मायबोलीवर आव्वाज कुणाचा ? पुणेकर वि. मुबईकर कि कोथरूडकर वि. पार्लेकरांचा ?

Submitted by गारंबीचा शारूक on 25 March, 2022 - 09:45

एका धाग्यावर ऋन्मेष सरांनी त्यांचे सखोल निरीक्षण मांडले आहे कि
पूर्वी मायबोलीवर पुण्याचं वर्चस्व होतं पण आता मुंबईचं आहे. तिथे त्यांनी सूचना केली कि यावर नवीन धागा काढा. पण त्यावर जे प्रतिसाद आले त्यामुळे वाद होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे. हा विषय तसा खेळीमेळीने घ्यायचा आहे.

ऋन्मेष सरांचे निरीक्षण म्हटल्यावर वादच नाही. पण काही जणांना त्यांच्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे कळत नाही. म्हणतात ना एखाद्याचे नाव गालफाड्या पडले की पडलेच. त्याने आईनस्टाईनचा गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगितला तरी लोक खोटेच म्हणणार.
अगदी शेक्सपीअरचे जगप्रसिद्ध वचन "व्हेन अ रोमन डूज अ फिडेल डू इट अगेन " हे ऐकवले तरी त्यात सुद्धा खोट काढतात लोक. मग सांगावे लागते कि हे शेक्सपीरचे वचन आहे. मी शेक्सपीअरचे काही वाचलेले नाही. पण प्रसिद्ध नाटककार जयंत नारळीकरांचा एक लेख वाचलेला त्यात होतं हे.

तर विषय असा होता कि
त्या आधी मला हे सांगायचे आहे की मुंबई ही खरी कोळ्यांची. आम्ही इथले खरे रहिवासी. पण आम्हालाच आता जागा राहिली नाही. आमच्या पणजोबाच्या आधी इथे डोंगर आणि मोकळी मैदाने होती. खापर पणजोबा आणि त्यांचे मित्र मैदानातल्या गवतात लपा छपी खेळत. विट्टी दांडू खेळत. त्यांनी डोंगरावर मातीचे किल्ले बांधले होते. समुद्रात जाणे हा तर रोजचा कार्यक्रम होता. मोठ मोठी जहाजे आणि माशाच्या जाळ्या घेऊन ते जात. समुद्रावर फेकत आणि मासे घेऊन येत, नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ वाढवण्याचा कार्यक्रम असायचा.
मी पण लहान असताना मसे पकडले आहेत आणि नारळी पौर्णिमेला कोळी गीतांवर नाचलो आहे. "गळ्यात साखळी सोन्याची" या गाण्यावरच्या माझ्या डान्सला आमच्या ग्रुपला सोन्याची साखळी मिळाली होती.

तर सांगायचा मुद्दा असा कि मुंबई काय, पुणे काय ही शहरे ज्यांच्या मनगटात तलवार होती आणि डोक्यात मेंदू होता त्यांनी वसवली. पुणे पूर्वीपासूनच मावळे आणि मराठी लोकांचे आहे. पण मुंबईत पहिल्यापासून गुजराती, पारशी, पंजाबी अशा लोकांचे वर्चस्व आहे. दादर, विले पार्ले या भागात मराठी वस्ती होती. पण आता तिथले लोक जागा विकून अमेरिकेत किंवा वांगणीच्या पुढे गेल्याने तिथेही अमराठी लोक आले आहेत. मुंबईची गती वेगवान आहे. पुण्याची गती पहिल्यापासून १० ते १ आणि ४ ते ८ अशी आहे. तब्येतीने काम हे पुण्याचे वैशिष्ट्य आहे.

यावरून काही लोक म्हणतात कि पुणेकरांचे सांस्क्रुतिक वर्चस्व आहे. काही जण त्याला दहशतवाद मानतात. पण मी तर लहानपणापासून मुंबईत पुण्यापेक्षा चांगले कार्यक्रम पाहत आलो आहे. पुल देशपांडे मूळचे मुंबईचे, असे अनेक थोर साहीत्यिक मूळचे मुंबईचे आहेत.

मग मायबोलीवर पूर्वी पुण्याचे वर्चस्व होते असे ऋ सरांनी निरीक्षण नोंदवले आहेत त्यांची कारणे काय असतील ? पार्लेकरांनी या वर्चस्वाला घोडा कसा घातला नाही ? त्यांनी ते कसे काय मुकाट्याने मान्य केले ? नागपूरकर त्या वेळी काय करत होते ?

