दूध
GMS powder
मिल्क पावडर
व्हिप क्रिम
साखर
कॉर्न फ्लोर
१) अर्धा लिटर म्हशीचे दूध
२) पाच टी स्पून साखर लागते. ( योग्य सौम्य गोडपणा येईल.)
३) एक टी स्पून GMS पावडर
४) एक टी स्पून कॉर्न फ्लोर
क्रमांक (३) आणि (४) बर्फाचे खडे होऊ नये यासाठी आहे. वाढवू नये.
यातून चांगला बेस तयार होतो.
रंग आणि फ्लेवर
फुड कलरचे पाच थेंब.
वनिला केल्यास दहा थेंब.
दुधाचे आईस्क्रीम
म्हणजे Softy किंवा फुसफुस.
Softy चा बेस बनवायचे साहित्य.
फोटो (१)
अर्धा लिटर म्हशीचं दूध,
GMS powder,
कॉर्न फ्लोर,
मिल्क पावडर.
थोड्या दुधात केशर विरघळवून रंगासाठी. किंवा फूड कलरचे दोन थेंब नंतर टाकायचे.
बेस
फोटो (२)
हे सर्व एकत्र करून शिजवून थोडे खळीसारखे करून घ्यायचे
हा बेस प्लास्टिक डब्यात ओतून फ्रिझरात पाच तास ठेवल्यावर दगड होतो.
हा घट्ट बेस एका मोठ्या पातेल्यात घेऊन इलेक्ट्रिक ब्लेंडर फिरवत ठेवायचा. दहा मिनिटांनी बेस फुगून दुप्पट अडिचपट होईल. [ही कृती न थांबता करावी लागते अन्यथा फुललेला बेस जातो. मग पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवून करावा लागतो.]
फोटो (३)
रंग /सुगंध टाकणे. टेक्शरमध्ये बदल करणे.
दोन तीन थेंब फुड कलर आणि दोन चार थेंव फुड एसन्स टाकून अर्धा मिनिट फिरवायचे. वेलची पावडर, व्हिप क्रीम टाकले आहे. इथे थोडे पनीर, टाकले आहे. पनीरने softy ला घट्टपणा येतो आणि कुल्फीसारखे होते. घरी ताजे पनीर बनवून लगेच वापरायचे.
फोटो (४)
ते ब्लेंडरने फुगवलेल्या बेसमध्ये टाकून
फोटो (५)
ट्रेमध्ये लगेच मोठ्या प्लास्टिक डब्यात पसरवून फ्रिझरमध्ये ठेवा.
फोटो (६)
ट्रेमध्ये तयार झालेले आईस्क्रीम.
पाच तासांनी सेट झाल्यावर स्कूपने काढून खायला तयार. #किंवा बिस्किट कोन तयार मिळतात त्यात टाकून मुलांना देता येईल.
फोटो (७)
कपात टाकून द्या
फोटो (८)
GMS powder
बाजारातील सॉफ्टीसारखे लागते पण फारच कृत्रिम चव असते. पनीर मिसळल्यास कुल्फीसारखे होते.
सॉफ्टी हलके असते. थोड्या दुधात बरेच होते पण थोडे पिठुळ लागते. तरीही मुलांना आवडते.
छान रेसिपी
छान रेसिपी
मस्त दिसतेय ही सुद्धा..
मस्त दिसतेय ही सुद्धा..
वाह, छान.
वाह, छान.
वाह, छानच.
वाह, छानच.
मी पूर्वी आईसक्रीम बनवायचा
मी पूर्वी आईसक्रीम बनवायचा क्लास केला होता.
जीएसएम सीएमसी मिल्कपावडर आणि काॅ. फ्लो. घालून आइस्कीम बनवत असे. भरपूर प्रकारची.
लेक लहान होती तेव्हा. तिला एकदा कुणीतरी विचारलं की तुला आईसक्रीम आवडतं का?
तर म्हणाली...
आईनं क्लास करायच्या आधी खूप आवडायचं आता नाही आवडत.
बरोबर. जेव्हा समारंभांतून
बरोबर. जेव्हा समारंभांतून तीनरंगी जॉय आईस्क्रीम मिळणे बंद झाले तेव्हा हे फुसफुस आले. वाडीलालचे कसाटा बरे होते.
यापेक्षा फक्त आटीव दुधाची कुल्फी चांगली लागते.
Srd , प्रमाण ?????
Srd , प्रमाण ?????
प्रमाण
प्रमाण
१) अर्धा लिटर म्हशीचे दूध
२) पाच टी स्पून साखर लागते. ( योग्य सौम्य गोडपणा येईल.)
३) एक टी स्पून GMS पावडर
४) एक टी स्पून कॉर्न फ्लोर
क्रमांक (३) आणि (४) बर्फाचे खडे होऊ नये यासाठी आहे. वाढवू नये.
यातून चांगला बेस तयार होतो.
रंग आणि फ्लेवर
फुड कलरचे पाच थेंब.
वनिला केल्यास दहा थेंब.
बाकी बदाम पिस्ते चुरा किंवा चॉकलेट चुरा वरून टाकणे ऐच्छिक. या प्रयोगात पनीरचा छोटा लिंबाएवढा गोळा घातला होता. पण सॉफ्टीत टाकू नका.
सॉफ्टी हा प्रकार नवीनच आला
सॉफ्टी हा प्रकार नवीनच आला होता तेव्हा इतका पिठूळ / रवाळ नाही लागायचा. मुंबईत तर अनेक ठिकाणी सॉफटीचे मशिन्स असायचे. ५/- किंवा १०/- रुपयाला सॉफ्टी खाल्ल्याचं आठवतंय. मग एकदम काहीतरी बंदी आल्यासारखे सगळीकडे हे softy मिळणे बंद झाले.
आणि आता मोठं झाल्यावर पुण्यात येऊन जितक्या ठिकाणी खाल्ले आहे (मोस्टली तुळशीबाग) सगळीकडे खाताना तोंडात कणकण लागतात. रवाळ असे. शिवाय चवसुद्धा भंगार आहे.
अगदी सातारा रोड(पुणे) डिमार्ट च्या बाहेर जे ब्रँडेड softy आहे त्याची चव देखील बंडल आहे अगदी.
ती लहानपणीची ऑथेंटिक चव फार मिस करते.