गहराइयां: चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 14 February, 2022 - 20:36

गहराइयां चित्रपट बघितल्यावर जुन्या पहिल्या जॉज चित्रपटातील एक सीन आठवतो. डबडया बोटीतून शार्क ची शिकार करायला टीम निघाली आहे. सागरात कुठेतरी एका पाठला गानंतर टीम सुस्तावली आहे. शेरीफ मागील बाजूस बसून अ‍ॅबसेंट ली एक एक मांसाचा तुकडा आमी ष म्हणून शार्क ला टाकत आहे. एक प्रकारचा साचले पणा येतो आपणही शांततेत गुंगत जातो व अचानक ज्या शार्कची शिकार करायची आहे तो अगदी अगदी जवळ येउन मांसखंड गट्टम करतो व पाण्यात गायब होतो. शेरिफ व आपणही दचकून मागे होतो. हे जीवघेणं संकट जवळच फिरत होतं आणि आपण किती निवां त होतो.

ह्या समुद्रात कोण जाणे काय दडले आहे? किती खोल खोल आहे हे सगळे आणि आपण वर वर चार हात मारून स्वतःला सुरक्षित समजतो.
गहराइयां ( शकुन बत्रा दिग्दर्शित) ह्या चित्रपटाची ही मेन थीम आहे. चित्रपटातील तरूण पात्रे वर वर एक सुखद जीवन जगत आहेत. पण आत काय काय घडा मोडी होत आहेत ते जशी कथा उलगडते तसे दिसत जाते.

दीपिकाची व्यक्तिरेखा : गोंधळलेली व सर्व सावरुन घेण्याचा प्रयत्न करणारी , लहान पणी आई बाबां च्यातला बेबनाव बघितला त्यातून आईने केलेली आत्म हत्या स्वतः बघितल्याने त्याचा दृश्य व खोल मानसिक परिणाम झालेला आहे. त्या अजाण वयात ह्या सा ठी ती वडिलांना जबाबदार ठरवते व त्या द्वेषावर बिल्ड अप करत मोठी होते व आता जगत आहे. फॅमिलि बिझनेस मधून बाहेर पडल्याने घरी तुलनेने गरीबी आली व तिला तिचे क शिक्षण मनासारखे घेता आले नाही. लवकर पैसे कमवायला लागले वडी लांनी असे केल्याने आपले जन्माचे नुकसान झालेआहे अशीच तिची धारणा आहे. ह्याचा उलगडा शेवटास होतो व तिला भावनिक क्लोजर मिळते. हा शेवटचा दीपिका व नासि रुद्दीन शहा ह्यांच्यातील सीन जरूर बघा. उत्तम लेखन व अ‍ॅक्टिन्ग. पूर्ण चित्रपट च दीपिकाने तोलुन धरला आहे.

ती आई सारखे बनायचे नाही म्हणता म्हणता हळू हळू तशीच बनत जाते व ट्रॅप होते. त्यातून बाहेर पडायला काही एक काँप्रमाइज करते. व त्या
गिल्ट बरोबर पुढील जीवन जगायला सुरू करते. योग शिक्षिका असल्याने लवचीक शरीर व अगदी फिट दिसते. स सिनेमाची थीम समुद्र असल्याने तिचा पूर्ण कपडे पट त्याला शोभेसाच आहे. एक दोन दाच तिने फॉर्मल किंवा घरगुती कपडे घातले आहेत अगदी बाबांकडे आल्याव्र टीशर्ट पायजमा. घरी घरातले कपडे. अनाइ दा श्रॉफ अद जानिया ने कपडे पट केला आहे. उत्तम काम. मला तरी ते स्पोर्ट ब्रा लेनिन्ग्ज लुक आवडले ती कोणत्याही फ्रेम मध्ये व अँगलने मस्त दिसते. व अशी बॉडी तयार करण्यात फार मेहनत आहे.

प्रेक्षकांना पिक्चर वेगळा वाटतो आहे कारण त्याची ट्रीट में ट वेगळी आहे. टिपिकल बॉलि वू ड मेक अप, ड्रेसिन्ग ओव्हर अ‍ॅक्टिन्ग असे नाही आहे. त्यामुळे काहींना पिक्चर उथ ळ वाटू शकतो. पण अगदी हळू उकळायला ठे वलेली परिस्थिती जेव्हा फायनल उकळी घेते तेव्हा एकदमच विस्फोट होतो. जीवने विदीर्ण होतात व ती सांधायचा प्रयत्न ह होतो. पुढे जायचे निस्चय होतात.

