गहराइयां: चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 14 February, 2022 - 20:36

गहराइयां चित्रपट बघितल्यावर जुन्या पहिल्या जॉज चित्रपटातील एक सीन आठवतो. डबडया बोटीतून शार्क ची शिकार करायला टीम निघाली आहे. सागरात कुठेतरी एका पाठला गानंतर टीम सुस्तावली आहे. शेरीफ मागील बाजूस बसून अ‍ॅबसेंट ली एक एक मांसाचा तुकडा आमी ष म्हणून शार्क ला टाकत आहे. एक प्रकारचा साचले पणा येतो आपणही शांततेत गुंगत जातो व अचानक ज्या शार्कची शिकार करायची आहे तो अगदी अगदी जवळ येउन मांसखंड गट्टम करतो व पाण्यात गायब होतो. शेरिफ व आपणही दचकून मागे होतो. हे जीवघेणं संकट जवळच फिरत होतं आणि आपण किती निवां त होतो.

ह्या समुद्रात कोण जाणे काय दडले आहे? किती खोल खोल आहे हे सगळे आणि आपण वर वर चार हात मारून स्वतःला सुरक्षित समजतो.
गहराइयां ( शकुन बत्रा दिग्दर्शित) ह्या चित्रपटाची ही मेन थीम आहे. चित्रपटातील तरूण पात्रे वर वर एक सुखद जीवन जगत आहेत. पण आत काय काय घडा मोडी होत आहेत ते जशी कथा उलगडते तसे दिसत जाते.

दीपिकाची व्यक्तिरेखा : गोंधळलेली व सर्व सावरुन घेण्याचा प्रयत्न करणारी , लहान पणी आई बाबां च्यातला बेबनाव बघितला त्यातून आईने केलेली आत्म हत्या स्वतः बघितल्याने त्याचा दृश्य व खोल मानसिक परिणाम झालेला आहे. त्या अजाण वयात ह्या सा ठी ती वडिलांना जबाबदार ठरवते व त्या द्वेषावर बिल्ड अप करत मोठी होते व आता जगत आहे. फॅमिलि बिझनेस मधून बाहेर पडल्याने घरी तुलनेने गरीबी आली व तिला तिचे क शिक्षण मनासारखे घेता आले नाही. लवकर पैसे कमवायला लागले वडी लांनी असे केल्याने आपले जन्माचे नुकसान झालेआहे अशीच तिची धारणा आहे. ह्याचा उलगडा शेवटास होतो व तिला भावनिक क्लोजर मिळते. हा शेवटचा दीपिका व नासि रुद्दीन शहा ह्यांच्यातील सीन जरूर बघा. उत्तम लेखन व अ‍ॅक्टिन्ग. पूर्ण चित्रपट च दीपिकाने तोलुन धरला आहे.

ती आई सारखे बनायचे नाही म्हणता म्हणता हळू हळू तशीच बनत जाते व ट्रॅप होते. त्यातून बाहेर पडायला काही एक काँप्रमाइज करते. व त्या
गिल्ट बरोबर पुढील जीवन जगायला सुरू करते. योग शिक्षिका असल्याने लवचीक शरीर व अगदी फिट दिसते. स सिनेमाची थीम समुद्र असल्याने तिचा पूर्ण कपडे पट त्याला शोभेसाच आहे. एक दोन दाच तिने फॉर्मल किंवा घरगुती कपडे घातले आहेत अगदी बाबांकडे आल्याव्र टीशर्ट पायजमा. घरी घरातले कपडे. अनाइ दा श्रॉफ अद जानिया ने कपडे पट केला आहे. उत्तम काम. मला तरी ते स्पोर्ट ब्रा लेनिन्ग्ज लुक आवडले ती कोणत्याही फ्रेम मध्ये व अँगलने मस्त दिसते. व अशी बॉडी तयार करण्यात फार मेहनत आहे.

प्रेक्षकांना पिक्चर वेगळा वाटतो आहे कारण त्याची ट्रीट में ट वेगळी आहे. टिपिकल बॉलि वू ड मेक अप, ड्रेसिन्ग ओव्हर अ‍ॅक्टिन्ग असे नाही आहे. त्यामुळे काहींना पिक्चर उथ ळ वाटू शकतो. पण अगदी हळू उकळायला ठे वलेली परिस्थिती जेव्हा फायनल उकळी घेते तेव्हा एकदमच विस्फोट होतो. जीवने विदीर्ण होतात व ती सांधायचा प्रयत्न ह होतो. पुढे जायचे निस्चय होतात.

