झोंबी म्हणजे जिवंत प्रेत! एक शरीर ज्यात आत्मा तर आहे. पण मेंदू नेहमीसारखा काम करायचा बंद झाला आहे. जणू एक पुरलेली सडलेली डेडबॉडी उकरून काढली आणि तिला खेळण्यासारखे चावी देऊन सोडले लोकांचा चावा घ्यायला. पण गंमत ईथेच संपत नाही. हे झोंबी ज्यांचा चावा घेतात ते सुद्धा झोंबी होतात. आणि हे जास्त डेंजर असते. कारण अश्याने यांची संख्या वाढतच जाते. वाढतच जाते. वाढतच जाते. पण यावर ऊपाय काय? पहिला झोंबी नेमका कश्यामुळे बनतो? आणि हे झोंबी नेमके दिसतात कसे? करतात काय? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील, तर झोंबिवली जरूर बघा. या लेखात मी यापैकी एकही उत्तर देणार नाहीये
तर ही कथा काही आटपाट नगरात घडत नाही. हि कथा घडते आपल्या डोंबिवली शहरात. आता हे डोंबिवली झोंबिवली यमकात बसते म्हणून ही कथा तिथे घडत नाही. तर डोंबिवली ज्या पाण्याच्या प्रॉब्लेमसाठी कुप्रसिद्ध आहे तोच या झोंबीकथेचाही आत्मा आहे.
कथेची स्टारकास्ट जबरदस्त !
या कथेचा नायक आहे चिकणा अमेय वाघ. जो कुठलाही मेकअप न करता केवळ आपल्या अदाकारीने स्वतःच एक झोंबी असल्याचा अभिनय उत्तम वठवू शकतो. कदाचित हिच त्याची जमेची बाजू जे त्याला ही भुमिका साकारायला मिळाली. नशीब काढले पठ्ठ्याने.
नशीब काढले ते यासाठी की त्याच्या समोर आहे, आरस्पानी सौंदर्याचा नमुना वैदेही परशुरामी. (आरस्पानी = आरसा आणि पाणी हे जसे प्रकाश परावर्तित करून बघणार्याचे डोळे दिपवतात तसे डोळे दिपवून टाकणारे सौंदर्य) झोंबींच्या विद्रुपतेमुळे जे चित्रपटाची फ्रेमही तद्रुप होते त्याला ती छान बॅलन्स करते
तिसरा कलाकार ललित प्रभाकर - हा याआधी माझ्या फारसा आवडीचा नव्हता. तसा नावडीचाही नव्हता. म्हणजे चॅनेल सर्फ करताना हा दिसला तरी मी सहज पुढे जायचो. यापुढे कदाचित थोडा थांबत जाईन. कारण या आधी मी त्याला केवळ गुळगुळीत चेहर्याचे पाहिले होते. त्याचे रोलही तसेच मिळमिळीत पाहिले होते. पण यात मात्र लूक सुद्धा डॅशिंग वाटला आणि अभिनयाची स्टाईलही. कुठलाही ओवरअॅक्टींगचा आव न आणता त्याने गरीबों की बस्तीतील टपोरी दादाचे कॅरेक्टर छान निभावले आहे.
त्याच्यासोबत नेहमीच चित्रपटांमध्ये दाखवतात तसे दुसर्या हिरोचे एकदम उलटे कॅरेक्टर. म्हणजे सतत घाबरणारा, जीवाला जपणारा, आपल्या आईचा संस्कारी मुलगा अमेय वाघने त्याच सहजतेने साकारला आहे. पण तरीही, वैदेही परशुरामी स्क्रीनवर येते तेव्हा नजर तिच्यावरच खिळून राहते
वैदेही आणि तिच्या मोलकरणीचे एकेका वाक्याचे संवाद असलेले सीनही बघायला छान वाटतात आणि लक्षात राहतात. अर्थात, यात नवल नाही. कारण त्यात आपल्याला वैदेही परशुरामी जे दिसते
ईतर छोटेमोटे कॅरेक्टर तुम्ही चित्रपटात बघालच, त्यामुळे आता थेट झोंबींकडे वळूया.
