गर्भपात - एक मेडिकल प्रोसिजर, स्त्री अधिकार, की भ्रूण हत्या?

Submitted by maitreyee on 2 August, 2022 - 09:10

आमितव ने 'Y' या चित्रपटाबद्दल चित्रपट धाग्यावर लिहिले होते तिथून विषय सुरु झाला. चित्रपट स्त्रीभ्रूण हत्या (?) या विषयावर आहे.
तिथली चर्चा अगदीच अवांतर असल्यामुळे हा धागा उघडण्याचे काम करतेय.
त्यावरुन मोरोबा या आयडी चे पोस्ट :
गर्भपात हे procedure आहे, हत्या नाही असं एकदा मान्य केल्यावर स्त्री भ्रूण removal ला तरी हत्या का म्हणायचं, असा प्रश्न पडला होता.

एकदा जर हे तत्व मान्य केलं की स्त्रीला कोणत्याही कारणामुळे गर्भपात करण्याची परवानगी असावी- निदान पहिले 20 ते 24 आठवडे तरी- तिथे सरकारने नाक खुपसू नये- तर मग स्त्रीभ्रूणहत्येला वेगळी ट्रीटमेंट का द्यावी हा प्रश्नच आहे.
समजा एखाद्या स्त्रीला भारतीय स्त्री म्हणून आयुष्यभर असुरक्षिता, abuse, दुय्यम वागणूक यांचा सामना करावा लागला असेल तर तिला वाटू शकतं की आपण आता परत female child ला जन्म देऊ नये आणि आयुष्यभरासाठी अतिरिक्त टेन्शन, जबाबदारी डोक्यावर घेऊ नये. तो चॉईस तिला असायला हवा. आणि तो चॉईस तिने घेऊ नये यासाठी तिला कायद्याचा धाक दाखवणं हा सोपा मार्ग झाला. याउलट स्त्रियांची स्थिती सुधारली तर कायद्याचा धाक नसला तरी ती तो चॉईस नाही निवडणार.
पुढच्या पिढीतील पुरुषांना स्त्रिया उपलब्ध असाव्यात यासाठी काही जोडप्याना नको असताना कायद्याचा धाक दाखवून मुली जन्माला घालायला लावणे हे हॅन्डमेड टेल टाईप वाटतं. Quick fix solution without addressing the root cause.
Submitted by WHITEHAT

प्रश्न हा आहे कि तो डिसिजन दोघांचा असावा...
Submitted by च्रप्स

मोरोबा,
मुलगी आहे म्हणून गर्भपात करणं आणि मूल नको म्हणून गर्भपात करणं, तसंच मुलगी नको हा सासरच्या/माहेरच्या लोकांचं प्रेशर असणं आणि मूल नको हा स्त्रीचा किंवा जोडप्याचा 'चॉईस' असणं यात फरक नाही का?
Submitted by अंजली

मुलगी नको असणे हा चॉईस असू शकत नाही का?
आणि स्त्री भ्रूण removal हे सासर माहेर च्या प्रेशर मुळेच होतं, असं जनरलिझेशन का? बऱ्याच वेळा स्त्रियांनाच/सुद्धा मुलग्याचा सोस असतो.
Whitehat thanks. मला एवढं नेमक्या शब्दांत सांगता आलं नसतं.
आपल्या पर्सनल कन्व्हिक्शन्स प्रमाणे आपण चॉईस आणि हत्या शब्द आलटून पालटून वापरत आहोत का?
Submitted by मोरोबा

आयसोलेशन मध्ये विचार केला तर मुलगी नको असणे हा चॉईस असू शकतो, मुलगाच हवा असणे हा ही नक्कीच चॉईस असू शकतो. गर्भपात करायला फक्त तेवढ्याच मुद्द्याचा विचार केला तर विरोध असायचं कारणच नाही.
पण विचार करा, हा लिंगसापेक्ष फक्त स्त्री गर्भाचा अंत हा मुळात गर्भपाताचा मुद्दाच नाही आहे. खोलात जाऊन विचार केला तर हा समाजात स्त्रीला, मुलींना दिला जाणारा... रादर दिला 'न जाणार्‍या' आदराचा मुद्दा आहे. आणि याचं शाश्वत उत्तर हे समाजाचं शिक्षण, प्रगती, स्त्री सबलीकरण यात आहे, ना की स्त्री भ्रूण हत्या कायद्याचा धाक दाखवून थांबणण्यात! दीर्घकालिन उत्तर हे समाजात त्यांच्या विचारात बदल हेच असणार आहे. कायद्याचा धाक-दपटशा दाखवुन काय साध्य होतंय हे बघतोच आहोत.
पण तरीही आजची भारताची परिस्थिती बघता कायदा असावाच याच मताचा मी आहे.
कॅनडात अठरापगड ठिकाणचे लोक रहातात, त्यांच्या मूळ ठिकाणच्या चालिरीती, समज गैरसमज इ. चे प्रतिबिंब गर्भपाताच्या निर्णयांत अर्थात पडते. दरकाही वर्षांनी लिंगसापेक्ष गर्भपाताची आकडेवारी तपासली जाते आणि अजुन तरी लिंग गुणोत्तरात फार फरक झालेला नाही. कॅनडात कुठल्याही कारणाशिवाय संपूर्ण प्रेगन्सीभर (अगदी फुल टर्म पर्यंत) गर्भपात विनामूल्य आणि सहज शक्य आहे. म्हणून मुद्दाम कॅनडाचं उदाहरण दिलं.
विचार करा, एक ४०० लोकं घेऊन मल्टिजनरेशन यान दूरच्या गॅलेक्सीच्या प्रवासाला निघालं आहे. तिकडे अबॉर्शनला परवानगी असेल का? अजिबात नसेल. जगात अ‍ॅब्स्युल्युट असं काही नसतं. सगळं रिलेटिव्ह, परिस्थिती प्रमाणे बदलतं.
Submitted by अमितव

मुलगी नको असणे हा चॉईस असू शकत नाही का?>>> याला तुम्ही चॉईस म्हणू शकता पण तो नसायला हवा कारण तो चॉईस लिंगभेद करतोय. 'मूल' हवं का नको (लिंगभेद न करता) हे 'मुलगी नको' यापेक्षा वेगळं नाही का?
आणि स्त्री भ्रूण removal हे सासर माहेर च्या प्रेशर मुळेच होतं, असं जनरलिझेशन का? बऱ्याच वेळा स्त्रियांनाच/सुद्धा मुलग्याचा सोस असतो.>> हे ही चुकिचेच आहे आणि ते थांबायला हवं.
आपल्या पर्सनल कन्व्हिक्शन्स प्रमाणे आपण चॉईस आणि हत्या शब्द आलटून पालटून वापरत आहोत का?>>> जेंडर नुसार गर्भपात करणे हे चुकीचे आहे. मूल हवं का नको - मुलगा असो वा मुलगी - हा चॉईस आहे. मला मूल हवं आहे पण ते मुलगाच हवा त्यानुसार घेतलेला निर्णय यालाही तुम्ही 'चॉईस' म्हणू शकता, फक्त या चॉईसचे परीणाम समाजावर किती दूरगामी, वाईट होऊ शकतात हे तुम्हाला माहित असेलच.
या धाग्याचा हा विषय नाही त्यामुळे इथे आता जास्त लिहीत नाही.
Submitted by अंजली

विचार करा, एक ४०० लोकं घेऊन मल्टिजनरेशन यान दूरच्या गॅलेक्सीच्या प्रवासाला निघालं आहे. तिकडे अबॉर्शनला परवानगी असेल का? अजिबात नसेल. जगात अ‍ॅब्स्युल्युट असं काही नसतं. सगळं रिलेटिव्ह, परिस्थिती प्रमाणे बदलतं.//
तो 400 जणांचा ग्रुप जर स्त्रियांना माणूस म्हणून किमान चांगली वागणूक देण्याच्याही capable नसेल तर मरू दे की तो ग्रुप. असला अभद्र समाज आणखी दुसऱ्या गॅलेक्सीत वाढवायला कशाला न्यायचा! Wink
फक्त या चॉईसचे परीणाम समाजावर किती दूरगामी, वाईट होऊ शकतात हे तुम्हाला माहित असेल////
होऊ देत की वाईट परिणाम. जोपर्यंत संपूर्ण समाजाला झळ पोचत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही. इच्छा नसताना एखादं जोडपं केवळ संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी मुलगी जन्माला घालण्याचा त्याग करत असेल तर त्यांना भक्कम आर्थिक मोबदला, मुलीच्या उत्तम खाजगी शिक्षणाला पुरेल इतका खर्च वगैरे तरी द्यायला हवं. जेलमध्ये टाकायच्या धमक्या देण्याऐवजी.
Submitted by WHITEHAT

इच्छा नसताना एखादं जोडपं केवळ संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी मुलगी जन्माला घालण्याचा त्याग करत असेल >>>> ???? मुलगी जन्माला घालणे हा 'त्याग' आहे? बरं.
आणि हो मुलींचं शिक्षण भारतात (काही वर्षांपर्यंततरी) मोफत आहे ना?
Submitted by अंजली

तो चॉईस लिंगभेद करतोय.>>कॉज आणि इफेक्ट ची गल्लत होतेय इथे. चॉईस लिंगभेद करत नाहीये तर समाजात लिंगभेद ऑलरेडी आहे म्हणून चॉईस केला जातोय. जिथे लिंगभेद तुलनेने कमी आहे त्या देशांत का नाही हा प्रॉब्लेम?
सप्लाय ॲंड डिमांड च्या तत्वानुसार स्त्रिया कमी झाल्या तर उलट त्यांचा समाजात दर्जा वाढायला हवा ना? हा वाईट परिणाम कसा? पुरुषांसाठी वाईट परिणाम होत असेल तर व्हायलाच पाहिजे. (बाकी ते स्त्रियांची सुरक्षितता धोक्यात येईल, बलात्कार होतील वगैरे म्हणजे नुसता बागुलबुवा आहे. स्त्रियांना सिस्टिमिकली कंट्रोल करायला असे बागुलबुवे बरे पडतात)
Submitted by मोरोबा

