ऑफिसच्या ऑनलाईन मिटिंग मधली बोलली जाणारी वाक्ये व तेव्हाचे मनातले प्रत्यक्ष विचार

Submitted by अतुल. on 22 February, 2022 - 08:57

अग/वाग मध्ये हे छोटा प्रतिसाद लिहायला म्हणून घेतले होते. लिहिता लिहिता अजून बरेच सुचत गेले. म्हणून पाडला वेगळा लेख. अर्थातच केवळ विरंगुळा म्हणून केलेले लिखाण आहे हे Happy त्यामुळे Light 1 घ्या
---

• I think there is background noise from your end.
(मागं इतका गाड्यांचा आवाज कसा रे? कुठं रस्त्याकडेला उभारून काम करतोयस का?)

• So what is the update on that please?
(अजून तेच करायला लागलायस होय रे? अरे तीन दिवस झाले कि राव)

• Yes I am on it.
(काय इंग्लिश भाषा राव. कोंबडी अंडी उबवते तसं काम उबवयत बसलोय असं वाटतंय)

• I am doing it. It is in progress.
(सगळा वेळ तुमच्या मिटिंगमध्येच जातोय. आताची मिटिंग नसती तर काम पूर्ण झालं असतं)

• There is blocker, I am badly stuck. I dont know how to do that.
(त्या फेसबुक आणि गुगलची मारामारी. ते एक टेक्नोलॉजी काढतंय तोवर हे वेगळीच टेक्नोलॉजी घेऊन येतंय. मधल्यामध्ये डेवलपरचं मरण)

• That's older technology, it has upgraded now.
(सकाळीच अपग्रेड केलंय. आता संध्याकाळपर्यत राहील कि आउटडेटेड होणार माहित नाही)

• But you said it was working yesterday?
(म्हणजे कालसुद्धा तयार नव्हतं हे. पण तू मला झालंय म्हणून थाप मारलास काल)

• I think there is advance technology now.
(च्यायला आता कुठे सगळे माहित झाले असे वाटले तोवर ह्यांनी नवीन टेक्नोलॉजी आणली)

• They have release new version of it and we need to upgrade.
(कंटाळा आला राव. मला वाटतंय आता दहाएक वर्षे तरी अपग्रेड करण्यावर कायद्याने बंदी आणा. आम्ही काम करावं का तुमचं सोफ्टवेअर अपग्रेड करण्यातच आयुष्य घालवावं?)

• We already had discussed this yesterday's. But it's ok I will explain it again now.
(कालच सांगितलं होतं कि रे. झोपला होतास काय?)

• Is my voice breaking? Ok wait a moment please...... how is it now?
(काहीही न करता थोड्या वेळानी फक्त "हाऊ इज इट नाऊ?" विचारायचं)

• Your voice is breaking. I can not hear anything.
(स्वस्तातला प्लान आहे का? चांगलं शंभर एमबीपीएस घे कि राव)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Are you able to see my scree?
I have a power cut (डुलकी नाय नाय मराठीत पॉवर नॅप! घ्यायला बेस्ट)

हे राह्यंलं

केटी (Knowledge Transfer) देताना -
Let me bring you up to the speed on this project
(केटी घेणारा पेन, नोटबूक, नोटपॅड घेऊन सरसावून पुढे होतो)

केटी देणारा- I know nothing about this project. Now you are up to the speed
#तुझंतुलाचशिकायचंयरे

Biggrin

Sorry, I was talking on mute
(एक घास सुखानं खाऊ देतील तर शपथ)

>> ऑन इट वाला पंच
पहिल्यांदा हा डायलॉग ऐकला होता तो बिचारा मोठ्या स्टाईलमध्ये बोलला होता. पण माझ्या डोळ्यासमोर मात्र बिल्डींगवर उभारून काम करणारा कामगार आला होता Biggrin

>> Are you able to see my scree?
हो हे एक कॉमन असते Lol is my screen visible. (सगळ्यांना दिसत असतो पण कोणतरी एक असतोच ज्याला दिसत नसतो. त्यात एक पाच दहा मिनटे अशीच जातात)

>> up to speed
हे "Bring him upto speed" आणि "Walk him though code" प्रचंड चीड आणणारी वाक्ये असायची. कामगार असल्याची जाणीव करून दिल्यासारखे वाटते Lol

>> Sorry, I was talking on mute
कोणी असे म्हटले कि मी मनात म्हणतो "Much better than you were not on mute" Lol

त्या दिवशी २ mighty & senior डेव्हज मध्ये वाद चाललेला. आमच्याकडची नुकतीच लागलेली पण स्वतःला शहाणी समजणारी प्रॉड मॅन्जर समजूत घालायला लागली. आम्ही एन्जॉय करतोय आणि हीला मधे पडायची गरजच काय होती Sad

माझ्या डोक्यात - अरे $#@ भांडु दे ना त्यांना, तुला शांतादुर्गा होण्याची काय गरजे मधे मधे. गप बस की तू पण नाही लाईमलाईटची हौस Wink

बरं, गेल्या आठवड्यात सतत कॅालिक झालेल्या बाळासारखं किरकिर करणाऱ्या मॅनेजरला आपण “we will talk more in detail on Monday” चे ग्राईप वॅाटर पाजून झोपवलेलं असतं.. तेच कॅालिक पुन्हा Mondayला सकाळी सकाळी पहिली कळ काढतं म्हणतं “where are we on this? “ Proud

हाहा.
Let's drop a pin on this and and take this offline >> आता बास.
This is impossible and complex >> मला काहीही येत नाही या मधलं. ( Reality : Hey, i just came here to take credit . Team worked on this and I have no idea what they did. )
This idea won't scale >> फालतु/भंकस आयडिया आहे ही.
Let's circle back on this >> आता यावर विचार करायचा कंटाळा आलाय. नंतर बघु म्हणे आग लागली कि.
After careful consideration I think we need to change direction : चुक झाली आहे. आणि आता सुधरायची आहे.

