ही अशक्य चोरी कुणी केली?

Submitted by सखा on 21 February, 2022 - 22:09

गुप्तहेर बबन बोंडे समोर कर्नाटक राज्याचे साक्षात वनमंत्री तोंड पाडून बसले होते पाहून अर्थातच मलाही आश्चर्य वाटले.
बबन माझ्याकडे वळून म्हणाला, "चोरीची केस आहे, माननिय मंत्र्यांचं चंदनाचे ५९९/- रुपयाचे key chain त्यांच्या डेस्कवरून चोरीला गेलेला आहे."
बबन पुढे म्हणाला की एक इसम यांच्याकडे नौकरी मागायला आला होता त्याचंच हे काम असावं.
"सर तुम्ही त्याचं वर्णन करू शकाल का?" बबन मुख्यमंत्र्यांना म्हणाला
"हो मला आठवतंय त्याप्रमाणे त्या माणसाचे अत्यंत दाट कुरळे केस होते जणूकाही टोपच, डोळ्यावर झिंग पांग गॉगल, कपडे अत्यंत कळकट आणि डाव्या हातात स्टीलचा पट्टा असलेले घड्याळ." मुख्यमंत्री म्हणाले.
"आणि कपडे?" मी विचारले
"चेक्सचा शर्ट होता" इती मंत्री
आम्हाला अजूनही काहीच लक्षात येईना त्यामुळे बबन म्हणाला
"सर या suspect बद्दल अजून काही सांगता येईल का?"
या वर मंत्री म्हणाले "गंमत म्हणजे तो इसम दरवाज्यातून आत येताना खांदे झुकते करून तेडा आत आला. एकदा तर त्याची चप्पल पण पायातून घसरली पण त्याने मागे जाऊन पुन्हा घातली आणि पुढच्या स्टेप्स पूर्ण केल्या."
स्टेप्स पूर्ण केल्या?आम्हाला या गंमतशीर वर्णनावरून अर्थातच पुन्हा एकदा काहीच काहीच बोध होईना. साक्षात मंत्र्यांचे चंदनाचं keychain चोरणारी हा नवीन भुरटा चोर कोण बरे असेल?
तेवढ्यात मुख्यमंत्रीच अचानक आठवून म्हणाले, "आणि हो अजून एक गोष्ट, तो माणूस सर्वसामान्यांप्रमाणे दाढी सरळ न खाजवता उलटा हात मारून खाजवत होता." आता तर आम्हालाच माननीय मंत्र्यांच्या मानसिक स्थिती बद्दल संशय येऊ लागला. कि-चेन चोरीला गेल्याचा त्यांना तीव्र मानसिक धक्का तर बसला नसेल ना? आम्हाला असं बुचकळ्यात पडलेले बघून मुख्यमंत्र्यांनाच आमची दया आली आणि ते म्हणाले चहा घेणार का? आम्ही होकारार्थी मान हलवल्यावर मुख्यमंत्र्यांनी इंटरकॉमवर पलीकडे बसलेल्या त्यांच्या सेक्रेटरीला ऑर्डर केली.
"पुष्पा तीन चहा पाठव बरे पटकन."
"सर मी सिरीवल्ली बोलते आहे. पुष्पा मॅडम मॅटर्निटी लिव्हवर गेल्या आहेत. मी पाठवते लगेच चहा सर."
#pushpa #mysterypushpa.jpg
#गुप्तहेर बबन बोंडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users