Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही..पण अप्पा असं म्हणताना
नाही..पण अप्पा असं म्हणताना दाखविले आहेत की..
काहीतरी प्रॉब्लेम आहे.....
काहीतरी प्रॉब्लेम आहे.....>
काहीतरी प्रॉब्लेम आहे.....>>पुढच्याच आठवड्यात/महिन्यात मुहूर्त आहे नाहीतर वर्षभर चांगला मुहूर्त नाही. असे म्हणणार असतील.
अरु ला मंगळ आहे/ आशूला बुध
अरु ला मंगळ आहे/ आशूला बुध गुरू आहे./ लग्न झाले की लगे च सासू मरेल असा योग आहे असे काही असले तर मज्जा येइल. अरु किती मूर्ख कॅरेक्टर आहे. आधी त्या दुसृया बाईवर विजय मिळवून नवरा पटकावला. व पुढील लग्नाचे डिस्कशन तिच्याच बरोबर. अगदी जखमेवर मीठ चोळत आहे ते ही साळसूद चेहरा ठेवुन. हिला साधेच लग्न हवे आहे म्हणे. हो कारण इस्टेटीतील पैसे जायला नकोत वाया.
आज " कर हा कॅरी धॅरिला शुभांगी " झाले ते ही अनवधानाने. आशू ही काय पीडा आता हे ही करावे लागणार की गं बया असा चेहरा करुन होता. अनभिज्ञ बाळ.
<<<<अरु किती मूर्ख कॅरेक्टर
<<<<अरु किती मूर्ख कॅरेक्टर आहे>>>> कोई शक?
४७ वर्षे वय आणि २५ वर्षे लग्नाचा अनुभव असुन आशुतोष ला लग्नासाठी होकार दैउन झाल्यावर तिने अप्पांना, "लग्न साठी आपल्याशी १००% पटणारी व्यक्ती मिळुन शकत नाही का? लग्न म्हणजे कायम तडजोडच का?" असे प्रश्न विचारले.
चांगले लोक म्हणजे बिनडोक लोक असं ठरलंय नाहीका त्यांचं?
अरु ला मंगळ आहे/ आशूला बुध
अरु ला मंगळ आहे/ आशूला बुध गुरू आहे./ लग्न झाले की लगे च सासू मरेल असा योग आहे असे काही असले तर मज्जा येइल.
>>>Ex सासू ना ? हीहीही.
सध्या मालिका फिरून फिरून
सध्या मालिका फिरून फिरून भोपळे चौकात म्हणजे काय त्याचा डेमो दाखवते आहे. ईशा आईच्या लग्नाला तयार झाली होती. आता पुन्हा पक्षांतर.
आशुतोष आणि अरुंधती देशमुखांकडे भेटले त्यानंतर एकमेकांशी बोलल्याचं दाखवलं का? कारण तिने घर सोडल्याचं याला माहीत नव्हतं.
मग लग्न कशा पद्धतीने व्हावं याबद्दलची एकमेकांची मतं त्यांना कशी कळली?
भरत, आशुरु ची केमिस्ट्री अशी
भरत, आशुरु ची केमिस्ट्री अशी आहे की न बोलता एकमेकांच्या मनातलं कळतं.
ईशा पण विसरली की तिने एकदा समजूतदारपणा दाखवला होता.
किती बारीक ऑब्झर्व्हेशन!
किती बारीक ऑब्झर्व्हेशन!
खरेच...ते जर एकमेकांशी लग्न या विषयावर बोललेलेच नाहीयेत.... ( त्यामागे अंगभूत संकोच, अपराधी पणा, तेलकट पणा, लॅक ऑफ कम्युनिकेशन स्किल्स, स्वतः समोरासमोर विचारण्यापेक्षा इकडून तिकडून फिरवून विचारण्यावर असलेला विश्वास... कारणं काहीही असोत !! )... तर त्यांना कसे कळले की दुसर्याला कसे लग्न हवे आहे !!!
मुळात लग्न म्हणजे काय हेच
मुळात लग्न म्हणजे काय हेच आशुतोषला माहीत नाही.
अरुंधतीला माहीत आहे. पण ती सगळ्यांच्या आग्रहामुळे तयार झाली आहे.
