चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ कलाम यांना विक्रम साराभाई सूनवतात ते पाहून कसंस झालं>>> ऑ, हे कधी होतं? मी मिसलं वाटतं.

शंकराच्या सिरीयल मध्ये विष्णू ब्रह्मा आणि अन्य देव कसे त्यांना वंदन करतात
आणि विष्णू च्या सिरीयल मध्ये शंकर, ब्रह्मा वगैरे त्यांना वंदन करतात
तसे काहीसे वाटलं>> Lol . बाकीचे ठिके पण मला शंकर तरी दुसऱ्या कुणाला वंदन करताना दिसले नाहीत आतापर्यंत. आणि देवांचा राजा असून इंद्र ज्याला त्याला नमस्कार करतात Lol . ह. घ्या. कृपया.

जय हनुमान मधेही आहे
संतोषी माँ मसध्येही

ज्यांची सिरीयल असेल त्यांना बाकीचे सगळे वंदन करतात हा रुल असतो Happy

Nambi अमेरिकेत जायच्या तयारीत असतात तेव्हाचा सिन
कलाम विरोध करत असतात

“ मी तरी तमिळ पाहिला, एक डोळा सबटायटल्सवर ठेऊन. कथेतला अमेरिकेतला भाग इंग्रजीत आहे - साधारण १०-१५ मिनिटे (की जास्तीच). शिवाय तुम्हाला फ्रेंच आणि रशियन येत असतील तर आणखी १० मिनिटे विदाऊट सब्स बघू शकाल. तमिळ येत असेल तर फक्त इंग्रजी, फ्रेंच आणि रशियन शिकावं लागेल (एक डायलॉग हिंदीत पण आहे” - बापरे! बरेच कष्ट आहेत. असू दे. इथे रिव्ह्यूज वाचून कळेलच सिनेमा. Happy

ज्यांची सिरीयल असेल त्यांना बाकीचे सगळे वंदन करतात हा रुल असतो >> Lol
अरे पण कलामांना शेंदूर कशाला फासताय.. त्या देवांसारखा? राहुद्या की त्यांना हाडामासाचा.

मुद्दा कलाम यांना शेंदूर फसण्याचा नाहीये
ज्याच्यावर बायोपिक त्याला सर्वगुणसंपन्न आणि बाकीच्यांना उणा दाखवणे याला ऑब्जेक्शन आहे

धोनीच्या पिक्चरमध्ये सचिनलाच क्रिकेटचे देव दाखवले होते.
धोनीच्या लहानपणी त्याचे आईवडील देवांचे फोटो विकत घेताना तो सचिनचा फोटो घेतो. आई विचारते ये कौनसे भगवान है, तो ये क्रिकेट के भगवान है.
माणसांमध्ये ज्यांना देव मानले जाते त्यांची प्रतिमा तशीच ठेवली जाते. मग चित्रपट कोणाचाही असो..

सर, धोनी ज्यावेळी खेळायला आला त्यावेळी सचिन प्रचंड फेमस होताच, त्यामुळे ते दाखवणे अवघड नव्हते

पण त्याच सिनेमात युवराज किंवा बाकीच्यांना बघा म्हणजे माझा मुद्दा कळेल

आणि न कळून घेता वाद घालायाचयाच असेल तर घाला खुशाल, ती तर तुमची मक्तेदारी आहे, न वाचता न समजून घेता बोलत रहायचं आपलं

आशुचँपजी,
मी एक रिव्ह्यू पाहिला. त्यात नंबी सरांचे आत्मचरित्र आणि पिक्चर यातला फरक सांगितला आहे. मी पुस्तक वाचलेले नाही, सिनेमा पण नाही पाहिला. पण त्या व्हिडीओत म्हटल्याप्रमाणे नंबी सरांना पोलिसांनी धक्काबुक्की केली नाही. त्यांना २४ तास आधी अटकेची कल्पना देण्यात आली होती. त्यामुळं त्यांना मॅनेज करणं सोपं गेलं. त्या व्हिडीओत म्हटलंय कि नंबी सरांच्या बाबतीत जे झालं त्याची दुसरी बाजू माहिती नाही पण त्यांचे आत्मचरित्र खूप प्रामाणिक आहे असे वाटते. त्यांनी कलिग्जना श्रेय दिले आहे. तसेच सिनेमात त्यांना जसे सुपरहिरो प्रोजेक्ट केले आहे तसे दावे नंबी सरांनी स्वतः केलेले नाहीत. तो व्हिडीओ तर नाही मिळाला. पण तसाच आशय असलेला व्हिडीओ काली दिला आहे.
https://www.youtube.com/watch?v=Q-COEUr1TwY

मलाही हेच म्हणायचे होतं, त्या व्यक्ती मी किती भारी असे कधीच म्हणणार नाहीत आणि त्याबद्दल त्यांचा अतोनात आदर आहे.

