चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यापेक्षा झोंबिवलीसारखे बनवा. बघा आणि नक्की कळवा >> झोंबिवली तुम्हाला आवडलाय तर डोळे झाकून स्कीप करायला हरकत नाही. आवड कळवल्याबद्दल आभार. Happy वेळ वाचला.
लोकांनी पाहू नये म्हणून रिकमेण्ड केला असेल तर माहिती नाही. कुणा जाणकाराचा रिव्ह्यू आला कि बघेन नक्की.

फोटोग्राफर नाही आवडला.
चांगल्या घरातल्या मुली पंटर मुलांना कश्या आधीन होतात ते पुन्हा नव्याने बघून काहीही साध्य झाले नाही.

घरात आईबापाने मुलीशी सुसंवाद ठेवणे आणि तिच्या आवडीनिवडीचा सुद्धा मान ठेवणे एवढ्या दोनच गोष्टी केल्या असत्या तर ती एवढी भिरभिरल्यासारखे तोंड घेऊन पूर्ण चित्रपटभर फिरली नसती. (खरं तर तिच्या आईवडिलांनी त्यांच्या परीने ते केलं सुद्धा असेल.. फक्त सिनेमात दाखवलं नाही तसं).

मला समहाऊ मिलोनीमध्ये माझी मैत्रीण, बहिण, भाची, पुतणी वगैरे दिसू लागली आणि मग नवाजुद्दीन वर अशक्य चिडचिड झाली. वाईट वाटलं सिनेमा बघून.

प्रचंड संथ आणि बोर आहे तो पिच्चर. त्या मुलीच्या चेहऱ्यावर तर कधीच काहीच भाव नसतात. बधाई हो मध्येपण तिच आहे ना. बराच अंधार आहे बराच वेळ. शेवटी ती जाते का त्याच्याकडे. खूप दिवस झाले बघून.

मला प्रचंड उत्सुकता होती झोंबीवली साठी... पण जितका ट्रेलर भारी जमलाय तितका चित्रपट नाही... पूर्वाध चांगला आहे..नंतर तेच तेच सीन वाटतात जसे झोंबी चा हल्ला.. शेवट सुध्हा अचानक आणि पूर्ण वाटतं नाही.. वैदेही ला प्रेग्नंट दाखवली नसती तरी चालल असत..त्याचा काही significance नाही.. पहिली गोष्ट वैदेही एवढ्या रात्री मोलकरणी सोबत कशाला शॉपिंग ला चाललेली.. हॉस्पिटल मध्ये लपलेल्याना परत बाहेर पडा है कशाला .. फक्त झोंबी च्या उपचाराचा साक्षात्कार होण्यासाठीच का.. बरं वैदेही ला कळलं होत तर तिने नवऱ्याला फोन करून का नाही सांगितलं.. मला शेवट पर्यंत वाटतं होत..ज्या केबिन मध्ये ललित, अमेय लपलेले ती कंपनी पाण्याची.. तिथे बऱ्याच पाण्याच्या बाटल्या होत्या..त्याचा काहितरी उपयोग होणार..पण heroin ला स्टंट द्यायाचे होते वाटत.. मला फारच अपेक्षा होत्या म्हणून अस झालं की काय माहित नाही ..

Montage नावाचा कोरीअन चित्रपट पहायचा आहे. तो प्राईमव्हिडीओ डॉट कॉम वर आहे. इकडे दिसत नाही. इथे कसा बघता येईल ?

लकडाऊन प्रचंड बेकार... पूर्ण बघू शकेल असा कोणी असेल वाटत नाही... संवाद खूपच रटाळ आहेत... काही स्क्रिप्ट्स वाचायला छान असतात पण चित्रपट/शिरेल बनवली तर कंटाळवाण्या होतात तसा प्रकार आहे...

शेवटी ती जाते का त्याच्याकडे. खूप दिवस झाले बघून.
>> ओपन एन्ड आहे. त्यामुळे माहिती नाही.

संथ, रटाळ, बोर, चेहऱ्यावर भाव नाहीत या सगळ्याला +१

आजच टॉपगन मॅव्हरिक पाहून आले.
अचाट व अतर्क्य. अग्निदिव्यातून जाउनही, हिरोला जराही खरचटत नाही वगैरे. पण मजा आली पहायला. एंटरटेनमेन्ट.
टॉम क्रुज काय फिट दिसतो बाप रे. काय वय असेल त्याचे आजच्या घडीला?

