं दुर्गायै नमः चा अजिबात त्रास तर होतच नाही आय कॅन गो ऑन फॉरेव्हर!

एक मैत्रिण म्हणाली रामनामाने, हीट वाढत असेल याउलट शंकराचे नाव शीतल असते. आता हे संशोधन कुठे झालेले आहे? बरं संशोधन तर नाही तर नाही पण कोणत्या धर्मग्रंथात मला तरी आठवत नाही वाचलेले की अमके शीतळ, तमके उष्ण.

रिपीटेशनमुळे मन शांतवत असेल जसं मंडल रंगवताना, विणकाम करताना तंद्री लागते तसं. सहजसमाधी. यामुळे वेडेवाकडे विचार करणार्या मेंदूला जरा ताळ्यावर येण्यास मदत होत असणार.

तुला नामस्मरण करायला आवडतं आणि ते का आवडतं हे ही लिहिलं आहेस तर त्याच्या फायद्या तोट्याचा विचार का करायचा? तुला त्याने बरं वाटत असेल तर करत रहा ना? रोज एकच म्हणायचा कंटाळा आला तर दिवस ठरवून घे कोणत्या दिवशी काय म्हणायचं ते.

मामी शक्य आहे.
----------
सायो बरोबर आहे ज्यांना आवडते त्यांनी जरुर म्हणावे.
---------
शर्मिला स्तोत्रांनी शांत वाटते हे मात्र मनाचे खेळ नाहीत. आवड आहे हे नक्की. आणि अनेकदा अनुभव आलेला आहे. मला तर कधी कधी वाटतं ज्यांना भौतिक जगात रेकगनिशन मिळालेले नसते, फारशी लीडरशिप नसते (= माझ्यासारखी लोकं) ते मग कुठेतरी अचिव्हमेन्टचे समाधान शोधतात. त्यांना हाच मानसिक आधार पुरेसा वाटतो की हां मी निदान अध्यात्मिक मार्गावरती अग्रेसर आहे. अर्थात हा सरसकट नियम नाही.

Samo tumhi lekhan vichar purvak karta. Lekhan shaili mala avdate. Ha lekh vachun tumchya sarkhe ch prashn mala hi padle ahet. Pan mazya gharat mazya aai cha ani sasu cha prachand vishwas ahe nam smarana var. Mala nam jap satatyane karta yet nahi pan adhun madhun karat aste . Baki lihit raha.... Tumcha likhan Mala avdta.
Marathi typing la khup vel jato mhanun English madhe kele ahe.

https://www.facebook.com/varsha.lad

या ताईनी नामस्मरण या एकाच विषयावर 37 भागांची लेखमालिका लिहिली आहे. हे सगळे भाग आणि त्याखाली ऑलरेडी झालेली प्रश्नोत्तरे वाचून झाल्यावर देखील या विषयावर काही शंका उरली आहे असा माणूस माझ्या(तरी) पाहण्यात नाही.

ता.क. हे भाग वाचूनही मनात काही शंका उरल्यास त्या फेसबुकवर ऍक्टिव्ह असल्याने लगेच उत्तरे देतात.

नाम इज लाईक किस... असं करावं की तसं करावं, हिथं करावं का तिथं करावं... उगा जास्त प्रश्न विचारू नये. करून मोकळं व्हावं नि नाही केलं तरी सग्गळं नीट होतं हे ही लक्षात ठेवावं... Wink

सामो, यूट्युब वर तत्वज्ञानाचे प्रोफेसर पू. बाबा बेलसरे यांची प्रवचने ऐका. नामस्मरणाबद्दलच्या सगळ्या शंका दूर होतील.
इथेही प्रवचने सापडतील.
https://youtube.com/channel/UCY_emXnfrW1ZgYDyq8wEhwg

या गुगल ड्राइव्हवर दिलेली नामसाधना शिबिर आणि पुण्यतिथी उत्सवांतील प्रवचने जरूर ऐक.
https://drive.google.com/drive/u/0/mobile/folders/0B9j4FxXG_IXxb2NRYUZ2R...

समो, रामनाम च कर असे कुणी सांगितले?
मला स्वत:लला रामनाम खूप वेळ (म्हणजे ५-१० मिनिट ;)) घेतलं की डोक dukhaayach.

स्वामींच्या नावाचा जप सुरू केला तर अस काहीच होत नाही.

आ आई ने ओम गं गणपतये प्रयत्न केला जमलं नाही.. पण रामनाम जमल.

जे जमेल ते, जमेल तितकं करावं.
नंतर जप होत र हात असेल तर उत्तमच की!
आपोआप होतोय!

नानबा, आर्या धन्यवाद.
आर्या बेलसरे यांचे बरेच साहित्य वाचलेले आहे. त्यांनी नामस्मरणाबद्दल बरच काही 'प्रो' असे लिहीलेले आहे. मान्य आहे.
पण मग मला 'नकोसे' का वाटते. नॉट शुअर. असो.