आपल्या देशात व्यक्तिपूजेचे स्तोम अपरंपार आहे त्यामुळे बायोपिक मध्ये असं काही घुसडून द्यायची उबळ येते

प्रामाणिक बायोपिक आपल्याकडे जवळपास नाहीतच

रच्याक, आपल्या इथे सर एकच

आम्ही सगळे त्यांचे भक्त, एका वीटेवर उभे राहून वंदन करणारे

आम्हाला उगाच सरकी देऊन सरांना सामान्य करू नका

ते भावी विश्वगुरु आहेत

“ ज्यांची सिरीयल असेल त्यांना बाकीचे सगळे वंदन करतात हा रुल असतो” >>> Lol

इतिहासातील थोर पुरूषांबद्दलच्या पिक्चर्समधेही हे लागू होते. त्यानंतरच्या भावी काळात जे घडले ते होणार होते हे फक्त कथानायकाला समजलेले असते. "इतरांना" ते समजत नाही.

द टर्मिनल बद्दल इथे कुणीच का बरं नाही लिहीलं ? काल सिनेमा पहायच्या आधी सर्च दिला होता. कळवत जा पाहिल्यावर.
नशीब चांगलं होतं म्हणून मूव्ही चांगला निघाला. फॉरेस्ट गंप सुद्धा एक दोन दिवस आधी पाहिला होता. २००४ साली बिग पाहिला होता.
साधारण अशा वेगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स टॉम हँक्सच्या वाटेला येतात का ? अजून कुठला आहे का त्यांचा पाहण्यासारखा सिनेमा ?

राभु, Happy
Sully आणि Cast Away बघ छान आहेत, मला Sleepless in Seattle व You've got mail हे रॉमकॉम पण आवडले होते. मेग रायन व त्याची जोडी कमाल वाटायची. नवीन Elvis ही बघायचाय.

मध्ये त्याचा एक जोक आलेला ना

टॉम हँक्स सोबत कधीही प्रवास करू नका
जर प्रवासात कधी दिसला तर तात्काळ घरी परत जा

कायम हा माणूस प्रवास करताना कुठंतरी तडमडतो
कास्ट अवे, अपोलो 13,सुली, कॅप्टन फिलिप्स आणि हा टर्मिनल Happy

इतिहासातील थोर पुरूषांबद्दलच्या पिक्चर्समधेही हे लागू होते. त्यानंतरच्या भावी काळात जे घडले ते होणार होते हे फक्त कथानायकाला समजलेले असते. "इतरांना" ते समजत नाही.>>>
अगदी अगदी, बोस, भगतसिंग पासून ते सगळे तंतोतंत

ज्यांची सिरीयल असेल त्यांना बाकीचे सगळे वंदन करतात हा रुल असतो” >>>  Lol
'देवोंके देव महादेव' मधे ब्रह्मदेव व इतर देवता हे विष्णू व महादेव दोघांनाही वंदन करायचे पण विष्णू व महादेव मात्र एकमेकांना नजरेनेच 'आय आय कॅप्टन' करायचे. Lol

टर्मिनल नाही पहिला अजून.

वर अस्मिता म्हणतात तसं कास्ट अवे म्हणीन (सली पहिला नाहीये.)