मिलेनियल म्हणजे आत्ता तिशीत असलेल्या पिढीचे प्रश्न मांडले आहेत त्यामुळे चाळीस व पुढील प्रेक्ष कांना तसेच ज्यांचे जीवन तुलनेने सुरळीत विना त्रास गेले आहे. फारसे धक्के बसलेले नाहीत. त्यांना चित्रपट समजायला अवघड जाईल व हे काय असे कधी होते का असा तु क टाकला जाईल. त्यात आजकाल तर इ तरांचे प्रश्न प्रश्नच नसतात अशीच धारणा आहे.

अनन्याची व्यक्तिरेखा: हिने धाकट्या बहिणीचा रोल चां गला केला आहे. हिला स्वतः चे गिल्ट आहे पण वयामुळे अजून भाबडी आहे व चटकन
विश्वास ठेवते. सर्व ओके असावं असं हिला मनात्नं वाटत असतं पण कुठेतरी पाणी मुरते आहे हा व्हेग संशय येत जातो तिला व शेवटा कडे
दु:ख व फस वले गेल्याची भावना तिला जवळ जव्ळ नश्ट करते. क्रशड. ती झैन ला स्वतः केलेले पॉ टरीची वस्तु गिफ्ट म्हणून देते त्यातला गोडवा वायाच जातो. तो तिचा फायदा घेतो आहे. पण तिला उमजूनही ते समजून घ्यायचे नाही. त्या एका स्वप्नात शक्यतो जमेल तितके जगायचे आहे. झैन तिला गॅसलाइट करतो तो सीन उत्तम केला आहे. एखाद्याच्या विश्वासा चा स्वार्था साठी बिनदिक्कत फायदा घेणा रे लोक अस्तात त्यातला झैन आहे.

झैन : डार्क ग्रे कॅरेक्टर. फिझिकल केमिस्ट्री असलेला व ती वापरायला मागे पुढे न पा हणारा. समो रच्या व्यक्तीला रुचेल असे कथानक बनवून त्यावर विश्वास ठेवायला लावणा रे साय्को पाथिक नार्सिसिस्टिक कॅरेक्टर. हे लोक इतरांना वापरोन नामा निराळे होतात. पण ह्या कथेत त्याला त्याचे कर्म शेव्टी बुडवतेच. काही लोक कांद्या सारखे असतात. आत आत फक्त पापुद्रेच मिळत जातात. कोअर नाहीच एक साल काढले की खाली दुस रे. नवा मुखवटा. आणि सोलुन आतली खरी व्यक्ती शोधायचा प्रयत्न करणा र्‍याला रडव्णार् हे नक्की. गिव्हन.

करणः टिपिकल सेल्फ ऑबसेस्ड न्यु जनरेशन माणूस स्वतः चे लेखन करायला दीपिकाच्या जिवावर वेळ वाया घालवत असतो पण त्याच्या मनात तिच्या बद्दल रिस्पेक्ट आजिबात नाही. तिच्याशी ते लेखन शेअर करत नाही. तिने विचारून सुद्धा. रिलेशन शिप मध्ये त्याने तिलाही दूरच ठेवले आहे. जे का ही देणे आहे ते तिच्या साइडने. कोण तीच जबाबदारी घेत नाही. सर्व तिच्या वर ढकलून तिला गृहित धरून वर अपेक्षा वाढवतो. तिला अजूनच पकडून ठेवायला प्रपोज करतो.

नसिरुद्दीन शाह चीए व्यक्तिरेखा: ही जीवन सागरात वेळ व अनुभव घेउन परिपक्व झालेली आहे व त्यातून तरुन आता एक शांत समजुत दार
जीवन जगत आहे. मागील घटनांचे अर्थ समजून घेउन त्या पुढे कथि त करायच्या का गप्प बसून आपल्या बरोबरच ते कालबाह्य त्रास अ‍ॅगनी संपवाय्ची ह्यतला चॉइस त्याने केला आहे. तो ही जाणीव पूर्वक. ह्याचा व दीपिकाचा सीन ग्रेट आहे. अगदी पदर डोळ्याला टैप.