आता हे वर्चस्व मोडून काढल्याने पुणेकर मायबोलीवर येत नाहीत का ? जुनी मायबोली राहिली नाही असे ते म्हणतात का ?
अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची तर या खेळीमेळीच्या धाग्यावर हलकी पुलकी चर्चा व्हायलाच पाहीजे.

( मायबोलीवर आवाज तर वेमा, अ‍ॅडमिन आणि त्यांना मदत करणारे पराग सर, जेबॉ सर, रॉहू सर, चीनूक्स सर आणि आश्चिग सर व इतर यांचाच आहे. ते मनावर घेणार नाहीत ही आशा आहे.).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावरून काही लोक म्हणतात कि पुणेकरांचे सांस्क्रुतिक वर्चस्व आहे. काही जण त्याला दहशतवाद मानतात. >>>>>>>>>>>>>
पुण्याला आले की पेडणेकर स्टाईल आम्ही तेरको कोरन्टीन करेंगा Happy

हेलिकॉप्टर खूप लांब ऊतरते. घरातल्या एकालाही आवाज ऐकू येत नाही. घरात गाणे चालू असते. तरी ते जवळून बघितले तर बाईलाही मिश्या दिसतात म्हणतात तसे लोकं खोदून खोदून शंका काढू शकतात. पण शाहरूख.. ऊप्फ.. त्याला बघून या शंका पडतातच कश्या.. फोटो बघा पुन्हा एकदा.. काय चिकणा दिसतोय शाहरूख.. अर्थात तरीही शंका पडूही शकतात.. कारण यू कॅन लव्ह शाहरूख .. यू कॅन हेट शाहरूख.. बट यू कॅन नॉट इग्नोर शाहरूख.. मला नुसते ती हेलिकॉप्टर एंट्री नाही तर त्यापेक्षा जास्त आवडते ते तो बॅगचा पट्टा सांभाळत घरात एंट्री मारतो.. गालातल्या खळीत हसत.. एक बोट नाचवत आईला विचारतो.. ऊफ्फ.. काय अदा आहे.. रिअल सुपर्रस्टार.. रिअल मॅजिक.. मग तिथे लॉजिक कोणी शोधायलाही जाऊ नये

मुंबई सेंट्रल स्टेशनवर चालत्या ट्रेनमधून ऊतरावे आणि खांद्यावर बॅग झुलवत घरी धावत यावे. >>>>

हा फौल आहे सर
तुम्ही ट्रेन घरापर्यंत न्यायला हवी
निदान स्वप्ने तरी भव्य बघा

वाफेच्या इंजिनाची शिट्टी दारात झाली तरी ऐकू येणार नाही घरातल्यांना. करण जोहरचा सिनेमा आहे तो.
बरोबरच आहे, हेलिकॉप्टर मधून एकमेकांना गाणे म्हणू शकतात तर घरात पंख्याचा आवाज जाईलच कसा ?

मुंबई / दिल्लीत कुठेशी ही हवेली आहे जिथे चारही बाजूंनी आल्प्सचे डोंगर आणि मागे खाई आहे ? कि शूटींग नंतर जाळून टाकले ते ?

आगरी - कोळी, मच्छिमार कोळी, भंडारी असे सगळे लोक आले. समुद्राकाठीचे मूळचे लोक हेच आहेत. हेच म्हणतो. पण चेनीचं गाणं कोळ्यांचच.
आता मालिकेत एकाच साडीवर दोघींचे हात पडतात आणि दोघींना तीच हवीय. नळावरची भांडणं ठीक. मायबोलीवर वर्चस्व कुणाचे अगदी साधी गोष्ट त्यासाठी आइनश्टाइन, नारळीकर, न्यूटन यांना रश्शीखेचीत घेणं बरं नव्हं.
हळूहळू वसिष्ठ विश्वामित्र वाद येईल. शारुक आहेच. अक्षय,सुनील,परेशरावळ येतील आणि समस्या . . . .

तुम्ही ट्रेन घरापर्यंत न्यायला हवी
निदान स्वप्ने तरी भव्य बघा
>>>>

ट्रेन घरापर्यंत नेणे हे भव्य स्वप्न आहे. वाह Happy
अहो मुंबईत कित्येक वस्त्यांच्या घरासमोरूनच ट्रेन जाते. त्यातील कैक तर बेकायदेशीर असतात.
असो, ट्रेन ही तिने ठरवून दिलेल्या स्थानकावरच थांबायला हवी. सो कॉल्लड भव्य स्वप्न बघण्यासाठी कायदा का मोडायचा?

