Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झोम्बीवली मलादेखील आवडला...
झोम्बीवली मलादेखील आवडला...
झी वर आहे झेड फॉर झोंबिवली
झी वर आहे झेड फॉर झोंबिवली
वैदेही परशुरामी >> अच्च्छा हा नाव ऐकलेय, छान आहे दिसायला. आणि अभिनयातही सुसह्य.
या सिनेमात फक्त झोंबी
या सिनेमात फक्त झोंबी लोकांनीच प्रामाणिक अभिनय केलाय
बाकी सगळ्यांनी पाट्या टाकल्यात
ना धड फार्सीकल ना धड हॉरर
वैदेही रोमॅंटिक सिन असो वा ऍक्शन एकसारख्याच कोऱ्या चेहऱ्याने वावरते
अमेय वाघ आणि ललित प्रभाकर थोडे सुसह्य
बराचसा गो गोवा गॉन ची कॉपी केल्यासारखा वाटतो
वैप ला कुणाला भेटायचे आहे का?
वैप ला कुणाला भेटायचे आहे का?
अट एकच. नंतर इथे धागा काढायचा नाही.
झी वर आहे झेड फॉर झोंबिवली>>>
झी वर आहे झेड फॉर झोंबिवली>>> झी ५ वर आहे का?
हो ओटीटी प्लॅटफॉर्म क्रमांक
हो ओटीटी प्लॅटफॉर्म क्रमांक झी ५ वर झोंबिवली फास्ट
झी 1 - 4 पण आहेत का?
झी 1 - 4 पण आहेत का?
नवीन धागा काढा कोणीतरी
नवीन धागा काढा कोणीतरी झोंबिवलीवर
मराठीत चांगले पिक्चर रोज रोज नाही येत.
चित्रपटाची चर्चा करायलाच हा
चित्रपटाची चर्चा करायलाच हा धागा आहे ना
मग परत कशाला वेगळा धागा
इतकं कौतुक करावे असा अजिबात सिनेमा नाहीये
आता सर नक्कीच इरेला पेटून नवीन धागा काढतील किंवा आपल्या चाहत्यांच्या द्वारे काढायला लावतील
आय झोंबिवली नो सी. सो आय नो
आय झोंबिवली नो सी. सो आय नो ओपन धागा.
व्हेन सी देन. इफ इमर्जन्सी कम कुणीपण ओपन.
चित्रपटाची चर्चा करायलाच हा
ऊडवला
चित्रपटाची चर्चा करायलाच हा
चित्रपटाची चर्चा करायलाच हा धागा आहे ना
मग परत कशाला वेगळा धागा
>>>>
चित्रपट विभाग चेक केले तर असे धागे बरेच दिसतील.
एखादा चांगला मराठी चित्रपट आलाय तर जरा त्यावर स्वतंत्र चर्चा होत आणखी चार लोकांना कळले तर चांगलेच असे मला वाटले.
इतकं कौतुक करावे असा अजिबात सिनेमा नाहीये
>>>>
आपल्या मताचा आदर आहे. अशी मते सैराट, दुनियादारी पासून झिम्मा चित्रपटाबद्दलही आली आहेत. पण महाराष्ट्राच्या जनतेने हे चित्रपट डोक्यावर ऊचलून घेतले आहेत. प्रत्येकाची आवड अभिरुची भिन्न असते. तिचा आदर असावा.
नुसता नवा धागा काढू नका
नुसता नवा धागा काढू नका म्हणलं तर अनादर कसा काय होतो?
मुळात या सिनेमाबद्दल फार काही लिहावं असेही नाहीये
हिंदी चित्रपटाची कॉपी करून, आणि इंग्रजी मध्ये आता घिसापिटा होण्याच्याही पलीकडे झालेला विषय घेऊन फक्त भाषा मराठी म्हणून त्याचं कौतुक करायचं तर करा बापडे हो
मुळात या सिनेमाबद्दल फार काही
मुळात या सिनेमाबद्दल फार काही लिहावं असेही नाहीये >>> चार पोस्ट तुम्हीच लिहील्यात. ज्यांना फार काही लिहावे असे वाटत नाही. मग लिहावे असे वाटणारे किती लिहीतील
असो, मला वेळ मिळाला तर या
असो, मला वेळ मिळाला तर या चित्रपटाचे परीक्षण लिहायला आवडेल. तुर्तास हे मा शे पो
चार पोस्ट तुम्हीच लिहील्यात.
चार पोस्ट तुम्हीच लिहील्यात. ज्यांना फार काही लिहावे असे वाटत नाही.>>>
सर गणित लहानपणापासून कच्चे दिसतंय तुमचं
ना धड इंग्लिश येत ना धड मराठी
गणिताचीही बोंब
आता तर इरेला पेटुन लिहिणारच याची खात्रीच आहे, कारण एखाद्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर हिरीरीने ती कशी भारी आहे हे लिहून इरिटेत करणे हा तुमचा आवडीचा छंद आहे
सदासर्वकाळ हेच तर सुरू असते
त्यामुळे आता झोंबिवली चा उदोउदो करणाऱ्या आता दणकेबाज पोस्टीं पडणार लवकरच
ऑस्कर किंवा कान लाच पाठवायचे बघा फक्त
वैदेही परशुरामी मला आवडते,
वैदेही परशुरामी मला आवडते, कतरीनापेक्षा जास्त गोड आहे दिसायला. स्माईल क्युट आहे तिचं.
