चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या वेगवेगळ्या तिघी आहेत (माहिती असावं म्हणून).
अजून चार सर्वत्र बहिणी आहेत. त्या रील्स बनवतात.

चित्रपटातील हिरो हिरोईनसाठी सौंदर्य हा एक फार मोठा गुण असतो, आणि नुसते ते असूनही चालत नाही ते प्रेझेंट करता यायला हवे. कतरीनाने ते आजवर जमवलेय म्हणून ती ईतकी यशस्वी आहे. वैदेही सुद्धा नक्की यशस्वी होईल. हिंदीतही तिने आपले नाणे खणखणीत वाजवावे.

कॅटरीना कबा वाटते याच्याशी सहमत. विशेषतः लग्न झाल्यापासून ठळकपणे जाणवते ते. सौंदर्य सुद्धा पेंटेड डॉल वाटू लागले आहे. आता हिंदीत ती स्पेस ईशा तलवार घेईल असे वाटते. खूप अपेक्षा आहेत तिच्याकडून.

जर्सी पहिला...मस्त.... शाहिद १ नंबर.....मृणाल ठाकूर पण छान....मला शाहिदच्या १ -२ सीन्स मध्ये खूप अमिताभ च्या स्टाईल चा भास झाला.. हे माझं वैयक्तिक मत....

जर्सी पहिला...मस्त.... शाहिद १ नंबर.....मृणाल ठाकूर पण छान....मला शाहिदच्या १ -२ सीन्स मध्ये खूप अमिताभ च्या स्टाईल चा भास झाला.. हे माझं वैयक्तिक मत....

जर्सी पहिला...मस्त.... शाहिद १ नंबर.....मृणाल ठाकूर पण छान....मला शाहिदच्या १ -२ सीन्स मध्ये खूप अमिताभ च्या स्टाईल चा भास झाला.. हे माझं वैयक्तिक मत....

जर्सी पहिला...मस्त.... शाहिद १ नंबर.....मृणाल ठाकूर पण छान....मला शाहिदच्या १ -२ सीन्स मध्ये खूप अमिताभ च्या स्टाईल चा भास झाला.. हे माझं वैयक्तिक मत....

झोंबिवली भारी आहे. थिएटर मध्येच पहायचा होता पण सगळ्या साउथ च्या डबड्या पिक्चरांनी लवकर काढावा लागला.

जर्सी पहिला...मस्त.... शाहिद १ नंबर.....मृणाल ठाकूर पण छान....मला शाहिदच्या १ -२ सीन्स मध्ये खूप अमिताभ च्या स्टाईल चा भास झाला..
>>>>>

शाहीद खरेच एक नंबर आहे. अभिनय करतोय असे वाटलेच नाही. जगलाय तो ती भुमिका. कबीर सिंग आणि यातले त्याचे कॅरेक्टर भिन्न आहेत. लूकमध्ये साम्य जाणवते. पण दोन्हीमध्ये त्याने आपल्या बॉडीलँगवेजने जे डिफरंट कॅरेक्टर उभे केलेय त्याला तोड नाही.

झोंबिवली झकास आहे. एकदम मस्त टाइमपास. ललित आवडतोच पण हा पिक्चर पाहून अजून आवडायला लागला Proud झोंबी लै भारी आहेत. टेकिंग मस्त. खूप दिवसांनी धमाल मराठी पिक्चर पाहिला.

भूलभुलैय्या २ चक्क चांगला वाटला. गाणी फारशी सुसह्य नाहीत (जुन्या गाण्यांचं रिमिक्स सोडल्यास). कार्तिक कियारा ओके वाटले. तब्बू दिसते पण कमाल आणि कामही छान करते. एकूण भट्टी जमली आहे असं वाटलं.

लकडाऊन बी पॉजिटीव्ह लावलेला आता घरी. मला बघायचा नव्हताच. पण बायको सांगून थोडी ऐकतेय. नशीब तिनेच पंधरा मिनिटात बदलला.

आता आर आर आर आर लावलाय

१९१७ पहायचा आहे पण हे लोक बहुतेक युद्धपटातली युद्धाची दृष्ये फार खरी वाटतील अशी बनवतात त्यामुळे पहायचा धीर होत नाहीये.
झोंबिवली नेटफ्लिक्सवर आला तर बरे नाहीतर पहायला नाही मिळणार.

ती दृश्ये गेम ऑफ थ्रोन्स् इतकी बीभत्स नाहीयेत. पण तरी मुलांसमोर नको. डेड बॉड्या दाखवल्या आहेत.