असो, तरी विषय निघालाच आहे तर ऐका..
मुंबई हार्बर लाईनवर रे रोड हून जी ट्रेन निघायची ती सॅंडहर्स्ट रोडला थांबायची. त्यांच्या मध्यबिंदूवर कुठेतरी माझा जन्म झाला म्हणून माझगावकरांनी अजून एक रेल्वेस्टेशनची मागणी केली. प्रशासनाने आधी आढेवेढे घेतले. पण मग माझा बालकृष्णाच्या रुपातील फोटो पाहताच मान्य केली. आता स्टेशन बांधायचे तर जागा हवी. पण ठरले म्हणजे ठरले. माझगावचा डोंगर फोडला आणि त्याखाली एक पूल बांधून जागा बनवली आणि डॉकयार्ड रोड स्थानक बांधले गेले. आजही लोकं विचार करतात की डॉकयार्डच्या डावीकडे बघितले तर सॅंडहर्स्ट रोड दिसते, उजवीकडे हाकेच्या अंतरावर रे रोड. असे असताना ईतक्या जवळ जवळ स्टेशन बांधलीच कश्याला.. प्रत्युत्तरादाखल मी कृष्णासारखेच गोड स्मितहास्य करतो Happy

सर तुम्ही जन्माला आला तेव्हा प्रलय झाला होता का?
मला आता जवळपास खात्रीच पटली आहे
निदान मीठी नदीला पूर आणि मग त्यावर वाहत येणारे पत्रावळी चे पान आणि त्यावर दोन्ही हाताचे सोबत पायाचे आणि अन्य जे काही सापडेल हातात ते चोखत पडलेलं बाळरूप

हे दृश्य अनेक मुंबईकरांनी पाहिलं असेल आणि आयुष्यभर भेदरून गेले असतील ते Happy

सर तुम्ही जन्माला आला तेव्हा प्रलय झाला होता का?........
>>>>

मला तर तेव्हाचे नाही आठवत. पण बरेच दंतकथा ऐकिवात आहेत. सर्वच एकाच वेळी खऱ्या असू शकत नाहीत हे कळते. पण लोकांचे प्रेम आहे. खोटेही म्हणू शकत नाही Happy

खोटे म्हणूच नये
उद्या भक्तांनी तुम्हाला दोन हात आणि चार पाय आहेत म्हणलं तरी होय म्हणावं

पुराव्यांदाखल फ्रिजवरील माठाचा फोटो टाकावा

पुराव्यांदाखल फ्रिजवरील माठाचा फोटो टाकावा
>>>
नवीन घरात तो माठ नाहीये आता. जुन्या घरमालकाचा होता तो. पण तो पहिल्यावहिल्या जीएसटी खरेदीचा फ्रिज आहे.

ज्यांना आमच्या या चर्चेचा संदर्भ माहीत नाही त्यांनी हा धागा बघा Happy

आमची GST फ्रिज खरेदी - पार्टी टाईम Happy
https://www.maayboli.com/node/62997

अशी ताटातूट करू नये माठांची
किती एकटे वाटत असेल त्याला >>>>>>
Lol
मला नेहमी प्रश्न पडतो , आपले आदरणीय रुन्मेष दादा शाहरुख चे डाय हार्ड फॅन आहेत हे शाहरुख ला माहीत असेल का ?
म्हणजे गाठी भेटीचा एखादा प्रसंग ?

काय बोगस बाफ. मुंबईकरांना मुंबई नीट लिहिता पण येत नाही. मुबई लिहिले आहे. ही कुठेशीक आहे?!

पुणेकरांस आवाज करावाच लागत नाही. आणि मायबोली वैश्विक आहे. सर्वांचा आवाज समान.

आपले आदरणीय रुन्मेष दादा शाहरुख चे डाय हार्ड फॅन आहेत हे शाहरुख ला माहीत असेल का ?
म्हणजे गाठी भेटीचा एखादा प्रसंग ?
>>>>

हो, आहे एक प्रसंग.
पण या धाग्यात नको. हे वाहून जायला नको. स्वतंत्र धाग्यात लिहितो Happy

काय बोगस बाफ. मुंबईकरांना मुंबई नीट लिहिता पण येत नाही. मुबई लिहिले आहे. ही कुठेशीक आहे?!
>>>>

अमा +७८६
माझे नाव नसते हेडर पोस्टमध्ये तर मी आलोही नसतो या धाग्यावर.
आधीची मायबोली राहिली नाही आता. हेच चालवून घेऊया Happy

Pages