चित्रपट संकल्पनेचा ओव्हरडोस होत आहे का ?

Submitted by BLACKCAT on 15 February, 2022 - 07:59

नाटक , दशावतार , संगीत नाटक , तमाशा, कीर्तन इ करमणूक प्रकार अखेर चित्रपट प्रकारात विलीन झाले आणि बघता बघता त्याचे प्रस्थ वाढत जात आहे.

1. पूर्वी सिनेमा बघणे ही एक हौस होती , पडदे लावलेल्या टुरिंग टॉकीज मध्ये 5 रुपयात सिनेमे दिसायचे , मॉलमध्येही आधी 70 रु तिकीट होते.

2. पण साधारण पणे वर्षाला 3,4 चित्रपट एखादे कुटुंब बघायचे, त्यातले एखादे वार्षिक परीक्षेनंतर , एखादे दिवाळीत , मध्ये एखाद दुसरा.

3. पण आता चित्रपट इतके धो धो येतात की हे एक्स्पोजर फार वाढले आहे. सरासरी महिना एक तरी ?

4. याशिवाय युट्युबवर फुकट बघणे उपलब्ध आहे. रोज एक तरी , अर्धा तरी होतोच

5. ओटीटीमुळे तर घरीच थिएटर पोचले आहे. वेळात वेळ काढून ऑफिस , लोकल , बस इथेही मोबाईल खिडकीत लावून लोक सिनेमे बघतात

6. बरे , हे जरी पाहिले तरी हे फार सांस्कृतिक असतात असेही नाही, खून , अपराध , फसवणूक , विवाहबाह्य संबमध इ जॉनर लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.

7. पूर्वी सिनेमेवाले व जाहिरातवाले वेगळे होते, आता दोन्हीकडे तेच लोक काम करतात व प्रॉडक्ट्स महाग करून ठेवतात.

8. सिनेमेवाल्यावर मायापुरी वगैरे मासिके निघायची, तीही दर्जेदार असायची. आता गुगल , फेसबुक , युट्युब, वर्तमानपत्रे ह्यात ह्यांचाच बुजबुजाट भरलेला असतो.

एकंदर वैचारिक प्रदूषण , आर्थिक हानी, साधन संपत्तीची नासाडी यापलीकडे हे काहितरी चांगले करत आहेत का ? ? चित्रपट संकल्पनेचा ओव्हरडोस होत आहे का ?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोविड काळात नवेजुने चित्रपट पाहण्याचं प्रमाण आमचं तरी वाढलंय.
कॉलेजला असताना सेमिस्टर संपलं की एक आणि रिझल्टनंतर एक सिनेमा बघायचा अशी आमची पद्धत होती. Happy तेव्हा लागलेल्या सिनेमांपैकी जो त्यातल्या त्यात बरा असेल तो. कधीकधी दोनसुद्धा बघायचो. शिवाय सेमिस्टरच्या मधेही चांगला सिनेमा आला की बघायचोच. कॉलेजच्या लास्ट इयरला असताना एका रूममेटकडे कंप्यूटर होता. तेव्हा सीडी आणून कित्येक (वर्षभरात तीसचाळीस) सिनेमे बघितले!
आता चित्रपट बघणं सोपं झालं आहे. वैचारिक प्रदूषण वगैरेबद्दल माहिती नाही. पण हिंदी चित्रपटाचा दर्जा ९० च्या दशकापेक्षा २००० नंतर (इन जनरल) नक्कीच सुधारलेला आहे.

केले माफ, छान विषय घेतला.

माझा स्वानुभव मात्र उलट आहे. लहानपणी केबल टीव्हीची सुरुवात बहुधा आमच्याच भागापासूनच झाली. तेव्हा रोज रात्री पिक्चर बघायचो. पुढे हे प्रमाण दिवसाला एकापेक्षा जास्त झाले. मग चॅनेलही ईतके वाढले की हवा तो पिक्चर निवडायचे स्वातंत्र्य मिळू लागले. त्यानंतर तर एकाच वेळी ईतके चित्रपट लागायचे तरी ते सगळेच्या सगळे मी बघितलेलेच असायचे. आठ दहा वर्षात हजारो चित्रपट बघणे झाले....