आता आर आर आर आर लावलाय>>>>> हा कोणता सिनेमा?

लकडाऊन सेम पिंच.

आमच्या घरात.आचार्य लावलाय .. सासरे पाहताएत..
आरटिफिशीअल गावातली पिचलेली जनता, छळणारा व्हिलन, तारणहार हिरो..घीसीपीटी कहानी..एक्शन सीन्स मधे तर चिरंजीवीचा एकेक ठोसा/किक खाऊन बाऊन्स होताएत गुंडलोक. Lol

प्राईमवर नवाजुद्दीन चा 'फोटोग्राफर' बघायला घेतला आहे.>> नवाय का?

झोंबिवली बघायची इच्छा आहे पण झी ५, सोनी लिव नाहिये Sad

लकडाऊन सेम पिंच. >>> हो ना, काय होता तो. म्हणजे कुठूनही काहीही आचरटपणा सुरू झालेला. एकीकडे आपण झोंबिवली बनवतोय आणि दुसरीकडे पुन्हा असे मागे घेऊन जाणारे चित्रपट.

आर आर आर अर्धा पाहिला. बाहुबलीसारखीच द्रुश्ये सतत जाणवत राहते. पण बाहुबलीचे ईमोशन्स नाहीत त्यात. म्हणजे तितके कनेक्ट होता आले नाही. अर्थात एकदा बघायला हरकत नाही. आज पुर्ण करेन मी. पण बाहुबलीसारखा पुन्हा पुन्हा बघावा असा नाही वाटत. बाकी सविस्तर आज पुर्ण बघितल्यावर लिहितो.

चांगला आहे लकडाऊन. आपण त्याचा आजवरचा प्रवास पाहिला आहे. इथपर्यंत तो पोहोचला याचं मायबोलीकर म्हणून कौतुक आहे. नाही आवडला तर टीका करावी, पण पूर्ण पाहून. आपल्या माणसासाठी वेळ काढणे अशक्य नसावे. मायबोलीवरचे वैभव जोशी, कौतुक शिरवाडकर तसेच अन्य ठिकाणचे काही जण (प्रणव सखदेव), स्व. मुरली खैरनार यांच्या प्रगतीचा अभिमान वाटायचा/ वाटतो. प्रेरणा मिळते.

ऋन्मेऽऽष, आर आर आर बाबत +१. मी अजूनपर्यंत दोन टप्प्यात बघूनही अर्धाच झाला आहे. अ आणि अ च्या पलिकडे लॉजिक आहे ह्या पिक्चरचं.

हा चित्रपट दक्षिण-लोकप्रिय चित्रपटांच्या खालील गरजा (मराठीत टिकमार्कस म्हणतो ते) पूर्ण करतो -
- हिंदू - मुस्लिम ऐक्य, प्राणापलिकडची यारी वगैरे
- उत्तम डान्स व अतर्क्य मारामारी
- गरिबीतून/अन्यायातून पिचून मग उत्थान करणारा हिरो
- धट्टीकट्टी गरीबी व लुळीपांगळी श्रीमंती, त्यात गरीब/अन्यायग्रस्त हे कायमच साधे-भोळे असणे
- हिरॉईन ही गरीबांच्या/अन्यायग्रस्तांच्या बाबतीत (फक्त ठराविक सोयीस्कर प्रसंगी) कनवाळू असणे आणि त्याने हिरो (दिसणे वगैरेच्या जोडीला ह्या महत्त्वाच्या कारणाने) भाळला जाणे (हा प्रकार दक्षिणस्रोती उत्तरनिर्मित चित्रपटांतही दिसतो - उदा. गझनी)
- हिरॉईनच्या बेंबीवर फोकस - हा अजून तरी अर्ध्या चित्रपटात जाणवला नाही, पुढे नसेल अशी आशा आहे
- व्हिलन पार्टी अतिशय व अकारण क्रूर व तेवढीच रेमेडोक्याची असणे
- कुठलेतरी भन्नाट संस्कृत श्लोक (जुने अपरिचित किंवा नवनिर्मित). हिंदी चित्रपटवाले अजून मंगलम् भगवान विष्णुच्या पलिकडे जात नाहीत.
- राकट हिरो आणि कोमलकाय हिरॉइन, इथे ही जोडी सावळा - गोरी, दाक्षिणात्य - उत्तर भारतीय, भारतीय - परदेशी (पक्षी गोरीच. काळी परदेशी नाही चालणार) इत्यादीपैकी काहीही असू शकते. मुळात हिरो हा तथाकथित पिचलेल्या वर्गातून येतो व हिरॉइन ही तथाकथित शोषणकर्त्या वर्गातून येते आणि हिरो हिरॉइनला गटवतो - हा जणू काही एका वर्गाने दुसर्‍या वर्गाचा घेतलेला सूड असतो.