अप्रतिम मेकअप. जवळपास प्रत्येक झोंबीचा. त्यांची हालचाल, लकबी, वेडेवाकडे चालणे, मग एकटा असो वा ग्रूपने. ते झोंबी कुठेही आपले बेअरींग सोडत नाहीत. ते घाबरवतातच. कारण त्यांच्यासोबत कॅमेर्याचे अँगलही तसेच फिरतात. आणि जोडीला असते पार्श्वसंगीत. कधी घाबरवणारे, तर कधी विंचू चावला.. विंचू चावला.. विंचू चावला
तांत्रिक बाबीतले मला फारसे कळत नाही. जे कळते ते प्रेक्षक म्हणूनच. जेव्हा एखादा हिंदी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सरस असतो तेव्हा आपण म्हणतो, "अरे एकदम ईंग्लिश पिक्चरच्या तोडीचा आहे". जेव्हा एखादा मराठी चित्रपट याबाबतीत भारी वाटतो तेव्हा आपण, "मराठी वाटतच नाही यार" असे बोलून मोकळे होतो. झोंबिवली या कसोटीवर खरा ऊतरतो. हल्ली अश्या चित्रपटांची संख्या मराठीत वाढतेय हे बघून छान वाटते. लवकरच आपण उलटे बोलणार आहोत. त्यासाठी प्रेक्षक म्हणून आपणही चांगले चित्रपट उचलून घेण्याची गरज.
आपल्याकडे भव्यदिव्य चित्रपट बनवताना बजेट आड येते. तरीही मराठी चित्रपटांचा आपल्याला अभिमान असतो. कारण ते गंभीर विषयावर असले तर आशयघन असतात, विनोदी असले तर थिल्लर नसतात, आणि झोंबींवर असले तरी अतर्क्य नसतात. समोर जे झोंबी प्रकरण घडतेय त्यावर आपला चित्रपट बघताना विश्वास बसतो, हेच याच्या कथा पटकथेचे यश.
बाकी नेहमीचे क्लिशे आहेतच चित्रपटात. पण त्याने खरेच फरक पडतो? छे, बिलकुल नाही. आपल्या हिरोहिरोईनींना चावेल असा झोंबी अजून पैदा व्हायचा आहे, हे आपल्यालाही माहीत असते. तरीही आपल्याला त्यांची काळजी वाटते. तेव्हा समजावे, पिक्चर जमला आहे. आपण त्या पिक्चरशी जोडले गेलो आहोत. आणि झोंबिवली बघताना हे नक्कीच होते.
चित्रपटात कुठले गाणे आहे का? माहीत नाही. आता आठवतही नाही. कारण त्याची गरजही नव्हतीच. पिक्चर संपल्यावर अंगात आलया म्हणत सिद्धार्थ जाधव नाचायला येतो तेव्हा हा देखील चित्रपटात एखादा झोंबी म्हणून, वा खरे तर झोंबींच्या टीमचा कप्तानच असायला हवा होता असे उगाचच वाटते. ते झाले आपले सिद्धार्थवरचे प्रेम
झोंबिवलीला देखील ईतकेच प्रेम मिळो. भले आता पिक्चर चित्रपटगृहातून उतरला आहे. तेव्हा बघायचा होता मला थिएटरात, पण नाही जमले. त्याची भरपाई म्हणून ओटीटीवर आल्या आल्या बघून घेतला, आणि हे चार शब्द लिहून काढले.
तुम्हीही पाहिला नसल्यास जरूर बघा. देर आये पर दुरुस्त आये असे म्हटलेले केव्हाही चांगलेच
कुठे बघाल - तर झोंबिवली फास्ट ओटीटी प्लॅटफॉर्म क्रमांक झी ५ वर येते. फक्त पायदान आणि फलाटामध्ये अंतर तेवढे व्यवस्थित ठेवा, नाहीतर एखाद्या डब्यातून झोंब्याने मारली उडी असे नको ना व्हायला
- ऋन्मेष
एक नंबर चित्रपट आहे हा...
एक नंबर चित्रपट आहे हा... ललित ने पण मस्त काम केलंय ...
इरेला पेटून सर धागा काढणार
इरेला पेटून सर धागा काढणार याची खात्री होतीच

अभिनंदन
आता चालू दे तुमच्या आरत्या आणि गाणी
अरे फारच भारी पिक्चर आहे.
अरे फारच भारी पिक्चर आहे. मज्जा आली बघायला. गो गोवा गॉन पेक्षा जास्ती मजा आली. वैदेहीचे काम आवडले. ललित तर बेस्टच आहे. मला तो स्माईल प्लिज मध्ये पण आवडला होता.
बटाट्या डोळ्यांचा अमेय वाघ काही मेकप न करता झाँबी दिसतो या क्रायटेरियावर स्क्रीन टेस्ट न घेता पास झाला असेल. पण त्याने पण घाबरट माणसाचे काम चांगले केले आहे.
