चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झी वर आहे झेड फॉर झोंबिवली

वैदेही परशुरामी >> अच्च्छा हा नाव ऐकलेय, छान आहे दिसायला. आणि अभिनयातही सुसह्य.

या सिनेमात फक्त झोंबी लोकांनीच प्रामाणिक अभिनय केलाय
बाकी सगळ्यांनी पाट्या टाकल्यात
ना धड फार्सीकल ना धड हॉरर
वैदेही रोमॅंटिक सिन असो वा ऍक्शन एकसारख्याच कोऱ्या चेहऱ्याने वावरते
अमेय वाघ आणि ललित प्रभाकर थोडे सुसह्य
बराचसा गो गोवा गॉन ची कॉपी केल्यासारखा वाटतो

चित्रपटाची चर्चा करायलाच हा धागा आहे ना
मग परत कशाला वेगळा धागा
इतकं कौतुक करावे असा अजिबात सिनेमा नाहीये

आता सर नक्कीच इरेला पेटून नवीन धागा काढतील किंवा आपल्या चाहत्यांच्या द्वारे काढायला लावतील Happy

चित्रपटाची चर्चा करायलाच हा धागा आहे ना
मग परत कशाला वेगळा धागा
>>>>
चित्रपट विभाग चेक केले तर असे धागे बरेच दिसतील.
एखादा चांगला मराठी चित्रपट आलाय तर जरा त्यावर स्वतंत्र चर्चा होत आणखी चार लोकांना कळले तर चांगलेच असे मला वाटले.

इतकं कौतुक करावे असा अजिबात सिनेमा नाहीये
>>>>
आपल्या मताचा आदर आहे. अशी मते सैराट, दुनियादारी पासून झिम्मा चित्रपटाबद्दलही आली आहेत. पण महाराष्ट्राच्या जनतेने हे चित्रपट डोक्यावर ऊचलून घेतले आहेत. प्रत्येकाची आवड अभिरुची भिन्न असते. तिचा आदर असावा.

नुसता नवा धागा काढू नका म्हणलं तर अनादर कसा काय होतो?

मुळात या सिनेमाबद्दल फार काही लिहावं असेही नाहीये
हिंदी चित्रपटाची कॉपी करून, आणि इंग्रजी मध्ये आता घिसापिटा होण्याच्याही पलीकडे झालेला विषय घेऊन फक्त भाषा मराठी म्हणून त्याचं कौतुक करायचं तर करा बापडे हो

मुळात या सिनेमाबद्दल फार काही लिहावं असेही नाहीये >>> चार पोस्ट तुम्हीच लिहील्यात. ज्यांना फार काही लिहावे असे वाटत नाही. मग लिहावे असे वाटणारे किती लिहीतील Happy

चार पोस्ट तुम्हीच लिहील्यात. ज्यांना फार काही लिहावे असे वाटत नाही.>>>
सर गणित लहानपणापासून कच्चे दिसतंय तुमचं
ना धड इंग्लिश येत ना धड मराठी
गणिताचीही बोंब

आता तर इरेला पेटुन लिहिणारच याची खात्रीच आहे, कारण एखाद्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर हिरीरीने ती कशी भारी आहे हे लिहून इरिटेत करणे हा तुमचा आवडीचा छंद आहे

सदासर्वकाळ हेच तर सुरू असते
त्यामुळे आता झोंबिवली चा उदोउदो करणाऱ्या आता दणकेबाज पोस्टीं पडणार लवकरच
ऑस्कर किंवा कान लाच पाठवायचे बघा फक्त Happy

भू भु 2 कसा आहे ? लेक फारच मागे लागलीय चल म्हणून.. पण ट्रेलर बघून काही खास वाटत नाहीय.

@ आशुचँप
कारण एखाद्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर हिरीरीने ती कशी भारी आहे हे लिहून....
>>>>>
माझ्या आधी म्हाळसाने चित्रपट आवडला लिहिलेले.
त्यानंतर मी पाहिला मला आवडला.
त्यानंतर च्रप्स यांची चित्रपट आवडल्याची पोस्ट आहे.
न आवडणारे या धाग्यावर तरी आपण पहिलेच आहात. मग मी असे म्हणावे का आम्हा तिघांना आवडला म्हणून तुम्ही मुद्दाम आवडला नाही म्हणत आहात. पण मी असे म्हणणार नाही. कारण प्रत्येकाच्या मताचा आदर आहे. हेच मी वर म्हणत आहे.
असो, तुम्ही केवळ मी ऋन्मेष आहे म्हणून वाद घालत असाल तर मला खरेच रस नाही. पण एका मराठी चित्रपटाबद्दल चर्चा करत असाल तर स्वागतच आहे, भले मतभेद का असेनात.

वैदेही परशुरामी मला आवडते, कतरीनापेक्षा जास्त गोड आहे दिसायला. स्माईल क्युट आहे तिचं.

>>>> अगदी सहमत!
काशिनाथ घाणेकर मध्येही खूप छान दिसली आहे.

मग मी असे म्हणावे का आम्हा तिघांना आवडला म्हणून तुम्ही मुद्दाम आवडला नाही म्हणत आहात. पण मी असे म्हणणार नाही.>>>>

मी पण तुम्हाला बालिश,उथळ आणि हेतुपुरस्सर दुसर्यांना छळणारे आहात असे म्हणावे का???
पण मी असे म्हणणार नाही. कारण प्रत्येकाच्या मताचा आदर आहे. हेच मी वर म्हणत आहे

छान आहे वैदेही, आधीच म्हटलेय.
कतरीनासारखी आहे म्हणून तुलना करायची ईच्छा नाही. कारण कतरीनाचेही सौंदर्य फार आवडीचे. ती कधीच वल्गर वाटत नाही हे तिच्या सौंदर्याचे वैशिष्ट्य.

@ आशुचॅप, ओके Happy

जास्त गोड आहे दिसायला. स्माईल क्युट आहे तिचं.>>>>
तेवढंच आहे, फक्त दिसायला छान आहे इतकंच
अभिनय वगैरेच्या वाट्याला जात नाही ती कधी Happy

झोंबिवलीमध्ये तिला तितका स्कोपही नव्हता अभिनय दाखवायला. पण वावर प्रसन्न आहे. तिचे आणि मोलकरीणीचेही छोटेछोटे एकेका संवादाचे सीनसुद्धा छान वाटतात.

images (9).pngIsha_Talwar_61st_Filmfare_Awards_South_(cropped) (1).jpg552e908bd04fe224d91f5b0e93d4c4ee.jpg

यातली जी कूल मॅन मराठीतून भाषांतर करताना लाजली ती वैदेही.

होता उलट
प्रेग्नेंट असताना नवऱ्याची काळजी, जीवाची काळजी, मूळचा धाडसी स्वभाव हे सगळं नीट दाखवता आलं असतं पण ती सगळीकडे कोरा भावणाविरहरित चेहरा घेऊन वावरते
तिला स्कोप नसायला काय झालं, मॅक्स वेळ तिलाच मिळालं आहे फुटेज

तुम्हाला घाणेकर म्हणायचं आहे का? त्यातही ती सेम एक्सप्रेशन घेऊन आहे

कुणीतरी कतरीना शी तुलना केलीय ते बरोबर आहे
निव्वल कचकड्याची बाहुली

Pages