कॉज आणि इफेक्ट ची गल्लत होतेय इथे. चॉईस लिंगभेद करत नाहीये तर समाजात लिंगभेद ऑलरेडी आहे म्हणून चॉईस केला जातोय. जिथे लिंगभेद तुलनेने कमी आहे त्या देशांत का नाही हा प्रॉब्लेम?>>> अहो, एक शब्द अलिकडे टाकला म्हणून फॅक्ट बदलतीये का? मूल नको असणे आणि मुलगी नको असणे यात निदान भारतात तरी फरक आहे ना? यातच तुमच्या पुढच्या प्रश्नाचेही उत्तर आहे.
सप्लाय ॲंड डिमांड च्या तत्वानुसार स्त्रिया कमी झाल्या तर उलट त्यांचा समाजात दर्जा वाढायला हवा ना? हा वाईट परिणाम कसा? >>> तो वाढत नाहीये, उलट दिवसेंदिवस कमी होत आहे हे वाईट फॅक्ट आहे.
तुम्ही तुमच्या कन्व्हिक्शन्स पायी इतरांचा चॉईस हिरावून घेत आहात, तर अमेरिकेतल्या अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन्स ना बोलण्याचं मोरल ग्राउंड तुमच्याकडे उरतं का?>>> हो, उरतं. कारण मूल हवं आहे, पण मुलगाच हवा आहे याचे भारतात तरी मोठे दूरगामी परीणाम होत आहेत. उद्या अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन्स देखिल मुलगाच हवा हा हट्ट धरू लागले तर त्यालाही तेव्हढाच विरोध होईल.
बाकी तेव्हढं ते 'कन्व्हिक्शन' म्हणजे काय ते समजले नाही
Submitted by अंजली

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाकी पोस्ट्स जमेल तशी कॉपी करतेय.
स्पेसिफिकली भारतीय समाजाबद्दल आपण आत्ता बोलत आहोत. एखाद्या समाजात मुलींची स्थिती वाईट असताना जबरदस्तीने कायद्याचा धाक दाखवून मुलींचा नवीन सप्लाय मिळवत राहणे- समाज टिकून राहावा , sustain व्हावा म्हणून- असा समाज टिकून राहायच्या लायकीचा आहे का?
If through such legal force, men keep getting adequate supply of women that they can then abuse(dowry, polygamy, systemic oppression) , they have no incentive to bring about actual change in society.
Submitted by WHITEHAT
वाक्य इंग्लिश मध्ये आहे म्हणून प्रतीविचारही इंग्लिश मध्ये
"If through such legal force, men keep getting adequate supply of women that they can then abuse(dowry, polygamy, systemic oppression) , they have no incentive to bring about actual change in society."
"Does that mean we should even pluck out every possibility,every hope that by increasing the count and knowledge and power we can turn the table on abusers and be strong and build stronger future,better culture for next generation of every gender, every culture?"
Submitted by mi_anu
अनु,

turn the table on abuser-
या लढाईसाठी फूट सोल्जर द्यायच्या की नाही तो निर्णय त्या जोडप्याचा असायला हवा. समाजाला गरज असल्यास त्यांना त्यासाठी भरपूर पैसे, privileges देऊन incentivise करा पण कायदेशीर धमक्यांचा वापर करून मनाविरुद्ध मुली जन्माला घालायला लावणं हा समाजाने जबाबदारी झटकण्याचा हलकटपणा आहे.
हिंदू कट्टरवादी साधू पण म्हणतात की "to turn the tables on Muslims" हिंदूनी चार मुलं जन्माला घालावी. हे जोपर्यंत ऐच्छिक आहे तोपर्यंत लोक हसण्यावारी नेतात-पण समाजाची गरज म्हणून उद्या चार मुलं नसलेल्या जोडप्याना अटक करणे, त्यांना contraception पुरवणाऱ्या डॉक्टरला जेलमध्ये घालणे असे प्रकार झाले तर लोक ऐकून घेतील का?
आजकाल अजून एक ओरड ऐकू येते की मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यामुळे विवाहसंस्था धोक्यात आहे. यावर उपाय काय? विवाहसंस्था काळानुसार मॉडर्न करायची की लग्न न करणाऱ्या किंवा घटस्फोट घेणाऱ्या मुलींना व त्यांच्या पालकांना जेलमध्ये टाकायचं? Ostensibly so that we don't pluck the possibility of improving situation in future?
Submitted by WHITEHAT

Whitehat, म्हणजे तुम्ही सीरियसली बोलत होतात? मला वाटत होतं की उपरोधाने लिहिलं असेल.
मनाविरुद्ध मुली जन्माला घालायला लावणं >> कंपल्सरी मुलीच जन्माला घाला, मुलगे असतील तर गर्भपात करा असं नाही म्हणत आहे कुणी. मुलगी आहे म्हणून गर्भपात करणं बरोबर नाही असा मुद्दा आहे.
Submitted by वावे

अमेरिकेत roe v wade कायद्याचे समर्थक म्हणतात की स्त्रीला कोणत्याही कारणाने गर्भपात करण्याचा हक्क असावा- सरकारने ढवळाढवळ करू नये.
त्या लॉजिकने पाहता मुलगी नको हेही कारण गर्भपात करायला का चालू शकत नाही?
भारतात मुलींना व त्यांच्या पालकांना rape culture, patriarchy, dowry अशा अनेक भयानक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे एखादं जोडपं 'मुलगी नको, मुलगा चालेल' असं म्हणत असल्यास दोष त्यांचा की समाजाचा?
Submitted by WHITEHAT
व्हाईटहॅट, प्रॉब्लेम असा आहे मी मुलगी नको हा निर्णय आईचा नसून तिच्या सासरच्यांचा असतो. जरी मग ती आई म्हणाली मला मुलगी नको तरी तिला तसे म्हणायला भाग पाडणारे तेच असतात. बाकी स्त्रीजन्माला आल्यावर फार सोसावे लागेल या आणि याच कारणासाठी मुलीचा गर्भपात करणारी माता हजारांत एखादी असेल.
Submitted by ऋन्मेऽऽष
हे over-generalization झालं.
तसं तर काही केसेसमध्ये अबोर्शन (regardless of gender of foetus) पण घरच्यांच्या दबावामुळे होतं. पण म्हणून भारतात अबोर्शनवर सरसकट बंदी घातलेली नाही. कारण ज्या स्त्रियांना स्वतःहून अबोर्शन करायचं आहे त्यांना तो पर्याय उपलब्ध हवा. तसंच जेंडर सिलेक्शनवर पण बंदी असू नये.
Submitted by WHITEHAT
आधीच दोन/तीन मुली असतील आणि नंतरही मुलगी होणार असेल तर तो निर्णय आईचाही असू शकतो... ( हे मुलांबाबतही)
जनरलायझेशन नको...
Submitted by च्रप्स

हे मुलांबाबतही
>>>
दोन मुलगेच झाले.. आता तिसराही मुलगाच होतोय म्हणून त्याला गर्भातच संपवायचा विचार आपल्याकडे लोकं करताहेत ... अश्या काहीतरी समाजाचे स्वप्न बघत आता झोपी जातो.
जसा आपला समाज आहे तो तसा आहे रे.. ॲक्सेप्ट करा हे फॅक्ट..
Submitted by ऋन्मेऽऽष
Reproductive autonomy हा प्रगत जगात स्त्रीचा बेसिक राईट मानला जातो.
'एखादी स्त्री x, y अथवा z कारणाने गर्भपात करूच कशी शकते, मला नाही वाटत कोणी स्त्री असा विचार करत असेल, आणा तिला माझ्यासमोर'- या टाईपचं judging , shaming करणं हा misogynistic व्यक्तींचा आवडता खेळ.
Still- स्त्रीच्या reproductive autonomy वर कायद्याने बंदी आणून criminalize करण्याऐवजी समाजाने महिलांचं स्टेटस सुधारण्यावर फोकस केलं तर मुलगी नको ही मानसिकता आपोआपच संपेल.
Submitted by WHITEHAT
विषय मोठा आहे, गंभीर आहे.यावर एक धागा पूर्वी येऊन गेला आहे.शोधता आला तर तिकडे लिहू.
Submitted by mi_anu
मला नाही वाटत कोणी स्त्री असा विचार करत असेल, आणा तिला माझ्यासमोर'- या टाईपचं judging , shaming करणं ...
>>>>
या वाक्यात असे वाटतेय की त्या गर्भवती स्त्री ला आरोपीच्या पिंजऱ्यात ऊभे केलेय. जे माझ्या वरच्या पोस्टमध्ये नव्हते. वा तसे प्रतीत होत असेल तर ते तसे नाहीये हे समजून घ्यायला हवे. त्यात फक्त अमुकतमुक विचार करणारी जनता किती असावी ईतकेच सांगितले आहे. तुम्ही मूठभर लोकांना निर्णयस्वातंत्र्य द्यायला बहुसंख्या लोकांना मारक कायदा नाही करू शकत. ते प्रॅक्टीकल नाही ना लॉजिकल.
Submitted by ऋन्मेऽऽष
'मातृभूमी - अ नेशन विदाउट वीमेन' या नावाचा चित्रपट येऊन गेलाय. झी५ वर आहे.
Submitted by भरत.
तुमच्यामते गर्भपाताचा अधिकार- reproductive autonomy हे "मूठभर स्त्रियांचं निर्णयस्वातंत्र्य" आहे जे तुमच्या मते totally disposable ही आहे.
एखाद्या कायद्याचा misuse होऊ शकतो म्हणून तो हक्क वा कायदा मुळातच नको हे तत्व लावायला गेलं तर असे misuse होणारे कायदे इतरही अनेक आहेत. त्यांचाही नंबर लागेलच हळूहळू.
Submitted by WHITEHAT