मिलेनियल म्हणजे आत्ता तिशीत असलेल्या पिढीचे प्रश्न मांडले आहेत त्यामुळे चाळीस व पुढील प्रेक्ष कांना तसेच ज्यांचे जीवन तुलनेने सुरळीत विना त्रास गेले आहे. फारसे धक्के बसलेले नाहीत. त्यांना चित्रपट समजायला अवघड जाईल व हे काय असे कधी होते का असा तु क टाकला जाईल. त्यात आजकाल तर इ तरांचे प्रश्न प्रश्नच नसतात अशीच धारणा आहे.

अनन्याची व्यक्तिरेखा: हिने धाकट्या बहिणीचा रोल चां गला केला आहे. हिला स्वतः चे गिल्ट आहे पण वयामुळे अजून भाबडी आहे व चटकन
विश्वास ठेवते. सर्व ओके असावं असं हिला मनात्नं वाटत असतं पण कुठेतरी पाणी मुरते आहे हा व्हेग संशय येत जातो तिला व शेवटा कडे
दु:ख व फस वले गेल्याची भावना तिला जवळ जव्ळ नश्ट करते. क्रशड. ती झैन ला स्वतः केलेले पॉ टरीची वस्तु गिफ्ट म्हणून देते त्यातला गोडवा वायाच जातो. तो तिचा फायदा घेतो आहे. पण तिला उमजूनही ते समजून घ्यायचे नाही. त्या एका स्वप्नात शक्यतो जमेल तितके जगायचे आहे. झैन तिला गॅसलाइट करतो तो सीन उत्तम केला आहे. एखाद्याच्या विश्वासा चा स्वार्था साठी बिनदिक्कत फायदा घेणा रे लोक अस्तात त्यातला झैन आहे.

झैन : डार्क ग्रे कॅरेक्टर. फिझिकल केमिस्ट्री असलेला व ती वापरायला मागे पुढे न पा हणारा. समो रच्या व्यक्तीला रुचेल असे कथानक बनवून त्यावर विश्वास ठेवायला लावणा रे साय्को पाथिक नार्सिसिस्टिक कॅरेक्टर. हे लोक इतरांना वापरोन नामा निराळे होतात. पण ह्या कथेत त्याला त्याचे कर्म शेव्टी बुडवतेच. काही लोक कांद्या सारखे असतात. आत आत फक्त पापुद्रेच मिळत जातात. कोअर नाहीच एक साल काढले की खाली दुस रे. नवा मुखवटा. आणि सोलुन आतली खरी व्यक्ती शोधायचा प्रयत्न करणा र्‍याला रडव्णार् हे नक्की. गिव्हन.

करणः टिपिकल सेल्फ ऑबसेस्ड न्यु जनरेशन माणूस स्वतः चे लेखन करायला दीपिकाच्या जिवावर वेळ वाया घालवत असतो पण त्याच्या मनात तिच्या बद्दल रिस्पेक्ट आजिबात नाही. तिच्याशी ते लेखन शेअर करत नाही. तिने विचारून सुद्धा. रिलेशन शिप मध्ये त्याने तिलाही दूरच ठेवले आहे. जे का ही देणे आहे ते तिच्या साइडने. कोण तीच जबाबदारी घेत नाही. सर्व तिच्या वर ढकलून तिला गृहित धरून वर अपेक्षा वाढवतो. तिला अजूनच पकडून ठेवायला प्रपोज करतो.

नसिरुद्दीन शाह चीए व्यक्तिरेखा: ही जीवन सागरात वेळ व अनुभव घेउन परिपक्व झालेली आहे व त्यातून तरुन आता एक शांत समजुत दार
जीवन जगत आहे. मागील घटनांचे अर्थ समजून घेउन त्या पुढे कथि त करायच्या का गप्प बसून आपल्या बरोबरच ते कालबाह्य त्रास अ‍ॅगनी संपवाय्ची ह्यतला चॉइस त्याने केला आहे. तो ही जाणीव पूर्वक. ह्याचा व दीपिकाचा सीन ग्रेट आहे. अगदी पदर डोळ्याला टैप.

जिते शः रजत कपूरः टिपिकल रुथलेस मुंबईकर डील मेकर. ह्यांना बाहेरुन मुंबईत येउन स्वतः ची उन्नती करायचा प्रयत्न करणार्‍यांबद्दल काहीही सहानुभूति नसते. फक्त डील महत्वाचे प्रॉ फिट महत्वाचे. त्यासा ठी कोणाचाही बळी द्यायची तयारी. प्रचं ड स्वार्थी पण ़ क्विड प्रो
को ला तयार. कारण ते डील संपवून पुढे जायचे असते.

