चित्रपट संकल्पनेचा ओव्हरडोस होत आहे का ?

Submitted by BLACKCAT on 15 February, 2022 - 07:59

नाटक , दशावतार , संगीत नाटक , तमाशा, कीर्तन इ करमणूक प्रकार अखेर चित्रपट प्रकारात विलीन झाले आणि बघता बघता त्याचे प्रस्थ वाढत जात आहे.

1. पूर्वी सिनेमा बघणे ही एक हौस होती , पडदे लावलेल्या टुरिंग टॉकीज मध्ये 5 रुपयात सिनेमे दिसायचे , मॉलमध्येही आधी 70 रु तिकीट होते.

2. पण साधारण पणे वर्षाला 3,4 चित्रपट एखादे कुटुंब बघायचे, त्यातले एखादे वार्षिक परीक्षेनंतर , एखादे दिवाळीत , मध्ये एखाद दुसरा.

3. पण आता चित्रपट इतके धो धो येतात की हे एक्स्पोजर फार वाढले आहे. सरासरी महिना एक तरी ?

4. याशिवाय युट्युबवर फुकट बघणे उपलब्ध आहे. रोज एक तरी , अर्धा तरी होतोच

5. ओटीटीमुळे तर घरीच थिएटर पोचले आहे. वेळात वेळ काढून ऑफिस , लोकल , बस इथेही मोबाईल खिडकीत लावून लोक सिनेमे बघतात

6. बरे , हे जरी पाहिले तरी हे फार सांस्कृतिक असतात असेही नाही, खून , अपराध , फसवणूक , विवाहबाह्य संबमध इ जॉनर लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.

7. पूर्वी सिनेमेवाले व जाहिरातवाले वेगळे होते, आता दोन्हीकडे तेच लोक काम करतात व प्रॉडक्ट्स महाग करून ठेवतात.

8. सिनेमेवाल्यावर मायापुरी वगैरे मासिके निघायची, तीही दर्जेदार असायची. आता गुगल , फेसबुक , युट्युब, वर्तमानपत्रे ह्यात ह्यांचाच बुजबुजाट भरलेला असतो.

एकंदर वैचारिक प्रदूषण , आर्थिक हानी, साधन संपत्तीची नासाडी यापलीकडे हे काहितरी चांगले करत आहेत का ? ? चित्रपट संकल्पनेचा ओव्हरडोस होत आहे का ?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कॅरम आवडतो, बिलियर्ड्स अजिबात नाही. एक तर त्यासाठी थ्रीडीत विचार करावा लागतो आणि परवडतही नाही.

मला बुक क्रिकेट आवडते,
कमीत कमी साधनात, कमीतकमी जागेत आणि कमीतकमी खेळाडूंमध्ये खेळता येतो.
लोकांच्या झोपा, चालू वर्ग डिस्टरब न करता स्वतःचा जीव रमावता येतो

योगासन करायलाही आवडेल. फक्त शवासन>>>

अडमीन आपल्या पोस्ट उडवणार याची खात्री आहे
तरीही लिहितो

शवासन हा अतिशय सुंदर आणि प्रभावी आसन आहे
दिवसभर काम केल्यावर, मानसिक आणि शारीरिक थकवा दूर करायला सुद्धा, शरीराचे सगळे स्नायू शिथिल करून त्याना एकेक करत रिलॅक्स करणे फार भारी आहे
शास्त्रशुद्ध पद्धतीने रोज किंवा आठवड्यातून काही दिवस शवासन केल्याचा फायदा दिसून येईल

भयंकर आणि गोंधळजन्य ओवरडोस. सग्ळ्या सिनेम्यांचं इन्सेप्शन कॉकटेल झालंय डोक्यात. काल एक सिनेमा बघायला घेतलेला, तर काही मिनिटांनी लक्षात आलं- हा आपण बघितलेला आधीच.

