Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<<<किंवा मग अप्पा इमोशनल
<<<<किंवा मग अप्पा इमोशनल ब्लॅकमेल करून लग्न लावून देतील जुन्या खुबसूरत सारखं.>>>>>
मला पण हेच वाटलं कारण अप्पांनी कांचनचा विरोध असेल तर मी सांभाळून घेईन आणि तुझे कन्यादान मीच करीन अशा अर्थाचे डायलॉग मारले होते एक दोन दिवसांपुर्वी.
बाकी अप्पांनी अरु च्या लग्नाबद्दल ची भुमिका अशी डेवलप होत गेली: सुरवातीला त्यांनी आशुतोष ला अरु शी लग्न कर असं सांगून टाकले. मग अरु ला दुसर्या लग्नाचा आणि आशुतोष चार विचार कर असा सल्ला दिला. सगळं झाल्यावर जेव्हा अरु ने त्यांना आशुतोष शी लग्न करण्याचा निर्णय सांगितला तेव्हा तिच्या कडे आशुतोष केळकर हा चांगला माणूस आहे ना? तुला सुखात ठेवेल ना इ. चवकशी केली! आणि हे देशमुख कुटुंबातील सगळ्यात समंजस व्यक्ती आहेत:).
curious case of Appa
curious case of Appa
पर्णीका !!!!
मस्त observation!!
अरुची साडी आणी गळ्यातल छान
अरुची साडी आणी गळ्यातल छान होत, अनघाची साडी-ज्वेलरी सगळच छान, छकुली सगळ्यात गोड बाकी पिळ भाग पुढे ढकलत पाहिला.
आजच्या भागात कांची अतिशय
आजच्या भागात कांची अतिशय बालिश बोलत होती, अरु काय गुलाम आहे का तिच्या आयुष्याचे निर्णय हिने घ्यायला ? अर्थात अरुचा लाळघोटेपणा बघता ती हेच डिझर्व करते असं म्हणावं लागेल.
पण खरंच असतात कांचन सारख्या
पण खरंच असतात कांचन सारख्या बायका......तिच्या सारख्याच असतात खरं तर जास्ती..!!
लेखिकेचे निरीक्षण बारीक आहे. अरु छान दिसत होती. तिच्या आईचा अभिनयही छान.
@प्राजक्ता, कांचन कधी
@प्राजक्ता, कांचन कधी बालिशपणा करत नाही? हा प्रश्न विचारला पाहिजे आपण आता तिचा कॉमिक रिलिफही बालीश असतो आणि संताप सुद्धा. कंटाळा आला बाबा ह्यांच्या दळणाचा. तेच तेच किती वेळा बघायचं?
आजचा भाग आवडला, कधी नव्हे ते
आजचा भाग आवडला, कधी नव्हे ते विद्याताईंना फूटेज मिळालं.
अरु अजूनही अपराधी भाव काही सोडत नाही. पुनर्विवाह करावा की नको अशी साशंकता वाटणं वेगळं आणि सतत गुन्हा केल्यासारखे भाव घेऊन वावरणं वेगळं. ती सतत सेवेच्या नावाखाली येत राहते आणि मग अपेक्षा वाढवते. अन्या तर बालिशपणाची हद्द करतो - २ गाणी गायला दिली म्हणून लग्न म्हणे,
केळकर लोक्स काही आतल्या
केळकर लोक्स काही आतल्या गाठीचे कोब्रा वाटत नाहीत शिरेलीत. आता मिया बीबी राजी आहेत ना. मग फ टकन नोटीस देउन महिन्याभरात लग्न करुनच टाकायचे. रिसेप्शनला ह वे तर बोलवा देशमुखांना. ती आई पण यडपट आपण सर्व कार्य क्रम करु तुम्ही घरी या व्गैरे लाळ घोटत राहते. जिथे मान राखला जात नाही तिथे जायचेच कशाला हात दाखवून अवलक्षण. अरुचे कन्यादान का बरे करा वे लागेल. तिची आई कायम रडका चेहरा . गुजराती मित्र छान दिसत होता. व चिंगी पण
तिची आई कायम रडका चेहरा . >>>
तिची आई कायम रडका चेहरा . >>>>बहुदा क्रायटेरियाचं ठेवला असेल नट/ नटी शोधताना , रडका चेहरा सिलेक्त, तेलकट चेहरा सिलेक्त , कॉन्स्टिपेशन चेहरा सिलेक्त , कायम चिडका चेहरा सिलेक्त , मूर्ख दिसणारा चेहरा सिलेक्त। हा हा हा हा हा
अरुंधतीची आई तोंड उघडून चक्क
अरुंधतीची आई तोंड उघडून चक्क चार ठाम वाक्य बोलली !