जिते शः रजत कपूरः टिपिकल रुथलेस मुंबईकर डील मेकर. ह्यांना बाहेरुन मुंबईत येउन स्वतः ची उन्नती करायचा प्रयत्न करणार्‍यांबद्दल काहीही सहानुभूति नसते. फक्त डील महत्वाचे प्रॉ फिट महत्वाचे. त्यासा ठी कोणाचाही बळी द्यायची तयारी. प्रचं ड स्वार्थी पण ़ क्विड प्रो
को ला तयार. कारण ते डील संपवून पुढे जायचे असते.

ह्या झाल्या व्यक्तिरेखा.
चित्रपटाचे टेकिन्ग नेत्रसुखद आहे. प्रत्येक ट्रांझिशन ला समुद्राचा लाटांचा यो ग्य वापर केला आहे व सूर्यास्त एकदम मनमोहक रीत्या घेतले आहेत. ती लक्षरी या ट / की बोट! मला फारच आवडली. ती व समुद्र हे पण एक प्रकारच्या व व्यक्तिरेखाच आहेत. व त्यांचा वापर कथानकात केलेला आहे.

इंटिमसी म्हणा ल तर ती मला तरी फार जाण वली नाही. इट वॉज ऑल अबाउट पॉवर. झैन आपल्या मोहात पाडा यच्या स्किल चा वापर करून
दीपिकाला पटवतो व कार्यभा ग साधला की तिला हटवून टाकायला रे डी आहे. त्यांच्यातील शरीर संबंध सोललेस वाटतात. मानसिक गुंतवणू क दोन्ही बाजूनी नाही. तुलनेने मर्डर सिनेमातील इमरान हशमी व मल्लीकाची केमिस्ट्री बघा. हे जुने प्रेमी आहेत व त्यांना खरंच परत जवळीक
साधायची आहे.

प्रत्येक पात्र अगदी कडेलोटा पाशी येउन अलगद निसटते. व एक आपल्या कर्माने अडकून जातो. कोणाच्या जीवना त काय व कसली सिक्रेट अस्तील ते काय ओव्हरकम करायचा प्रयत्न करत असतील आपल्याला वरून कळत नाही. त्यासाठी त्या माणसात सखोल डुबकी मारायची त्ळा परेन्त जायची आपली दरवेळी तयारी असते का? काय सापडेल ह्याची शाश्वती नाही अश्या वेळी पुढे जायला लाइफ जॅकेत असते का? चित्रपट हा विचार करायला लावतो.

वुडी अ‍ॅलन च्या चित्रपटाची डिरेक्ट कॉपी आता तरी कोणी मारणार नाही. कथानकात साम्य आहे इतके च पण असे म्हणतात जगात केवल सात
कथा आहेत ज्या परत परत वेगळ्या रुपात समोर येतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जी आधुनिक मुलगी सक्षमपणे निर्णय घेते.  कोणासोबत, कधी आणि का शारीरिक संबंध ठेवायचा ते तिला समजतं. एका व्यक्ती सोबत ती गेले ६ वर्ष संबंध ठेवून आहे, तिला सेफ  सेक्स संकल्पना माहित नसावी? मॉर्निंग आफ्टर पिल्स किंवा असिसिडेंटल प्रेग्नंन्सी मॅनॅजमेन्ट हे संकल्पना नसावी हे मुळीच पचत नाही. केवळ मेलोड्रामा ह्या शिवाय ती प्रेग्नन्ट होते ह्याला काहीच अर्थ नाहीये. 
कदाचित तिने मुद्दाम हे होऊ दिला म्हणजे तिला झैन ला बांधून घालता येईल, असे असेल का?

..येईल, असे असेल का?>>>असू शकते. पण कोणताच गर्भधारणा प्रतिबंधक उपाय १००% प्रभावी नाही. असे समजून प्रेक्षक तिला कमी कपटी मानू शकतो.

पण आता वय जाणवते तिचे.. especially अनन्याच्या पुढे>>>>

अनन्यापेक्षा ती मोठीच दाखवलीय ना? मग तशी दिसायलाही नको का? अनन्यापेक्षा लहान दाखवली असती तर कठीण होते. मग तिच्या जागी कुणी दुसरी घ्यायला हवी होती.

