आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभप्रभात:

आशू एक दम हैबतीत आहे. तिच्या वाटचा तोच टेन्शन घेतो आहे. उद्याचा कार्यक्रम कसा होईल. हा फारच वेल विश र व शुभचिंटक टाइप आहे.
तिला इतर लोकांबरोबर पण काम करूदे. इथे आई विचार फेकत असते. तिला अडकवू नका. कसलीच बंधन घालू नका. ह्याने तोच एक विचित्र
सूट व ते बूट घातले आहे.

आई अरू किचन मध्ये काम करत आहेत. तिला हातात चहा देते आई. कार्यक्रमाचे टेन्शन हात पाच मिनि टे. बेल वाजली.
आता हे दोघे आले आहेत. नित्या आशू. ह्याला बॉस म्हणून काही काम नाही का? सारखा इथेच रुंजी घालत असतो. हे दोघे आईला आमंत्रण द्यायला आले आहेत. आशू वेगळी गाडी पाठव्णार आहे. तिघे शाळेला गेल्यासारखे ऑफिसला जा यच्या प्लान मध्ये आहेत.
अरू ला सासरी आई आली तर कसे सगळे वागत होते ती आठवण येते.

शेखर व निखिल आले आहेत घरी. व अनघा त्याला खापी करत आहे. संजना पण येते. संजना चा साइड व्ह्यू आहे त्यात तिला डबल चिन!!!
वय होत चालले फटाकडीचे. हा लगेच अरुध ती कुठे आहे विचा र ते.
क ट टु ऑफिस. नवी होर्डिन्ग येताfunction at() { [native code] } त ती बनव णारा शेखरच आहे. मग तिथे खेचा खेची.

प्रोमो मध्ये आशूच्या बोटाला काही लागले असल्याने अरू पट्टी बांधत आहे ते अन्या न नेमके बघतो. चाळे चालू आहेत राजरोस असे आईला सांगतो. दोघे कौतुकाला वैतागले आहेत.

अन्या येतो व अनघाला चहा मागतो. शेखर त्याची खेचत आहे.

अमा... Happy आता शेखरलाही काम मिळाले का सु अरु- आशु च्या कंपनीत...? सगळ्यांचेच कल्याण करणारे बहुतेक...!!
अशुतोष ला खरंच काही काम नाही...अरु समोर रुंजी घालण्या खेरीज

कसल्या त्या बोर्ड मिटींग्ज!

शेखर तिथे आधीपासून काम करत आहे, नेमके तिथेच. रस्त्यावर उभे राहून पट्टी कोण बांधते, फक्त अन्याने बघावे म्हणून का. शेखर आल्यामुळे छान बदल झाला, कोणीतरी चांगले शालजोडीतले देणारा आला.

स्त्यावर उभे राहून पट्टी कोण बांधते,>> कारण ह्यांच्या मनात विशुद्ध मैत्री आहे. निरागस निस्पाप मुलेच आहेत ती. अरु तर पवित्र स्फटिक मूर्ती संगमरवरी ( थोडे दात अंम ळ पुढे) व हातर बावरा प्रेमी. तिच्या नादात इक डे तिकडे धडकून लागवून घेतो. ही पट्टी बांधेल व बाउ वा हात करेल.
ऐसा प्यार किस्मत से ही मिलता है.

अमा Biggrin

आशुनं खूप कष्ट करुन कंपनी एकदम वरच्या लेवलला नेली असेल म्हणून तर आता निवांत अरूच्या आगे-मागे करतो.

No yaar he was in the us for many years doing Marathi music and the nitya was in charge. It is a fortune 500900 company.

हो का? तो पार्ट मिस झाला माझा. मी त्या गाण्याचा कार्यक्रम एपिसोडनंतर इकडे आले परत. ज्यात आशु भान हरपून अरुकडेच बघत बसतो तो एपिसोड, नव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाला. आता तुमच्या सगळ्यांच्या पोस्ट्स वाचून "बघते" मालिका.

शेखर आला का,, यह अपना फेवरेट है ,, बघते आजचा भाग.

अरु तर पवित्र स्फटिक मूर्ती ..हातर बावरा प्रेमी>>> Lol

अनुपमा मधे किती ताणतात बाssssssपरे. करा ना बाबांनो आता एकदाचं लग्न, किती दिवस अनाउन्सच करत आहेत. का त्या नातवाची वाट बघताय अक्षता टाकायला? तिच्या स्टोरीच्या मानाने बघता आईची सिरीयल पण अजून वर्षभर सहज चालतेय.

नितीन आणि आशुतोष अरुंधतीच्या आईसोबत सोफ्यावर बसले तेव्हा ती आणि अरुंधती दोघी हा आता लग्नाची मागणी घालतो की काय अशा घाबरून बघत होत्या.

भरत..:हाहा: अगदी अगदी.
तिची आई अगदी अंग चोरून बसलेली....एव्हढं काय तिला आमंत्रण द्यायचं? काय घरचं कार्य आहे का...?

अनिरुद्ध आणि कांचन अरुंधतीच्या माहेरच्यांशी किती वाईट वागायचे ते दाखवायला.