फळाची इच्छा न धरता कर्म करावे हा बेसिक नियम आहे जो पाळायला सर्वात कठीण आहे. आता अत्यंत हार्मलेस नाम घेण्यासाठी देखील आपल्याला कर्मफल काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा होत असेल तर आपल्याला बेसिक नियम पुन्हा एकदा समजून घेतला पाहिजे.
मी स्तोत्र म्हणते कारण मला त्यातून आनंद मिळतो असे असेल तर ज्या दिवशी तो आनंद मिळणे बंद होईल तेव्हा मग पंचाईत होईल!
ही व्यक्तीगत टिप्पणी नाही तर कळलेली थिअरी उदाहरणातून मांडण्याचा प्रयत्न आहे.
मला झालेले आकलन असे की कर्मफलाची आसक्ती सुटावी यासाठी नाम घ्यायचे. का तर नामस्मरणाने काहीही दृश्य फलप्राप्ती होत नाही. It's a good way to decouple कर्म आणि फल. नाम देवाचे घ्यायचे कारण ती एक immaterial entity (सुक्ष्मतम) आहे. You can also choose any of your favorite fictional characters! डंबलडोरचं नाव घ्या. Doesn't really matter.
Once you are able to decouple कर्म आणि फल using नामजप, you can extend this exercise to more materialistic actions (कर्म) in daily life and see if you can perform them without any expectations. हा एवढा द्राविडी प्राणायाम का करायचा कारण मनःशांती बिघडण्याचे मुख्य कारण हे कर्म नसून कर्मफलाची आसक्ती हे आहे. एकदा ती सुटली की मग नंद्या यांच्या भाषेत "मौजा ही मौजा".
So नामस्मरण is a toolkit to practice decoupling of karma and fal.
ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या हरिपाठात नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे.
बेलसरे यांची सार्थ हरिपाठ नावाची छोटीशी पुस्तिका आहे. फारच सुरेख आहे!

>>>>>जो पाळायला सर्वात कठीण आहे.
सत्य आहे.
>>>>>आता अत्यंत हार्मलेस नाम
नाही तोच प्रश्न आहे जिज्ञासा, की अति नाम घेतल्याने ते मनात्/मेंदूत अ‍ॅबनॉर्मली, घुमत रहातं का? बरं ती परीक्षा कोण पहाणार Sad वेळेचा अपव्यय होतो का? की मला काही मौल्यवान मिळेल त्यातून? आय अ‍ॅम वेइंग प्रोज & कॉन्स.
कोणाचे काय अनुभव आहेत?
माझा स्वतःचा अनुभव वरती लिहीलेला आहे - नामस्मरण मला बेचव कडबा चघळल्यासारखे वाटते.
मग त्या दिवशी कीर्तनात अश्रूपात झाला त्याचे रहस्य काय?
असे काही प्रश्न आहेत.
>>>>>.मी स्तोत्र म्हणते कारण मला त्यातून आनंद मिळतो असे असेल तर ज्या दिवशी तो आनंद मिळणे बंद होईल तेव्हा मग पंचाईत होईल!
होय! बंद केले जाइल.

प्रश्न पडणार असतील, सारासार बुद्धी जागृत रहाणार असेल तर हे धंदे कशाला करायचे? अस्सल भारतीय कन्फॉर्मेटिव्ह अ‍ॅटिट्युड असल्याशिवाय या वाट्याला जाऊ नये. प्रश्न पडलेच नाही पाहिजेत इतका विश्वास हवा. ठेविले अनंते तैसेची रहावे! :आयरोल:
>>होय! बंद केले जाइल.>> गुड. पर्स्युट ऑव्ह हॅपिनेस सगळ्यात महत्त्वाचा.

सामो, नामस्मरणाने काही मौल्यवान मिळत नाही आणि वेळेचा अपव्यय होतो असे वाटत असल्यास ते घेऊ नयेच (कारण ते खरेच आहे!) जेव्हा नामस्मरणाचा हेतू जर निरपेक्ष कर्म करण्याची सवय लागावी असा असेल तेव्हा मग ते घेता येईल. कारण मग फायदे तोटे असा प्रश्नच पडणार नाही!

अवांतर - नामस्मरणाच्या नावाखाली जे वह्यांवर वह्या भरुन काढण्याचे कुटीरउद्योग चालतात ना ते पाहिले की हसावे की रडावे हेच कळत नाही. सुक्ष्म नामाला जडरूपात आणण्याचा खटाटोप का करायचा? It is beyond me.

छान लेख आहे. आधीचे धागे असले तरी वेगळा धागा काढायला हरकत नाही.
कारण ज्यांना नामस्मरणात रस नाही ते धाग्यावर फिरकणार नाहीत. आणि ज्यांना नामस्मरणात रस आहे ते पुन्हा पुन्हा तेच वाचायला कंटाळणार नाहीत Happy

सी यांचा प्रतिसाद फार आवडला आहे. नामस्मरण म्हणजे किस. हे आता मी किस करताना लक्षात ठेवणार आणि पुन्हा पुन्हा करणार Happy

नामस्मरणाच्या नावाखाली जे वह्यांवर वह्या भरुन काढण्याचे कुटीरउद्योग चालतात ना...
>>>>
सी लॉजिक नुसार ते व्हॉटसपवर किसची ईमोजी पाठवण्यासारखे झाले. एखाद्याला येत असेल त्यातही मजा तर करू द्यावी Happy

Pages