ह्या झाल्या व्यक्तिरेखा.
चित्रपटाचे टेकिन्ग नेत्रसुखद आहे. प्रत्येक ट्रांझिशन ला समुद्राचा लाटांचा यो ग्य वापर केला आहे व सूर्यास्त एकदम मनमोहक रीत्या घेतले आहेत. ती लक्षरी या ट / की बोट! मला फारच आवडली. ती व समुद्र हे पण एक प्रकारच्या व व्यक्तिरेखाच आहेत. व त्यांचा वापर कथानकात केलेला आहे.

इंटिमसी म्हणा ल तर ती मला तरी फार जाण वली नाही. इट वॉज ऑल अबाउट पॉवर. झैन आपल्या मोहात पाडा यच्या स्किल चा वापर करून
दीपिकाला पटवतो व कार्यभा ग साधला की तिला हटवून टाकायला रे डी आहे. त्यांच्यातील शरीर संबंध सोललेस वाटतात. मानसिक गुंतवणू क दोन्ही बाजूनी नाही. तुलनेने मर्डर सिनेमातील इमरान हशमी व मल्लीकाची केमिस्ट्री बघा. हे जुने प्रेमी आहेत व त्यांना खरंच परत जवळीक
साधायची आहे.

प्रत्येक पात्र अगदी कडेलोटा पाशी येउन अलगद निसटते. व एक आपल्या कर्माने अडकून जातो. कोणाच्या जीवना त काय व कसली सिक्रेट अस्तील ते काय ओव्हरकम करायचा प्रयत्न करत असतील आपल्याला वरून कळत नाही. त्यासाठी त्या माणसात सखोल डुबकी मारायची त्ळा परेन्त जायची आपली दरवेळी तयारी असते का? काय सापडेल ह्याची शाश्वती नाही अश्या वेळी पुढे जायला लाइफ जॅकेत असते का? चित्रपट हा विचार करायला लावतो.

वुडी अ‍ॅलन च्या चित्रपटाची डिरेक्ट कॉपी आता तरी कोणी मारणार नाही. कथानकात साम्य आहे इतके च पण असे म्हणतात जगात केवल सात
कथा आहेत ज्या परत परत वेगळ्या रुपात समोर येतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल पाहिला सिनेमा. अगदी पुन:पुन्हा बघितला जाईल इतका आवडला नाही तरी वन टाइम वॉच नक्की आहे.
मॅचपॉइंटवरून इन्स्पायर्ड आहे हे लक्षात येतं, पण थँकफुली नक्कल नाहीये.
सगळी कॅरेक्टर्स* ह्यूमन आहेत. आपापल्या व्हल्नरेबिलिटीज आणि आपापले सर्वायवल स्ट्रगल्स यात अडकलेली.

******स्पॉइलर वॉर्निंग******
दीपिका झैनचं फ्लर्टिंग आधी हातभर अंतरावरून हाताळते, पण करणकडून वारंवार झालेले अनेक लेव्हल्सवरचे अपेक्षाभंग शेवटी तिला पेलवेनासे होतात आणि ती टेम्प्टेशनच्या आधीन होते. फ्रस्ट्रेशनमध्ये एखादं व्यसन जवळ करावं आणि मग त्यच्या कह्यात जावं तशी पुढची वाटचाल होते.
तिला तिची बर्डन्स शेअर करू शकेल असं माणूस हवं आहे - अशा माणसाचा नुसता आभाससुद्धा पुरेल इतक्या ब्रेकिंग पॉइंटला येते, आणि त्यातून सगळे गोंधळ होतात.
झैनची त्याची त्याची कैफियत आहे. त्याला कोवळ्या वयात परिस्थितीने डबल क्रॉस केलं होतं. अब्यूसिव वडील, आईची बाजू घ्यावी तर ती वडिलांना सोडायला तयार नाही आणि बाहेर पडलं तर आईला वार्‍यावर सोडल्याचा ठपका! त्यातून तो स्वार्थी आणि रूथलेस झाला तर त्याला जज करणारे आपण कोण? त्याची गोष्ट बिरबलाच्या माकडिणीच्या गोष्टीसारखी वाटते.
त्याच्यात आणि दीपिकाच्या कॅरेक्टरमध्ये सलामीलाच आकर्षणाचे स्पार्क्स फुलतात - जे बहुधा खरे आहेत. पण त्यापलीकडची कमिटमेन्ट बहुधा दोघांच्याही रक्तात नाही. त्यानंतर एकमेकांचा उपयोग करून घेणं त्यांच्या व्हॅल्यू सिस्टिममध्ये बसतं.
त्याउलट करण आणि अनन्या वरकरणी ओल्ड फॅशन्ड लवर्स वाटले तरी तेही या 'यूज अ‍ॅन्ड थ्रो' खेळातलेच प्लेयर्स आहेत. अलीबागचं घर अनन्याच्या कॉन्शन्सवरचं बर्डन आहे. दीपिकालातर मिळू द्यायचं नाही, पण त्याचा गिल्टही त्रासदायक वाटतो. अनन्या दिसते तितकी भोळी नाही.