फ्लॅशबॅक मधला प्रसंग आधी दाखवला होता की आता नव्याने बनवला?

बाळ झुरळाला घाबरलं आणि पदरामागे लपलं. झुरळ मार.
बाळाला खोकी आली. त्याला गोळी दे. काढा करून दे.
बाळाच्या बोटाला लागलं, पट्टी बांध.

लाँच व्हायच्या आधीच गाणं लोकांना आवडलं. हे लोक म्युझिक लाँच म्हणताहेत का? ते सिनेमाचं असतं ना?
यांचा अल्बम कशावर आहे? सीडी की नेट? अल्बममध्ये एकच गाणं आहे का? बाकीचे गायक गायिका संगीतकार गीतकार अदृश्य आहेत का?
निलेश मोहरीर जी एं सारखा फोटो लावू देत नाही का?

नसलेला निहार दाखवायला "अरे निहार लवकर परत ये," असं दारातून ओरडायचं लक्षात ठेवतात , तसं अल्बममध्ये आणखीही गाणी असतील हेही लक्षात ठेवलं असतं तर बरं दिसलं असतं.

तो शेखर व निखिल फार फुटेज खातात. संजनाचा हिरवा ड्रेस छान होता. पण ती केस फुगवून मागे करते ते पावर पफ गर्ल्स मधील मोजो जोजो ह्या व्हिलन सारखे दिसते. वर एक जास्तीचा ब्रेन आहे असे.

ह्याला नक्की काय लागले नी किती रक्त आले आहे त्या मानाने ड्रामा किती? म्हण जे तरूण पणी ह्याला काहीच झाले नसेल का? प्रिन्सेस लिया बघोन सुद्धा? अरू गाडी चालवत ह्याला सोडेल घरी त्याच्या आईच्या हातात सोपवेल. पण मला वाट्ल लाँच च्या आधी उगीच अपघात झाला तर?

अन्या येणार नाही म्हणला पण आला वाट्तं अरूचे केस काय भारी केलेत.

मोजो जोजो…. जास्तीचा ब्रेन >>> Lol
ह्याला नक्की काय लागले ….. तरी नशीब ती फर्स्ट एड बॅाक्स मागते. मला वाटले पदराची चिंधी फाडून बांधते कि काय

Bharajari ga pitambar dila phaaduna

Draupadi si bandhu shobhe naaarayana. I sang this song also. sorry for englis. Phone pe hai

मलाही वाटले..आता पदर फाडून चिंधी बांधते ही....!! पण मग ती भावाला बांधायची असते ना...सो...तसे नाही दाखविले...!!
कैच्या कै....!!

उद्याच्या भागात
अरुंधतीला ड्राइव्ह करताना बघणाऱ्या आशुतोषच्या तोंडावर वेडसर भाव दिसताहेत.

>>>अरुंधतीला ड्राइव्ह करताना बघणाऱ्या आशुतोषच्या तोंडावर वेडसर भाव दिसताहेत
त्याला पण "चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला" हेच आठवलं असणार ..पत्ता कट Wink Lol

नाही. एक बाई कार चालवतेय याचा त्याला धक्का बसला.

बाई म्हणजे स्पेसिफिकली अरुंधती नव्हे, कोणतीही बाई.

सर्व कमेंट्स भारी. अमा जबरदस्त.

मी एक शॉट बघितला आत्ताच शेखर येतो ऑफिसमध्ये तो. त्याने मजा आणली पण, तो अभिनय उत्तम करतो कुठलंही काम द्या. व्हिलन तर कमाल करतो.

भरत.. Lol
बाळाला खोकी आली.... यावर खूपच हसू आलं...!!
मजा येते इथे कॉमेंट करायला आणि वाचायला...
प्रत्यक्ष सिरियल पेक्षाही.....

मेन आर फ्रॉम् मार्स इ.इ. तारे तोडले. स्त्रियांना रस्ता शोधता येत नाही.

आज मेड अप अरुंधतीला बघताना पुन्हा तेच वेडसर भाव.

आज निदान अंघो ळ केली आहे किंवा मेक प म्यान ने फाउंडेशन ह्याला पन चोपडीले आहे. अरू घरी आणून सोड ते. परत टेन्शन परत सर्व काही नीट होईल. हे प्रत्येक पात्र हजार वेळा तरी म्हणत आहे. इवेंट छोटासाच तर आहे. अर्धे फॅमिली पब्लिकच आहे. पोरे टोरे, गौरी इशा जोडी, यश अवी अनघा व संजना आणि नंतर अन्या पण येतो. संजना पाकिट पत्रकारिता चालू करते.

ते जे फॅन्सी बॅनर म्हणून आणले आहे त्यावर एक यलो प्रिं त आउट चिकटवले आहे. असे कसे चालते. शेखरभावुजी ग्रेट. असे काम कसे काय करतो.

इथे देशमुख फॅमि लीचे नाच आहेत का.

अरु छान तयार झालीये, अनघाची पण साडी आवडली मला. संजनाची पण छान आहे, पण ती नेहमी सारखी छान नाही दिसत आहे. अरूला छान दाखवायचं असलं की हीला असा जरा विचित्र गेटप देतात वाटतं.

Pages