माझेच उदाहरण देते.
माझ्या आई वडिलांना माझ्या आधी एक मुलगी नंतर एक मुलगा. मी तीन नंबर. माझ्यावेळी जेव्हा आई गरोदर होती तेव्हा त्यांनी लिंगपरिक्षण केले होते. मुलगी नको होती पण दवाखान्यात जाऊन गर्भपात का केला नाही माहित नाही. पण आईनेच सांगितले होते की तिने तेव्हा भरपूर गर्भ पडावे म्हणून बरेच प्रयत्न केले होते. जसे डॉक्टर कडून गोळ्या घेतल्या होत्या, भरपूर पपई खाल्ली etc. परंतू माझ्या नशिबात जन्माआधीचा मृत्युयोग नसावा Happy म्हणून मी आलेच जन्माला.
माझ्या बारशाच्या वेळी द अक्षर आले होते. कुणीतरी विचारले काय नाव ठेवायचे तेव्हा बाबांनी ठेवा दगड धोंडा असे म्हंटले होते. तेव्हा शेजारच्या ताईने मी कांगारूंच्या पिल्लासारखी दिसते म्हणून पाळण्यात माझे नाव कांगारू ठेवले. जन्मदाखल्यावर माझ्या मोठया ताईने माझे निलम नाव लावायला लावले. कॉलेजला जाईस्तोवर सगळेच मला माझ्या पाळण्यातील नावानेच बोलवत असत. मग एका नवीन लग्न होऊन आलेल्या त्याच नाव ठेवणाऱ्या ताईच्या वहिनीने सगळ्यांना मला निलम हाक मारण्यास भाग पाडले. अजूनही काही जुनी, लांबची लोक मला जुन्या नावाने हाक मारतात.
मला समजायला लागल्यापासून मला तरी कधीच मुलगा मुलगी असा भेद घरातून जाणवला नाही. आईने हे सगळ सांगितलं नसते तर मला हे कळले ही नसते की मी नकोशी मुलगी आहे. पण हे कळल्यावर जी जखम झाली आहे ती भरतच नाही. कधी कुणी जुन्या नावाने बोलवले किंवा स्त्री भ्रूण हत्येचा विषय निघाला तर पुन्हा भळभळून वाहू लागते. Sad (आज पुन्हा काही मलमपट्टी करावी लागेल)
अति अवांतरासाठी क्षमस्व.
Submitted by निल्सन
निल्सन, तुम्ही जन्मा आधी नकोसे अपत्य होता पण जन्मानंतर तुमच्या माता पित्यांनी तुमच्यात व तुमच्या भावात भेद केला नाही, तुम्हाला नंतर तशी वागणुक न मिळता तुम्ही इतर मुलांसारख्या वाढलात. म्हणजे गर्भलिंग कळल्यावरची भावना तेव्हाची होती व नंतर त्यांच्या मनात नकोशी मुलगी अशी भावना राहिली नाही असे म्हणता येईल.
हे बर्‍याच जणांच्या बाबतीत घडलेले असु शकते. माझी आईने सांगितलेले माझा सगळ्यात धाकटा भाऊ जेव्हा राहिला तेव्हा आईला मुल नको होते पण ह्या न त्या कामात डॉक्टरकडे जायचे राहुन गेले व भाऊ जन्माला आला.
Submitted by साधना

समजू शकते. माझ्या आईला ही पाडायचा प्रयत्न आज्जीने केलेला. पण त्याचे कारण तिला म्हणजे आज्जीला टी बी होता व तिला ही अधिकची जबाबदारी नको होती. मात्र आईला वाईट वाटेच की आपण नकोशा होतो याचे Sad
Submitted by सामो

हे भयानक आहे. प्रत्यक्ष जन्मदात्यांनाही आपण नकोसे आहोत ही जाणीव बाळगत जगणं म्हणजे काय याची कल्पना इतरांना करता येणं कठीण आहे. तरी निल्सन यांची सौम्य केस आहे. कित्येक नकोशा मुलींना याहून बरंच काही भोगावं लागत असेल.
पण आई मुलीला मारू शकते का वगैरे खूपच डीप थिंकिंग झालं. माझा प्रश्न अगदीच बेसिक होता. आपल्या व्ह्युपॉईंट प्रमाणे गर्भपात आणि भ्रूणहत्या हे शब्द सोयीस्करपणे वापरले जातात.
अमेरिकेत अनिर्बंध अनप्रोटेक्टेड संबंध ठेवून प्रेग्नंट झालेली तरूणी गर्भपात करते तेव्हा तो तिचा 'माय बॉडी, माय चॉईस' असतो. (ही प्रो-चॉईस वाल्यांची प्रसिद्ध घोषणा आहे)
भारतातलं एखादं अतिदरिद्री जोडपं मुलगी झाली तर भविष्यातला हुंड्याचा खर्च परवडणार नाही म्हणून गर्भपात करायला गेलं तर ती 'भ्रूणहत्या' असते
अमेरिकेत प्रोचॉइस वाले लोक जबरदस्तीने जन्माला घातलेल्या मुलांची पुढे आबाळ होईल हे एक कारण सांगतात. हे वेलफेअर सिस्टीम असलेल्या प्रगत देशात.
भारतातल्या नकोशा मुलींच्या बाबतीत मात्र हा मुद्दा गैरलागू असतो. मग या मुलींचं पुढे काही का होईना.
अमेरिकेपर्यंत जायची पण गरज नाही. भारतापुरतंच बघू. एरवी कुठल्याही कारणासाठी केलेला गर्भपात, मग ते फॅमिली प्लॅनिंगसाठी असो, की कॉन्डॉम ने मजा येत नाही म्हणून असो, रुटिन मेडिकल प्रोसिजर असतं, मग याच केस मध्ये 'हत्या' कशाला? तुम्हाला गर्भलिंगचाचणी वर बंदी घालायची असेल तर घाला, पण सिलेक्टिव्हली 'भ्रूणहत्या' वगैरे शब्द वापरून लोकांना गिल्ट देऊ नका. 'आमचा तो चॉईस आणि तुमची ती हत्या' नको. या तो घोडा बोलो या चतुर.
Submitted by मोरोबा

भारतात गर्भलिंगचिकित्सेचा शोध लागायच्या आधी नवजात मुली मारल्या जात. भाताचं तूस खायला घालून, पाण्याने /दुधाने भरलेल्या घंगाळात बुडवून. ती जशी हत्या, तशीच गर्भलिंग कळल्यावर पाडलेला गर्भ हीही हत्या.
सद्य परिस्थितीत मुलीचा जन्म वाईट म्हणून मला मुलगी जन्माला घालायची नाही, असं कोणी स्त्री म्हणत असेल ; पण मुलगा मात्र हवा असेल तर हा निव्वळ ढोंगीपणा झाला. तिने संततीप्रतिबंधक उपाय वापरून गर्भच राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
Submitted by भरत.
स्त्रीभ्रूण मारणे हा चॉईस असेल तर मग हेच लॉजिक लावले तर सतीप्रथाही पुन्हा सुरू होऊ शकेल
Submitted by BLACKCAT on 30 July, 2022 - 11:10

> हे वेलफेअर सिस्टीम असलेल्या प्रगत देशात.
व्हाट अ जोक. वाल मार्ट सारख्या ठिकाणी मिनिमम वेज वर काम करणार्‍या सिंगल मदर चे इन्कम तिचे तिलाच पुरत नाही. शिवाय पगारी रजा, पेन्शन, मेडिकल इन्शुरन्स वगैरे नसतो. विशेषतः रेड स्टेट्स मध्ये. बाळंतपणाची रजा नसलेला अमेरिका एकमेव प्रगत देश आहे.
Submitted by vijaykulkarni
इथे या विषयावर लिहीत असताना कोणाची खपली निघेल/दुखावले जाईल हे लक्षात आले नाही>>पण अशा बोलण्याने आयुष्यभराची जखम होऊ शकते हे मात्र लक्षात आलंय
मला पहिली मुलगी,तिच्यानंतर 7 वर्ष झाली तरी दुसरा चान्स घेतला नाही दुसरं बाळ नको म्हणून,नंतर नवऱ्याच्या समजवण्याने म्हणा किंवा आग्रहाने म्हणा दुसरा चान्स घेतला,दुसरा मुलगा किंवा मुलगी हा विषयही डोक्यात नव्हता फक्त एकच अपत्य नको असं नवऱ्याच् म्हणणं होतं,मला तेव्हा ते पटलं पण खोटं कशाला बोलू 3 महिन्या नंतर आपण उगाचच चान्स घेतला असं वाटत राहत होत,काहितरी प्रॉब्लम व्हावा आणि गर्भपात व्हावा असंही अधून मधून वाटायचं,पण मी बोलून दाखवला नव्हत कुणाला तेव्हा,दुसरा मुलगा झाला घरातले सगळे खूप खुश होते पण माझ्या डोक्यात कुठे तरी हूर हूर असायचीच
नंतर नंतर कधीतरी रागाने बोललं ही जायचं उगाचच ह्याला जन्माला घातलं म्हणून
आता तो 5 वर्षांचा झालाय,अर्थातच आमचा खूप खूप जीव आहे त्याच्यावर पण यापुढे चुकूनही त्याला याबद्दल समजणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन
Submitted by आदू
मुल गा हवा असताना जन्माला आलेल्या मुलीचं नाव नकुशी ठेवायची पद्धत होती, अजूनही असेल. भारतात २ कोटी १० लाख नकुशा आहेत
माझ्या एका चुलत मावशीचं नाव नकुशा आहे. यावर नकुशी ही टीव्ही मालिका आली होती.
सातारा जिल्हा परिषदेने नकुशा हे नाव बदलायचा उपक्रम हाती घेतला होता.
Submitted by भरत.
निल्सन ,,,
तुमच्या वेदना मी समजू शकते कारण का माहितीये ? मी रीलेट करू शकते ते स्वत: . मीही एक भाऊ आणि बहीणी नंतर तिसरी. त्यावेळी आईचं वय जास्त होतं माझ्या आणि बाबा तिला होणारा त्रास बघून सरळ हे बाळ नको म्हणाले होते. एवढंच नाही तर तिला डॉक्टरांनी पण हाच सल्ला दिला होता, पण तरीही माझा जन्म झाला आणि क्रिटीकल असल्यामुळे मी जगतेय की नाही याची महीनाभर वाट पाहीली आईने.