<अरु अजूनही अपराधी भाव काही
<अरु अजूनही अपराधी भाव काही सोडत नाही. पुनर्विवाह करावा की नको अशी साशंकता वाटणं वेगळं आणि सतत गुन्हा केल्यासारखे भाव घेऊन वावरणं वेगळं. >+१.
ती घटस्फोट घेईपर्यंत , रादर आशुतोष येईपर्यंत नीट विचार करू शकत होती. ठामपणे बोलू शकत होती. खरं तर तिला सगळं सोपं होत गेलं. अनघामु़ळे आश्रमातली नोकरी मिळाली. मुलामुळे एक आणि मग मित्रामुळे आणखी गाणी आणि नोकर्या मिळाल्या. घर मिळालं. आपण लग्न करायला हवं हे तिलाच मुळात पटल्यासारखं दिसत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनाही प टायचा प्रश्न नाही. आशुतोषलासुद्धा नितीन आहेच.
आता लग्न आणखी पुढे ढकलतील. पुन्हा हो नाही करत बसतील.
तिच्यापेक्षा मला संजनाची थॉट प्रोसेस जास्त क्लिअर वाटते. अनिरुद्धला आपल्याशी लग्न करायचं नाहीए, पण त्याने आपल्याला फिरवून सोडलं किंवा आपल्याबरोबर फक्त मजा केली हा शिक्का नको म्हणून तिने त्याला जबरदस्तीने लग्न करायला लावलं. अरुंधतीच्या लग्नाच्या बाबतही तीच जास्त व्यवस्थित आणि खणखणीत बोलते.
अप्पांच्या भाषणानंतर अरुंधती आणि आशुतोष , यश इ.चे भाव न्यायाधीशांनी मोठ्या गुन्ह्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केल्यासारखे होते.
सासरच्यांची जबाबदारी आपल्यावर आहे हेही तिच्या डोक्यात पक्के बसलेले आहे. पॅट्रिआर्की तिच्यात पुरती भिनलेली आहे. संजनाने अनिरुद्धला तू बघ सगळ्यांकडे हे मस्त सांगितले. अभिषेकला सांगायची पॅटर्निटी लीव्ह घ्यायला.
काल नितीन अनुष्का अनिरुद्धबाबत बोलत असताना अनुष्का चक्क लाजल्यासारखी वाटली.
अप्पाला चक्कर आल्यावर फक्त नाडी पाहिली? स्टेथोस्कोप, बीपी, ऑक्सिमिटर यातलं काही नको? मॉडर्न मेडिसिनवाले नाडीला इतकं महत्त्व देतात का?
केळकर देशमुखांकडे आल्यावर त्यांचा अपमान व्हायलाच पाहिजे हा नियम अगदी बोल्ड अक्षरांत लिहून अंडरलाइन केला गेला.
देशमुखांकडच्या किंवा किमान अनघाच्या सोहळ्यात राडा व्हायलाच पाहिजे असा आणखी एक नियम असावा. तिच्या साखरपुड्याला, लग्नात, डोहाळजेव णात आणि आता मुलीच्या बारशाला अशी राड्यांची मालिका सुरू आहे.
अरुंंधतीच्या भाच्याबरोबर तिचा भाऊही गायब झाला.
भरत..
भरत..
मलाही अरुंधतीचं हे वाक्य अजिबात आवडलं नाही..
"तुम्हाला माझ्या जबाबदार्यांचीच काळजी आहे ना? तर मी माझी कर्तव्यं पार पाडण्यात काहीही कुचराई करणार नाही हे हवे तर मी लिहून देते....!!! अरे..!!!!
कमाल आहे!
अप्पांच्या भाषणानंतर अरुंधती आणि आशुतोष , यश इ.चे भाव न्यायाधीशांनी मोठ्या गुन्ह्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केल्यासारखे होते.
अगदी

सध्या निखिल, अरुंधतीचा भाउ, भाचा, गौरी, अविनाश, केदार, शेखर, विमल हे सगळे गायब आहेत.
आणि वर्षा, मिनू हे नुसते उल्लेख मात्र आहेत.