स्पॉयलर ---------------------------------------
त्याला झाँबीने चावले असे वाटत असताना तो उठतो आणि वैदेही त्याच्या डोक्यात मारते ते पाहून भारी वाटले. इव्हन इंग्लीश पिक्चर्स मध्ये पण अशा वेळेस उगीच इमोशनल डिसिजन्स घेतलेले दिसतात. याउलट ती बरोबर करते. त्याचा सुरूवातीचा झोपेतून उठण्याचा सीन बघून हा पुढे
पण असेच काही तरी करेल असे वाटले होतेच.
आयपी टीव्ही वर असेल तर बघतो.
आयपी टीव्ही वर असेल तर बघतो.
डोंबिवली ज्या पाण्याच्या
डोंबिवली ज्या पाण्याच्या प्रॉब्लेमसाठी कुप्रसिद्ध आहे तोच या झोंबीकथेचाही आत्मा आहे>> पाण्याऐवजी मच्छर चावल्याने लोकं झॅाम्बीज झाल्याचे दाखवले असते तरी चाललं असतं
एनिवेज, पिच्चर चांगलाच आहे.. डोंबिवलीत रहाणारे बरेच कलाकार दिसले पण बहुतेक सगळं शूटींग रात्रीचंच झालंय त्यामुळे डोंबिवलीतली गर्दी तशी बघायला मिळाली नाही
अमितव आयपी वर आहे...
अमितव आयपी वर आहे...
डोंबिवलीत रहाणारे बरेच कलाकार
डोंबिवलीत रहाणारे बरेच कलाकार दिसले
>>>
कोणते कलाकार?
तुषार खैर आहे ना?
तुषार खैर आहे ना?
तरीच आमच्याकडे वाशी'चे ( हो
तरीच आमच्याकडे वाशी'चे ( हो तसेच नाव आहे त्या गावाचे) आणि तुंबई'चे ( जुनं नाव मुंबई, जून ते सप्टेंबरात हेच नाव असते, लोकल ट्रेनचे कायमचेच) पावणे येत नाहीत.
पिक्चर संपल्यावर अंगात आलया म्हणत सिद्धार्थ जाधव नाचायला येतो तेव्हा हा देखील चित्रपटात एखादा झोंबी म्हणून, वा खरे तर झोंबींच्या टीमचा कप्तानच असायला हवा होता - नैतरकाय.
बाकी डासांचं म्हणाल तर पालघर
बाकी डासांचं म्हणाल तर पालघर ते श्रीवर्धन कोणत्याही किनाऱ्यावर आणि केरळातल्या कुट्टुवलोममधेही संध्याकाळी असतातच. झोंबलं म्हणून लिहिलं का? -होय.
छान लिहिलं आहे. बघायला हवा.
छान लिहिलं आहे. बघायला हवा. ललित प्रभाकर आणि अमेय वाघ दोघेही आवडतात.
बाकी ठीक ! पण
बाकी ठीक ! पण
चिकणा अमेय वाघ
>>> हे काय झेपले नाही . असो.
चिकणा अमेय वाघ
चिकणा अमेय वाघ
>>> हे काय झेपले नाही . असो.
>>>>
दुनियादारी आलेला तेव्हा मायबोलीवर त्याचा फॅनक्लब निघालेला
२५०+ प्रतिसाद आलेले.
हजारच झाले असते एवढी पोरींमध्ये त्याची क्रेझ होती.
पण त्याचे लग्न झाले आणि धागाच थांबला...
ईथे बघू शकता
कैवल्य कैवल्य फ्यान क्लब .. (बदाम बदाम बदाम)
https://www.maayboli.com/node/53692
चिकणा अमेय वाघ >> सहमत आहे.
चिकणा अमेय वाघ >> सहमत आहे. त्याला त्याच्या चिकणेपणाला साजेसं स्टारडम अजून मिळालेलं नाही. ऋ सर ज्या पिक्चरवर स्वतंत्र धागा काढतात तो तुफान चालतो असा अनुभव आहे. मराठी इंडस्ट्रीने हे लक्षात ठेवावे.
चिकणा अमेय वाघ >> चकणा
चिकणा अमेय वाघ >> चकणा म्हणायचे असेल
हजारच झाले असते एवढी पोरींमध्ये त्याची क्रेझ होती.>> रिअली? मराठी मुलींची चॉईस एवढी खराब आहे?
झी ५ ची मेंबरशिप मी घेतलेली
झी ५ ची मेंबरशिप मी घेतलेली नाही. तिकडेच सगळे नवीन पिक्चर रिलीज होताना दिसतात. काश्मीर फाईल्स, ऊरी, सिंबा, मराठी सगळेच जवळपास, झुंड.
माझ्याकडे प्राईम, डिस्कवरी, नेफ्लि, हॉटस्टार आणि दोन तीन आहेत. बघून होत नाही.