हे सगळं मला तिने सांगितले आणि प्रेग्नंसीमधे किती त्रास झाला , तिच्या मदतीला कसं कोणीच नव्हते हेही सांगितले. फार वाईट वाटले होते तेव्हा कि आपण यांना काहीही गरज नसताना आणि आईच्या जीवावर बेतलेले असताना जन्मलो. पण खरं सांगू तर तुम्ही म्हणालात तसंच मलाही लहानपणापासून कधीही मुलगा मुलगी भेद जाणवलाच नाही. आम्ही तीनही मुलं आई बाबांना तितकेच प्रिय होतो.

सांगायचं एवढंच आहे की आपले आई बाबा आपल्यासाठी जे करतात ते कुणीही करत नाही ‌, हे मला मनोमन पटते आजही. त्यावेळी जी काही परीस्थिती असते , त्यांची मानसिकता असते त्याची आपण काही कल्पना करू शकत नाही, आणि करूही नये. जे झालं ते आठवत बसण्यापेक्षा आपण आज आहोत त्यांच्यामुळे आणि आपलं एकमेकांवर निर्विवाद प्रेम आहे एवढंच मनात ठेवावं असं वाटतं. निदान माझा तरी तोच प्रयत्न असतो. तुमची पोस्ट वाचून रीलेट झालं म्हणून लिहिलं, तुम्हाला दुखवायचा काही हेतू नाही.
Submitted by भाग्यश्री१२३
खरयं. ह्या पोस्ट्स वरून जाणीव झाली की माझ्या भावाला काय वाटत असेल. आम्ही दोन बहिणी आणि मग बाबांनी नवस मागवून आणि लिंग चाचणी करून मिळवलेला मुलगा. आईला दोन मुलीच बास असं होतं पण वंशाच्या दिव्याचे फॅमिली प्रेशर. चिडून आई कितीदा म्हणायची नकोच होता तिसरं. पण माझं ऐकतय कोण. पण आमच्या इथे कायम बाबांचा मुलासाठी सॉफ्ट कॉर्नर. ज्या गोष्टी मुलींना नाही द्यायला जमले ते मुलाला मात्र ते मिळवून देणारच ह्या गोष्टीचे तेवढे अजून हि वाईट वाटतं. आई बापाला सगळी मुले सारखीच असं आई म्हणते, पण बाबा मात्र वेगळेच वागतात. आज बहीण भाऊ म्हणून एकत्र आम्ही खुश आहोत पण हे discrimination कायमच झेलावं लागतच.
Submitted by निशा_०४

गर्भपात.
ह्या वर आपण सर्व बाकी विषय बाजूला ठेवून ,कायदा काय सांगतो हे पण बाजूला ठेवून,परवानगी आहे की नाही हे पण बाजूला ठेवून फक्त स्त्री चे आरोग्य ह्याच पॉइंट वर पाहिलं विचार केला पाहिजे.
१) स्त्री चे वय काय आहे ह्या वर गर्भपात केल्या मुळे किती धोका निर्माण होवू शकतो हे अवलंबून आहे.
२) गर्भपात करताना पूर्ण भुल दिली जाते त्याचा काहीतरी दीर्घकालीन परिणाम शरीरावर होत च असावा.
आयुष्यात किती वेळा अशी भूल देणे धोकादायक नाही ह्याचा विचार करणे गरजेचे आहे.
३) गर्भ किती महिन्याचा आहे ह्याचा विचार तर करावाच लागतो.
बाकी नैतिक प्रश्न आणि स्त्री चे हक्क ह्या कोलाहल मध्ये स्त्री च्या आरोग्य शी खेळणे मला तरी चुकीचं वाटत.
प्रभावशाली आणि सहज वापरू शकू असे गर्भ निरोधक उपाय ह्या वर चर्चा गरजेची आहे.

इथल्या प्रतिक्रिया वाचून दुसऱ्या बाजूने विचार केला न्हवता हे लक्षात आलं. आता चित्रपट वेगळ्या नजरेने मनातल्या मनात बघून ... आणि ख्रिश्चन लोक लहान मुलांच्या तुटलेले हात पायाचे ग्राफिक व्हिज्युअल घेऊन प्रो लाईफ बोंबलत planned Parenthood बाहेर उभे असतात त्यात आणि या स्त्री गर्भपात दृश्यात नक्की काय फरक आहे इ अनेक विचार मनात येत आहेत. इथे प्रतिक्रिया देणाऱ्याचे आणि वेगळा दृष्टीकोन मांडणाऱ्यांना अनेक धन्यवाद.
Submitted by अमितव
Reproductive rights हे समाजात लिंग गुणोत्तर समतोल साधण्या पेक्षा नक्कीच वरचढ हवेत. वेळ झाला की काढतो नवा धागा.
Submitted by अमितव

मोरोबानी लिहिलं नसतं तर मलाही लक्षात आलं नसतं. तुम्ही ओपन माइंडेडनेस दाखवला हे छान!
यानिमित्ताने लिबरलत्वाची झूल पांघरून आतमध्ये कट्टर सनातनी misogyny भरलेले पालथे घडे 'होय ही हत्याच' म्हणत expose झाले ही अजून एक गंमत!
Submitted by WHITEHAT
यानिमित्ताने लिबरलत्वाची झूल पांघरून आतमध्ये कट्टर सनातनी misogyny भरलेले पालथे घडे 'होय ही हत्याच' म्हणत expose झाले ही अजून एक गंमत!>>> Whatever...
मोरोबा जे म्हणतायत ते टेक्निकली बरोबर आहे. एक तो हक्क आणि दुसरी ती हत्या असं वाटतं. पण भारतात फक्त मुलींचे गर्भ निवडून ते गर्भपात करणे आणि मूल नकोय म्हणून गर्भपात करणे यात फरक नाही वाटत कुणाला? त्याचे सामाजिक परीणाम दिसत नाहियेत का? मुलगी आहे म्हणून दोन, तीन, चार ते असंख्यवेळा गर्भपात करणे याला काय लॉजिक लावाल? मूल नकोय म्हणून स त त गर्भपात करणारे किती टक्के असतील? WHITEHAT यांना वाटतं की देशात मुलींचे गर्भ काढणार्‍या जोडप्यांना सरकार धमक्या देतंय, जेल मधे टाकतंय. त्याऐवजी समाजा प्रबोधन करा. पण या गोष्टी ऑलरेडी होत आहेत ना? सरकार मुलींसाठी सोयी सवलती देत आहेच ना? त्याबरोबरच मुलगी आहे म्हणून गर्भपात करणे आणि मूल नकोय म्हणून करणे या कितीही पटले नाही तरी फरक आहे.
मला अजून लिहायचे होते या विषयावर. धाग्यासाठी वाट पहात होते.
Submitted by अंजली
अंजली+१
हायला! जन्मलेले मूल मुलगी आहे म्हणून तिला तूस खायला घालून किंवा बुडवून मारण्याचे समर्थन करणारे फेमिनिस्ट बघून डोळे निवले. आणि हे सगळं कशासाठी? तर मला बाई मुलगाच हवा म्हणून! अल्ट्रा फेमिनिस्ट झाले हे तर!
Submitted by भरत.
गर्भपात हे procedure आहे, हत्या नाही असं एकदा मान्य केल्यावर स्त्री भ्रूण removal ला तरी हत्या का म्हणायचं, असा प्रश्न पडला होता.
>>
नाहीच आहे. प्रश्ण इथे वेगळा आहे. स्त्री भ्रुण चिकित्सा करण्यावर बन्दी आहे. कारण एकदा ही चिकित्सा झाली की सासरचे लोक मुलगी होणार म्हणुन सुनेवर गर्भपाताचा दबाव आणु शकतात. भ्रुणाचे लिन्ग माहित नसताना, गर्भपात करण्यावर बन्दी आहे का भारतात?
Submitted by निलिमा
जन्मलेले मूल मुलगी आहे म्हणून तिला तूस खायला घालून किंवा बुडवून मारण्याचे समर्थन करणारे फेमिनिस्ट बघून डोळे निवले.//
हे समर्थन कुठेही कोणीही केलेलं नाही. पण जन्मलेल्या मुलाची हत्या आणि भारतात जो २०-२४ आठवडेपर्यंत गर्भपात करण्याचा नियम आहे त्या मुदतीत केलेलं गर्भपात प्रोसिजर हे सेम आहे , हत्याच आहे- असं म्हणणं तुमचं आहे- जर गर्भ मुलीचा असेल तर. राईट?
हे सेम अमेरिकेतील सनातनी प्रो-लाईफ वाल्यांचं अर्ग्युमेंट आहे. त्यांचा दृष्टीकोन जास्त व्यापक आहे- म्हणजे त्यांना पुरुष गर्भाचाही गर्भपात चालत नाही इतकंच. People without female reproductive organs wanting to control women. No wonder.
Submitted by WHITEHAT
अंजली,
Reproductive autonomy एकदा मान्य केली तर "सामाजिक परिणाम" हा निकष कसा लावता येईल?
मुलींची संख्या कमी झाल्यास मुलांना हुंड्याची अपेक्षा न ठेवता लग्न करावं लागेल, विधवा परित्यक्ता यांची लग्न होऊ शकतील आणि अशा प्रकारे समाजात transformation झाल्यास लोकांचा मुलगी नको हा दृष्टिकोन आपोआपच बदलेल.
आणि समजा- हा सर्व भयानक सामाजिक परिणाम आहे असं म्हणणं असेल तरी त्यासाठी forcing people to have a child they don't want to have- हे कसं काय योग्य?
स्त्रीच्या empowerment चे भयावह सामाजिक परिणाम होत आहेत- विवाहसंस्था, कुटूंबसंस्था उध्वस्त होते आहे- आमच्या जातीची/धर्माची/रेसची लोकसंख्या कमी होत आहे- म्हणून तिने आम्ही सांगतो तितकी मुलं जन्माला घालावी , नोकरी करू नये, घटस्फोट घेऊ नये, लेस्बियन असू नये- ही सगळी बंधनं सामाजिक परिणामांच्या नावाखालीच घातलेली असतात.
भारतासारख्या रेप, स्त्रीची असुरक्षितता, हुंडा, स्त्रीला हीन वागणूक हेच कल्चर असलेल्या देशात कोणी मुलगी नको म्हणणं इतकं का वेगळं वाटत आहे?त्याला समाज collectively जबाबदार आहे- ते जोडपं फक्त परिस्थितीला react करत आहे. गर्भपातासाठी- severe birth defects असणं, अनौरसता, कॉलेज कपलच्या 'एक ही भूल का नतिजा', आर्थिकदृष्ट्या असमर्थता असणं- ही सर्व कारणं राजमान्य आहेत. असा फरक का?
Submitted by WHITEHAT
नवजात बाळ मुलगी आहे म्हणून तिच्या नरडीला नख लावणार्‍यांचा आणि गर्भ स्त्री आहे म्हणून तो पाडणार्‍यांचा उद्देश एकच आहे. त्यामुळे माझ्यालेखी या दोन्ही गोष्टी सारख्याच.
अमेरिकेतले प्रो चॉइस वाले लोकांना गर्भ प्रतिबंधक साधने न वापरता वारंवार गर्भपात करायला उत्तेजन देतात का? तेच स्त्रीभ्रूणहत्येचं समर्थन करणारे मात्र तुम्ही जोवर मुलगा /मुलगे होत नाहीत तोवर गर्भधारणा आणि गर्भपात करत रहा असं म्हणतत.
भारतात मुलीचा जन्म कठीण म्हणून मुलगी नको असं म्हणणारी स्त्री जर स्वतः मुलाला जन्म देऊन इतर कोणाच्या मुलींची छेडछाड , बलात्कार, हुंडाबळी करणारा अपराधी तयार करते. (मूळ त्या पोस्टमधलंच लॉजिक पुढे नेऊन). म्हणूनच मुलींच्या जगण्याबद्दल काळजी वाटणारी विचारी व खरी स्त्रीवादी स्त्री मुलगा वा मुलगी असं कोणतंच अपत्य नको, असं म्हणणारी असेल.
Submitted by भरत.