असंच मागे अर्धा राहिलेला सिनेमा बघायला घेतला, तर द एंड नंतरची क्रेडिट्स चालू झाली. मी चक्रावून सिनेमा आठवायचा प्रयत्न केला, तर कायच आठवेना. नंतर जाऊदेमरूदे आपलं लक्ष दुसर्‍या विचारात असताना संपला असेल बापडा म्हटलं.

नंतर लक्षात आलं- घरातच एकाने चुकून माझ्या अकौंटवरनं बघितलेला सिनेमा. Uhoh मग आता नक्की कुठून बघावा, म्हणून नादच सोडला झालं..

सिंबा, अमितव प्रतिसाद आवडले.

वाचन, संगीता प्रमाणे "अन्नाचा ओव्हरडोस होतोय का?", "शिक्षणाचा ओव्हरडोस होतोय का?", "कपड्यांचा ओव्हरडोस होतोय का?", "पर्यटनाचा ओव्हरडोस होतोय का?", "माहितीचा ओव्हरडोस होतोय का?" इत्यादि मुद्दे काढता येतील. अशा प्रत्येक मुद्द्यावर स्वतंत्र धागा काढुन "धाग्यांचा ओव्हरडोस होतोय का?" असा धागा काढता येईल.

मानव, हे बरोबर आहे. पर्यटनाचा ओवरडोस झाला म्हणून कोविड आलेला. तर लोकांनी दरवेळी पुढच्या लाटेची जय्यत तयारी म्हणून पुन्हा ओवरडोस सुरू केले.

कपड्यांच्या आणि शिक्षणाच्या ओवरडोसमुळे सध्या कुठेकुठे शाळाकॉलेजात शांततापूर्ण आणि सामंजस्याने आंदोलने चालू आहेत असं ऐकलं. (जास्त कपड्यांवरून आंदोलन म्हणजे भलतंच. खरंतर दिपिकाने कमी कपडे घातले म्हणून आंदोलन व्हायला हवं)

धाग्यांचा ओवरडोस झाला तर बरंच की. कोणत्या धग्यावर काय लिहिले होते आणि लिहावे, आणि कुणाशी कोणत्या धाग्यावर काय बोललो भांडलो होतो- यात जाम गोंधळ व्हायला हवा. गोंधळाचा ओवरडोस झाला की आपोआप शांतता प्रस्थापित होईल. Proud

कुठलीही गोष्ट प्रमाणात असावी: ओव्हरडोस हा प्रमाणात असावा, ओव्हरडोसचा ओव्हरडोस होऊ देऊ नये.
ओव्हरडोसचा ओव्हरडोस प्रमाणात असावा, ओव्हरडोसच्या ओव्हरडोसचा ओव्हरडोस होऊ देऊ नये.... अँड सो ऑन.

ड्युस

चला विषयावर येऊया

चित्रपट संकल्पनेचा ओव्हरडोस होतोय यापेक्षा चिंतेची बाब ही की लोकांना चित्रपटाकडे चित्रपट म्हणून बघता येत नाहीये.
लोकांना चित्रपटात जे घडतेय ते वास्तवात घडणारे हवेय. ते देखील चारचौघांशी घडणारे हवेय. लार्जर दॅन लाईफ बिलकुल चालत नाही. गुडीगुडी पण मनोरंजक चित्रपटांवर बाळबोध चित्रपटांचा ठपका मारला जातोय. हे असले पिक्चर गेल्या दशकात वा गेल्या शतकात यायचे म्हणून त्यांना कमी लेखले जातेय. त्यामुळे असे चित्रपट आवडणारेही ..... थांबा कॉल आला ऑफिसचा ...... ओके आई अ‍ॅम बॅक..... त्यामुळे असे चित्रपट आवडणारेही चारचौघात आपली आवड व्यक्त करायला संकोचतात.