वय दिसणे म्हणजे नक्की काय ? ३०+ वयाच्या स्त्रिया चित्रपटात शाळकरी मुली न करता ३०+ वयाच्या व्यक्तिरेखा करत असतील तर ठिक आहे ना..

दृश्य माध्यमातील लोकान्नी कायम तरुणच दिसावे याचे त्यान्च्यावर मोठे दड्पण आहे. त्यामुळेच त्याना चेहर्यावर काय काय करुन घ्यावे लागते, ते केले की मुळ चेहरा वेगळा दिसायला लागतो आणि त्यावरही टिका होते. खुप तणावपुर्ण आयुष्य जगतात हे लोक.

फोन बूथचा हिंदी रिमेक झाला आहे, संजय दत्त , इरफान खान

नॉकआउट

https://youtu.be/8a4WkdnlLmI

ह्याचा एक साऊथ रिमेक होऊन तोही हिंदी डब झाला होता यु ट्यूबवर

Totally. This is a story of a woman over 30 . Who has desires. And emotional conflicts . A will to improve her lot in life. Not of privilege. They struggle and stumble.

35 च्या हीरो ना नाही म्हणणार कोणी आता वय दिसतंय... आमिर खान student म्हणून खपवला ३ idiots मध्ये... Heroines ना कधी accept करणारेत लोक काय माहित.. तरी बरं हल्ली रोल तरी मिळत आहेत.. झैन च्या आईचा रोल नाही करावा लागते केस पांढरे करून हेही नसे थोडके...

हो ना.
अर्थात हिरोज वरपण तरुण दिसायचं बरंच प्रेशर असतं.
पण नायिका तर जवळजवळ मार्केट बाहेरच होतात, 35-40 नंतर.
मला वाटतं पिक्चर च्या कथेत जे वय दाखवलं आहे त्या वयाचं दिसावं इतकंच.त्यातही वयापेक्षा लहान किंवा वयापेक्षा मोठे दिसणारी अशी सर्वच उदाहरणे प्रत्यक्ष आयुष्यात असतात.
थ्री इडियट्स मध्ये पण आमिर आणि माधवन कॉलेज स्टुडंट म्हणून अजिबात बघवले नव्हते.

छान लिहिलंय चित्रपट परिक्षण.
Bad words सोडले तर बाकी काही खटकलं नाही..आज बघितला..कंटाळवाणा नाही वाटला..शेवटी ट्वीस्ट मस्तच.

मला शेवट नीट कळला नाही. त्या anxiety च्या गोळया कोण घेत असतं, अलिशा की झेन. बोटीवर झेन त्याच गोळया तिच्या ड्रिंक मध्ये टाकतो का आणि हे तिला कळतं का. जर तिने ते ड्रिंक घेतलं असतं तर काय झालं असतं. झेन तिच्या अनुपस्थितीत तिच्या घरात काय करत असतो आणि तिचे वडील तिला हे सांगतात तेव्हा तिला नक्की काय वाटतं. धक्का बसतो की तिला हे माहिती असतं. टिया तिच्या वडिलांना मृत्यूपत्र बदलायला लावते का. झेन दोघीनाही फसवत असतो का.

त्या anxiety च्या गोळया कोण घेत असतं, अलिशा की झेन.
>>> आलिशा. झेनने गडबडीत तिच्या गोळया स्वत: च्या खिशात टाकल्या असतात.

बोटीवर झेन त्याच गोळया तिच्या ड्रिंक मध्ये टाकतो का
>>> त्याच गोळया का माहीत नाही पण तिला मारण्याच्या हेतून गोळया टाकतो

आणि हे तिला कळतं का. >>> हो. लैपटॉप मोबाईल शी linked असतो त्यामुळं तिला chat दिसत

जर तिने ते ड्रिंक घेतलं असतं तर काय झालं असतं.
>>>मेली असती बहुतेक

झेन तिच्या अनुपस्थितीत तिच्या घरात काय करत असतो
>>> तो तिथेच राहत असतो

तिच्या वडिलांना मृत्यूपत्र बदलायला लावते का. >>हो. आईला त्रास होईल असे वाटत असल्यामुले

झेन दोघीनाही फसवत असतो का >> टिया ला नक्कीच

त्या गोळ्या वेगळ्या असतात, त्या दिल चाहता है मधल्या महेश अंकल ने त्याच्याकडे दीपिका ला मारण्यासाठीच दिलेल्या असतात ना

Pages