झाले बहुतेक प्रतिसाद हलवून. आता पुढे बोलता येईल.

मुलगाच हवा म्हणून गर्भलिंग चेक करून केले जाणार गर्भपात किती असतील हो.

म्हणजे percent मध्ये.
कमी असतील.
१) विवाह पूर्ण संबंध आल्या मुळे गर्भ राहतो आणि तो ना समाज स्वीकारत ,ना ती स्त्री स्वीकारत ना तो पुरुष पार्टनर स्वीकारत .
ह्या मुळे होणारे गर्भपात नक्कीच जास्त आहेत.
मुलाची जबाबदारी घेणे ही दीर्घकालीन जबाबदारी असते.ते घेणे टाळले जाते.
वयची पन्नाशी गाठली आहे मुल मोठी झाली आहेत
सूना जावई आले आहेत.
आणि गर्भ राहतो .
तेव्हा गर्भपात हा एकमेव मार्ग उपलब्ध असतो.
आणि ह्याचे प्रमाण पण बऱ्यापैकी जास्त आहेत.

पण मुलगाच हवा म्हणून गर्भपात होतो इतक्याच विषयावर आपण बोलत असतो
.
आणि बाकी सर्व. ठिकाणी दुर्लक्ष करतो.

अमेरिकेतील रो वि वेड ला समर्थन पण भारतातील सेक्स सिलेक्टिव्ह अ‍ॅबोर्शन ला विरोध हा वरकरणी विरोधाभास, दुटप्पीपणा किंवा ढोंगीपणा वाटू शकतो. तो तसा नाही. सौदी मधल्या बुरखासक्तीला विरोध पण कर्नाटकात हिजाब वाल्या मुलींच्या हक्काला समर्थन हे लॉजिकली कंसिस्टंट आहे, तसेच हे.

धन्यवाद धाग्याबद्दल मै.

तेथे वाद वाचत होतो पण धागा त्यावर चर्चेला योग्य नव्हता. मूळ विषयाबद्दल -
- इथे "स्त्रियांना ठरवू दे" लॉजिक मधे कसलेही समर्थन नाही. यात ज्या विविध प्रकारच्या केसेस असतात त्या "वाइड" डेटावर कमीत कमी अन्यायकारक तोडगा आहे. यापेक्षा वेगळे काही ठरवले तर जास्त केसेस मधे स्त्रियांना अडचणीचे होईल.
- स्त्रीभृणूहत्येच्या केसेस मधेही कायद्याचा हस्तक्षेप नकोच. इतरच मार्गाने प्रयत्न व्हावेत. जनरली अशा बाबतीत कायद्याचा हस्तक्षेप हा आणखी भयंकर इलाज ठरतो (विचारस्वातंत्र्यासारखेच हे ही आहे त्या दृष्टीने).
- कसलेही ठोस कारण नसताना केला जाणारा कोणताही गर्भपात हा या स्वातंत्र्याचा गैरवापर आहे. त्यात भारतात केली जाणारी स्त्रीभृणूहत्याही आली. त्याचे कसलेही समर्थन नाही. मात्र भारतात ती स्त्री स्वतः कितपत ठरवते आणि तिच्या सासरचे तिच्यावर किती प्रेशर असते हा डेटा मिळणे अवघड आहे. अशा स्त्रियांवर कुटुंबियांकडून प्रेशर आणणे हा गुन्हाच असावा. हे असले गुन्हे एन्फोर्स करणे अवघड असते (हुंड्याप्रमाणेच) पण कायद्याने तरी गुन्हा असावा. ज्यांना दाद मागायची त्यांच्याकडे ऑप्शन असतो.
- "रो वि वेड" चर्चेत मी एक मुद्दा काढला होता की काही ठराविक बाबतीत अपवाद करून कायद्याने बंदी असावी का? पण त्याचेही दुष्परिणाम तेथे चर्चेत आले व एकूण विचार करता ते नकोच असेच वाटते. नाहीतर परस्परसंमतीने प्रेग्नंट राहिलेली व्यक्ती, बाळाची हेल्थ चांगली असणे, प्रेग्नंसी बरीच पुढे गेलेली असणे - याबाबत काही अपवाद होउ शकतात. स्त्रीभृणूहत्याही त्यात येउ शकते. पण भारतात व अमेरिकेत तरी कायदे करणार्‍यांचा उत्साह पाहिला तर तो स्लिपरी स्लोप वाटतो.

कोणत्याही "स्वातंत्र्या" मधे:
- ज्या उद्देशाने ते स्वातंत्र्य दिले गेले तो उद्देश
- काही बाबतीत त्याचा होणारा गैरवापर व त्यामुळे त्या स्वातंत्र्यावरच टाच आणण्याची केली जाणारी मागणी
- अशा कायद्यातून होणारा त्या मूळ उद्देशाचा संकोच

या तिन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो. सहसा तिसर्‍या कारणामुळे तो गैरवापर हा साइड इफेक्ट म्हणून सोडून द्यावा लागतो. विचारस्वातंत्र्याच्या बाबतीत हे लागू करून बघा. तसेच आहे.

अमेरिकेतील रो वि वेड ला समर्थन पण भारतातील सेक्स सिलेक्टिव्ह अ‍ॅबोर्शन ला विरोध हा वरकरणी विरोधाभास, दुटप्पीपणा किंवा ढोंगीपणा वाटू शकतो. तो तसा नाही. सौदी मधल्या बुरखासक्तीला विरोध पण कर्नाटकात हिजाब वाल्या मुलींच्या हक्काला समर्थन हे लॉजिकली कंसिस्टंट आहे, तसेच हे.
नवीन Submitted by vijaykulkarni on 2 Augu

Lol

एखाद्या बाईला अबोर्शन करायचं असेल तर अमेरिकेत तिने लिबरल राज्यात क्लिनिकमध्ये जावं- प्रोसिजर करून घ्यावी- no questions asked.
पण भारतात अबोर्शन करायचं असल्यास तिने डॉक्टरांना कारण सांगावं. मग डॉक्टर कुलकर्णीसराना कारणाचा फॉर्म इमेल करणार. सरांनी अप्रुव्ह केलं तरच बाईला परवानगी मिळणार. असं करायचं का हो सर?
एक स्त्री भारतात टिपिकल भारतीय मुलगी म्हणून abuse discrimination harrassment हे सहन करत मोठी झाली. कशीबशी त्यातून बाहेर पडली. आता परत मुलगी जन्माला घालून तेच टेन्शन, असुरक्षितता नको या विचाराने मुलगी नको, मुलगा चालेल अशी तिची मानसिकता आहे. पण ती तुमच्या दृष्टीने क्रिमिनल.
मग एखादी विवाहित स्त्री म्हणाली की मला मूल हवं आहे पण हे मूल माझ्या नवऱ्याचं नसून कॉलेज रियुनियनला एक्स भेटला त्यावेळी चूक झाली त्याचा परिणाम आहे. मला माझा संसार वाचवायचा आहे सो मला अबोर्शन करून घ्यायचंय. तर? सर तुम्ही हे कारण अप्रुव्ह करणार का? की भरत. सर म्हणाले तसं हे पण नरड्याला नख लावण्याच्या समान?
म्हणजे अबोर्शनला कोणतं कारण valid आणि कोणतं invalid हे तुमच्यासारखे पुरुष (सॉरी- persons without female reproduction system) ठरवणार ना? बायकांना काय कळतं हो सर...