' Think outside the box' जर कुणी लीडर अजुनही वापरत असेल तर त्यांनी लीडर/मेंटर बदलावा अस सुचवेन. Sad
wheelhouse, low hanging fruit, leverage पण बास केलेले बरे.

"Let's take this offline" म्हणजे "एवढं साधं कळत नाही लेका तुला! आता काहीतरी वाकडे तिकडे प्रश्न विचारुन भर मीटींग मधे लाज नको आणू.
नंतर भेट जरा एकटा, तेव्हा तुझी अक्कल काढतो!".

"There were a few challenges" म्हणजे सगळा राडा झाला आहे, जसं कोड केलं तसं काहीही चालत नाहीये आणि ते फिक्स करायला इथे हातघाईची लढाई चालु आहे.

हे काही लॉ फर्म संदर्भातले:
Let's park this issue for the time being.. (वाद घालून कंटाळा आलाय , मी माझं झाड सोडणार नाय)
Let the parties decide on the commercials, we do not have any problem..(खूप वेळ झाला बस हा वाद, ते काय ते दोघे क्लायंट मिळवून ठरवतील, आजचा बिलिंग चा कोटा झाला..)
There is a recent supreme court, bombay high court, Madras high court or any high court authority/ judgement on this very topic (डोंबल, असलं काय बी नसतंय)
Please understand our point of view also / from where we are coming from..( हे आपलं उगाच , थोडं आता माझं बी एक की)
This is very common in such kind of transactions/ documents/ structure etc etc (छे छे.. हे असलं काहीतरी आम्ही पहिल्यांदा इथे वापरत आहे)
आणि इतर वेळ मोठमोठया आवाजात वादावादी , शेवटी
We will circulate the MoM and the revised draft with limited agreed points.. Please work only in track mode once you get our document.. Proud (हुश्श)

"येस आय गेट इट, इट इज नॉट पी१ इश्यु. बट डझ नॉट मीन वी स्विप इट अंडर कार्पेट. " (इथे टिम मध्ये पी२ काय, पी० आणि पी-१ पण 'फ्यु मायनर रिफाईनमेंटस' म्हणून गालिच्याखाली ढकलणारे महाभाग असतात)

[P1]: Hello P2, you there? ....

[P3, P4, P5..... P10]: | I think he got dropped | He dropped | He is not there | etc. etc. |
...
...
[P2] Hello hello, am i audible? Sorry I got dropped!

[P1] Yes, yes, you are audible now... on a lighter note, P2, coincidently even when I am not comfortable to answer a question in some tough meeting, even my connection drops!

Oh ... that's our cat/Buzzo/my second one/ (काहीही भरा) ...looks like... I'll be right back...

Guys, I have a different view.
( आता बघा हे मांजर आपल्या स्वतःच्याच आधी ठाम म्हणून सांगितलेल्या मतावर कसं १८०त गिरकी मारतंय ते.)

वरच्या different ला धरूनच ..Different view / different take / just a thought, not applied my mind completely to it ..टोण्या ह्यावर पूर्ण रात्र घालवून विचार केला आहेस आणि ब्राऊनी पॉइण्टस साठी आत्ता इथे ओकी ओकी केली आहे, पुढल्या वेळी बघून घेईन.

आणि ते एक...
Just thinking aloud..

(अरे गुमान कर की काय विचार करायचा तो.. आणि नंतर बोल. काय घाई आहे?)

लेट्स मुव्ह इट टू पी-२ (म्हणजे यावर काम करायला नको. कारण पीएमच्या बिल्ड क्रायटेरिआ पी-०/ पी-१ आहे. पी-२ ला कोण वाली नाही. अळीमिळीगुपचिळी)
लेट्स चेंज टार्गेट माईल स्टोन अ‍ॅज टेक्निकल डेट. (कोणत्या महाभागाने पी-२ सर्च लावला! $%$#$. आता टार्गेटच बदलतो. रेस्ट इन पीस! )

Tell me, what's actual situation on ground?
( एक तूच खरा दोस्त! )

ट्रेनिंग मध्ये
"गुड क्वेशचन. आय ऍम कमिंग टू डॅट इन माय नेक्स्ट टॉपिक सेशन."
(रताळ्या, उगी काहीतरी विचारू नकोस..तुला उत्तरात घंटा इंटरेस्ट नाही मला माहिती आहे.उगी भापिंग करायला प्रश्न टाकतंयस.पुढच्या सेशन पर्यंत विसर.)

प्रसंग- भर पिेझेंटेशनमधे कॅालवर असलेल्या अजून १२ लोकांना आपला पॅाईंट सिद्ध करण्यासाठी काही तरी दाखवायचंय, पण जे दाखवायचंय ते नेमकं त्याचवेळेस सापडत नसतं तेव्हा..

मॅनेजर (इथे मॅनेजर ऐवजी कोणीही असू शकतं) : “टूटूटूटूटू.टूटूटूटूटू..टूटूटूटूटूटूटू…टूटूटूटूटू “
(मी मूर्ख, मी मंद, मी माठ असं तुम्हाला मी नक्कीच वाटू देणार नाही)

इतर १२ जण: (आज काय ह्याला सापडत नाय बुआ)

Pages