59

तुलसीदास ज्युनियर पाहिला काल. अफलातुन सिनेमा. स्पोर्टस सिनेमांना तसेही फार डिमांड आहे. राजीव कपुर, सन्जय दत्त, दिलिप ताहील सर्वांचिच कामे छान झालीत.
मुळ फोकस आहे, त्या लहान मुलावर. ..! वरुण बुद्धदेव हा टिनेजर पोरगा इतका गोड दिसतो की बस.
चित्रपटाचा काळ १९९४-९५ चा दाखवला आहे. स्नुकर चॅम्पियन वडील राजीव कपुरला वर्षानुवर्षे ऐन निर्णायक क्षणी हारतांना पाहतांना (अन ते ही दलिप ताहिल ने चिटींग करुन)उद्विग्न झालेला १३ वर्षाचा हा मुलगा, पेटुन उठतो. अन स्वत: स्ट्रगल करुन स्नुकर शिकतो. .. ते ही कोलकत्याच्या बकाल वस्तीत असलेल्या क्लब मधे जाउन. आणि शेवटी दिलिप ताहिलला हरवुन वडिलांना कप जिंकवुन देतो.
संजय दत्तला जास्त डायलॉग नाहीतच. पण त्याच्यासाठी ही भुमिका म्हण्जे अगदी डाव्या हातचा मळ वाटतो. एकंदरीत मस्त रिफ्रेशींग अनुभव. Happy

व्हिलन असेल असे वाटते. बघायचा आहे हा चित्रपट. कालच राज यांनी दुसर्‍या धाग्यावर सजेस्ट केलेला. आता अजून एक त्यावर प्रतिसाद आला. नोट करून ठेवतो हा...

<<संजय दत्तने १३ वर्षाच्या मुलाचे काम केलेय का ?<< छे हो. Biggrin
व्हिलनही नाही तो.

वरुण बुद्धदेव हा राजीव कपुरचा १३ वर्शाचा पोरगा दाखवलाय. अंडर १६ म्हणुन वरुणला इतर कुठलेच क्लब घेत नाही तेव्हा संजय दत्त त्याला शिकवतो.
बकाल वस्तीत असलेल्या स्नुकर क्लबचा 'राजा' संजय दत्त, इन्डियाचा बेस्ट प्लेयर असतो..
सर्वात आवडले ते... स्नुकर खेळाचे बारकावे, बारीकसारीक तपशिल, नियम वै.अगदी छान समजावुन सांगितले आहेत.

अदृष्य मुव्ही

रिव्ह्यू आलेत
पण कुठे खेळच नाही दिसत

पैशे वाचले

आता फक्त डायनासुर मुव्ही बघणार जून मध्ये

झोंबिवली बघायची इच्छा आहे पण झी ५, सोनी लिव नाहिये >>>>>> यू टयूबवर आहे.

मला अ आणि अ कॅटेगरीतला वाटला बघून.
@तुरू_ मला पण तसंच वाटलेलं.

अ आणि अ कॅटेगरीतला >> Lol पिक्चर मध्ये झॉम्बी आहेत मग तो खरा - जीवनाचे सुख दु:ख दाखवणारा कसा काय असेल असा विचार करतो आहे Uhoh

एक चावा आणि खेळ खलास

यातच जीवनाचे सार आहे

अडम का इव्ह नेही सफरचंदाचा एकच चावा घेतला आणि सगळी गडबड झाली Happy

काल शिल्लक तासाभराचा आर आर आर संपवला.
त्यात काहीच हाती लागले नाही.
नुसती हाणामारी. फक्त एक आलिया भटचा सीन विदाऊट हाणामारी होता. पण त्यातही तिच्या पोटात एक लाथ घातलीच.
शेवटच्या तासाभराने निराशा केली. नसता पुर्ण केला तरी चालले असते असे वाटले.

झोंबिवली बघायची इच्छा आहे पण झी ५, सोनी लिव नाहिये >>>>>> यू टयूबवर आहे.

>>> आं! यूट्यूबवर आख्खा सिनेमा आहे? सिनेमा हॉलमध्ये फोनवर शूट केलेला असेल का? मला सापडला नाही.

Pages