ऑफिसच्या ऑनलाईन मिटिंग मधली बोलली जाणारी वाक्ये व तेव्हाचे मनातले प्रत्यक्ष विचार

Submitted by अतुल. on 22 February, 2022 - 08:57

अग/वाग मध्ये हे छोटा प्रतिसाद लिहायला म्हणून घेतले होते. लिहिता लिहिता अजून बरेच सुचत गेले. म्हणून पाडला वेगळा लेख. अर्थातच केवळ विरंगुळा म्हणून केलेले लिखाण आहे हे Happy त्यामुळे Light 1 घ्या
---

• I think there is background noise from your end.
(मागं इतका गाड्यांचा आवाज कसा रे? कुठं रस्त्याकडेला उभारून काम करतोयस का?)

• So what is the update on that please?
(अजून तेच करायला लागलायस होय रे? अरे तीन दिवस झाले कि राव)

• Yes I am on it.
(काय इंग्लिश भाषा राव. कोंबडी अंडी उबवते तसं काम उबवयत बसलोय असं वाटतंय)

• I am doing it. It is in progress.
(सगळा वेळ तुमच्या मिटिंगमध्येच जातोय. आताची मिटिंग नसती तर काम पूर्ण झालं असतं)

• There is blocker, I am badly stuck. I dont know how to do that.
(त्या फेसबुक आणि गुगलची मारामारी. ते एक टेक्नोलॉजी काढतंय तोवर हे वेगळीच टेक्नोलॉजी घेऊन येतंय. मधल्यामध्ये डेवलपरचं मरण)

• That's older technology, it has upgraded now.
(सकाळीच अपग्रेड केलंय. आता संध्याकाळपर्यत राहील कि आउटडेटेड होणार माहित नाही)

• But you said it was working yesterday?
(म्हणजे कालसुद्धा तयार नव्हतं हे. पण तू मला झालंय म्हणून थाप मारलास काल)

• I think there is advance technology now.
(च्यायला आता कुठे सगळे माहित झाले असे वाटले तोवर ह्यांनी नवीन टेक्नोलॉजी आणली)

• They have release new version of it and we need to upgrade.
(कंटाळा आला राव. मला वाटतंय आता दहाएक वर्षे तरी अपग्रेड करण्यावर कायद्याने बंदी आणा. आम्ही काम करावं का तुमचं सोफ्टवेअर अपग्रेड करण्यातच आयुष्य घालवावं?)

• We already had discussed this yesterday's. But it's ok I will explain it again now.
(कालच सांगितलं होतं कि रे. झोपला होतास काय?)

• Is my voice breaking? Ok wait a moment please...... how is it now?
(काहीही न करता थोड्या वेळानी फक्त "हाऊ इज इट नाऊ?" विचारायचं)

• Your voice is breaking. I can not hear anything.
(स्वस्तातला प्लान आहे का? चांगलं शंभर एमबीपीएस घे कि राव)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बराच वेळ चर्चा झाल्यानंतर कोणतरी एकजण (शक्यतो मिटिंग होस्ट) म्हणतो:
"ओके ठीक आहे. उद्या आपल्याला क्लाएंटला काय दाखवायचे त्यासाठी हि मिटिंग आहे. तर आपण फक्त त्यावरच चर्चा करू"

(एव्हाना चर्चा भरकटलेली असते आणि पुढच्या सहा महीन्यात काय काय करायचे यावर अर्धा तास गेलेला असतो Biggrin )

Pages