एक दोन सबस्क्रीप्शन्स बंद करून झी ५ घेऊ का ?
ओके ऋ सर. चकणा म्हणायचे असेल
ओके ऋ सर.
चकणा म्हणायचे असेल
चांगला आहे...one time watch!!
चांगला आहे...one time watch!! ललित प्रभाकर तर फारच बेस्ट .. मस्त अक्टिंग केली आहे त्याने. अमेय वैभवी पण सही सूट झालेत.
मी उल्हासनगरला पाहिला
मी उल्हासनगरला पाहिला
@ रानभुली, वर्षभरासाठी न घेता
@ रानभुली, वर्षभरासाठी न घेता महिना, तीनेक महिने असे काही असते का बघा. एका मित्राने हॉटस्टार आयपीएलपुरते तीन महिने घेतलेले असे तो म्हणालेला. यावर एक धागा असावा. शोधायला हवा. नसेल तर काढायला हवा.
ऋ सर ज्या पिक्चरवर स्वतंत्र
ऋ सर ज्या पिक्चरवर स्वतंत्र धागा काढतात तो तुफान चालतो असा अनुभव आहे. >> आमी तं येगळचं ऐकलं व्हतं.
तुमची पिक्चरवाल्याशी काई दुस्मनी हाये का?
सरले काहुन पिक्चरची सुपारी देवुन रायले बाप्पा.
त्यांना धागा म्हणायचे असेल
त्यांना धागा म्हणायचे असेल
पिक्चर ऑलरेडी ओटीटीवर आलाय
तरी जास्तीत जास्त लोकांनी तो बघावा..
असो, वर अमेय वाघ चिकणा वरून
असो, वर अमेय वाघ चिकणा वरून आठवले.
जर ते तो नसता तर त्याला फास्टर फेणे चित्रपट नसता मिळाला. तुडतुडीत स्मार्ट मुलाची भुमिका साकारणारा..
पिक्चराधे तो चकणा आणायला
पिक्चराधे तो चकणा आणायला गेलेला असतो ४० रूपयांचा तेव्हां झोंबी चावायाला येतो.
तिथून जे स्टार्ट घेतलीय झोंबींनी. आख्ख्या डोंबिवलीत झोंबाझोंबी चाललेली असते. पोलीस डोंबिवली सील करतात.
खरंच असं झालं तर ? नवी मुंबई, ठाणे सील होतील का ?
हो, पोलिस डोंबिवली सील
हो, पोलिस डोंबिवली सील करतात तो सीन मस्त घेतलाय. फुल्ल ईंग्लिश पिक्चर वाटतो.
तसेच वैदेही परशुराम त्या विश्वास-जग्गू-ललित प्रभाकरची बाजू घेत एका हलकट माणसावर चढते तो सीन सुद्धा मस्त आहे. हे त्यांच्यासाठी ज्यांना वैदेहीला अभिनय येत नाही असे वाटते.
झोंबी हा प्रकारच बालीश आहे.
झोंबी हा प्रकारच बालीश आहे. हॉलीवूडने खूप कमी काळात झोंबी कल्पनेचा चावून चोथा केला आहे. मराठी चित्रपटात झोंबी पहिल्यांदा म्हणून कौतुक वाटले असेल.
जग्गूचा हात हा प्रकार बालीशच आहे. चांगले चित्रपट येत असताना पुन्हा असे चित्रपट बनू नयेत. शेवटी झोंबी हे दूषित पाण्याने होतात असा केविलवाणा ट्विस्ट दिला आहे. दूषित पाण्याने डोळे, बुब्बुळं पांढरी होणे, चावत सुटणे, वाकडे चालणे हे एकाच वेळी होते का ?
केवळ दूषित पाण्याने नाही होत.
केवळ दूषित पाण्याने नाही होत. काहीतरी केमिकल लोच्या दाखवलाय ना
जग्गूचा हात हा प्रकार बालीशच
जग्गूचा हात हा प्रकार बालीशच आहे
>>>
जिम कॅरी.
मी मायसेल्फ आणि आयरीन
पुर्ण पिक्चर या बालिश कल्पनेवर होता
तो ईंग्लिश होता
पिक्चराधे तो चकणा आणायला
पिक्चराधे तो चकणा आणायला गेलेला असतो
रियली...चकणा???????
विश्वास-जग्गू-ललित प्रभाकरची बाजू घेत एका हलकट माणसावर चढते तो सीन सुद्धा मस्त आहे.
काय पण भाषा ??????
चांगली तर होती भाषा?
चांगली तर होती भाषा? वेबसिरीजसारखे कचकचीत शिव्या वगैरे घालत नाही..
Pages