वरती स्टार दिला तो रजत कपूर आणि नसीरच्या कॅरेक्टर्ससाठी. ती काहीशी एकसुरी आहेत. ऑलमोस्ट एकमेकांचे अ‍ॅन्टीथीसिस आहेत.
नसीरने 'मला तुझ्या मनातली तुझ्या आईची प्रतिमा डागाळायची नव्हती' असं म्हणण्यापेक्षा 'मला माझी बाजू मांडायची तू संधीच दिली नाहीस' असं म्हटलं असतं तर त्याचं कॅरेक्टर माझ्यासाठी जिवंत झालं असतं. असो.

एकूण घटनाक्रमांपेक्षा व्यक्तिचित्रणांवर भर दिलेला मला आवडतो, यातही आवडला.

अमा, तुमच्या या धाग्यामुळे हा चित्रपट पाहिला, नाहीतर बहुधा आवर्जून बघितला नसता. धन्यवाद. Happy

नसीरने 'मला तुझ्या मनातली तुझ्या आईची प्रतिमा डागाळायची नव्हती' असं म्हणण्यापेक्षा 'मला माझी बाजू मांडायची तू संधीच दिली नाहीस' असं म्हटलं असतं तर त्याचं कॅरेक्टर माझ्यासाठी जिवंत झालं असतं.>>> त्याला ती संधी होती. त्यामुळेच दिपीका त्याला विचारते की 'आधी का नाही सांगितलं?'. न सांगणं हा त्याचा चॉईस होता. कदाचित त्याची बायको त्याला अव्हेरून त्याच्या भावाकडे आकर्षित झाली यात त्याला काहीतरी कमीपणा, अपमान, humiliation वगैरे वाटलं असू शकतं आणि दिपीकाला सांगताना स्वतः मधला तो कमीपणा अधोरेखित होऊ शकतो म्हणून बोलला नसेल असंही असू शकतं.
शेवटी मानवी मन त्या समुद्रासारखंच आहे - थांग न लागणारं.

एकूण घटनाक्रमांपेक्षा व्यक्तिचित्रणांवर भर दिलेला मला आवडतो, यातही आवडला.>>>> +१

>>> दाचित त्याची बायको त्याला अव्हेरून त्याच्या भावाकडे आकर्षित झाली यात त्याला काहीतरी कमीपणा, अपमान, humiliation वगैरे वाटलं असू शकतं आणि दिपीकाला सांगताना स्वतः मधला तो कमीपणा अधोरेखित होऊ शकतो म्हणून बोलला नसेल असंही असू शकतं.

हो, शक्य आहे. किंवा सांगितलं आणि तिला खरं वाटलं नाही तर? - ही भीतीही असू शकते.

नसिरूद्दिनचे ही तर आयुष्य उध्वस्त झालेले असते - समाजात चर्चा होईल अशा पद्धतीने बायको गेली, मुलगी स्वतःची नाही तरी वाढवतो आहे, व्यवसाय बदलावा लागला (जीवनशैली बदलली), व्यसन पत्करलं ... कालांतराने जेव्हा आफ्टरमॅथकडे डोळसपणे बघण्याची ताकद येते, उपरती होते तेव्हा हाताशी काय उरले आहे? मुलगी जी स्वतःची नाही तरी त्याला पिता मानते. तिला काय सांगायचं? मुली, तू माझी नाहीस. तिच्या लहान वयात फार क्रूर ठरेल ते. त्यापेक्षा वडिलकीच्या नात्याने तिला जेव्हा कळेल तेव्हा मी अजूनही तुझा पिताच आहे हा दिलासा देणे हे वडिलकीचे वागणे. अर्थात समाजात It's not about pacifying myself, its about her असे "पीर पराई जाने रे" प्रकारचे वैष्णव जन कमीच असतात त्यामुळे 'मला संधीच दिली नाही' असे म्हणणारा पिता असता तरी रिअलिस्टीकच वाटला असता. तसा नाही दाखवला म्हणून एक सीन तरी सिनेमात (माझ्यासाठी) प्रेक्षणीय झाला.