आणि मग गेले आठ दहा वर्षांचा काळ आला ज्यात मोजून पंधरा वीस चित्रपट बघितले, ते देखील थिएटरला बघण्यासारखा असेल तरच.. अगदी शाहरूखचे पिक्चर बघणेही सोडले.

नुकतेच गेले वर्षभर पुन्हा ओटीटीमुळे पिक्चर बघणे सुरू झालेय. काही वेबसिरीजही कधी नव्हे ते बघितल्या.

पण आता पुन्हा बोअर होऊ लागलेय. यापेक्षा गड्या आपली मायबोलीच बरी जिथे छान व्यक्त होता येते...

पूर्वी मध्यमवर्गीय घरात केवळ मराठी कादंबऱ्या वाचनालयातून आणू वाचल्या जायच्या,
आजकाल ऑनलाइन पुस्तके मिळू लागली आहेत, विविध इ बुक्स, pdf फुकट उपलब्ध आहेत, आता तर पुस्तके , कथा ऐकता पण येतात,
विवध भाषातील पुस्तके मराठीत उपलब्ध होत आहेत
पूर्वी केवळ मासिक, वर्तमान पत्रे किंवा पुस्तके असायची, आता ब्लॉग्स, ऑनलाइन न्यूज येथेही वाचावे लागते
एकंदरीत वाचन संकल्पनेचा ओव्हरडोस झाला आहे का?

पूर्वी संगीत ऐकणे दुर्मिळ होते, निवडक लोकांकडे रेडिओ होता, मग ट्रांसिस्टर, रेडिओ, टेपरेकॉर्डर चे पेव फुटले,
आता तर यु ट्यूब, स्ट्रीमिंग ऍप मुळे वाट्टेल ती गाणी, hqwi तेव्हा ऐकता येतात,
आपली अभिरुची दाखवायला संगीत महोत्सवाला जायची वाट पहावी लागत नाही, मी बाबा फक्त किशोरीच ऐकतो, किंवा हरिप्रसाद ऐकल्याशिवाय झोप येत नाही अशी ऐट मारता येते.

इंस्टा च्या स्टोरीज पण म्युसिक शिवाय पुऱ्या होत नाहीत

पूर्वी केवळ भारतीय वाद्य संगीत होते, आता कोणत्याही देशातील वाद्य, पारंपरिक, लोक संगीत, समकालीन, रॉक, पॉप, काहीही ऐकता येते,

एकाच गाण्याची 8 10 वरजन्स ऐकता येतात,

कुणाच्या तरी छकुलीने मोठ्या गटात म्हंटलेले लहान माझी भावली ऐकता येते

एकंदरीत संगीत ऐकणे या संकल्पनेचा ओव्हरडोस होत आहे का?

Hoy.
एकंदरच मनोरंजनाचा अतिरेक झाला आहे असे वाटते.
Matrix मधल्या प्रमाणे आपण आपले मेंदू सोशल मीडिया आणि ott platform मध्ये गहाण टाकलेत असे वाटते

https://www.maayboli.com/node/50824

असे एक मागे लिहिले होते (आमच्याही धाग्याची जाहिरात)

आता तर तुम्ही म्हणता तसा फारच बट्ट्याबोळ झाला आहे

हा dopamine fasting या विषयावरचा व्हिडीओ जरुर बघा. माणसाच्या मेंदूला काहीच अति प्रमाणात सहन होत नाही. तेव्हा उपलब्धता आपल्या पुरती मर्यादित करावी आणि मनःस्वास्थ्य राखावे हे उत्तम.