खरंय भरत. मी ही मालिका बघायला
खरंय भरत. मी ही मालिका बघायला सुरुवात केली ती इथे वाचुन. अनिरुद्ध -संजना बद्दल कळल्यावर अरुंधती सेल्फ पिटि किंवा तत्सम मालिकांतील पद्धतीने न वागता एकदम रॅशनल, ठाम, लाॅजिकल वागताना दाखवलीय. त्याबद्दल इथे जवळपास सगळ्यांनीच खूप कौतुक केले होते ते वाचून मी बघायला लागले. तेव्हा अनघाला तिची मेंटाॅर म्हणून दाखवलं होतं. तिला मानसिक रित्या सेल्फ सफिशिअंट आणि भुतकाळात न रमता वर्तमान काळात जगायला शिकवणारी इ दाखवली होती.
पण मग अनघा - अभि चार ट्रॅक सुरू झाला आणि अरु अनघाची फार वेगाने रिग्रेसिव वाटचाल सुरू झाली. त्यानंतर तुम्ही लिहलय तसं अरु ने स्वतः कुठलाच निर्णय घेतला नाही आयुष्यातला. तिचे सगळे निर्णय इतरांनी घेतले आणि सगळं तिला आपोआप मिळत गेले. अनघा तर आधुनिक मीना कुमारी बनली आहे, ट्रॅजेडी क्विन! तिच्या कुठल्याही वागण्यात आत्मविश्वासच दिसत नाही. ती आणि अरुंधती आळीपाळीने कांचन च्या शिव्या खात आणि रडत बसलेल्या दिसतात.
डेली सोप च्या मर्यादा वगैरे सगळं मान्य पण ह्या मुळ मुद्दयाच काय? त्या दोघी जर अजुनही अनिरुद्ध -अभिषेक ह्या अत्यंत कांगावेखोर पितापुत्र जोडिचे टोमणे आणि वागण सहन करणार असतील आणि त्यांच्या अवतीभवती च रहाणार असतील तर ह्या सगळ्या त्यांच्या प्रवासाच प्रयोजन काय मग?
डेली सोप च्या मर्यादा वगैरे
डेली सोप च्या मर्यादा वगैरे सगळं मान्य पण ह्या मुळ मुद्दयाच काय? त्या दोघी जर अजुनही अनिरुद्ध -अभिषेक ह्या अत्यंत कांगावेखोर पितापुत्र जोडिचे टोमणे आणि वागण सहन करणार असतील आणि त्यांच्या अवतीभवती च रहाणार असतील तर ह्या सगळ्या त्यांच्या प्रवासाच प्रयोजन काय मग? >>>>>>> खूपच लॉजिकल प्रश्न आहे तुमचा . स्टारच्या सिरीयल पेजवर जाऊन हा प्रश्न विचारा त्या महान लेखिकेला? मगच तुम्हाला व आम्हाला यातून सुटका
अरुंधतीला आता देशमुखांच्या
अरुंधतीला आता देशमुखांच्या लाथाबुक्क्या तेवढ्या खायच्या बाकी राहिल्यात. त्याही ती कर्तव्य म्हणून मुकाट्याने खाईल.
मेकपच्या जाड थराने झाकले ल्या चेहर्यावर बारा वाजल्याचे भाव ठेवून अरुंधतीने सगळं म हाभारत ऐकून आणि पाहून घेतलं आणि बाहेर येऊन आशुतोषला , " मला आनंदी राहायचा हक्क आहे, मला तुमच्याशी लग्न करायचं स्वातंत्र्य आहे, " असं सांगितलं तेव्हाचे चेहर्यावरचे भाव, आवाजातला रडकेपणा यांचा त्या शब्दांशी काहीही संबंध नव्हता. आधी यश, अप्पा, तिची ती धुमकेतू मैत्रीण आणि आता चक्क तिची आई, आशुतोष आणि त्याची आई तिला साखळ दंडातून सोडवण्याचा प्रयत्न करत असताना ही बाई त्या बेड्यांना घट्ट धरून बसली आहे.
तिला आशुतोष तिच्या बाजूने उभा राहायला लागतोय. आणि तिच्यामुळे त्याचा व त्याच्या आईचा वारंवार अपमान होताना ही बघत बसते.
आत जाऊन अप्पांना अभिषेकचं कौतुक सांगते. याला कोडगेपणा म्हणावं की बथ्थडपणा?
गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल - हे डॉ आंबेडकरांचं वि धान असल्याचं वाचलंय. त्यांनीसुद्धा अरुंधतीपुढे हात टेकले असते. २०२३ मध्ये मालिकेची नायिका १९६०-७० च्या मराठी चित्रपटांच्या नायिकांना लाजवेल इतकी कणाहीन वागतेय.