सर तुम्ही इतक्या कामातही मायबोलीवर येऊन पोस्ट टाकता
वेगवेगळे धागे, वेगळ्या आयडी, प्रत्येकाचा स्वभाव, भाषा, अविर्भाव वेगळा
कसं काय जमतं?
दिवसेंदिवस आदर वाढतच चालला आहे तुमच्या बद्दल

>>काल एक सिनेमा बघायला घेतलेला, तर काही मिनिटांनी लक्षात आलं- हा आपण बघितलेला आधीच. >> होतं असं! एकदा केसातून हात फिरवा, आरशात बघा की तर कारण समजेल आपोआप. Proud

गुडीगुडी पण मनोरंजक चित्रपटांवर बाळबोध चित्रपटांचा ठपका मारला जातोय. हे असले पिक्चर गेल्या दशकात वा गेल्या शतकात यायचे म्हणून त्यांना कमी लेखले जातेय. त्यामुळे असे चित्रपट आवडणारेही ..... थांबा कॉल आला ऑफिसचा ...... ओके आई अ‍ॅम बॅक..... त्यामुळे असे चित्रपट आवडणारेही चारचौघात आपली आवड व्यक्त करायला संकोचतात.>>> सर मला आवडतात असे चित्रपट आणि टीव्ही प्रोग्रॅम्स. एक धागा येऊदे अशा चित्रपटांवर.
सिरीयसली. भडक प्लॉट, शिव्या, न्युडिटी यालाच मनोरंजन समजण्याचा ट्रेण्ड आहे सध्या.

..... थांबा कॉल आला ऑफिसचा ...... ओके आई अ‍ॅम बॅक..... >> मागे एक कवीराज होते माबोवर. ते सांगायचे मधुनमधुन 'थांबा जेवण करुन आलो." त्यांची आठवण आली.

लोकहो तुम्हीपण ना... नेचर लिहिलेलं बरं दिसत नाही म्हणून सरांनी ऑफिस लिहिलं. तर इतके खोदून खोदून काय विचारताय?

अहो पण लिहायलाच पाहिजे अशी काही सक्ती आहे का? Happy
पोस्ट लिहून ठेवली आणि आल्यावर पोस्ट केली तरी चालते
थोड्या वेळात आपोआपच पोस्ट होत नाही ती Happy

जाऊ दे अजून काही बोललो तर सरांचे भक्त येतील ओरडत आणि अडमीन पोस्ट उडवतील माझ्या

कधी कधी माझाच एन्काऊंटर होईल असे वाटतं

एक दोन आयडी चित्रपटात लॉजिक शोधण्यावर टीका करतात. त्यांच्या या चळवळीला आता वाढता पाठिंबा आहे. आजही अमर अकबर अँथनी सारखेच सिनेमे बनावेत आणि लोकांची आवड सेमच रहावी ही सुद्धा आवड असू शकते. काळाप्रमाणे आवड समृद्ध होण्याला विरोध असू शकतो. हे समजण्यासारखे आहे.

आपल्याला कलात्मक चित्रे समजत नाहीत म्हणून ती हास्यास्पद असे समजणारा वर्ग आहे. प्रतिकांच्या कविता समजत नाहीत तर त्या हास्यास्पद आणि त्यावरच्या चर्चाही हास्यास्पद वाटणारे लोक आहेत. शास्त्रीय संगीत वेळेचा अपव्यय वाटतो काहींना. शास्त्रीय नृत्याएक्षा बॉलीवूडचे नृत्य चांगले वाटते.

पण कधीतरी आपण त्याच त्या विश्वात राहण्यापेक्षा इतरांचे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकले तर हरकत काय आहे ? एखादा सिनेमा चांगला बनवायला काय लागते ? आपल्याला सवयी लागल्यात सिनेमा आवडून घेण्याच्या. ती सहीष्णुता आपल्यात आहे कारण आपण उत्तम पाहिलेले नाही. आपणच आपले नुकसान करून घेतो. चांगली समज येण्यासाठी चांगले सिनेमे पाहिले पाहीजेत. त्यासाठी चांगली परीक्षणं वाचली पाहीजेत. त्यातून आपले शिक्षण होत नाही असे कुणाला वाटत असेल तर पुन्हा अशांना कुणी सांगायला जाणार नाही. त्यावाचून कुणाचेच अडत नाही. त्यामुळे ज्याचा त्याचा निर्णय !

Pages