Submitted by Filmy on 15 February, 2022 >>> गप्रे, भपकन वासमार्‍या !

पण हिंदी चित्रपटाचा दर्जा ९० च्या दशकापेक्षा २००० नंतर (इन जनरल) नक्कीच सुधारलेला आहे.
>>>

हा वादाचा विषय होईल.
म्हणजे ९० च्या दशकातले मिथुनचे बी ग्रेड मूव्ही आणि त्यातले संगीत म्हणाल तर येस, तो फार बंडल प्रकार होता. किंबहुना ऐंशीचे दशकात खूप रटाळ चित्रपट आणि संगीत आलेले.
पण नव्वदीच्या दशकात मेलोडीयस म्युजिक आणि तितकेच छान रोमॅंटींक चित्रपट आलेले. विनोदी हलकेफुलकेही छान आलेले. सिनेमेटीक लिबर्टी घेतलेले असावेत. उगाच लॉजिक शोधून चिरफाड करायची झाल्यास कितीही करता येईल. पण तो काळ फार मनोरंजक होता. तेव्हा चित्रपट बघायची जी मजा होती ती आता तितकी राहिली नाहीये. तेव्हाच्या हिरोंचे जे स्टारडम होते ते आता मिसिंग आहे. चित्रपटांचे मनोरंजनमूल्य कमी झालेय गेल्या दशकभरात. यात चित्रपटप्रेमी प्रेक्षकांचाही दोष म्हणू शकतो. चित्रपट बघून चार घटका मनोरंजन करायचे तर आशय वगैरे शोधू लागलेत. मुख्य म्हणजे सोशलमिडीया फोफावल्यामुळे तात्विक चर्चाही करू लागलेत. मनोरंजक चित्रपटाला डाऊन दाखवत आपली आवड आणि अभिरुची ऊच्च दर्जाची दाखवायचा आटापीटा एकूणच वाढू लागलाय. हे मलाही लागू असेल. मी ईनजनरल लिहितोय. मी सुद्धा असलाच आव आणत बाहुबली चित्रपटावर टिका करून झालीय. आणि नंतर त्याचे दोन्ही भाग पोरांसोबत चार चार वेळा बघून झालेत Happy

असो, नव्वदीच्या दशकातले सिनेमे हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. कोणीतरी काढा रे..

सिम्बा +१
राजीखुषीने मी आवडतात म्हणून चित्रपट बघतो. वेब सिरीज बघतो. काही आवडलं नाही तर बघत नाही. मला सध्याच्या काळात जिवंत असल्याबद्द्ल भाग्यवान वाटतं, लवकर जन्मलो असतो तर हे बघताच आलं नसतं!
पुस्तंक वाचत नाही वाटलं की पुस्तकं वाचतो .. कागदी वाचतो, इ बुक वाचतो, ऑडिओ बुक ऐकतो. हे करतो आणि दुसरं पूर्वी सारखं करत नाही म्हणून रडत मात्र नाही. पूर्वी सारखं करावसं वाटलं तर ते करतोच.

कशाचाही (आपल्यासाठी) अतिरेक होऊ न देणं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. भरपूर उपलब्धता आणि निवडपर्याय असले तरी काय आणि किती घ्यावं हे आपण ठरवू शकतो. अर्थात भरपूर आणि मारा करणाऱ्या उपलब्धतेमुळे आपली उपभोगेच्छा चाळवली जाऊन आपण त्या छंदाचा अतिरेक करून घेण्याचा धोका असतोच.

जितकी स्पर्धा अधिक तितका वेगळा कंटेंट जन्मण्याची शक्यता अधिक.मला ओटीटी च्या काळात जिवंत असल्याबद्दल बरं वाटतं.कधी एके काळी फ्रेंड्स च्या 10 डीव्हीडी चा सेट आम्ही चिनी मार्केट मधून पायरेटेड घेतला होता.मूळ कंपनी डीव्हीडी ची किंमत 200 रुपयाला 2 एपिसोड अशी काहीतरी होती.आता हे सर्व भूतकाळात केल्याचं आवडत नाही.पण कायदेशीर रित्या पैसे भरून हाऊस, बिग बँग, फ्रेंड्स आणि अनेक चांगल्या मालिका बघता येतात याचा आनंद होतो.