गुलामाला त्याच्या गुलामगिरीची
गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल - हे डॉ आंबेडकरांचं वि धान असल्याचं वाचलंय. त्यांनीसुद्धा अरुंधतीपुढे हात टेकले असते. >>
अगदी अगदी भरत. एखादी असती तर
अगदी अगदी भरत. एखादी असती तर त्याक्षणी बाहेर पडली असती. ही तिथेच पडीक. अशा वेळी संजना गायब, विशाखा पाहुणी असल्यासारखी हे सगळं होयच्या आधी निघून गेली आणि आशु कंपनी अपमान करून घ्यायला जणू थांबली.
कुठे आभाळमायाची सुधा जोशी आणि कुठे ही.
कांचनला गुलाम हवाय हे अजून किती स्पष्ट शब्दात सांगावं म्हणजे तिच्या डोक्यात शिरेल काय माहीत.
अजनबी, काही फरक पडत नाही हो
अजनबी, काही फरक पडत नाही हो त्यांना. मी मायबोलीवरच वाचलेले आधी की चॅनेल च्या पेजवरच्या गैरसोयीच्या काॅमेंटस् काढुन टाकल्या जातात. "मीच मला महान ठरवुन टाकतो, लोकांना काय बघायला आवडेल ते मीच ठरवतो आणि त्याविरुद्ध कुणाला काहीच बोलुन देणार नाही". त्यामुळे आपल्याला कमेंट्स करण्याचा हक्क तोपर्यंतच आहे जोपर्यंत त्या त्यांच्या सोईच्या आहेत.
आभाळमाया ची आठवण मला पण होते. ती पण डेली सोप होती पण क्वालिटी च्या बाबतीत केवढी वर होती. स्टोरी, पात्रांच्या वागण्यातील सुसंगती, त्यांची वेषभुषा, भाषा, सगळंच. इथे सगळाच आनंद! आता मराठी मालिकांच्या क्षेत्रात खूप पैसा आलाय, मालिकांच बजेट वाढलंय. मग तरिही क्वालिटी दिवसेंदिवस इतकी सुमार का होत चालली आहे? हा प्रश्न मला नेहमी पडतो.
तेच मोजके लेखक अनेक मालिका
तेच मोजके लेखक अनेक मालिका लिहितात. त्यामुळे पाट्या टाकतात. अभिजित गुरू, रोहिणी निनावे एकावेळी चारपाच मालिका लिहितात. वर यांना अभिनय करायची सुद्धा हौस.
दुसरीकडे अभिनेत्रींना लेखनाची हौस.
झी मराठीवर टिळकांवरची मालिका आली. प्रोमोज पाहून सुद्धा टिळकांचं हे आतापर्यंतच सगळ्यात भंगार पोर्ट्रेयल वाटलं. आता शामच्या आईवर मालिका येतेय. त्यात तिच्या लहानपणी एक बाई दिवाणावर झोपलेली दाखवलीय. रोहिणी हट्टंगडी सोवळ्या बाईचं काम करताहेत.
प्रतिमा कुलकर्णी चांगल्या मालिका करायच्या. त्या खोटा अंबाडा लावून खाष्ट सासूचा अभिनय करताहेत.
आभाळमाया चांगली होती, बरेच
आभाळमाया चांगली होती, बरेच दिवस. शेवटी शेवटी त्यांनीपण पाणी घातलं होतं बहुतेक. वादळवाट पण चांगली होती. अवंतिका मी नाही पाहिलेली फारशी.
गुंतता हृदय हे भारी होती. वेगळीच होती. मृणाल कुलकर्णी-संदीप कुलकर्णी आणि अंगद म्हसकर.
सगळ्या मालिकांचा पाया विबासं.
सगळ्या मालिकांचा पाया विबासं. (वादळवाट पाहिली नाही).
अवंतिकामध्ये जगात असतील नसतील ते सगळे प्रश्न हाताळले होते.
<<<रोहिणी हट्टंगडी सोवळ्या
<<<रोहिणी हट्टंगडी सोवळ्या बाईचं काम करताहेत.