स्त्रीभृणूहत्येच्या केसेस मधेही कायद्याचा हस्तक्षेप नकोच. इतरच मार्गाने प्रयत्न व्हावेत. जनरली अशा बाबतीत कायद्याचा हस्तक्षेप हा आणखी भयंकर इलाज ठरतो (विचारस्वातंत्र्यासारखेच हे ही आहे त्या दृष्टीने).///

+१००००
'हत्या' तर राहू दे आज भारतात नुसती गर्भलिंगचाचणी केली तर ते जोडपं आणि तो technician यांच्यावर FIR वगैरे पण करू शकतात पोलीस.
गंमत म्हणजे तथाकथित पुरोगामी लिबरल्सना हे खूप आवडतं. या गुन्हेगारांना असंच पाहिजे टाईप्स. भारतात विनोदीच परिस्थिती आहे एकूण.

ते हत्या, गळ्याला नख वगैरे इमोशनल शब्द या विषयावरच्या चर्चेत येतातच हमखास आणि अशा इमोशनल शब्दाचा लॉजिकल प्रतिवाद अवघड होऊन बसतो.
या विषयावर मध्यंतरी अमेरिकेतील राजकारण ग्रुप वर चर्चा झाली होती तेव्हा लिहिलेल्या पोस्ट चा काही भागः
मेडिकली पहिल्या काही आठवड्यात गर्भाचे ठोके सुरु झाले तरीही गर्भाशयाबाहेर जिवंत राहण्याची शक्यता नसलेल्या गर्भाला "viable fetus" समजले जात नाही. म्हणजे त्याला बालक, व्यक्ती वगैरे समजले जात नाही. त्याला फक्त " भविष्यात बालक जन्माला येण्याची शक्यता असलेला पेशींचा समूह " असे म्हणता येईल. अमेरिकेत "viable fetus" हे २४ आठवड्यांनंतर समजले जाते. इतर काही ठिकाणी बहुतेक २२ , २३ आठवडे धरतात. याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातले कोणी असतील तर नीट सांगू शकतील.
त्यामुळे त्याआधी केलेल्या गर्भपाताला ते हत्या, खून वगैरे म्हणणे हे अयोग्य होईल.
"viable fetus" होण्यापूर्वी स्त्रीला कोणताही गिल्ट न देता गर्भपात करण्याचा अधिकार हवाच. "viable fetus" झाल्यानंतर गर्भपात हा सबळ कारणाने ( जसे स्त्रीच्या जिवाला किंवा तब्येतीला धोका असल्यास) करता यावा अन्यथा नाही. (साधारण असेच काहीसे रो वि. वेड च्या निकालात होते)
कारण तोपर्यन्त इतर कोणत्याही कारणाने मूल नको असल्यास तुम्हाला विचार करण्याची, सुरक्षित गर्भपाताची पुरेशी संधी मिळालेली आहे. हे पटण्यासारखे वाटते मला.
गर्भ लिंग निदान आणि त्यावर आधारित गर्भपात हे बहुधा २० आठवड्याच्या आसपास होत असावेत.
हे फारेन्ड म्हणत आहे तसे "दिलेल्या अधिकारचा गैरवापर" च्या कक्षेत येत असावे असे वाटते.

भारतात गर्भपात करण्यास कायद्याने प्रतिबंध नाही.
अमेरिकेत कायद्याने गर्भपात करण्यास बंदी आताच टाकली आहे.
फक्त नियमावली नक्की आहे.
गर्भपात करण्याचा सल्ला dr नी दिल्याशिवाय
कोणतेच हॉस्पिटल ते करणार नाही.
पन्नास सह्या तरी विविध फॉर्म वर घेतात त्या मध्ये काय लिहलेले असते हे सहसा कोणी वाचत नाही.
फक्त सह्या करतात
सह्या करणारा व्यक्ती चे त्या स्त्री शी नात काय
हा कळी चा प्रश्न प्रतेक पानावर असतो.
मुलगा किंवा वडील हे ती सही करण्यास पात्र व्यक्ती नसावेत.
असे मला वाटत.
त्या मुलाचा biological बाप च सही करण्यास उपलब्ध असला पाहिजे .
असे मला वाटत.
नक्की माहित नाही.
गर्भपात ज्या स्त्री चा करायचा आहे तिच्या शिवाय अजून एका व्यक्तीची सही लागतेच.
त्या शिवाय डॉक्टर रिस्क घेणार नाहीत.

अमेरिकेत कायद्याने गर्भपात करण्यास बंदी आताच टाकली आहे. >>> असे नाहीये ते. एखाद्या स्टेट मधे गर्भपातावर बंदी घालायची की कसे तो निर्णय आता ती ती स्टेट्स घेऊ शकतात असे झालेले आहे

कायद्याची व्याख्या बाजूला ठेवली तर माझ्या मते गर्भपात ही हत्याच आहे. पण गुन्हेगाराला दिलेली फाशी हीसुद्धा हत्या आहे. पेशंटचा लाईफ सपोर्ट काढणे हीसुद्धा हत्याच आहे. सबळ कारण असतानाच आणि अपवादात्मक परिस्थितींमध्ये या हत्या कायदेशीर आणि नैतिक असल्या पाहिजेत आणि असतात.
गर्भपात हा गर्भनिरोधनाला पर्याय नसला पाहिजे. त्यासाठी गर्भनिरोधक साधनांचा प्रसार आणि पुरेशी उपलब्धता, जागरुकता असली पाहिजे.

अमेरिकेत आणि भारतात केल्या जाणाऱ्या गर्भपातांची परिस्थिती सारखी आहे का? तर अमेरिका-भारत तुलनेला अर्थ आहे. अमेरिकेत जर स्त्रीभ्रूणहत्या हा मोठा प्रॉब्लेम नसेल तर कायद्यांची तुलना कशी करता येईल? भारतात विवाहपूर्व संबंधांतून गर्भधारणा झाली तर जी गरोदर आहे त्या मुलीला, तिच्या घरच्यांना भयंकर दिव्यातून जावं लागतं. यात किमान ५०% जबाबदारी ज्याची असते त्याने हात वर केलेले असले की विषयच संपला. मग त्या जन्मलेल्या मुलाचं भवितव्य काय? अशा वेळी गर्भपात हाच सर्वोत्तम उपाय त्यांना उपलब्ध असतो. मग तो असुरक्षित पद्धतीने करण्यापेक्षा कायदेशीर, सुरक्षित पद्धतीने करणं कधीही चांगलं.

मै धन्यवाद.
गर्भाचे लिंग स्त्री आहे म्हणून तो पाडणे (हत्या शब्द कनोटेशनमुळे टाळतोय) ह्यात समर्थनार्थ काहीही असूच शकत नाही.

लिंग-सापेक्ष गर्भपात, अर्थात सामान्यतः आणि भारताच्या दृष्टीकोनातून विचार केला तर स्त्री-लिंग असलेल्या गर्भाला पाडून टाकणे कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगा म्हातारपणाची काठी कारण दुसर्‍या काही सोशल सिक्युरिटीचा संपूर्ण अभाव, मुलगी दुसर्‍याकडे जाणार, मुलीला वाढवणे म्हणजे उगाच खर्च इ. इ. अनेक कारणांमुळे होणारा गर्भपात अर्थात स्त्रीभ्रूण हत्या. पण मुळात गर्भपात म्हणजे काय? तर नको असलेली संतती जन्माला येवू नये यासाठी करावयाची वैद्यकीय प्रोसिजर. वेगवेगळ्या देशांत गर्भपात कधी करू शकतो, आणि कधी केला तर तो गुन्हा आहे यासाठी अनेक कायदे आहेत. अमेरिकेचा अपवाद वगळता हे कायदे बहुतेक ठिकाणी अनेक वर्षे तावुन सुलाखुन आता सर्वमान्य झाले आहेत. काही अटींवर गर्भपात जवळ जवळ संपूर्ण जगात उपलब्ध आहे (का होता ? Sad ) अर्थात या अटी देशांप्रमाणे बदलत जातात. स्त्रीचा जीव वाचवणे, गर्भात असलेले शारिरीक किंवा मानसिक व्यंग, बलत्कारामुळे राहिलेला गर्भ, आर्थिक असमर्थता पासून कुठलेही कारण न देता फक्त स्त्रीला गर्भपाताची निर्णय घ्यायची संपूर्ण मुभा असणे (चीन, कॅनडा). इत्यादी अनेक कारणे देऊन किंवा कुठलेही कारण न देता गर्भपात करता येतो. मग हाच धागा पुढे खेचून गर्भपात करता येतो तर मग मला मुलगाच हवा आहे किंवा मुलगीच नको या कारणाने गर्भपात केला तर काय समस्या आहे असा प्रश्न निर्माण होतो. याची कारणे डायवर्सिटी राखणे, लिंग-गुणोत्तर असामन झाल्यामुळे होणारे समाजातील दुष्परिणाम टाळणे इ. अनेक आहेत.
आता भारताबद्दल विचार केला चांगल्या शिकल्यासवरलेल्या शहरात रहाणार्‍या एका कुटुंबातील स्त्री गर्भवती राहिली आहे. तिला/ तिच्या नवर्‍याला/ तिच्या सासू सासर्‍यांना/ आई-बाबांना... होणारे मूल 'मुलगा' असेल तरच हवे आहे. मुलगी असेल तर नको आहे. कारणे काहीही असोत, पण असं आहे. आता कायदा असल्याने ते मुलगी असेल तर काहीच करू शकत नाहीत. मग काय होत असेल?
१. कायद्याला डावलून गर्भ लिंग चिकित्सा करणे.
२. कायद्याला डावलून अनधिकृत गर्भपात.. अनधिकृत त्यामुळे असुरक्षित/ मेडिकली जिवावर बेतू शकणारे/ कायम स्वरुपी समस्या निर्माण करू शकणारे.
३. अनधिकृत त्यामुळे कदाचित खूप उशीरा. कारण वेळेत मदत मिळणे होईलच असे नाही.
४. गर्भपात शक्य न झाल्याने नको असलेल्या अपत्याला जन्म देणे पण नवजात अर्भकाची काहीही काळजी न घेणे आणि बालमृत्यू ओढवून घेणे.
५. नकोशा अर्भकाला नकोसे आहेस असं दाखवतच वाढवणे.
६. शिक्षण मोफत आहे, आरोग्य सुविधा मोफत आहेत इ. ठीक. पण भारतात मोफत गोष्टी किती आणि कशा मिळतात ते वेगळं सांगायला नको. पालकांनी सापत्न वागणूक द्यायचीच ठरवली तर अपत्य काहीही करू शकत नाही.
७. मूल जन्मल्यावर त्याचा चक्क खून करणे.
८. नकोसे अपत्य आहे पण झाल्यावर प्रेम उत्पन्न होणे, सहवासाने प्रेम उत्पन्न होणे आणि स्वीकार करणे. दुजाभाव न करता भविष्यात पालन पोषण करणे.