नसिरूद्दिनचे ही तर आयुष्य उध्वस्त झालेले असते - समाजात चर्चा होईल अशा पद्धतीने बायको गेली, मुलगी स्वतःची नाही तरी वाढवतो आहे, व्यवसाय बदलावा लागला (जीवनशैली बदलली), व्यसन पत्करलं ... कालांतराने जेव्हा आफ्टरमॅथकडे डोळसपणे बघण्याची ताकद येते, उपरती होते तेव्हा हाताशी काय उरले आहे? >>>> परत एकदा - आपण 'समाजाच्या' दृष्टीने लांबून किंवा वर्तुळाच्या बाहेरून नसीरच्या व्यक्तीरेखेकडे बघतो आहोत. त्या व्यक्तीरेखेच्या स्वतःच्या या घटनेबद्दल काय भावना असतील?

त्या व्यक्तीरेखेच्या स्वतःच्या या घटनेबद्दल काय भावना असतील? >> अगदी अगदी, पटला आहे तुझा मुद्दा आधीच अंजली Happy माझी पूर्ण पोस्ट बघ. नासिरच्या व्यक्तीरेखेच्या भावभावना आणि दाखवलेले सीन्स मला तर आवडले नि पटले ही.

अमा, तुमच्या या धाग्यामुळे हा चित्रपट पाहिला, नाहीतर बहुधा आवर्जून बघितला नसता. >> हम्म मी पण. बराय तसा, खुप काही वेगळेपण जाणवले नाही मला तरी. अशा प्रकारच्या व्यक्तीरेखा पाहील्यात आगोदर इतर सिरीज मधेपण थोड्याफार फरकाने.

अभिनय सगळ्यांचा छान झालाय. झैन आणि दीपिका बद्दलचे स्वाती यांच्याशी सहमत. ते कमिटमेंट कधी नव्हतेच त्यामुळे ते नातं तसंच वरवरचं वाटतं. अनन्या आवडली surprisingly. फार गोड दिसलीये आणि तिचा रोल चांगला केलाय.

दीपिका पण छान दिसते, सगळे outfits छान कॅरी केलेत, त्यामुळे ते स्पोर्ट्स ब्रा वगैरेचं काहीच जाणवलं नाही odd असं. तिने स्वतःसाठी पहिले ब्रेकप केले तिथपर्यंत ठिक वाटली, नंतर पुन्हा decisions चुकत गेले. झैन वाला actor ठिक ठाक, खुप काही charming वाटला नाही.

नसरुद्दीनचा शेवटचा सीन आवडला. शेवटी अनन्या जे काही म्हणते दीपिकाला, की नवीन सुरुवात करुया, टच मधे राहूया ते मला वाटलं की दीपिकाने म्हणायला हवे होते as a मोठी बहीण तिला. असो.

शेवटी तिला कळणार असतं का दीपिकाचं सिक्रेट? Through that म्हातारी??

स्वातीची पोस्ट पण आवडली, फक्तं झेनची लहानपणची स्टोरी खरी होती कि दीपिकाची सिंपथी घेण्यासाठी मेडअप होती समजलं नाही मला !

काल.पाहिला . One time watch वाटला. सगळे आपापल्या जागी ठीक वाटतात पण एकत्रित प्रभाव पडत नाही. झैन -टीया , करण-अलिशा, झैन-अलिशा , करण-टिया (childhood frnds ) कुठल्याच जोडीत spark किंवा chemistry दिसत नाही.
झैन young bznessman म्हणून ठिक वाटतो पण charming lover अजिबात नाही.
त्या call चा एवढा गाजावाजा करतात मला वाटल world bank कडे पैसे मागतायेत का , फुसका 5 min चा call .
सुरुवातीला पिचलेली अलिशा , झैनबरोबर affair चालू झाल्यावर visually pleasent , glowing दिसते .

charming lover अजिबात नाही.>> तो कि ळस वाणाच आहे. गॅस लाइ ट र नार्सिसिस्टिक व्यक्तिमत्व आहे. हिला ते दिसत नाही.

को ण ताही शब्द अनेक वेळा म्ह टला की त्यातला अर्थ निघून जातो तसे ते कॅरे क्टर आहे.