प्रतिमा कुलकर्णी चांगल्या मालिका करायच्या. त्या खोटा अंबाडा लावून खाष्ट सासूचा अभिनय करताहेत.>>>
अरेरे फार वाईट वाटले वाचुन. रोहिणी हट्टंगडी बद्दल तर प्रश्नच नाही त्यांचं काम सगळ्यांनाच माहिती आहे. प्रतिमा कुलकर्णी बद्दल पण मला फार आदर होता, त्यांची नाटकं, प्रपंच, झोका सारख्या मालिका इ. मुळे. ह्या दोघिही आजकाल पीळ मालिकांमध्ये काम करतात असं दिसतंय. गेल्या वर्षी सर्फिंग करताना भरत जाधव आणि रोहिणी हट्टंगडी करत असलेल्या मालिकेचा एपिसोड बघितला. जे काही दाखवत होते ते इतकं वाईट होते कि सलग पाच मि सुद्धा बघवल नाही. नाव आठवत नाही पण इतक्यातलीच आहे मालिका. इतक्या टॅलेंटेड बायकांना हे कसं सहन होत असेल?
वाले तुम्हाला 'रिमझिम' आठवते
वाले तुम्हाला 'रिमझिम' आठवते का? चंद्रशेखर गोखले ने लिहली होती, त्याची बायको उमा गोखले काम करायची त्यात. सुनील बर्वे पण होता. मस्त होती ती पण.
प्रतिमा कुलकर्णी मानबा मधेहि
प्रतिमा कुलकर्णी मानबा मधेहि दर्शन द्यायच्या.
रिमझिम आठवते - पूर्वा गोखले होती.
अवंतिका हे असं रेफरंस बुक आहे जे कोणत्याही मालिका लेखकाने उघडावं आणि एखादा सीन ढापावा. कथानकात कुठे ना कुठे फिट बसणारच.
आजच्या भागातही अरु ठाम वगैरे बोलतच नव्हती, अपराधी भाव तसेच. अजूनही ती स्पष्टीकरण देत्ये. घटस्फोट घेताना मधुराणीने चांगला अभिनय केलेला, आता फक्त गिल्टि भाव.
हे सगळं ठीक आहे....पण खरेच
मधुराणीचे संवाद , भूमिका, चेहेर्यावरील भाव हे सगळे आपल्याला इल्लॉजिकल वाटतात..पण ते तसे वाटण्यात संवाद लेखिकेचाही वाटा आहेच ना...या बाबतीत तरी ती कंसिस्टंट आहे... तिला तसेच उभे करायचे असेल अरुंधती चे पात्र!
रिमझिम ही कुठली मालिका ते मला
रिमझिम ही कुठली मालिका ते मला आठवत नाही. कदाचित काही भाग बघितलेही असतील. मी पहिल्यापासून शेवटपर्यंत अशी फक्त 'गुंतता हृदय हे' बघितली होती. ती मधूनच पुढे बघायला सुरुवात केली होती. आधीचे भाग हल्ली कधीतरी झी5 वर पाहिले. 'खुलता कळी खुलेना' हीपण अशीच मधूनच पुढे शेवटपर्यंत बघितली. बऱ्याच मालिकांचे अधलेमधले भाग बघून होतात आईबाबा-साबा आल्या किंवा मी तिकडे गेले तर. त्यामुळे बऱ्याच मालिकांचं साधारण कथानक माहिती असतं. काय फरक असतो म्हणा फारसा. विबासं, मनाविरुद्ध झालेलं लग्न, कुणीतरी हरवलेलं असणं, सासू-सून भांडणं हे आलटून पालटून असतं.
अजूनही अरु कांचीकडून समजून
अजूनही अरु कांचीकडून समजून घेण्याची वगैरे अपेक्षा करत्ये, तरी नशीब निघून गेली आजच्या भागात.
अप्पांना आलेली चक्कर बघून हे
अप्पांना आलेली चक्कर बघून हे गंभीर प्रकरण असेल असं वाटलं होतं. पण लगेच टुणटुणीत आणि ठणठणीत झाले.
अरुंधतीने पुन्हा या घरात यायचं नाही आणि तिला कोणी भेटायलाही जायचं नाही, असं फर्मान आधीही एकदा सोडून आणि मोडून झालंय ना?
काल नितीनने सेन्सिबल बोलायला सुरुवात केली होती. झटपट लग्न लावून टाका. पण मग वरमाईला आपली हौस पुरवायचीय हे कळल्यावर उलटला.
विवाहसोहळ्याच्या नावाखाली महिनाभर घालवायची संधी कसे सोडतील?
भरत, नाही, लगेच उरकतील पण
भरत, नाही, लगेच उरकतील पण दणक्यात सोहळा करून. प्रोमो मधे अप्पा सांगत आहेत - मुहुर्त काढायला गेलेलो पण .......
हा पण असणार की जवळचा मुहुर्त आहे, मग नाही वगैरे.
१९९८ पासून मालिका बघून ह्यांचे सगळे फंडे पाठ झाले आहेत.
Pages