वरील पर्यायातील अनेक पर्याय अमानुष वाटत असतील तरी ते होतात असे बातम्यात, रिसर्च पेपर मध्ये वाचलेले आहे. आणि होण्याचे प्रमान स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट आहे असे ही वाचलेले आहे. यातील ज्यांच्या वाट्याला शेवटचा पर्याय येतो ते भाग्यवान. पण इतर कोणताही पर्याय आलेले मुल जन्मभर (किंवा जे काही जगेल तितका काळ) आपण नकोसे आहोत या मानसिक तणावात जगणार. कायम नकोसे आहोत याचा आघात किती जबरदस्त असू शकतो याची मला कल्पनाही करवत नाही. तो नकळत्या वयात आणि कायम असेल तर?

गर्भ लिंग चिकित्सा यंत्रे १९७० पासून भारतात उपलब्ध होऊ लागली. त्यात ८०/ ९० च्या दशकांत सुधारण्या झाल्या. भारतात लिंग सापेक्ष गर्भपाताला बंदी आहे. तरीही गेल्या १५० वर्षातील ०-५ वर्षातील लिंग गुणोत्तर बघितले तर त्यात उत्तरोत्तर काहीही सुधारणा होताना दिसत नाही.
२०२१ ची माहिती मला सापडली नाही, पण २०११ पर्यंत तरी उत्तरोत्तर ०-५ गुणोत्तर खराबच होत गेलेले आहे. याचा सरळ अर्थ कायद्याला डावलून राजरोस असुरक्षित गर्भपात होत आहेत.

हा सगळा विचार करुन मलातरी यात कायद्याने फार पडू नये आणि शाश्वत उत्तर अर्थात शिक्षण, समानता इ. वरच भर द्यावा असं वाटतं. याचा अर्थ लगेच कायदा बदलावा असं अर्थात वाटत नाही. पण फोकस मानसिकता बदलण्यात असावा. कायद्याचे हत्यार लागेल तिकडे नक्कीच वापरावे.

'Y' मध्ये जन्म न झालेल्या (स्त्री लिंगी) अर्भकांचे अवयव दाखवले आहेत. त्याची अमानुष पद्धतीने विल्हेवाट दाखवली आहे. ते बघून मला चीड/ राग/ किळस इ. अनेक गोष्टी वाटल्या होत्या.
इथे / अमेरिकेत समर मधले एखाददोन वीकेंड ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन लोक फुटपाथवर उभे राहून असेच तुटलेले हात पाय असलेली पोस्टर घेऊन हा पक्ष खुनी आहे असलं रेडरिक्ट घेऊन मूक किंवा बोंबलत फिरतात. तेव्हा राग येतो. किळस नाही येत. आणि तो राग स्त्री चे अधिकार डावलणे इ. वर आलेला असतो, प्रो चॉईस असतो.
हा विचार करुन आधी गंमत वाटली.
पण आणखी विचार करता प्रो चॉईस आणि जेंडर डिस्क्रिमिनेशन हे दोन वेगळे मुद्दे आहेत हे जाणवलं. दोन्ही आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. त्यांच्यात एकाला सोडून दुसर्‍याला धरा असं करता येत नाही. दोन्हींची कास धरुन अवघड वाटचाल केलीच पाहिजे.

एक स्त्री भारतात टिपिकल भारतीय मुलगी म्हणून abuse discrimination harrassment हे सहन करत मोठी झाली. कशीबशी त्यातून बाहेर पडली. आता परत मुलगी जन्माला घालून तेच टेन्शन, असुरक्षितता नको या विचाराने मुलगी नको, मुलगा चालेल अशी तिची मानसिकता आहे. पण ती तुमच्या दृष्टीने क्रिमिनल.

हो. अशा डिस्क्रिमिनेशन असलेल्या जगात आपले बाळच नको या मानसिकतेतून तिने जर विनापत्य रहायचा निर्णय घेतला, राहिलेला गर्भ लिंग न तपासता गर्भपात केला तर जरूर आदर वाटेल , तो निर्णय पटला नाही तरीही. पण मुलगाच हवा याचा अर्थ आम्ही बक्कळ हुंडा वसूल करणार हाच असतो. भारतात हे उपलब्ध नसल्याने अनेक लोक दुबईत जाऊन करतात. आता या विषयी कायद्याने करावे की प्रबोधनाने, यावर मतभेद असतील. पण अमेरिकेतील गर्भपात आणी हे यांची तुलना अस्थानी आहे.

मुलगाच हवा पेक्षा 'मुलगी नको' असा विचार करा विकु आणि कदाचित वेगळं चित्र दिसेल.
हरियाणात मुली कमी असल्याने त्यांना एकापेक्षा जास्त पुरुषांबरोबर बळजबरी झोपावं लागतं. घरात लग्न करुन आलेल्या मुलीला लग्न झालेल्या नवर्‍या व्यतिरिक्त घरातील इतर पुरुषांबरोबर झोपावं लागतं. स्त्रियांवर जबरदस्ती इ. किती होते ते वेगळं सांगायला नकोच.
थोडक्यात स्त्रियांची संख्या कमी झाल्याने वर कोणी डिमांड -सप्लाय प्रकारे स्त्री अप्पर हँड होईल असं लिहिलेलं तसं अजिबात होत नाही तर बळी तो कानपिळी प्रकारे पुरुषांचाच धाकदपटशा चालतो. मुलगी झाली तर हुंडा द्यावा लागतो इ. आहेच.
हा विचार करुन मुलगी नको कोणी म्हटलं तर.. असा विचार करा. आणि कायदा आहे त्यामुळे सरळ तर नको म्हणता येत नाही. मग आडमार्गाने काय काय होतं त्याचा ही विचार करा.

मुलगी नको मुलगाच हवा .
म्हणूनच च भारतात किंवा जगात गर्भपात होतात .
आणि हेच एकमेव कारण आहे
ही मानसिकता खरेच सोडा.
अधिकृत आकडेवारी अस्तित्वात असणार नाही
पण गर्भपात सर्वात जास्त होतात ते
अनैतिक संबंध मधून.
आणि मुलाची जबाबदारी घेण्याची कुवत ना स्त्री मध्ये असते ना पुरुषात म्हणून.
उगाच मुलगी आहे म्हणून गर्भपात केले जातात ,हेच एकमेव कारण आहे
असे युक्तिवाद करून .
चंगळवादी पण जबाबदारी घेण्यास नालायक
अशा लोकांची पाप लपवू नका

हे कॉपी केलेले एक गठ्ठा प्रतिसाद वाचणे थोडे कठीण जात आहे.
त्यामुळे पूर्ण काही वाचता आले नाही
पहिल्या काही प्रतिसादात "लिंगसापेक्ष गर्भपात करण्यास परवानगी असावी असा सूर दिसला"
वाचून आनंद झाला. Keep it up _/\_

1) नैतिकता
२) लिंगभेद
ह्या चष्म्यातून गर्भपात कडे बघूच नका.
मुळात जा.
शारीरिक संबंध आल्या शिवाय गर्भ राहतं नाही.
हे अंतिम सत्य आहे
लग्न झाल्या नंतर शारीरिक संबंध येणे अनिवार्य आहे.
मुल हवं की नको .
ह्या वर कोणत्याच देशात कोणतीच कायदेशीर बंधन नाहीत.
लग्न झालेल्या लोकांची पुढची जबाबदारी आहे.
मुलगा आहे की मुलगी हे जो चेक करेल त्याला लगेच फाशी हा जागतिक कायदा हवा.
फक्त डॉक्टर नाही

त्या मुलाची आई,बाप आणि संबंधित नातेवाईक सर्व आरोपी.
मुल हवं असेल तर च असुरक्षित शारीरिक संबंध .
नको असेल तर फक्त मजा येते म्हणून असुरक्षित संबंध ठेवणे हा गंभीर गुन्हा.
जबाबदारी घेत असतील तर लक्ष देण्याची गरज नाही
अपवाद असणारे.
वयस्कर नवरा bayko चुकून राहिले ते.
Baltkar मधून.
फसवणूक झाली तर .ह्या मध्ये फसवणूक करणारा गंभीर गुन्हेगार असेल..
मग ती स्त्री असू किंवा पुरुष
मुलगी आहे म्हणून कोणी केला तर तत्काळ फाशी .
सर्व संबंधित लोकांना

इथे वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत-
एक मतप्रवाह- overall कोणत्याही कारणाने गर्भपात केला तरी चालेल पण मुलगी आहे (gender selection) हे कारण चालणार नाही. बाकी selective कारणं- मूल नवऱ्याचं नसून बॉयफ्रेंडचं आहे(gene pool selection), औरस नसून अनौरस आहे, severe birth defects आहेत- ही सिलेक्शन चालतील. का? आम्ही म्हणतो म्हणून. आम्ही reproductive autonomy मानत नाही म्हणून. आम्ही सक्तीने जन्माला घातलेल्या मुलीचं पुढे काय होईल याची कुठलीही जबाबदारी मात्र आम्ही घेणार नाही.