असो, नव्वदीच्या दशकातले सिनेमे हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. कोणीतरी काढा रे.. >> ऋ सर, तुमच्या पेक्षा या विषयातले जास्त कळत नाही. तरी पण तुमचा शब्द खाली पडू द्यायचा नाही म्हणून प्रयत्न करीन. तुम्ही फ्री व्हाल तेव्हां काढेन.

मी दोन्ही बाजूंशी सहमत
म्हणजे खूप पर्याय उपलब्ध झालेत ही चांगली गोष्ट आहे पण त्याच बरोबर एक धड बघितला जात नाही
म्हणजे माझ्यासारखे असतील काही जण
ते थाळी सिस्टीम मध्ये अक्षरशः निरनिराळ्या पदार्थांचे ढीग येऊन पडतात, ते असं गच्च ओसंडून वाहणारे ताट पाहिले की माझी भूक च मरते
त्या पेक्षा एखादं दुसराच आयटम ताटात आहे तर त्याकडे नीट लक्ष देऊन आनंदाने खायला जायचा

सर्व क टकट बंद करून गेम खेळते मी तर
>>>>>
अमा, विडिओ गेम की प्रत्यक्षातील बैठे वा मैदानी खेळ?

हल्लीच्या काळात विडिओगेम्सचाही ओवर डोस होत आहे..
यावरही एक स्वतंत्र धागा येईल.. प्लीज काढा रे कोणीतरी

जो जो रॅबिट पूर्ण पाहिला. बर्‍याच दिवसांनी. त्याबद्दल नवीन धागा काढला पण. त्याची रिक्षा !
https://www.maayboli.com/node/81100
(आकडा चांगला आहे. ८११००. नक्की लावा).

अमा, विडिओ गेम की प्रत्यक्षातील बैठे वा मैदानी खेळ?>> मर्ज ड्रॅगन. माझा धागा पण आहे. function at() { [native code] आज पण एक इवेंट चालू आहे पण काम क्रावे लागते आहे मध्ये मध्ये. बैठे खेळ पूर्वी खेळत असू कार्ड्स कॅरम चोर पोलीस आंधळी कोशिंबीर

परवा राफा ची फाय्नल बघि तल्या पासून टेनिस शिकयला घ्यावे असे फार मनात आहे. इथे एडीएम म्हणून आहेत त्याम्नी छान सल्ला पण दिलेला.

प्लीज काढा रे कोणीतरी >>> काय वेळ आली ! अप्पासाहेब बेलवलकर घर देता का घर म्हणत फिरताहेत.
तू बी अन मी बी
भजी खायची का पकौडे तळायचे
हा एकच सवाल आहे
अशी स्वगतं म्हणत असहाय्यतेने टाहो फोडताहेत..

असेच चित्र डोळ्यासमोर आले.

परवा राफा ची फाय्नल बघि तल्या पासून टेनिस शिकयला घ्यावे असे फार मनात आहे.
>>>>
कॉलेजला असताना टेनिस कोर्टवर हात साफ करायला जायचो. पण स्वतःहून शिकायला लय बेक्कार खेळ आहे. त्यामुळे मौजमजाच चालायची. पण एक आहे, त्यानंतर कधी पुन्हा टेबल टेनिस खेळावेसे वाटले नाही. म्हणजे आधीही मी जिममध्ये कॅरमवरच पडीक असायचो, टेबल टेनिस अध्येमध्येच खेळायचो. पण मैदानी टेनिस खेळल्यावर त्या टेबलावर छोटासा बॉल मारायची मजाच संपली.

Pages