गहराइयां हा 90च्या दशकातला मराठी सिनेमा असता,

तर दीपिकाच्या जागी अश्विनी भावे
अनन्या पांडेच्या जागी वर्षा उसगावकर

दीपिकाचा बॉयफ्रेंड रमेश भाटकर अथवा दिलिप कुलकर्णी,
अनन्याचा बॉयफ्रेंड अजिंक्य देव.
दीपिकाचा योगा ऍप नसून गरीब मुलांची नृत्यशाळा असती. (टाका एक नाच!). तिचा बॉफ्रे कादंबरीकार असता.
अनन्याच्या नवऱ्याचा साखर कारखाना असता.
यॉटऐवजी कॉन्टेसा,
अलिबागच्या ऐवजी पन्हाळ्याचा बंगला.

अनन्या अमेरिकेऐवजी दिल्लीला गेली असती.

समुद्रात वाचवलेल्या म्हातारीऐवजी शेजारच्या बंगल्यात बिबट्या घुसलेला असतांना ललिता पवारना वाचवलं असतं.

दीपिका एका गाण्यात प्रेग्नंट होते,
90च्या दशकात दोघं खेबुडकरांचं,अनिलअरुणांचं, वाडकरांचं, पौडवालांचं ड्युएट गात प्रेग्नंट झाली असती.

कारखान्याचा काळापैसा नृत्यशाळेच्या हार्मोनियममध्ये सापडून ती सील झाली असती.

अनन्याला बॉयफ्रेंडच्या लफड्याची कुणकुण प्रिया बेर्डे नावाच्या घरकामगाराकडून लागली असती.

मग बॉयफ्रेन्ड कड्यावरून पडून मेला असता.
नसीरच्या जागी श्रीराम लागू असते.
रविन्द्र महाजनीने पन्हाळ्याचा बंगला हडपला असता.

पिक्चरचं नाव असतं, 'झालंगेलं कड्यावरून पडलं'.
---
ता.क.- हा 2010च्या दशकातला सिनेमा असता तर अलिबागेऐवजी बोर्डीतारापूरला मासेमारीच्या बोटीवर व वसईच्या बंगल्यावर सोनालीसईअंकुशसिद्धार्थ(चांदेकर)बरोबर झाला असता. शेजारचा बंगला नीना कुलकर्णींचा, एंड क्रेडिटला गाणं असतं, '"लाटांखाली गुपीत गेलं फक!'.

योगेश दामले यांची फेसबुक पोस्ट

आज पाहिला.
सुरुवातीला फटकन बंद करायचा मोह आवरायला प्रयत्न करावे लागले.पण पाऊण तासाने एकदम पकड घेतो पिक्चर.
दीपिका चांगली दिसते, पण जरा थकलेली वाटते(मुद्दाम तशी घेतलीय का, कुटुंबातल्या ट्रॅजेडीमुळे?सिद्धांत म्हणजे झेन आवडला.अजून 1 दीड वर्षात जन्मणाऱ्या बऱ्याच बाळांची नावं झेन असतील असं वाटतं.
झेन कितीही गडद व्यक्तिरेखा असला तरी दीपिका ने त्याला असं कठीण प्रसंगी सारखं धारेवर धरलेलं,कोंडीत पकडलेलं विशेष आवडलं नाही.थोडा पेशन्स दाखवून बरेच प्रश्न सुटत होते.
अनन्या पांडे गोड दिसते आणि अभिनय पण जितका वाव मिळाला तितका आवडला.तो मुलगा उगीच आहे कथेत असं वाटलं.रजत कपूर आणि नसिरुद्दीन यांची पात्रं टिपिकल ते रोल्स करतात तशीच आहेत.
या सगळ्यात पोलिसांना नक्की कसं दाबलं हे जरा गूढ आहे.किंवा कुटुंबाने पुढचा तपास न करायचा ठरवल्या वर फाईल आपोआप बंद झाली असेल.
दीपिकाचे कपडे एकसुरी वाटले पण विशेष खटकले वगैरे नाहीत.आमच्या इथे गोल्डस जिम ला,dancing curve ला असणाऱ्या शिक्षिका मुली अश्याच कपड्यात वावरताना पाहिल्या आहेत.महाग, एकदम ट्रेंडी फॅशन चे रंगीत किंवा काळे रिपड स्पोर्ट लेगिंग आणि वर चांगल्या ब्रँड ची स्पोर्ट्स ब्रा.त्यांच्यावर चांगल्या फिगरमुळे विशेष खटकत पण नाहीत ते कपडे.
एकंदर पिक्चर मध्ये सगळ्यांच्या आयुष्यात सगळं चुकीच्या वेळी घडलंय.,

या सगळ्यात पोलिसांना नक्की कसं दाबलं हे जरा गूढ आहे.>> आत्म हत्या म्हणून नोंद झाली असावी. झैन च्या बाजुने पाठ पुरावा करणार रे कोणीच नाही. जितेश च्या ओळखीचे पोलीस अधिकारी असतीलच. इथे सर्व पुरावे असुनही केस उभी राहिली नाही अजून मनसुख हिरेनची. हा तर कोन कुठुन आलेला. असे रोज बरे च बेवारशी मरतात इथे.