हँक्सचे आवडलेले इतर सिनेमे-
सेव्हिंग प्रायव्हेट रायन
द पोस्ट
कॅच मी इफ यू कॅन
द ग्रीन माईल

अस्मिता, कॉमी थँक्स. Happy

त्या व्यक्ती मी किती भारी असे कधीच म्हणणार नाहीत आणि त्याबद्दल त्यांचा अतोनात आदर आहे. >>> बिग एम एम वर संग्राम त्याच्या "इतिहास नावाची व्यक्ती" पॉडकास्टची जाहिरात इतक्या वेळा करत असतो कि तो चॅनल ऐकणेच सोडलेय. पण त्याचं एक वाक्य खूप छान आहे. " आपल्याला थोर वाटणारी इतिहासातली व्यक्तीमत्वं ही आधी सामान्यच असतात. पण ते काम असं करतात कि ते नंतर असामान्य बनतात. त्यांचं असामान्यत्व बाजूला ठेवलं, देवत्व बाजूला ठेवलं तर आपणही हे करू शकतो असा विश्वास निर्माण होतो. नाहीतर अरे ते महापुरूष होते म्हणून ते करू शकले, आपण कसे करणार ? असा समज रूजण्याचा धोका असतो".

"त्यानंतरच्या भावी काळात जे घडले ते होणार होते हे फक्त कथानायकाला समजलेले असते. "इतरांना" ते समजत नाही." - Lol - परफेक्ट.

फारसं तपशीलात न शिरता, ह्या सगळ्या गोष्टी पाहून मला नेहमीच वाटतं की बॉलीवूड (फॉर दॅट मॅटर - भारतीय फिल्ममेकर्सनी) इतिहास, चरित्रपट वगैरे गोष्टींच्या नादी लागू नये. कदाचित त्यांच्या स्वतःच्या काही कारणांमुळे किंवा सभोवती असणार्या काही कारणांमुळे, प्रामाणिक बायोपिक्स / इतिहासपट त्यांना नाही तयार करता येत. सगळंच लार्जर दॅन लाईफ करण्याचा अट्टहास नडतो. मला आवडलेला भारतीय चरित्रपट रिचर्ड अ‍ॅटनबरोचा 'गांधी' आहे.

लोकमान्य टिळक, बालगंधर्व अजून काही बायोपिक असतील तर (इतकेच आठवले) अशा सुप्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या चरित्रात फारशी ढवळाढवळ करता येणे शक्य नाही. केली तरी त्याच्यावर धुरळा उडणारच. मग सिनेमॅटिक लिबर्टी ची माफी द्यावी लागते.
पण जी व्यक्तीमत्वे सिनेमातूनच लार्जर स्केल वर पहिल्यांदा समोर येताहेत त्यांच्या बाबतीत खरं खोटं समजणे अवघड असतं.

द टर्मिनल बद्दल इथे कुणीच का बरं नाही लिहीलं ? >> टर्मिनल बराच जुना सिनेमा आहे ना. त्यामुळेच इथे चर्चा दिसली नसेल तुम्हाला.
सली नाही बघितलेला, ती घटना इथेच न्यूयॉर्क ला घडली आणि ते उलगडत असताना लाइव्ह न्यूज कवरेज बघितले होते. नंतर मिडिया मधे त्या खर्‍या सली ला खूप कवरेज मिळाले, त्याचे, त्याच्या क्रू चे, प्रवाशांचे इंटरव्ह्ञुज वगैरे, वर आणखी आता सिनेमा काय बघायचा असे वाटले होते.
फॉरेस्ट गम्प ऑल टाइम फेव मूव्ही आहे. आता लालसिंग चढ्ढा ची कथा भारतीय सेटिंग आणि वातावरणाला कशी बदलली असेल ते बघण्याची जराशी उत्सुकता कम भिती आहे थोडी Happy सोपे नसेल ते, कारण फॉरेस्ट गम्प मधे फुटा फुटाला अमेरिकेच्या त्या त्या काळातल्या इतिहास भुगोलातले रेफरन्सेस आहेत. सीन टु सीन कॉपी आणि अ‍ॅक्टर्स ची नक्कल असे काही केले तर सपशेल फेल होणार. अर्थात हल्ली ट्रेन्ड तोच आहे म्हणा , नावे मोठ्ठी बजेट मोठे पण हा आला सिनेमा हा गेला गाळात Lol

हो ना व्हाईट हाऊस मध्ये गम्प राष्ट्राध्यक्षांना पँट उतरावून पार्श्वभागावरची जखम दाखवतो ती आपल्याकडे रुचणार का

आणि पिंग पॉंग डिप्लोमसीचे काय करणार

भारतात आता कुठे टेबल टेनिसमध्ये कामगिरी करत आहेत मग सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन चीनला हरवणार का चढ्ढा

Pages