भू भु 2 कसा आहे ? लेक फारच
भू भु 2 कसा आहे ? लेक फारच मागे लागलीय चल म्हणून.. पण ट्रेलर बघून काही खास वाटत नाहीय.
@ आशुचँप
@ आशुचँप
कारण एखाद्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर हिरीरीने ती कशी भारी आहे हे लिहून....
>>>>>
माझ्या आधी म्हाळसाने चित्रपट आवडला लिहिलेले.
त्यानंतर मी पाहिला मला आवडला.
त्यानंतर च्रप्स यांची चित्रपट आवडल्याची पोस्ट आहे.
न आवडणारे या धाग्यावर तरी आपण पहिलेच आहात. मग मी असे म्हणावे का आम्हा तिघांना आवडला म्हणून तुम्ही मुद्दाम आवडला नाही म्हणत आहात. पण मी असे म्हणणार नाही. कारण प्रत्येकाच्या मताचा आदर आहे. हेच मी वर म्हणत आहे.
असो, तुम्ही केवळ मी ऋन्मेष आहे म्हणून वाद घालत असाल तर मला खरेच रस नाही. पण एका मराठी चित्रपटाबद्दल चर्चा करत असाल तर स्वागतच आहे, भले मतभेद का असेनात.
तिघे कोण?
तिघे कोण?
वैदेही परशुरामी मला आवडते,
वैदेही परशुरामी मला आवडते, कतरीनापेक्षा जास्त गोड आहे दिसायला. स्माईल क्युट आहे तिचं.
>>>> अगदी सहमत!
काशिनाथ घाणेकर मध्येही खूप छान दिसली आहे.
मग मी असे म्हणावे का आम्हा
मग मी असे म्हणावे का आम्हा तिघांना आवडला म्हणून तुम्ही मुद्दाम आवडला नाही म्हणत आहात. पण मी असे म्हणणार नाही.>>>>
मी पण तुम्हाला बालिश,उथळ आणि हेतुपुरस्सर दुसर्यांना छळणारे आहात असे म्हणावे का???
पण मी असे म्हणणार नाही. कारण प्रत्येकाच्या मताचा आदर आहे. हेच मी वर म्हणत आहे
छान आहे वैदेही, आधीच म्हटलेय.
छान आहे वैदेही, आधीच म्हटलेय.
कतरीनासारखी आहे म्हणून तुलना करायची ईच्छा नाही. कारण कतरीनाचेही सौंदर्य फार आवडीचे. ती कधीच वल्गर वाटत नाही हे तिच्या सौंदर्याचे वैशिष्ट्य.
@ आशुचॅप, ओके
जास्त गोड आहे दिसायला. स्माईल
जास्त गोड आहे दिसायला. स्माईल क्युट आहे तिचं.>>>>
तेवढंच आहे, फक्त दिसायला छान आहे इतकंच
अभिनय वगैरेच्या वाट्याला जात नाही ती कधी
तिचं काम बघितलेलं आठवत नाहीये
तिचं काम बघितलेलं आठवत नाहीये, त्यामुळे त्याबद्दल काही सांगू शकणार नाही.
झोंबिवलीमध्ये तिला तितका
झोंबिवलीमध्ये तिला तितका स्कोपही नव्हता अभिनय दाखवायला. पण वावर प्रसन्न आहे. तिचे आणि मोलकरीणीचेही छोटेछोटे एकेका संवादाचे सीनसुद्धा छान वाटतात.
(No subject)
यातली जी कूल मॅन मराठीतून भाषांतर करताना लाजली ती वैदेही.
वैदेही कशी वाटली - नवा धागा
वैदेही कशी वाटली - नवा धागा काढायला वाव आहे.
होता उलट
होता उलट
प्रेग्नेंट असताना नवऱ्याची काळजी, जीवाची काळजी, मूळचा धाडसी स्वभाव हे सगळं नीट दाखवता आलं असतं पण ती सगळीकडे कोरा भावणाविरहरित चेहरा घेऊन वावरते
तिला स्कोप नसायला काय झालं, मॅक्स वेळ तिलाच मिळालं आहे फुटेज
तुम्हाला घाणेकर म्हणायचं आहे का? त्यातही ती सेम एक्सप्रेशन घेऊन आहे
कुणीतरी कतरीना शी तुलना केलीय ते बरोबर आहे
निव्वल कचकड्याची बाहुली
यातली जी कूल मॅन मराठीतून
यातली जी कूल मॅन मराठीतून भाषांतर करताना लाजली ती वैदेही.>>>>
Pages