(No subject)
लाज म्हणजे अजूनही सगळे कांची
लाज म्हणजे अजूनही सगळे कांची समजून घेईल ह्या मोडमधे आहेत. आपल्या बहिणीला इतका त्रास दिलेला हे माहीत असूनही आजच्या भागात सुधीरही त्याच मताचा आहे की कांची मोठं मन वगैरे दाखवेल.
आता अरुची पाठवणी समृद्धी मधून म्हणजे अन्या- अभि- कांची त्रिकुटाला ऊत येणार.
हो ना ती कांचन बिचारी सांगुन
हो ना ती कांचन बिचारी सांगुन थकली कि मी ह्या लग्नाला विरोधच करणार कारण मला ते मुळातच पटत नाही तरीही अप्पां ते छकुली सगळे अरु टीम मधले लोक आपला हेका सोडायला तयारच नाहीत.
तिकडे अनिरुद्ध संजना च्या लग्नाच्या वेळी देखील तिचा विरोध होताच तेव्हा अरु ने तिच्या कडे अजीबात लक्ष न देता अनिरुद्ध ला दमदाटी करून संजनाशी लग्न करायला भाग पाडले त्याची स्वतःची देखील इच्छा नसताना.
आता तिच्या मागे लागलेत परवानगी साठी. धन्य गॅंग आहे ही प्रो अरु पब्लिक.
प्रो अरु पब्लिक!!
छकुली ते अप्पा...
आता तिच्या मागे लागलेत परवानगी साठी. धन्य गॅंग आहे ही प्रो अरु पब्लिक..
ह्या वाक्यावर अजूनही हसतेय मी...
एपिसोड वेगवेगळे लेख लिहित
एपिसोड वेगवेगळे लेखक लिहित असावेत त्यामुळे काही भागांपुर्वी काय दाखविले ते विसरत असतील. आणि पात्रं काय दिली वाक्ये बोलायची असे काम करतात! मालिकेचे शेपूट लांबविताना बिच्चार्यांना कुठे ठावूक असते त्यांची सगळी बखर ह्याठिकाणी माबो लिहली जाते आहे!
ह्या मालिकांच्या संबधीत कुणी माबो उघडत नसेल का? मला पडलेला एक प्रश्न!
आंबटगोड .
आंबटगोड
.
@ कृष्णा, आतापर्यंत मायबोली वाचली नसेल तर आता वाचायला सुरुवात करावी त्यांनी. निदान ही पात्रे स्मृतीभ्रंश झाल्यासारखी तरी वागणार नाहीत.
< अप्पां ते छकुली सगळे अरु
< अप्पां ते छकुली सगळे अरु टीम मधले लोक > हे सॉलिड होतं.
बहुतेक , लग्नात छकुली करवली
बहुतेक , लग्नात छकुली करवली असेल.
आता साग्रसंगीत लग्न
आता साग्रसंगीत लग्न लावल्याशिवाय हे गप्प बसणार नाहीत. त्याशिवाय त्यात सतराशे विघ्न कशी येतील ना. कोर्ट मॅरेज वगैरे प्रकार कधी ऐकला पण नसेल. त्यात तमाशाला स्कोप कमी असतो ना. महिनाभराची सोय झालेय. काही कथानक-बिथानक नको.
आजचा भाग विनोदी , एडिटिंग
आजचा भाग विनोदी , एडिटिंग गंडलेलं असा होता.
अरु तयार आहे लवकर लग्नाला हे अरु कबुल करायच्या आधीच आशुला सांगण्याचा सीन झाला.
अन्या पत्रकारांना बेसलेस उचकवतो - आशुरु लग्न करत आहेत म्हणून आशु अनुष्काला फसवतो आहे हे कुठलं लॉजिक ? आणि समाजाला का कळायला हवं ?
अरुंधतीने भावाला कधी आणि कसं
अरुंधतीने भावाला कधी आणि कसं सपोर्ट केलं? कॉलेज अर्धवट सोडून तिचं लग्न झालं म्हणजे तेव्हा काही नोकरी करणं पैसे कमवणं केलं नसेल.
घटस्फोट होईतो ती काही पैसे कमवत नव्हती. सासरचे पैसे उचलून भावाला देणं शक्य नाही. म्हणजे गेल्या दोन वर्षात जे काही दिलं असेल त्याच्या ओझ्याने दबला का तो?