दुसरा मतप्रवाह-reproductive autonomy तत्व म्हणून मान्य आहे पण इथे तो अधिकार देता येणार नाही कारण मग मुलींचा तुटवडा होईल. मुली जन्माला यायला हव्यात कारण पुरुषांना पुरेश्या मुली उपलब्ध असाव्यात. इथे स्त्री ही means to an end आहे. पुरुषांची सेवा, लैंगिक भूक भागवणे व प्रजोत्पादन यासाठी पुरेसा सप्लाय उपलब्ध असावा म्हणून तो सप्लाय ensure करणे व त्यासाठी कायदे करणे. प्लस प्रत्येक शहरात पुरेश्या वेश्या पण हव्यातच कारण त्या आहेत म्हणून आपल्यासारख्या घरातल्या बायका सुरक्षित आहेत हो.

तिसरा मतप्रवाह- जेंडर सिलेक्शन decriminalize करावं- निदान ओव्हरनाईट नाही तरी त्या दिशेने वाटचाल करावी आणि प्रबोधनावर भर द्यावा. मला तिसरा मतप्रवाह पटतोय.

अमेरिकेत फ्रेंड्समधली रेचेल लग्नाशिवाय मूल जन्माला घालायला तयार असते- रॉसला म्हणते तुला व्हायचं तितकं involve हो- काही सक्ती नाही, मी एकटी बघेन काय ते.
भारतीय मुलींना अशा परिस्थितीत अबोर्शन हाच पर्याय असतो. इथे रेचेल फार ग्रेट आणि भारतीय बायका म्हणजे नरड्याला नख लावणाऱ्या कुलटा असं नसून दोन समाजाच्या मानसिकतेतला हा फरक आहे. बाईला क्रिमिनल न ठरवता समाजाने- पुरुषांनी- मानसिकता बदलावी.

<<आजकाल अजून एक ओरड ऐकू येते की मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यामुळे विवाहसंस्था धोक्यात आहे. यावर उपाय काय?>>

This is very important topic.. नवीन धागा काढणं मस्ट आहे!

विवाह संस्था ह्या फक्त पुरुष लोकांसाठी नाहीत
लहान मूल.
वृध्द लोक.
स्त्रिया
पुरुष.
आणि समाज स्वास्थ.
सर्वांचा फायदा त्या मध्ये आहे.
कुटुंब व्यवस्था नष्ट झाली.
स्त्री संकटात.
मुल संकटात त्या चिमण्या पाखरांची जबाबदारी चंगळवादी घेणार नाहीत.
वृध्द संकटात.

स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहिली
कोणाच्या आधाराने.
उद्योग पती ,भांडवल दार.
लाथ मारून अपंग करतील
खूप ऑप्शन त्यांच्या कडे असतील.
इथे नोकरी करणारा कोणीच स्वतःच्या पायावर उभा नाही.
दयेवर जगत आहे.
लोकांसाठी आयपीएस अधिकारी असतो पण सत्ता धारी लोकांचा तो नोकर असतो.
एक शब्द जरी उलट बोलला तरी घरी
मग लोकशाही असू,हुकूम शही असू.
किंवा राजे शाही काही फरक पडत नाही

शरीर सुख म्हणजे सेक्स .
सेक्स केल्या शिवाय गर्भ राहतं नाही.
त्रिवार सत्य आहे
तरी स्व सुखासाठी सेक्स करून गर्भ राहिला तर स्व स्वार्थ साधण्यासाठी गर्भपात,जीव हत्या करण्याचा अधिकार हवा.
हास्यास्पद आहे
.rape , गर्भ निरोधक साधनांचा दोष.
फक्त ह्याच कारणाने गर्भ pat करण्याची परवानगी.
हा जागतिक कायदा हवा
स्वतः maja मारण्यासाठी जीव हत्या हा गुन्हा च आहे

>दुसरा मतप्रवाह-reproductive autonomy तत्व म्हणून मान्य आहे पण इथे तो अधिकार देता येणार नाही कारण मग मुलींचा तुटवडा होईल. मुली जन्माला यायला हव्यात कारण पुरुषांना पुरेश्या मुली उपलब्ध असाव्यात. इथे स्त्री ही means to an end आहे. पुरुषांची सेवा, लैंगिक भूक भागवणे व प्रजोत्पादन यासाठी पुरेसा सप्लाय उपलब्ध असावा म्हणून तो सप्लाय ensure करणे व त्यासाठी कायदे करणे. प्लस प्रत्येक शहरात पुरेश्या वेश्या पण हव्यातच कारण त्या आहेत म्हणून आपल्यासारख्या घरातल्या बायका सुरक्षित आहेत हो

दुसर्‍याने न लिहिलेले वाचून त्यावर टीका करण्याचा हव्यास का ? वरचे काही कुणी दूरान्वयाने तरी लिहिले आहे का ?

विकु +१
हे असं इथे किंवा तिथे कुणी कधी लिहिलंय?

मुली नाही राहिल्या तरी अनेक पर्याय आज उपलब्ध असतील.
समाजातील प्रत्येक घटकाची सुरक्षा .हे विषय महत्वाचे आहेत
पुरुष अन्याय करणारे ,स्त्रिया अन्याय सहन करणाऱ्या.
सर्व व्यवस्था ह्या स्त्री वर अन्याय करण्यासाठी च आहेत.
हा विचारच पटत नाही.
आणि कोणी अन्याय करत असेल मग अन्याय ग्रस्त पुरुष असू किंवा स्त्री
अन्याय करणाऱ्या व्यक्ती ल
अमानवीय शिक्षा देण्या लं माझा बिलकुल विरोध नाही

भारतात एकीकडे लोकसंख्या जास्त असल्याने अबोर्शनला सरकार दरबारी आडकाठी किंवा विरोध नसताना फक्त gender बेस्ड अबोर्शनला कायद्याचा धाक याचसाठी तर आहे. मुलींची संख्या कमी झाली तर बलात्कार वाढतील, एका मुलीला अनेक पुरुषांसोबत झोपावं लागेल- कारण पुरुषांची लैंगिक गरज तशीच राहणार. थोडक्यात शिल्लक राहिलेल्या मुलींचा इव्हन मोअर abuse होईल. त्यामुळे पुरेसा सप्लाय maintain करा म्हणजे abuse सोसायला पुरेसं संख्याबळ असेल. असंच तर आहे! शिवाय बिनलग्नाच्या पुरुषांचं काय- त्यांच्या गरजा इत्यादी काळजी आहेच. त्या दृष्टीने बायका हे means to an end आहे.
कुुलकर्णी सरांचा त्यांच्या जातीतील पुरुषांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत असा गळा काढणारा धागा होताच ना. त्यात त्यानी दुसऱ्या जातीतील बायकांशी लग्न करणं हा "उपाय" सुचवला होता. पण सगळीकडेच shortage झालं तर काय!

दोन वेगळे दृष्टिकोन दिसत आहेतः

१. भारतात स्रीभ्रुणपात करू न देणे म्हणजे मातेचा वैयक्तिक निर्णय नाकारण्यासारखं आहे. यामुळे मातेच्या विचार आणि कृती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे, जे समर्थनीय नाही. त्यामुळे मातेची इच्छा असल्यास तिला स्त्रीभ्रुणपात करू द्यावा; तिला गुन्हेगाराच्या पिंजर्‍यात उभे करू नये.
२. भारतात स्त्रीभ्रुणहत्या ही मातेच्या वैयक्तिक इच्छेप्रमाणे न होता सामाजिक पुरुषी दबाव, मुलगाच हवा असणे, वंशाचा दिवा वगैरे विचार - यामुळे प्रामुख्याने होते. शिवाय हत्या ही मोठ्या प्रमाणात पुंभ्रुणापेक्षा स्त्रीभ्रुणाची होते, ज्याने खूपच लिंग-असमतोल निर्माण झाला आहे आणि तो वाढतच आहे. सबब भारतात स्त्रीभ्रुणहत्याविरोधी कायदा योग्यच आहे.

दोन्ही विचारांमध्ये असं दिसतं आहे की काही गृहीतके आहेत. पहिलं गृहीतक हे भारतात स्त्रीभ्रुणहत्या/पात कोणकोणत्या कारणांमुळे होते याबद्दल. आता 'स्त्रीजन्म त्रासदायक आहे म्हणून मुलगी नको' असं एक कारण दोन्ही बाजूंच्या मंडळांना माहीत आहे. फक्त त्यावर त्यांचे खालील मतप्रवाह आहेत -
१. स्त्रीजन्म त्रासदायक वाटल्यामुळे जरी स्त्रीगर्भपात करावासा वाटला तरी तो मातेचा निर्णय आहे. मूळ प्रश्न स्त्रियांना होणारा त्रास हा असेल तर त्यावर काम आधी करा; स्त्रीजन्म सुखकर वाटेल अशी परिस्थिती निर्माण करा; आपोआप 'त्या कारणाने होणारे' स्त्रीभ्रुणपात कमी होतील. पण मातेचं स्वातंत्र्य हे जास्त महत्त्वाचं आहे. स्त्रीगर्भपात-स्वातंत्र्य आधी, स्त्री-परिस्थिती-सुधार नंतर.
२. मातेचं स्वातंत्र्य हे इतक्या सहजा सहजी येणारं नाही. मुळात स्त्रीजन्म त्रासदायक वाटतो त्याची कारणं चिकार आहेत आणि त्यांची (जन्मापूर्वी आणि नंतरही) केली जाणारी हत्या हाच विषय गंभीर आहे. त्यामुळे ती हत्या रोखण्याचा कायदा कडक ठेवल्याशिवाय स्त्रीजन्म सुखकर होण्यासाठी जी वाटचाल करायची आहे (इतर उपायांसकट), ती अशक्य आहे. स्त्री-परिस्थिती-सुधार आधी, स्त्रीगर्भपात-स्वातंत्र्य नंतर.

छान मुद्दे आहेत. एकमेकांवर भावनिक दोषारोप न करता सर्वांनी गांभीर्याने चर्चा पुढे न्यावी ही विनंती. (अमुक एक विचार हास्यास्पद वाटला तरी त्यावर न हसता आधी समोरच्याने तसे का म्हटले आहे हे जाणून घ्यावे - असे माझे दोन्हीकडच्या मंडळींना हात जोडून सांगणे आहे. विषय महत्त्वाचा आहे, त्याचा चोथा होऊ नये).

Pages