शांत माणूस, धुंद रवींचे कौतुक आहेच. त्यांचा जनगणना, लुंगीखरेदी या लेखांची तर पारायणे करून झालीत. बाकी कोणाचेच लेखन मी एकापेक्षा जास्त वेळ वाचले नाही.
पण चित्रपट हे वेगळे माध्यम आहे. दिग्दर्शन गंडलेले आहे. मी खरेच तो पुर्ण नाही बघू शकत. क्षमा असावी.

राहिला प्रश्न मराठी चित्रपट आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यायचा. तर त्यात मला वाटते मायबोलीवर सर्वात पुढे मीच असेल. प्रसंगी लोकांचा रोष ओढवून धागे काढून प्रोत्साहन दिलेय. मराठी चित्रपट, वेबसिरीज लोकांपर्यंत पोहोचवलेत. याच धाग्याच्या मागच्या पानावर गेलात तरी झोंबिवलीचे ताजे उदाहरण सापडेल. माझ्या लिखानात गेलात तर खजिना सापडेल.

आताही कोणा मराठी कलाकाराला नाऊमेद करत नाहीये. त्या सर्वांचे पोटेंशिअल माहीत आहे. जसे लकडाऊनमधील अंकुश देखील फार आवडीचा कलाकार आहे. पण असे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीच्या हिताचे नाहीयेत. आवडलेल्या मराठी चित्रपटाचे मी जास्त कौतुक करतो. पण अश्या चित्रपटांचे मुद्दाम कौतुक करणे चुकीचे वाटते. त्याचा मराठीला फटकाच बसेल.

तुमच्या मनात एखाद्या मायबोलीकर कलाकाराबद्दल जी आत्मियता आहे ती माझ्या मनात पुर्ण मराठी चित्रपटसृष्टीबद्दल आहे.. कोई शक Happy

अहो ऋन्मेष सर दादा, इथे मी तुम्हाला जबाबदार धरलेले नाही किंवा तुमच्याकडून उत्तर पण मागितलेले नाही. जिथे विचारले आहे तिकडे मौनात जाता. (त्याने फरक पडत नाही). प्रत्येकाच्या पोस्टला उत्तर देण्यासाठी मायबोलीवर तुमची केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक केल्यासारखे काय करताय ? माझे मत मी मांडले. तुमचे तुम्ही मांडले. बात खत्म. एकीकडे मराठी सिनेमा चालला पाहीजे म्हणून धागा काढला म्हणणार , मराठी पिक्चर्स असे असे निघाले तर साऊथला टक्कर देतील असेही म्हणायचे आणि जे आपल्यातून उठून प्रत्यक्ष सिनेमे बनवताहेत त्यांचा पिक्चर पूर्णही न बघता त्यावर टीकेची झोड उठवायची याच्यावर मी एक शब्दही बोललो नाही. रागावू नका. दहा मिनिटात पिचर बंद केला हे इतर टुकार सिनेम्यांना ठीक आहे. पण आपुलकीची भावना असेल , पिक्चर टुकार नसेल तर अभिमानाने सांगायची काय गरज आहे ? यात काय तीर मारला दहा मिनिटात बंद करून ? तुम्हीच कुणालातरी पुढचा पिक्चर बघायला पाहीजे होता असे म्हणालाय ना ? मी तर ते ही म्हणत नाही. ( यावर पण तुमचे उत्तर येणार हे ओघाने आलेच).

एकीकडे मराठी सिनेमा चालला पाहीजे म्हणून धागा काढला म्हणणार , मराठी पिक्चर्स असे असे निघाले तर साऊथला टक्कर देतील असेही म्हणायचे आणि जे आपल्यातून उठून प्रत्यक्ष सिनेमे बनवताहेत त्यांचा पिक्चर पूर्णही न बघता त्यावर टीकेची झोड उठवायची
>>>>>

झोड वगैरे कुठे दिसली टिकेची Happy

असो, पहिले मत तेच आहे, आणि दुसरे त्याला विरोधाभास नसून त्यातही तेच म्हणतोय. असे पिक्चर बनवाल तर कधीच प्रगती होणार नाही.
त्यापेक्षा झोंबिवलीसारखे बनवा. बघा आणि नक्की कळवा Happy

Pages