तिकडे अरुंधती सासूने तिची बाळंतपणं केली, नाजूक तब्येत सांभाळली म्हणून दबली. सासूने एवढं सगळं केलं हे पटायला जरा कठीण आहे. अरुंधतीही तिच्या सणावारच्या कामाच्या उरकाचं आणि हौशीचं कौतुक करत असते. ज्याला कामाची सवय असते तो शक्य असेपर्यंत कामं करत राहतो. ऑर्डरी सोडत बसून राहत नाही.
आणि हिला नातवंडं नको होती का?
भरत ..तुमच्या रॅशनल थिंकींग
पण असा आणि एव्हढा विचार कुणी करत नाही. ही तर काल्पनिक सिरीयलच आहे... पण प्रत्यक्षात ही बायका असेच बोलताना पाहील्या आहेत.
त्याचा अर्थ, तिच्या आईने नाही केलीत बाळंतपणं... आम्हीच केले सारे!
तिचा भाऊ अगदीच निमित्ताने येतो आणि ही सुद्धा कधीच त्याची आठवण देखिल काढत नाही!
कशाचा सपोर्ट आणि कशाचे काय!
अरु कबुल >>>>>मी हे अरु कुबल
अरु कबुल >>>>>मी हे अरु कुबल (अलका कुबल) सारखे वाचले
अरु तयार आहे लवकर लग्नाला हे
अरु तयार आहे लवकर लग्नाला हे अरु कबुल करायच्या आधीच आशुला सांगण्याचा सीन झाला.>>हो
घटस्फोट होईतो ती काही पैसे कमवत नव्हती. सासरचे पैसे उचलून भावाला देणं शक्य नाही. म्हणजे गेल्या दोन वर्षात जे काही दिलं असेल त्याच्या ओझ्याने दबला का तो?>> अगदी.
तो ठोंब्या आता अरूला काहीतरी सांगणार आहे म्हणे आणि त्याला आशा आहे कि ते ऐकून अरू तिचा निर्णय बदलणार नाही. काय असेल बरे ते?
तो ठोंब्या आता अरूला काहीतरी
तो ठोंब्या आता अरूला काहीतरी सांगणार आहे म्हणे आणि त्याला आशा आहे कि ते ऐकून अरू तिचा निर्णय बदलणार नाही. काय असेल बरे ते? >>>>> काहीतरी पाचकळ , घोरतो वगैरे
प्राजक्ता..असेच असेल.
काही...!!!!!
यांच्या प्रतिभेची आणि तेलकटाच्या सो कॉल्ड भिती- चिंता यांच्या सुमार लेव्हल्सची आपल्याला आता पूर्ण कल्पना आली आहे!
ह्याची सुद्दा दत्तक मुलगी
ह्याची सुद्दा दत्तक मुलगी असेल हिन्दीसारखी.
पण अनुपमा मध्ये दत्तक मुलगी
पण अनुपमा मध्ये दत्तक मुलगी ही लग्न झाल्यावर घेतली त्यांनी.
इथे ती कुणी वीणा आहे ना..सस थिंग ...
तिचे काही असेल!!!
लग्नाची करणार हे अनाउन्स
लग्न करणार हे अनाउन्स करून झालं, त्यावरून राडे झाले, मुहूर्त झाले . त्यानंतर आशुतोष अरु धतीला असं काहीतरी सांगणार आहे ज्यामुळे ती लग्नाला नकार देऊ शकते.
आणि हे सगळं कुठे तर चालत्या कार मध्ये. ड्रायव्हरसमोर (मागे) असल्या गोष्टी बोलतात ?
लग्नाच्या घोषणेवर झालेले राडे पुरेसे नव्हते म्हणून अप्पांना अरुंधतीची पाठवणी आपल्या घरातूनच करायची आहे. तिलाही त्यानिमित्ताने आणखी अपमान करून घ्यायला समृद्धीवर राहता येईल.
कालच्या भागात फ्लॅशबॅकमधून अरुंधती स्टॉकहोम सिंड्रोमची बरी होऊ न शकणारी केस आहे हे दाखवलं.
साधारण मे महीना उजाडेल आशुरु
साधारण मे महीना उजाडेल आशुरु संसाराला लागायला.
आशुतोष सुलेखाबाईंचा मुलगा
आशुतोष सुलेखाबाईंचा मुलगा नसावा. दत्तक वगैरे प्रकार असेल. आश्रम आहेच की त्यांचा. तिकडे अनूजचं तसंच आहे ना.
Pages