दीपिकाने बोट धक्क्याला लावून तडक पोलिसात जायला हवे होते. व जबानी द्यायची. स्व संरक्षणार्थ मारामारी झाली असे सांगता आले असते व चांग ला वकील घेता आला असता. मग अनन्याशी सरळ फ्रँक बोलायचे व माझी चुकी झाली म्हणून बहिणी बहिणीत मिळून प्रोपर्टी वाच वता आली असती. त्यातुनच वकिलाची फी नवा स्टुडिओ झाले अस्ते. हे मा वै म. पण आयत्यावेळी असे काही सुचत नाही.

मुंबई पोलिस फारच सह कार्य करतात खरे तर.

तर दीपिकाच्या जागी अश्विनी भावे
अनन्या पांडेच्या जागी वर्षा उसगावकर >>>>>> पण दिपिकाच्या रोलसाठी वर्षा उसगावकर फिट्ट वाटते. दोघीही बोल्ड आहेत. अश्विनी भावेची अनन्या पांडे रडूबाई झाली असती.

90च्या दशकात दोघं खेबुडकरांचं,अनिलअरुणांचं, वाडकरांचं, पौडवालांचं ड्युएट गात प्रेग्नंट झाली असती. >>>>>> ह्यावरुन अश्विनी भावे आणि अक्षय कुमारचा हिन्दी चित्रपट आठवला. त्यात अश्विनी अक्षयकुमार पासून प्रेग्नंट राहते. अक्षयकुमारच ऑलरेडी मुनमून सेनबरोबर लग्न झालेल असत. पुढे अक्षयची हिरोईह भलतीच दाखवलीये. अश्विनीच पुढे काय होत ते कळल नाही.

तो मुलगा म्हणजे कोण, अनु? दीपिका चा बॉय फ्रेंड का?

झेन कितीही गडद व्यक्तिरेखा असला तरी दीपिका ने त्याला असं कठीण प्रसंगी सारखं धारेवर धरलेलं,कोंडीत पकडलेलं विशेष आवडलं नाही... हे पटलं... त्याने काही हिच्यावर जबरदस्ती नव्हती केलेली!!

पण तो प्रोब्लेम clearly कम्युनिके ट करताना दाखवला नाहीये.
तो सगळं नीट आहे असच सांगत रहातो

हां . पैशाचा प्रॉब्लेम आहे तर तिला सांगायच ना . सारखं आपलं तू जा , मी बघतो वगैरे काय . पण कदाचित टिया चे परत देण्यात अडचणी येणार म्हणून तो टळतो . त्यात दोन्ही बातम्या अचनक कळल्यामुळे तो भांबावून जातो पार्टीच्या वेळी .
त्यामानाने टीया त्याची नीट चौकशी तरी करते , गोळ्या बघून काळजी करते . ही आणखी टेन्शन देते त्याच्या डोक्याला .

अमा, तुमच्या या धाग्यामुळे हा चित्रपट पाहिला. आवडला. वन टाइम वॉच आहे.
अभिनय सगळ्यांचा छान झालाय. दिपिका छान दिसते. outfits अजिबात खटकले नाहीत. छान कॅरी केले आहेत.
सिद्धार्थ चतुर्वेदी गलिबॉय मध्ये आवडलेला. यात ठीक वाटला .
एका सिन मध्ये झेन ला अनन्याला बोटीवरून ढाकलावेसे वाटते पण तो तसे करत नाही. पण नंतर तेच तो दीपिका सोबत करतो. तो कुणाशीच कमिटेड नाहीय .

टीयाला काहीतरी फिलिंग्स असतात, आलियाचं फक्त फिजिकल असतं almost. आंधळं का असेना, टीयाचं प्रेम असतं त्याच्यावर.

आमच्या क डे लेकीने प्रिव्यु मध्ये हा पिक्चर आधी बघितलेला दोन महिने त्यामुळे ते अनन्याला फेकायच्या सीनला ती माझी रिअ‍ॅक्षन बघ्त होती. मला जेनुइन धक्का बसलेला. ( बिचारं भाब डं कोकरु ते.) मुंबईत अश्या लोकांना कबुतर म्हणतात म्हणजे ज्याच्यावर तो फ्रॉड होतो ती व्यक्ती. विश्वास टाकणा री.

तो कुणाशीच कमिटेड नाहीय .>> कोबा ल्ट ब्लू पुस्तकात असे एक कॅरेक्ट र आहे.

हो मला पण
मी एकदम सिरियल मध्ये दाखवतात तसे तोंडावर हात ठेवून हा वगैरे केलेले आठवतेय Happy
झेन ने मुळात अती आत्मविश्वासात ते कर्ज घ्यायला नको होतं. त्यानंतर आलेले सर्व प्रश्न त्यानेच उभे केलेत. अगदी दिपीकाचा पण.
मुळात दोघे एकमेकांशी फ्लर्ट करतायत, एकमेकांशी संमतीने पण चुकीचे (एकाची फियान्स असतानाचे) संबंध ठेवतायत. असं असताना प्रेग्नन्सी कळल्यावर फक्त त्याला ब्लेम केल्यासारखं का वागावं? शिवाय तो 'आपण दोघे एकत्र बघू' म्हणतोय स्पष्ट, पण सध्या अडचण आहे, अर्जंट आहे सांगतोय तर थोडा वेळ द्यायला हरकत नाही. 'आताच्या आता सांग नाहीतर मी सांगते' वगैरे का?

(@ आंबटगोडः हो तो मुलगा म्हणजे दिपीकाचा आधीचा पार्टनर.)

आताच्या आता सांग नाहीतर मी सांगते' वगैरे का?>> तिला कसलीतरी वैयक्तिक कोंडी फोडून पुढे जायचे असावे. शिवाय अनन्न्या बद्दल हिडन जेलसी आहे कारण तिचे लाइफ स्टाइल शिक्षण वगैरे नीट झाले ती सुखात व लाडात आर्थिक सुबत्तेत मोठी झाली. आता तिला जे सर्वात महत्वाचे ते तिला हिरावुन घ्यायचे आहे जेणे करून अनन्याला दु:ख नावाचा अनुभव येइल तिला हर्ट करायचे आहे. असे असावे.

या धाग्यामुळे काल हा चित्रपट पाहिला. वन टाइम वॉच आहे. थोडा wannabe वाटला. म्हणजे सगळे issues दाखवायचे तर आहेत पण depth च नाही. मला खूप relate नाही झाला. पण अनेकांना होऊ शकतो. तरी पण एकूण सादरीकरण चकाचक असल्यामुळे बसल्या बैठकीत पाहून झाला. नाहीतर हल्ली मी सिनेमे पण २/३ सिटींग मध्ये बघते.
दीपिकाची टोन्ड बॉडी बघून एकदम envious ! पण आता वय जाणवते तिचे.. especially अनन्याच्या पुढे. तिचे कपडे तर फारच मस्त. इव्हन लव्ह सीन्सही काही फार ओव्हर नाही वाटले. एवढे तर हल्ली कॉमन हेत.
सर्वात सुंदर समुद्र व ते पनवेलचे घर !

एक फोन बुथ नावाचा सिनेमा आहे तो फार फार छान आहे. त्यात असेच एका माण सा च्या जीवनाचे विचारांचे पापु द्रे सोलत सोलत त्याला पार
मानसि क दृ श्ट्या विवस्त्र करुन टाकतो व्हिलन. ते ही फक्त फोन वर बोलुन त्यात असेच त्याचे वैय क्तिक स्वार्थी विचार शेवटी बाहेर येतात. व तो पार कोलमडून जातो. ह्या सिनेमाचे दिग्दर्शन फार उच्च आहे.

शिवाय तो 'आपण दोघे एकत्र बघू' म्हणतोय स्पष्ट, पण सध्या अडचण आहे, अर्जंट आहे सांगतोय तर थोडा वेळ द्यायला हरकत नाही. 'आताच्या आता सांग नाहीतर मी सांगते' वगैरे का?>>> अनेक जुळून येणार्‍या घटना बघितल्या तर दिपिकाला तो डबल गेम खेळतोय हे सारख वाटत राहतय.
अर्थात झेनने सगळ एकट्याने सॉर्ट करत राहण्यापेक्षा हे अस अस झालय हे सान्गितलेले जास्त बर झाल असत पण मग मुव्हीत इतक लॉजिकल घडल तर पुढचा ड्रामा कसा घडेल?

Pages